निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)
आजकाल सेक्युलॅरिझम व सेक्युलर ह्यांबद्दल बरेच बोलले जाते. ज्येष्ठांच्या बैठकीत यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्यांना जशी माहिती तशी त्यांनी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा. • सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैलीबरोबरच राज्यशासनव्यवस्थेशी जोडला गेला आहे. • या शब्दाला बरेच अर्थ आहेत. जसे, इहवाद येथपासून …