सदाशिव आठवले - लेख सूची

प्राचीन भारतीय कल्पना

प्राचीन भारतीयांनी इतिहासलेखन असे फारसे केलेच नाही. तथापि इतिहासाविषयी, कालप्रवाहाविषयी, स्थित्यंतरे आणि त्यामागील सूत्रे ह्या अनुरोधाने पुष्कळ विवेचन ऋग्वेदकालापासून पुढे कित्येक शतके केलेले दिसते. इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतातही दैवी शक्तीवर विश्वास होताच. निसर्गात बदल घडविणाऱ्या देवता मानवी जीवनाच्याही नियंत्रक होत्या. तेव्हा कर्ताकरविता परमेश्वर, माणसे म्हणजे त्याच्या हातातील बाहुली ही कल्पना आलीच. आपण काहीतरी करतो आणि …

इस्लामी कल्पना

इस्लामी संस्कृतीच्या क्षेत्रातही अशीच ईश्वरनिष्ठ आणि कालचक्र निष्ठ इतिहासमीमांसा आढळते. तथापि इस्लामी विचार मुख्यतः किंवा जवळजवळ सर्वस्वीच सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वराच्या अल्लाच्या अनुरोधानेच मांडलेला आहे. चौदाव्या शतकातील इब्न खाल्दुनने निरनिराळ्या राज्ये नि सत्ता ह्यांचे उदय, वृद्धी व अस्त ह्यासंबंधी काही ठोकळ नियम सांगितले. पण तोही कुराणप्रणीत अल्लाच्या सामर्थ्याविषयी शंका उपस्थित करू शकत नव्हता. हा एक …

ग्रीक आणि रोमन कल्पना

प्राचीन ग्रीक लोकांनी विश्वाविषयी आणि मानवी जीवनाविषयी अनेक अंगानी व अनेक दृष्टींनी विचार केला. अनेक ज्ञानशाखांच्या क्षेत्रांत ग्रीकांचे विचार तर्कशुद्ध, मूलभूत आणि पुरोगामी असे होते. रोमन लोक हे ग्रीकांइतके ज्ञानपिपासू नव्हते. ते अधिक व्यवहारी होते, तथापि रोममध्येही अनेक वचारवंतांनी ग्रीकांचे विविधा विचार आत्मसात करून पुढे त्यांचा विस्तार केलेला आढळून येतो.

ज्यू आणि ख्रिस्ती कल्पना

पॅलेस्टाइनमधील ज्यू विचारवंत, नंतरच्या काळातील ख्रिस्तप्रणीत धर्म आणि तज्जन्य विवेचन ह्यातून आलेले इतिहासविषयक सिद्धान्तसुद्धा असेच ईश्वरी सूत्राच्या कल्पनेवर आधारलेले आहेत. ज्यू तत्त्वज्ञांच्या मते मानवाचा आणि मानवाच्या इतिहासाचा परमेश्वर हा जनकच आहे. माणसाच्या इतिहासातील सर्व चढउतार, यशापयश हे ईश्वरी हस्तक्षेपानेच होत असतात. म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्या आज्ञा प्रत्यक्षात माणसांना कधी धर्मगुरूंमार्फत किंवा उपदेशकांमार्फत समजतील, …