कारागृहातील महिलांची स्थिती

दि.3 एप्रिलच्या हिंदू ह्या दैनिकामध्ये दिव्या त्रिवेदी ह्यांनी कारागृहांमध्ये होणारी महिला कैद्यांची छळणूक ह्या विषयावर एक छोटासा लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे – सर्व कारागृहे सोनी सोरींनी भरली आहेत.
ह्या लेखात महिला कैद्यांना दिलेल्या बेकायदेशीर, अमानुष वागणुकीचे किस्से कचन केले आहेत. त्यातील काही आसु च्या वाचकांसाठी देत आहे.
1. तिहार कारागृहाच्या वार्ड क्र.8 च्या वॉर्डनशी थोडी वादावादी झाल्यामुळे जोहरा बरताली हिला ओटीपोटात जबरदस्त गुद्दे मारण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून तिला एक महिनाभर रक्तस्राव होत होता. शेवटी त्यातच तिचा अंत झाला. ही घटना एका दशकापूर्वीची.
2. गेल्या वर्षी सीमा सिंग हिला जयपुर येथील पोलीस ठाण्याच्या आत तीन पोलिसांकडून जबर मारहाण व लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा धक्का सहन न झाल्यामुळे सौमा सिंग हिने रेल्वे गाडीखाली जीव देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तिला मृत्यू आला नाही. परंतु ती कायमची अपंग झाली. तशाही परिस्थितीत पोलीस तिला अटक करण्यास चुकले नाहीत. बरोबर आहे. आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हाच ना. गेल्या महिन्यात तिच्या जामीनअर्जाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली, पुन्हा एकदा.
3. शास्त्रज्ञ व मानवी हक्क कार्यकर्ती असलेल्या निशाने प्रथम तुरुंगात पाऊल ठेवले तेव्हा तिला आयुष्यातील सर्वांत वाईट, लज्जास्पद प्रकाराला सामोरे जावे लागले होते. तरी तिच्या शहरी रूपामुळे त्यातले सौम्य प्रकारच तिच्या वाट्याला आले होते म्हणे.
4. काही महिलांना सॅनिटरी पॅडस म्हणून उधई लागलेली ब्लँकेट्स् दिली होती. अनेकदा ह्या महिलांना अनावश्यक अशी गर्भचाचणीही करून घ्यावी लागते. तिथे अनेक पुरुष उपस्थित असतात आणि हातमोजे न बदलताच अनेकींची गर्भचाचणी केली जाते.
5. गेल्याच महिन्यात, पोलीस कस्टडीतील महिला कैद्यांवर अत्याचार ह्या विषयावर दिल्ली येथे अखिल भारतीय बैठक घेण्यात आली. तेथे झालेल्या चर्चेतून अशा महिलांची दुर्दशा तीव्रपणे समोर आली आहे. वास्तविक अशा हिंसाचारास कोणताही कायदा संमती देत नाही. तरीदेखील हा रोजचा प्रकार होऊन बसला असल्याचे सोनी सोरी प्रकरणातून उघड झाले आहे. बैठकीतील वक्त्यांनी, स्त्रीच्या लैंगिकतेचा, तिला छळण्यासाठी आणि गुन्हेगार ठरवण्यासाठी गैरफायदा घेतला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पोलीस रिपोर्टमध्ये ह्या महिलांना वाईट चालीच्या असे संबोधले जाते. ह्या देशातील 99.9 महिला कैदी ह्या दलित. आदिवासी व अल्पस समाजातील आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
6. ट्रेड युनियन कार्यकर्ती अनू हिने सांगितले की, कारागृहात वर्गानुसार भेदभाव मोठया प्रमाणावर केला जातो. कपडेलत्ते व राहणीमान यांच्यावरून जर तुम्ही वरच्या वर्गातील वाटलात, तर तुम्हाला जास्त काम सांगितले जात नाही. इतरांना मात्र अक्षरशः नाचवले जाते. ऐंशी वर्षांच्या म्हातारीलाही हे लोक सूट देत नाही कारागृहात पाऊल टाकताक्षणीच तुम्ही गुन्हेगार आहात असे भासवून भीतीचे वातावरण तयार केले जाते. ह्या भयगंडातूनच स्त्रिया अपमान व अवहेलना ह्यांना बळी पडतात.
