पुस्तकपरिचय गेम्स इंडियन्स प्ले (व्हाय वी आर द वे वी आर) – लेखक – वी. रघुनाथन

एखाद्या पुस्तकाचे नावच आपल्याला इतके वेधक वाटते की वाचावेसेच वाटते, आणि एकदा वाचू लागलो की सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते आपल्याला सोडत नाही. गेम्स इंडियन्स प्ले हे पुस्तक या प्रकारचे आहे.
आपण भारतीय माणसे असे का वागतो? असे म्हणजे कसे, तर भर रस्त्यावर कुणाला मारले जाते, कुणावर बलात्कार केला जातो, पण एकही माणूस अडवायला तर जात नाहीच, पण नंतर साक्षही द्यायला तयार नसतो. आपण एखाद्या रांगेत उभे असतो; अचानकपणे कुणी स्थानिक पुढारी त्याच्या चार-पाच कार्यकत्यांसह तिथे येतो. रांगेची शिस्त, न्याय वगैरे गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नसतात. तो सरळ पुढे जातो. त्याचे काम करून घेतो. ‘आम्ही काय इतका वेळ मूर्ख म्हणून…’ असा विचार आपल्या मनात येतोही, पण ते कोण आहेत माहीत आहे ना, ते अमुकतमुक आहेत, त्याचे पित्ते रांगेला बजावतात. आपण गप्प बसतो.
सरकारी कार्यालयांमध्ये एखादे काम करून घ्यावचे तर चपराशापासून साहेवापर्यंत सगळ्यांचे हात ओले करावे लागणार, ही गोष्ट आपण वस्तुस्थिती म्हणून मान्य करतो. आपल्याला कायद्यांची, नियमांची महिती नसल्यामुळे आपले चुकले, असे होऊ नये म्हणून पैसे देऊन घेतलेली चार्टर्ड अकाउंटंट्स, वकील ही मंडळीच आपल्याला हे विशेष मार्गदर्शन करतात. खरे तर, हे योग्य नाही, पैसे घेणाऱ्यांप्रमाणे देणाराही चूकच असतो, हे का
आपल्याला माहीत नसते? मग तरीही का वागतो आपण असे?
आपली सार्वजनिक स्वच्छतेची कल्पना इतकी गलिच्छ का आहे? आपण घरातला कचरा रस्त्यावर बिनदिक्कतपणे कसा फेकतो? रस्त्यावर धुंकणे हा आपल्याला लोकशाहीने दिलेला जन्मसिद्ध हक्क का वाटतो? ताजमहालावर स्वतःचे नाव कसे लिहितो, ग्रंथालयातल्या पुस्तकातले पान कसे फाडतो? एकेक रस्ते बांधायला आपल्याला इतकी वर्षे का लागतात? एकंदरीने वेगवान आणि दर्जेदार कामाची आच आपल्याला अगदीच कशी नाही? सार्वजनिक संसाधनांची नासाडी का करतो? पहाटे तीन वाजता रस्त्याने भोरे वाजवत बाहर का चालवतो? चौकावर लालदिव्याचा नियम न मानता ‘सदैव सैनिका’ वृत्तीने पुढेपुढेच कसे जातो? इत्यादी इत्यादी….
खरा प्रश्न लेखकाने पुढे विचारला आहे की सामान्यपणे बहुतेक माणसे जर अशीच वागत असली, आणि पुढेही वागणार असली, आणि या वागण्याला जर शंभर कोटींनी गुणायचे असले तर आपल्या हाती काय येणार?
एकच प्रश्न, आपण असे का वागतो? का?
हा प्रश्न या शब्दांत नसेल तरी भावार्थाने आपल्यापैकी बहुतेकांनी निदान मनातल्या मनात विचारलेला असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्यात एकाअर्थी नवीन काहीच नाही. आपले रोजचे वास्तवच आहे ते. नवीन आहे ते त्या प्रश्नांकडे बघण्यासाठी लेखकाने
वापरलेली गेम थियरी.
गेम थियरी म्हणजे काय? शब्दार्थापासून बघायचे तर जेव्हा व्यक्तीचे निर्णय इतरांच्या वागणुकीवर अवलंबून असतात अशावेळी जास्तीतजास्त फायदेशीर निर्णय कसा घेता येतो याचे गणिती विश्लेषण. .
