विवाह आणि नीती (भाग ७)

स्त्रीमुक्ती
लैंगिक नीती सध्या संक्रमणावस्थेत आहे याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले, संततिप्रतिबंधाच्या साधनांचा शोध, आणि दुसरे, स्त्रियांची मुक्ती. यांपैकी पहिल्या कारणाचा विचार मी नंतर करणार आहे; दुसरा या प्रकरणाचा विषय आहे.

स्त्रियांची मुक्ती हा लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाला. आपण वर पाहिल्याप्रमाणे या राज्यक्रांतीत वारसाहक्कविषयी कायद्यात कन्यांना अनुकूल असा बदल करण्यात आला. ज्या कल्पनांमुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ज्यांचा विकास झाला अशा कल्पनांतून मेरी वॉलस्टोनक्राफ्टचे ‘स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन’ (१७९२) हे पुस्तक निर्माण झाले होते. तिच्या काळापासुन ते थेट आजपर्यंत स्त्रीपुरुषसमानतेचा दावा उत्तरोत्तर वाढत्या जोराने केला गेला आहे, आणि त्याला सतत वाढते यशही मिळत गेले आहे. जॉन स्टुअर्ट मिलचे स्त्रियांची परवशता (१८६९) हे अतिशय प्रत्ययकारी आणि तर्कशुद्ध युक्तिवादानी परिपूर्ण असे पुस्तक. मिलनंतरच्या पिढीच्या विचारी लोकांवर त्याचा खूपच प्रभाव पडला होता. माझे वडील आणि आई दोघेही मिलचे भक्त होते. आणि माझी आई १८६० च्या सुमारास स्त्रियांना मताधिकार मिळावा म्हणून भाषणे करी. तिचा स्त्रीवाद (feminism) इतका उत्कट होता की माझ्या आईचे प्रसवकार्य पहिली स्त्री-डॉक्टर, गॅरेट् अँडरसन, या महिलेकडून तिने करविले. त्यावेळी स्त्रियांना डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्यास मज्जाव होता, आणि त्यांना फक्त प्रमाणपत्रित सुईण म्हणून काम करता येई. त्या काळी स्त्रीवादी चळवळ उच्च आणि मध्यम वर्गापुरती सीमित होती, आणि त्यामुळे तिला फारसे राजकीय महत्त्व नव्हते. स्त्रियांना मताधिकार मागणारे विधेयक दरवर्षी पार्लमेंटपुढे येई, आणि जरी दरवेळी मि. फेथफुल बग माइत आणि मि. स्टॅगवेज त्याला दुजोरा देत, तरी त्याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मुळीच संभव नव्हता. मात्र मध्यमवर्गीय स्त्रीवाद्यांना त्यांच्या क्षेत्रात एक मोठा जय मिळाला होता. विवाहित स्त्रियांच्या मतांचा फायदा (१८८२). हा कायदा पास होण्यापूर्वी विवाहित स्त्रीची जी काही मत्ता (property) असे तिच्यावर तिच्या नवर्‍याचे नियंत्रण चाले; फक्त जर त्या संपत्तीच्या न्यार केलेला असेल, तर त्याला मुदलाला स्पर्श करता येत न स्त्रियांच्या चळवळीचा त्यानंतरचा राजकीय इतिहास इतका ताजा आहे आणि इतका सुविदित आहे की त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज वाटत नाही. परंतु एवढे मात्र म्हटलेच पाहिजे की बहुतेक नागरित (civilized) देशांमध्ये स्त्रियांना त्यांचे राजकीय हक्क इतके भराभर मिळाले, आणि त्यांत घडून आलेला मनोभूमिकेतील बदल एवढा मोठा होता की, त्याला भूतकाळात तोड सापडणे अशक्य आहे. गुलामीच्या प्रथेच्या नाशाची कथाही काहीशी अशीच आहे. पण खरे म्हणजे युरोपात आधुनिक काळात गुलामी नव्हतीच, आणि तिचा स्त्रीपुरुषांच्या संबंधासारख्या गाढ विषयाशी संबंधही नव्हता.

