श्रद्धा–अश्रद्धा घोळ

आपण अश्रद्ध आहोत याचा पराकोटीचा अभिमान-बहुतांशी गर्वच अस-लेल्या बऱ्याच माणसांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्यही पडते —-श्रद्धेला शास्त्रीय प्रमाण किंवा शास्त्रीय आधार नाही—- शास्त्रीय कसोट्यांवर श्रद्धा घासून पाहताच येत नाही यासारखी घासून गुळगुळीत झालेली विधाने तोंडावर फेकून सगळे अश्रद्ध लोक उरलेल्यांना गप्प करताना दिसतात. हजारो वर्षांपासून ज्यांना कुठल्याही टोप्या फिट्ट बसतात अशी भाबडी सश्रद्ध जनता हे निमूटपणे ऐकून घेते. ह्या विषयावर काही वेगळा विचार माझ्यापरीने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मुळात, लॉजिकल आणि रॅशनल या दोन शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर, लॉजिकल (1) of, relating to, involving, or being in accordance with logic. (2) formally true or valid : Analytic Deductive, or – capable of reasoning or of using reason in an orderly cogent [convincing] fashion. Rational :- (A) Having reason or understanding (B) Relating to or based on, or agreeable to reason! Reasonable किंवा साध्या सोप्या मराठीत लॉजिकल म्हणजे तर्कशुद्ध आणि रॅशनल म्हणजे सुज्ञ, समजदार. थोडक्यात, असा आभास सर्वसाधारणपणे उभा केला जातो की अश्रद्धांच्या मागे शास्त्राची किंवा Science ची ताकद लॉजिकल आणि रॅशनल अशा दोन प्रचंड मोठ्या तोफा घेऊन उभी आहे, तर सश्रद्ध बाजारबुणग्यांकडे मात्र हवेत हात फिरवून मारलेल्या गप्पांखेरीज काहीच नाही.
मुळात सायन्स अथवा शास्त्र म्हणजे काय? ते कसे तयार होते? उपलब्ध ज्ञानावर समोर असलेले पर्याय अथवा गृहीततत्त्व घासून पाहून त्यातील एकाची निवड आणि त्याद्वारे पुन्हा ज्ञानात भर अशी वाटचाल करणे आणि त्या गृहीततत्त्वांचे नियमांत रूपांतर करणे अशी शास्त्राची सर्वसाधारण ढोबळ व्याख्या केली जाऊ शकेल. पण शास्त्रीय ज्ञानाचे गृहीततत्त्व हे येते कुठून? तर निसर्गाकडून.
या मताला माझा विरोध आहे. निसर्ग फक्त प्रयोगांसाठी आवश्यक असलेली सामग्री उपलब्ध करून देतो. मग गृहीततत्त्व अथवा इंग्रजीत हायपोथिसिस म्हणतात, हे कसे तयार होते? लगेच सोपे उत्तर येते. अर्थात बुद्धिमान माणूस ते तयार करतो. प्रत्यक्षात मात्र शोध करताना फार वेगळ्या आणि धक्कादायक गोष्टी पुढे येतात. गृहीततत्त्व हे जर प्रयोगासाठी म्हणून एक उपयुक्त सूत्र किंवा दिशा मानली आणि त्यावर शास्त्रीय प्रयोगाला सुरुवात केली तर ते गृहीततत्त्व सिद्ध करण्यासाठी घासून, पारखून घ्यायला अनेक पर्याय अथवा वेगवेगळ्या परीक्षणपद्धती समोर उपलब्ध असतात. पैकी उपलब्ध असलेल्या गृहीततत्त्वांपैकी एक निवडून प्रयोग करताना त्यातूनच पुन्हा अनेक पर्याय, शक्यता आणि नवीन गृहीते तयार होतात. शास्त्राचा किंवा शास्त्रीय पद्धतीचा मूळ हेतूच हा आहे की उपलब्ध असलेल्या सर्व पर्याय, शक्यता किंवा गृहीतांमधून एकाची अंतिम निवड करता यावी. पण जर तुमच्या अत्यंत तोकड्या प्रयोगपद्धतीच्या समोर सहस्रपटींनी अत्यंत वेगात वाढत जाणारे पर्याय, गृहीततत्त्व, शक्यता समोर येत असतील, तर हे सर्व तपासून त्यातून एकाची अंतिम निवड करून मग पुढे वाटचाल हे निखळपणे अशक्य आहे.
