इस्लामी कल्पना
इस्लामी संस्कृतीच्या क्षेत्रातही अशीच ईश्वरनिष्ठ आणि कालचक्र निष्ठ इतिहासमीमांसा आढळते. तथापि इस्लामी विचार मुख्यतः किंवा जवळजवळ सर्वस्वीच सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वराच्या अल्लाच्या अनुरोधानेच मांडलेला आहे. चौदाव्या शतकातील इब्न खाल्दुनने निरनिराळ्या राज्ये नि सत्ता ह्यांचे उदय, वृद्धी व अस्त ह्यासंबंधी काही ठोकळ नियम सांगितले. पण तोही कुराणप्रणीत अल्लाच्या सामर्थ्याविषयी शंका उपस्थित करू शकत नव्हता. हा एक …