8. कारागृहाच्या गजांआड भ्रष्टाचाराचा सुकाळ असतो. तिहारमध्ये वाजतगाजत बसवण्यात आलेला सौरऊर्जा प्रकल्प आजतागायत सुरू झालेला नाही. लंगरहन न्यू आणलेल्या गरम पाण्याच्या बादलीला 10 रुपये मोजावे लागतील. कारागृहाच्या आत एका मोबाईल फोनला 15.00 रु., चार्जरला 2000 रुपये, सिमकार्डला 1500 रु. पडतात. ते केवळ धनदांडग्या कैद्यांनाच परवडू शकतात, आणि कॅन्टीनचे रुचकर जेवणही.
9. तिहार अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. दोनशे पन्नास व्यक्तींसाठी असलेल्या ह्या तुरुंगात 500 जण भरले आहेत. जागेसाठीची विद्रूप भांडणेही नेहमीचीच आहे. एखाद्या महिलेवर गन्ह्याचा आरोप असला, तर तिच्या सासलाही-कठल्यातरी कानाकोपऱ्यातून उचलून-लॉकअपमध्ये टाकले जाते. संपूर्ण कुटुंबच तुरुंगात खितप्पा पडते. तेथे 5-6 वर्षे राहणाऱ्यांनाही, आपल्याला कशासाठी उचलण्यात आले होते
ते माहीत नसते.
10. जादा कैदी भरलेला तिहार हा काही देशातील एकमेव तुरुंग नाही. जगदलपूरच्या तुरुंगात नक्षलवादी प्रकरणात पकडलेल्या 132 महिला आहेत. त्यांना तेथे कोंकून ठेवले आहे. कधीकधी 6 जणींच्या खोलीत 20-30 जणींना ठेवले जाते. काही तुरुंगांमध्ये सर्व महिला कैद्यांसाठी एकच शौचकूप असतो… तोही दरवाजा नसलेला आणि पुरुष पहारेकर्त्यांना दिसणारा…. या
11. कायद्यानुसार पोलिसांना सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी महिलांना अटक करता येत नाही, परंतु भोपाळमधील पारधी समाजाच्या कचरावेचक महिलांना कोणत्याही वेळी. कशीही अटक केली जाते. पारधी समाज हा अजूनही गुन्हेगार समाज म्हणूनच ओळखला जातो आणि आसपास घडलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी त्यांनाच दोषी धरले जाते. आपले सर्वोच्च न्यायालय मानवी हक्क, महिलांची प्रतिष्ठा यांवर वा मोठ्या बाता मारत असले, तरी प्रत्यक्षात पोलिसठाण्यांमधील वस्तुस्थिती त्याहून खूपच वेगळी आहे. कोणत्याही सभ्य लोकांत घडू नयेत असे हे प्रकार आपल्या समाजाच्या दुटप्पी नीतीवरच प्रकाश पाडत नाहीत का?
सोनी सोरी ही छत्तीसगढ येतील आदिवासी शाळा शिक्षिका. नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवून तिला रायपूर जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ऑक्टोबर 2011 पासून तेथे असलेली सोनी पोलिसछळाचे प्रतीक बनून राहिली आहे. उच्च न्यायालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, तिच्या योनिमार्गातून 2 व गुदद्वारातून 1 खडा (दगड) घुसवण्यात आला होता. तत्पूर्वी, पोलिसठाण्यात पोलिस अधिकारी अंकित गर्ग ह्यांच्या आदेशानुसार तिला त्यांच्यासमोर विवस्त्रावस्थेत उभे करण्यात आले. तेव्हा ते खुर्चीत बसून तिच्यावर गलिच्छ शेरेबाजी करीत होते. त्यानंतर तीन जणांनी तिच्याजवळ येऊन तिला…’
मा. राष्ट्रपतींनी जानेवारी 2012 मध्ये अंकित गर्ग ह्यांना पोलिसशौर्यपदक बहाल केले.
शिरपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.