एखाद्या परिस्थितीत आपण कुणीही काही निर्णय घेत असतो. असा निर्णय घेताना आपल्यासमोर काही पर्याय असतात. त्यातला नेमका कोणता घ्यायचा, कोणता सोडायचा हे ठरवण्यामागे ज्या त्या व्यक्तींचा काहीतरी विचार असतो. या निर्णयावर इतरांच्या आसपास असण्याचा, त्यांनी घेतलेल्या किंवा घेऊ शकतील अशा निर्णयांचा, परिणाम असतो. कोणता पर्याय घेतला तर आपल्याला फायदा होणार आहे, आपल्या फायद्यासह र्दुसऱ्या कुणाचे नुकसान होणार आहे की त्यांचे उखळ बिनकष्टात पांढरे होणार आहे; आणि समजा आपण दुसरा पर्याय स्वीकारला तर आपले नुकसान होईल हे खरे पण त्यासोबत दुसऱ्या व्यक्तीचे जास्त किंवा कमी नुकसान होईल का? इत्यादी विचार प्रत्येक जण करत असतो. आणि त्यानुसार निर्णयही घेतो. कोणत्या परिस्थितीत, विशिष्ट सामाजिक परिवेशात व्यक्ती कुठला निर्णय सामान्यपणे घेईल ह्याचा अभ्यास करून त्यावरून अंदाज बांधणे हा गेल्या पंचवीस-तीस वर्षांत संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय झालेला आहे. तो इतका की सुरुवातीला युद्धशास्त्रात आणि अर्थशास्त्रात असलेल्या या विषयाचा वापर आता अनेक बहदा सगळ्याच ज्ञानशाखांमध्ये विस्ततपणे केला जातो. स्वतः लेखकाचे गेम थियरीवर प्रभुत्व आहे, आणि त्याच्या अर्थशास्त्रातील वापराबद्दलचे अध्यापन त्यांनी अनेक वर्षे केलेले आहे.
प्रत्येकवेळी वेळ देऊन विचारविनिमय करून माणसांचे रोजचे निर्णय होत नाहीत, आधीच्या अनुभवावरून, तर्काने आणि आवश्यक व शक्य असेल तर गणित, संख्याशास्त्र, अशा काही पूर्वज्ञानाचा वापर करून ते निर्णय घेतात. त्यात सुसंगती असते तशी विसंगतीही असतेच, व्यक्तिगत क्षमतांशिवाय प्रतिष्ठा, स्वार्थ, स्पर्धा, सहकार्य, सर्व मंगलाची आस ह्या आणि अशा अनेक गोष्टी त्यात येतात. तर हे निर्णय सामान्यपणे काय असतात, कसे घेतले जातात याचा विचार गेम थियरीत होतो. सामान्यपणे माणसे तर्कशुद्ध वागतात. अर्थशास्त्राच्या संदर्भातून पाहिले तर जेवढा धोका पत्करतात त्या प्रमाणात त्यातून अधिक फायदा सुटेल अशी अपेक्षा ठेवतात. म्हणजे तर्कपूर्ण हिशेबीपणानेच वागतात. अगदी त्यागाच्या कृतीतूनही आनंद आणि समाधान हवेच असते, म्हणजे इथेही स्वार्थाचा विचार अगदी वेगळेपणाने पण तरीही दिसून येतो. हा स्वार्थ स्वतःपुरता असेल किंवा आपण ज्या समाजाचे घटक म्हणवतो त्या समाजगटासाठी किंवा व्यापक समाजासासाठीही असेल. भारतीय मनोवृत्तीचे गेम थियरीच्या पद्धतीने विशेष असे विश्लेषण केले गेलेले नाही; पण भारतात दिसणारा सार्वजिनक स्वच्छतेबद्दला निष्काळजीपणा; आपले काम करून घेण्यासाठी चिरीमिरी देण्याची सहजवृत्ती आणि नियम-कायद्यांमधून पळवाटा शोधण्याची विशेष गुणवत्ता पाहताना असे का होत असावे असा प्रश्न पडून त्याचे विश्लेषण गेम थियरीच्या चौकटीतून करून या पुस्तकात मांडले आहे. हे संशोधन म्हणावे असे नाही. बरेच असे सहजनिरीक्षण आहे. तसे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेही आहे. नाही म्हणायला शक्य झाले तिथे अनेकदा सहज भेटलेल्या विद्यार्थी-मित्र-मंडळी यांच्या सोबत आपली गृहीतके तपासून घेतलेली
आहेत.
कुशाग्र बुद्धिमत्तेचा विचार केल्यास भारतीय लोक जगातल्या कुठल्याही समाजाहून जराही कमी नाहीत. याबद्दल लेखकाच्या मनात संदेह नाही; पण ही बुद्धिमत्ता कायद्यातल्या फटी शोधण्यासाठी, कुणाला फसवण्यासाठी, आपण का वापरतो असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक जणू काही लेखक आपल्याला भेटलेला आहे आणि आपण त्याच्याबरोबर या विषयावर चर्चा करत आहोत असेच वाटते.