आपण शास्त्राचा इतिहास बघितला — इथे मी मुद्दाम शास्त्राच्या प्रगतीचा इतिहास असे म्हणत नाही हे कृपया लक्षात घ्या, तर या इतिहासामध्ये असे नि िचत लक्षात येईल की जुन्याच उपलब्ध असलेल्या वस्तुस्थितीची किंवा फॅक्टस्ची कायम नवीनवी बदलत जाणारी उत्तरे मिळत राहणे हाच इतिहास आहे. काही शास्त्रीय सत्ये अनेक शतके टिकतात तर काही एखादा वर्षच. शास्त्रीय सत्य म्हणजे कुठेही काळ्या दगडावरची रेघ नसून ती एक कायम बदलत जाणारी तात्पुरती स्थिती आहे, तिचा अभ्यास माझ्यासारखा सामान्य सश्रद्ध माणूस सुद्धा करू शकतो. १८ व्या शतकातील शास्त्रीय सत्ये बराच काळ अबाधित राहिली याचे कारण उपलब्ध गृहीतांवर प्रयोग करण्याची अत्यंत तोकडी ताकद हे आहे. २० व्या शतकात ही ताकद वाढल्यावर ही बहुतांश शास्त्रीय सत्ये निकामी ठरली. पुढच्या शतकात हीच ताकद कमीतकमी १० पटीने वाढली असे गृहीत धरले तर शास्त्रीय सत्याचे आयुष्य आजच्या एक दशांश सुद्धा नसेल. अशा प्रकारे अमुक अमुक एक गोष्ट शास्त्रीय सत्य आहे हे ठाम विधान बोलून पूर्ण होण्याइतके सुद्धा आयुष्य त्या शास्त्रीय सत्याला लाभणार नाही असा काळ येईल. कारण मुळात शास्त्रीय पद्धतीचा हेतूच सगळी गृहीतके तपासून मग त्यांतून एकाची योग्य ती निवड हा आहे. पण उपलब्ध असलेल्या अनेक गृहीततत्त्वांमधून एक योग्य गृहीत निवडण्याऐवजी शास्त्र त्या गृहीततत्त्वांची संख्याच दहा, शंभर किंवा सहस्रपटीने वाढवत नेते. याचाच तर्कशुद्ध अर्थ असा होतो की शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून आपण एका न बदलणाऱ्या अंतिम सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्षात मात्र आपण शास्त्रीय पद्धतीच्या वापरामुळे त्यापासून दूरच जात असतो. अनेक गृहीत सत्यांमधून एकाची निवड हाच शास्त्राचा हेतू असताना शास्त्राचा इतिहास मात्र त्याची बरोबर विरुद्ध बाजूच शाबीत करतो. उपलब्ध असलेल्या गृहीत सत्यांचे अगणित गुणाकार अत्यंत वेगाने मिळणारी नवीन माहिती, समीकरणे आणि गृहीततत्त्वे या सगळ्यांचा परिपाक असा दिसतो की शास्त्रानेच आम्हाला कुठल्याही क्षेत्रात मूळ, अंतिम सत्यापासून कायम दूर ठेवले आहे असे दिसते.
कुठल्याही विचारात किंवा मूल्यांमध्ये नको असलेल्याचा त्याग करून काही गोष्टींचे शाश्वत मूल्य शोधणे हा शास्त्राचा मूळ हेतू असताना कुठल्याच विचारांचा पक्केपणा होण्यात हीच शास्त्रीय पद्धत आडवी येत असल्यामुळे अनेकदा सामाजिक गोंधळ निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा शेवटी,
अॅल्बर्ट आईनस्टाईन नावाच्या तरुण शास्त्रज्ञाने १९१८ साली दिलेल्या व्याख्यानातल्या काही मुद्द्यांचा उल्लेख कस्न मी माझे कथन संपवतो.
(1) The state of mind which enables a man to do work of science is akin to that of the religious worshipper or lover. The daily effort comes from no deliberate intention or programme, but straight from the heart.
(2) Man tries to make for himself in the fashion that suits him best a simplified and intelligible picture of the world. He then tries to some extent to substitute this cosmos of his for the world of experience, and thus to overcome it . . . He makes this cosmos and its construction the pivot of his emotional life in order to find in this way the peace and serenity which he cannot find in the narrow whirlpool of personal experience. . . . The supreme task . . . is to arrive at those universal (elementary) laws from which the cosmos can be built up by pure deduction. There is no logical path to these laws; only intuition, resting on sympathetic understanding of experience, can reach them . . . सायन्स, लॉजिक, रॅशनॅलिटी, म्हणा की, कोपर्निकस, गॅलिलिओ यांच्यासारखे शास्त्रज्ञ म्हणा त्यांच्या पार्श्वभूमीवरती श्रद्धा, किंवा श्रद्धेतून निर्माण झालेली निवड या सगळ्यांचाच पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे हे नोंदवून मी हे टिपण मी संपवतो.
G. T. PVT. LTD., Kapadia Bungalow, Opp. Kalika Mandir, Old Agra Road,
NASIK – 422 002

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.