संकलन - अनुराधा मोहनी - लेख सूची

मी अश्रद्ध का आहे? (प्रश्नकर्ते पॉल क्रूझ यांना श्रद्धांजली)

अमेरिकेतील निधर्मी, मानवतावादी तत्त्वचिंतक पॉल कुर्झ ह्यांचे नुकतेच निधन झाले. विविध प्रकारच्या विज्ञानातील निराधार अपसमज, गूढवाद, बुवाबाजी, प्रसारमाध्यमांतील भोंदूगिरी आणि सर्व रूपांतल्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा ह्यांचा बीमोड करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. परमेश्वराच्या संकल्पनेशिवाय निकोप सामाजिक व नैतिक आयुष्य जगण्यासाठी युप्रैक्सोफी नामक विज्ञानाधिष्ठित पर्याय त्यांनी लोकांसमोर ठेवला. पॉल कुर्झ हे नामांकित लेखकदेखील होते. …

कारागृहातील महिलांची स्थिती

दि.3 एप्रिलच्या हिंदू ह्या दैनिकामध्ये दिव्या त्रिवेदी ह्यांनी कारागृहांमध्ये होणारी महिला कैद्यांची छळणूक ह्या विषयावर एक छोटासा लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे – सर्व कारागृहे सोनी सोरींनी भरली आहेत. ह्या लेखात महिला कैद्यांना दिलेल्या बेकायदेशीर, अमानुष वागणुकीचे किस्से कचन केले आहेत. त्यातील काही आसु च्या वाचकांसाठी देत आहे. 1. तिहार कारागृहाच्या वार्ड क्र.8 च्या …