खरंच, पुनर्जन्म आहे? (पूर्वार्ध)
ऑगस्ट १९९५ च्या आजच्या सुधारक मधील हा लेख वाचून आश्चर्यच वाटले. अशा प्रकारचा लेख आजचा सुधारकमध्ये अपेक्षित नव्हता. पुनर्जन्मावरील लेख छापायला माझा आक्षेप नाही. परंतु भारावून जाऊन लिहिलेल्या लेखाऐवजी अधिक विवेचक लेख शोभून दिसला असता. केवळ एक केस-रिपोर्ट वाचून श्री. प्र. के. कुलकर्णीचा अश्रद्धपणा हादरून गेला याचा खेद वाटला. प्रा. अकोलकरांचा मूळ शोधनिबंध वाचून निर्माण …