शिवप्रसाद महाजन, कुमार केतकर, लोकेश शेवडे - लेख सूची

नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा आणि प्रसारमाध्यमांतील नास्तिक्याची भूमिका

शिवप्रसाद महाजन : नास्तिक कायमच गंभीर असतो असा आपल्याकडे साधारणपणे बऱ्याचजणांचा समज असतो. किंवा बरेचजण तसे जाहीरपणे बोलतदेखील असतात. आपले सकाळपासूनचे कार्यक्रम बघितले तर त्यामध्ये चर्चासत्रं झालीत, परिसंवाद होतोय, काही गाण्यांचे कार्यक्रम झाले, नंतर एकांकिका आहे, रात्री पुन्हा गाण्याचे कार्यक्रम आहेत. तर असं काही नसतं की नास्तिक नेहमी गंभीरच असतो. तो सर्व क्षेत्रात आपापल्या परीनं …