विष्णुशास्त्री चिपळूणकर - लेख सूची

मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत

इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणे हा जीवनाचाच एक उपाय होऊ पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचे तर यासारखे सध्यां दुसरें साधनच नाहीं. तेव्हा तिचा जो हल्ली फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढे वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी? इंग्लिश लोक आपल्या उत्कृष्ट …

भाषेच्या रचनेस यत्किंचितही अपाय नको

इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाहीं. हे तर काय पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठवले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पहाणा-या भाषेस जितकें होईल तितकें थोडे आहे! इतकेच मात्र कीं, ते ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखलें …