सदानंद मोरे - लेख सूची

सेक्युलॅरिझमचा अर्थ

एकनाथांचे तत्त्वज्ञान हे धर्माधर्मांमधील सामंजस्य वाढून त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संवाद सामंजस्यासाठी ते या दोन्ही धर्मांची गुळमुळीत तरफदारी करीत नाहीत. त्यांच्यातील मूलतत्त्ववादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत नाहीत. आपल्या संविधानातील सेक्युलॅरिझम या तत्त्वाची ओढाताण करीत बुद्धिवाद्यांनी त्याचा धर्मउच्छेदक अर्थ लावला तर सर्वधर्मसमभाववाद्यांनी त्याचा अर्थ शासनाने धर्मांत साक्षेप न करता सर्व …

अंधश्रद्धा निर्मूलन हा वारकऱ्यांचा धर्मच!

(अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक आणि वारकरी या मुद्द्यावरून काही जण वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असले तरी वारकरी ज्याला अनुसरतात त्या भागवत धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही. उलट समाजातल्या अशा अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे कामच या धर्माने शतकानुशतके केले आहे. त्या संदर्भातले विवेचन. ) राज्यातील अंधश्रद्धेचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत यावा, या चांगल्या उद्देशाने अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने कायद्याचा मुद्दा …