प्रिझनर्स डायलेमा असे नाव दिलेली एक द्वन्द्वात्मक परिस्थिती गेम थियरीत विचारात घेतली जाते. ते फार मजेशीर आहे. समजा एका गुन्ह्यात पकडल्या गेलेल्या दोन कैद्यांना एकमेकांशी बोलायला न देता भाफीचा साक्षीदार होण्यासाठी विचारले तर प्रत्येकासमोर स्वतःचा वाचवण्यासाठी माफीचा साक्षीदार होऊन दुसऱ्याचा विश्वासघात करणे किंवा जबाबदारी स्वीकारून गप्प बसणे असे दोन पर्याय असतात. त्यातला कोणता निवडावा याचा संभ्रम त्याच्या मनात असतो. दोघेही गप्प राहिले तर दोघांनाही कमी शिक्षा होईल. एकाने माफीचा साक्षीदार होणे स्वीकारले तर त्याला शिक्षेत संपूर्ण सूट आणि दुसऱ्याला मात्र जास्त शिक्षा होईल. तसेच दोघांनीही माफीची साक्षीदारी दिली तर मात्र दोघांनाही मोठी शिक्षा मिळेल. आता या पिरिस्थितीत फायद्यातोट्याचा विचार केला तर दोघांनाही थोडी शिक्षा हा सर्वांत फायदेशीर पर्याय आहे. पण त्यासाठी दोघांनाही वैयक्तिक स्वार्थ सोडावा लागतो. तर अशा संभ्रमावस्थेत कोणता निर्णय घेतला जाईल आणि त्याचे परिणाम काय होतील हे गेम थियरीतील एक प्रसिद्ध रूपक रघुनाथन यांचे विशेष आवडते असावे. ते अनेक प्रकारे संभ्रमावस्थेच्या विविध प्रसंगांमध्ये त्यांनी वापरून दाखवले आहे.
भारतीय मनोवृत्तीत. आपला फायदा आणि त्यातून दुसऱ्याचा तोटा होत असेल तर तो पर्याय सहजपणे स्वीकारला जातो. याशिवाय स्वतःचा फायदा साधताना किंवा कधीकधी तोही नसला तरी सार्वजनिक व्यवस्थेचा तोटा होण्याबद्दल काहीही तमा ते बाळगत नाहीत. कुठलीही व्यवस्था – तिचे नियम न पाळणेही भारतीयांची विशेषता असल्याचे लेखकांना दिसते. तसेच प्रत्येक गोष्टीबद्दल भरपूर बाष्कळ बडबड करणे आणि त्या बडबडीलाच आपण त्या मुद्द्यावर काम करतो आहोत असे मानणे ही भारतीयांची खासियत आहे. त्यांना प्रश्न, अडचणी कळत नाहीत असे नाही पण मी एकटा काय करू शकणार असे म्हणून ते स्वतःची सुटका करून घेतात. लेखकाने नुसते काहीच म्हटलेले नाही. आपल्या सर्वांना माहीत असलेल्या प्रसंगांची उदाहरणे सर्वत्र दिलेली आहेत.
कुठलीही व्यवस्था भारतीय मानतच नाहीत. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे कुठलीही व्यवस्था परिपूर्ण नसतेच, त्यात कुठे ना कुठे फटी असतातच. कितीही चांगली व्यवस्था रचली तरी तिच्या नजरेतून क्वचित अयोग्य काहीतरी निसटतेच, किंवा योग्य गोष्टीची बूज ठेवली जात नाही, असे होतेच. समजा असे घडले तर काय करावे, एकतर असे क्वचित होणारच म्हणून मान्य करावे, किंवा व्यवस्था अधिक सक्षम व्हावी म्हणून प्रयत्न करावे; भारतात ह्यांपैकी काहीही न होता, मोठा आरडाओरडा केला जातो आणि तो योग्य वा अयोग्य वाटलेला निर्णय बदलवून घेतला जातो. व्यवस्थेत मात्र कोणताही बदल केला जात नाही. हा तिसराच पर्याय अगदीच बुचकळ्यात पाडणारा आहे. कारण त्यामध्ये व्यवस्थेला काही किंमतच नाही. ती दुरुस्त करण्याचे काही कारणच नाही. एका क्रिकेटवीराला निवडसमितीने बाद ठरवले, आणि त्याच्या चाहत्यांना ते पटले नाही. त्यांनी आरडाओरडा केला. निर्णय बदलून घेतला. आपल्याला त्यात चूक आढळली की ती दुरुस्त करून घ्यायची बस्स. शिवाय चूक कशाला म्हणायचे याचे नियम प्रत्येकाचे स्वतंत्र! म्हणजे व्यवस्थेला जसा काही अर्थ नाही. अनेक उदाहरणे देऊन लेखक म्हणतात, ‘आपण जवळजवळ कुठलेही नियम नसलेल्या समाजात राहतो, आणि शंभराहून अधिक कोटींच्या देशाला काहीही नियम नसताना कसे राहता येईल, त्यांना नियम असण्याची गरजच आहे, अगदी लहानग्याला दुधाची गरज असते तितकी.’
