संजीवनी कुळकर्णी - लेख सूची

पुस्तकपरिचय गेम्स इंडियन्स प्ले (व्हाय वी आर द वे वी आर) – लेखक – वी. रघुनाथन

एखाद्या पुस्तकाचे नावच आपल्याला इतके वेधक वाटते की वाचावेसेच वाटते, आणि एकदा वाचू लागलो की सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते आपल्याला सोडत नाही. गेम्स इंडियन्स प्ले हे पुस्तक या प्रकारचे आहे. आपण भारतीय माणसे असे का वागतो? असे म्हणजे कसे, तर भर रस्त्यावर कुणाला मारले जाते, कुणावर बलात्कार केला जातो, पण एकही माणूस अडवायला तर जात नाहीच, …

व्याघेश्वरीचे पुराण

या वर्षाच्या सुरुवातीला Battle Hymn of the Tiger Mother नावाचे एक पुस्तक ब्लूम्सबरी पब्लिशिंग तर्फे बाजारात आले आहे, आणि बालसंगोपनाबद्दलचे पुस्तक म्हणून बहुवितरितही होते आहे. त्या पुस्तकाच्या लेखिका अॅमी चुआ ह्या मूळ चिनी वंशाच्या आणि त्यांच्या वडलांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या दोघी मुलींना खास चिनी पद्धतीने शिस्तीच्या धारेवर धरून कसे वाढवले, आणि मुलांना …