या अतिजलद बदलाची कारणे द्विविध असावीत असे वाटते. एका बाजूला लोकशाहीवादी विचारसरणीचा सरळ प्रभाव होता; कारण त्या विचारसरणीतील स्त्रियांच्या मागण्या नामंजूर करायला तर्कशुद्ध कारण सापडणे शक्य नव्हते. दुसर्‍या बाजूला आपली उपजीविका घराबाहेर करणार्‍या, आणि बाप किंवा नवरे यांच्या मेहेरबानीवर अवलंबून नसणाऱ्या स्त्रियांची सतत वाढणारी संख्या. या अवस्थेची परमावधी महायुद्धकाळात झाली. कारण त्या काळात जी कामे सामान्यपणे पुरुष करीत अशी कितीतरी कामे स्त्रियांना करावी लागली. स्त्रियांना मताधिकार देण्याविरुद्ध युद्धापूर्वी वापरला जाणारा एक युक्तिवाद असा होता की स्त्रियांची प्रवृत्ती शांततावादी असते. परतु युद्धकाळात त्यांनी या आरोपाचे मोठ्या प्रमाणावर खंडन केले, आणि त्यांनी युद्धाच्या क्रूर उद्योगात जे अंशदान दिले त्याचा मोबदला म्हणून त्यांना मताधिकार दिला गेला. ज्या आदर्शवादी सुधारकांची अशी कल्पना होती की स्त्रियांमुळे राजकारणाचा नैतिक स्तर उंचावेल, त्यांची निराशा झाली असेल; परंतु आदर्शवाद्यांच्या नशिबात हेच असते की काय कोण जाणे, की ते ज्या गोष्टीकरिता झगडतात, ती त्यांना अशा भग्न स्वरूपात मिळते की त्यामुळे त्यांचा आदर्शवाद उद्ध्वस्त व्हावा. स्त्रियांच्या हक्कांची मागणी त्या नैतिकदृष्ट्या किंवा अन्य तऱ्हांनी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत या गृहीतावर अर्थातच आधारलेली नव्हती; त्यांना केवळ मानवप्राणी म्हणून हक्क हवे होते, किंवा खरे म्हणजे त्यांची भिस्त लोकशाहीवादी सामान्य युक्तिवादावर होती. परंतु जेव्हा एखादा पीडित वर्ग किंवा राष्ट्र हक्कांची मागणी करते, तेव्हा त्यांचे पुरस्कर्ते आपल्या युक्तिवादांना अधिक जोर आणण्याकरिता नेहमीच त्या वर्गाच्या किंवा राष्ट्राच्या ठिकाणी काही विशेष गुण असल्याचा दावा करतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीतही झाले, आणि त्यांचे हे कल्पित विशेष गुण नैतिक होते असे त्यांनी मानले.

