संपादक-१९९१ - लेख सूची

धर्मनिरपेक्षता: काही प्रश्न

मार्च १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या संपादकीयात जाहीर केल्याप्रमाणे त्यात उल्लेखिलेल्या दोन विषयापैकी धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) ह्या विषयावरील परिसंवादाची रुपरेषा दाखवणारी प्रश्नावली खाली देत आहोत. तिच्यावरुन विषयाच्या अपेक्षित व्याप्तीची कल्पना येइल. ही प्रश्नावली आमचे मित्र डॉ. भा. ल. भोळे व श्री. वसन्त पळशीकर यांनी ‘आजचा सुधारक’साठी तयार केली आहे. त्याचे आम्ही आभारी आहोत. पुढील अंकामध्ये ‘मार्क्सवादाचे भवितव्य’ …