आगरकर म्हणतात –

एकाने दुसर्‍याकरतां सहज मरणें, बुद्ध्या मारून घेणे, किंवा नाहीं नाहीं ते हाल भोगणें हें सर्वथैव इष्ट असेल तर, स्त्री मेल्यावर पुरुषानेही तिच्याबद्दल प्राण सोडणे, प्राणहत्या करणे, किंवा वैधव्यव्रताचे सेवन करणे प्रशस्त होईल, किंवा झाले असते! बायको मेल्याची वार्ता येतांच बेशुद्ध होऊन परलोकवासी झालेल्या भार्यारतांची उदाहरणे कधी तरी आपल्या ऐकण्यांत येतात काय? किंवा स्त्रीबरोबर सहगमन केलेल्या प्रियैकरतांची उदाहरणे कोणत्याही देशाच्या पुराणांत किंवा इतिहासांत कोणीं वाचली आहेत काय ? किंवा बायकोस देवाज्ञा झाल्यामुळे, नित्य भगवी वस्त्रे परिधान करणारे, क्षौराच्या दिवशीं डोक्याच्या किंवा तोंडाच्या कोणत्याही भागावरील केसांची काडीमात्र दयामाया न ठेवणारे, भाजणीच्या थालिपिठाशिवाय दुसन्या कोणत्याही आहारास स्पर्श ने करणारे, अरिष्ट गुदरल्यापासून चारसहा महिने कोणास तोंड न दाखविणारे, पानतंबाखूची किंवा चिलीमविडीची त्या अत्यंत खेदजनक दिवसापासून आमरण समिध शेकणारे, व मंगलकार्यात किंवा कामासाठी घरांतून बाहेर पडणार्‍या इसमापुढे येण्यास भिणारे नवरे कोणी पाहिले आहेत काय? जर नसतील तर स्त्रियांची अशा त-हेची वागणूक सतीत्वाची, साध्वीत्वाची, पतिव्रतात्वाची, एकनिष्ठ प्रेमाची, व अलौकिक सद्धर्मित्वाची साक्ष देणारी कशी होते, हे कोणी उघड करून सांगेल काय? जो सांगेल त्यास आम्ही बृहस्पतीचा बृहस्पति मानू!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.