शुद्धलेखनातील अराजक परिणाम आणि उपाय - लेख सूची

शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (पूर्वार्ध) 

(१) मुद्रित मराठी भाषेमध्ये एकसारखेपणा राहिलेला नाहीं. संगणकाच्या साहाय्यानें मुद्रण पूर्वीपेक्षां सोपें झालें असलें तरी त्याच्या उपलब्धतेमुळे जे नवीन लोक मुद्रणक्षेत्रांत उतरले त्यांस लेखनाचे कांहीं नियम असतात, आणि ते नियम लिहितांना, किंवा मुद्रण करण्यासाठी संगणकावर अक्षरें जुळवितांना पाळावयाचे असतात हे माहीत नाहीं. परिणाम असा झाला आहे की वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतूनच नाही तर पुस्तकांमधूनसुद्धां एकसारखें मराठी …

शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (उत्तरार्ध)

मागच्या लेखांकांत अराजकाचे परिणाम काय झाले आहेत, ते स्पष्ट केले आहेत. ह्या अंकांत आपण उपायांकडे लक्ष देणार आहोत. पहिला उपाय मला सुचतो तो असा की प्रमाणभाषेला प्रत्येकाने परकी भाषा मानून आपले दैनंदिन व्यवहार स्थानिक बोली भाषेत करावे. प्रमाणभाषेचे शिक्षण मातृभाषेचे शिक्षण म्हणून न देतां एक वेगळी, परकी भाषा म्हणून द्यावे. ही संपर्कभाषा आहे हा संपर्क, …