श्रीकांत हलदुले - लेख सूची

श्रद्धा–अश्रद्धा घोळ

आपण अश्रद्ध आहोत याचा पराकोटीचा अभिमान-बहुतांशी गर्वच अस-लेल्या बऱ्याच माणसांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्यही पडते —-श्रद्धेला शास्त्रीय प्रमाण किंवा शास्त्रीय आधार नाही—- शास्त्रीय कसोट्यांवर श्रद्धा घासून पाहताच येत नाही यासारखी घासून गुळगुळीत झालेली विधाने तोंडावर फेकून सगळे अश्रद्ध लोक उरलेल्यांना गप्प करताना दिसतात. हजारो वर्षांपासून ज्यांना कुठल्याही टोप्या फिट्ट बसतात अशी भाबडी सश्रद्ध जनता …