विज्ञान ही काय चीज आहे? - लेख सूची

विज्ञान ही चीज काय आहे? (पूर्वार्ध)

आधुनिक जगात विज्ञानाविषयी आदराची, दराऱ्याची भावना आहे यात शंका नाही. मानवी ज्ञानाच्या कक्षा अणुरेणूंपासून विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत, विविध क्षेत्रांत, विविध प्रकारे रुंदावण्याचे विज्ञानाचे यश वादातीत आहे. (या लेखाचे ते एक मुख्य गृहीतक ही आहे.) मानवाच्या भौतिक प्रगतीसाठी विज्ञानाची उपयुक्तता, विज्ञानाचे योगदानही सर्वमान्य आहे. विज्ञानाविषयीचा आदर व दरारा मात्र या योगदानातून, उपयुक्ततेतूनच आलेला आहे असे नाही, तर …

विज्ञान ही काय चीज आहे? (उत्तरार्ध)

थॉमस कून यांचा वैज्ञानिक क्रांतींची संरचना (The Structure of Scientific Revolutions) हा ग्रंथ 1962 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत या ग्रंथावर जगात हजारो शोधनिबंध लिहिले गेले असतील. या ग्रंथामुळे विज्ञानाकडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोनात क्रांती घडून आली. विज्ञान म्हणजे काय हा विचार करताना कूनपूर्व आणि कूनोत्तर असे दोन कालखंड पडतात. अर्थात ते अगदी काटेकोर कालगणनेनुसार …