एका बाजूला व्यवस्थाच न मानणाऱ्या आपल्या समाजात जाती, धर्म, लिंग यांच्या पारंपरिक चौकटी आणि त्यातल्या व्यवस्था मात्र काळ्या दगडावरच्या रेषांसारख्या ठाशीवपणे सरूच राहतात. नव्या काळाबरोबर बदलायला अजिबात तयार नसतात. असे कसे होते. तिथे का अतार्किकता सरसहा दिसत असताना प्रश्न उठवले जात नाहीत त्याबद्दल प्रश्न लेखकाने विचारलेला आहे.
यावर उपाय काय यावर विचार मांडताना लेखकाने म्हटले आहे की आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपला स्वधर्म जागृत असायला हवा, या निष्कर्षाकडे येताना स्वधर्म म्हणजे काय ह्या प्रश्नाबद्दलचा ऊहापोह त्यांनी केलेला आहे. आपले काम, आपली जबाबदारी, हा आपला स्वधर्म हे सविस्तर सांगून शेवटच्या प्रकरणात लेखकाने गीतेचा संदर्भ घेतला आहे. गीतेत हजारो वर्षांपूर्वी आपला स्वधर्म आपण कसा पाळायला हवा हे ज्या देशात सांगितले गेले, हे स्पष्ट करून त्याच देशातली माणसे ते आता कशी विसरत आहेत, ह्याकडे लक्ष वेधले आहे. ते विसरू नये यासाठी नेमके काय करायला हवे तेही सांगण्याचा यत्न केलेला आहे.
उपसंहारात लेखकाने त्याचे दुःख व्यक्त करायला एक कविताच लिहिली आहे. आपल्याला सगळे येते, आपण मनात आणले तर काहीही करून दाखवू शकतो पण काहीच कसे जमत नाही. बरे! आपल्याला. अशा आशयाची ही कविता आहे. इतकेच नाहीतर पुस्तकाचा शेवट करताना रवीन्द्रनाथ ठाकुरांची Where the mind is with out fear ही कविता Where the neighborhood is without filth अशी बदलून दिली आहे.
हे पुस्तक मला आवडले ते त्याच्या वेगळेपणानेच. एकतर, लेखकाला जे काही म्हणायचे आहे ते खरोखरच मनापासून. संपूर्ण पुस्तक काहीशा हसऱ्या खेळकर भाषेत मांडलेले आहे. हा हसरेपणा कधी खोचकपणे संताप-उद्वेगाच्या वाटेने जाऊ लागतो खरे, पण तेही ही परिस्थिती बदललीच पाहिजे याबद्दलच्या अतीव उमाळ्यानेच. त्यासाठी वापरलेला गेम थियरीचा संदर्भ मला व्यक्तिशः फार वेधक वाटला. केवळ असे वागू नका असा उपदेश करून काहीच साधले नसते. पण माणसांच्या निर्णय घेण्याच्या वृत्तीचे विश्लेषण करत करत त्यांनी केलेले भाष्य वाचकांवर अधिक सहज परिणाम करेल असे मला वाटते.
हे पुस्तक वाचताना आपल्याला त्रास होतो पण तो वेगळा. स्वतः लेखक समोर बसून हे बोलले असते तर ‘अक्षरशः आणि अगदीच’ याशिवाय आपल्याला काहीच म्हणता आले नसते. हा त्रास पुस्तक न वाचल्याने टळेल असा नाही. त्यापेक्षा वाचावे. नाही म्हणायला या विषयावर अशाप्रकारे कविता लिहिणे हा मार्ग मला अनुरूप वाटला नाही. विषय आपल्याला सर्वांना हृदयात तुपत राहावा असा आहे. तो कवितेच्या रूपाने मांडल्यावर त्यातले शब्द, अर्थ आणि त्यांची नक्षी यांत वाटणारा उगाचच अडकून राहील त्याची काहीच जरूरी नाही. पण तो लेखकाचा निर्णय आहे.
अमृता क्लिनिक, संभाजीपूल कोपरा, कर्वे रस्ता, पुणे – 477 004.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.