नीतिविचार धर्मविचाराहून निराळा

अलीकडील विद्वान लोक नीतितत्त्वांचा विचार धर्मविचारापान निळा करतात. त्यांचा असा समज झाला आहे की, नीतितत्त्वांचा अभ्यास पृथक्पणानं केला, तर आता तो फार सोपा जाता. म्हणून सर्वमान्य नीतितत्त्वांचा धर्मात समावेश न करता या तत्त्वाचे स्वतंत्र शास्त्र कल्पून, त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा. असे करण्यांत एक मी सोय आहे, ती ही कीं, धर्मात नीतितत्त्वांचा अंतर्भाव केला असतां, “अमुक गोष्ट चांगली कशासाठी?” असा प्रश्न कोणी केला तर त्यास असे उत्तर द्यावे लागते की,’ती परमेश्वरा चांगली वाटते, म्हणून ती चांगली मानणे भाग आहे.’ यावर जर कोणी असा उलट प्रश्न करील की,’अमुक गोष्ट परमेश्वरास चांगली वाटते असें कशावरून समजावयाचे?’ तर त्यावर असं प्रत्युत्तर द्यावं लागतं की ते वेदांसारख्या, वैवला.या दिवा कुराणासारख्या ईश्वरप्रणीत पुस्तकांत सांगितले आहे म्हणून.’ पण या उत्तरावर ही कोणी असा प्रश्न करतात की,’ही पुस्तकें ईश्वरप्रणीत असें कशासाठी मानावे?’ अशा प्रकारचा विलक्षण प्रश्न कोणी केल्यास, त्यास इतकंच उत्तर देतां येतं की,’ही पुस्तकं ईश्वरप्रणीतआहेत, असे या पुस्तकांतच सांगितले आहे,” किंवा ‘तीं ईश्वरप्रणीत आहेत असे आमचे मत आहे’. पण ही दोन्ही उत्तरं रामाधानकारक नाहीत, हे, कोणीही विचारी व समंजस मनुष्य कबूल करील. अशा प्रकारच्या विचारशैलीस तर्कशास्त्रांत परिवृत्तिवाद म्हणतात. अशा प्रकारच्या कोटिक्रमाने संशयनिवृत्ति होत नाही, कारण यांतील विचार परस्परावलंबी असतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.