विद्या बाळ - लेख सूची

आगरकर आणि स्त्री

गोपाळ गणेश आगरकरांचे निधन झाले त्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.या विलक्षण ताकदीच्या माणसाला अवघे एकोणचाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले आणि त्यातही जेमतेम पंधरा वर्षांचा काळाचा तुकडा आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या हाती लागला. या अवधीमध्ये त्यांनी कितीतरी विषयांची, सखोल विचार आणि अभ्यास करून, मांडणी केली. त्यापैकी स्त्रियांच्या संदर्भात किंवा स्त्रीपुरुप-समतेच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या काही …