परंतु राजकीय मुक्तीशी आपला संबंध असलाच तर अत्यल्प आहे. विवाह आणि नीती यांच्या संबंधात महत्त्वाची असलेली मुक्ती अर्थातच सामाजिक मुक्ती आहे. प्राचीन काळी, आणि पूर्वेत तर आपल्या काळापर्यंत, स्त्रियांची शुद्धता राखण्याचा उपाय म्हणजे त्यांना पुरुषांपासून विभक्त ठेवणे. त्यांना आंतरिक आत्मसंयम शिकविण्याचे कोणतेही उपाय केले गेले नाहीत; व्यभिचाराची संधी त्यांना मिळणार नाही अशी व्यवस्था करण्याचाच सर्व प्रयत्न झाला. पश्चिमेत या पद्धतीचा पूर्ण स्वीकार कधीच झाला नाही. परंतु प्रतिष्ठित स्त्रियांत विवाहबाह्य लैंगिक संबंधांचे दारुण भय जेणेकरून निर्माण होईल असे शिक्षण त्यांना बाल्यावस्थेपासून दिले गेले. या शिक्षणव्यवस्थेच्या रीती जसजशा अधिकाधिक परिपूर्ण होत गेल्या तसतशी बाह्य बंधने कमी केली गेली. बाह्य बंधने हटविण्याचे ज्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले त्यांची खात्री होती की आंतरिक बंधने पुरेशी प्रभावी होतील. उदा. तरुण अविवाहित मुलीला घराबाहेर पडताना दुसऱ्या स्त्रीच्या सोबतीची गरज नाही, कारण कोणतीही सुविनीत आणि सुशील मुलगी, तिला संधी मिळाली तरी, तरुण पुरुषांच्या आवाहनाला बळी पडणार नाही, असे मानले गेले. मी तरुण होतो तेव्हा प्रतिष्ठित स्त्रिया असे मानत की बहुतेक स्त्रियांना रतिकर्म अप्रिय असते आणि केवळ कर्तव्यबुद्धीने ते त्या वैवाहिक जीवनात सहन करतात. हे त्यांचे मत असल्यामुळे पूर्वीच्या वास्तववादी युगात जे सुरक्षित मानले जाई त्याहून अधिक स्वातंत्र्य त्या आपल्या मुलींना द्यायला तयार असत. याचे परिणाम अपेक्षेहून काहीसे भिन्न झाले आहेत; आणि हा भेद अविवाहित आणि विवाहित दोन्ही स्त्रियांच्या बाबतीत दिसून आला आहे. व्हिक्टोरियाकालीन स्त्रिया एका मानसिक तुरुंगात होत्या, आणि बर्‍याच स्त्रिया अजूनही त्यात आहेत. हा तुरुंग संज्ञेला (consciousness) उघड दिसत नव्हता, कारण तो असंज्ञ प्रतिबंधांच्या (subconscious inhibitions) स्वरूपात असे. हे प्रतिबंध आज तरुण मुलामुलींच्या मनात क्षीण झाले आहेत आणि त्यामुळे ज्या सहजात (instinctive) इच्छा पूर्वी मिथ्या विनयाच्या दडपणाखाली दबलेल्या होत्या, त्या परत संज्ञेत प्रवेश करू लागल्या आहेत. याचा आपल्या लैंगिक नीतीवर क्रांतिकारक परिणाम घडून येतो आहे, आणि तो एका देशात किंवा एका वर्गात नव्हे, तर सर्व नागरित देशांत आणि सर्व वर्गात दृग्गोचर होत आहे.

स्त्रीपुरुषसमानतेची मागणी ही पहिल्यापासून केवळ राजकीय बाबींपुरती मर्यादित नसून लैंगिक नीतीच्या बाबतीतही केली गेली. मेरी वॉलस्टोनक्राफ्टची मनोवृत्ती पूर्णपणे आधुनिक होती, परंतु स्त्रियांच्या हक्कांच्या नंतरच्या पुरस्कर्त्यांनी तिचं या बाबतीत अनुकरण केले नाही. उलट हे पुरस्कर्ते बहुधा कठोर नीतिवादी होते, आणि त्यांना आशा होती की आतापर्यंत स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या नैतिक बेड्या पुरुषांनाही घालता येतील. परंतु १९१४ नंतर तरुण स्त्रियांनी विशेष गाजावाजा न करता एक वेगळीच दिशा स्वीकारली आहे. युद्धकालीन भावनिक उत्तेजित अवस्थेमुळे हे अधिक शीघ्रतेने घडून आले हे खरे आहे; पण एरव्हीही ते घडून यायला फार विलंब लागणार नव्हताच. स्त्रियांना शुद्ध राखण्याचे मुख्य प्रेरक दोन होते. एक मरणोत्तर नरकवासाची भीती, आणि दुसरी गर्भधारणेची भीती. यापैकी पहिला धार्मिक सनातनीपणाच्या ऱ्हासाने नाहीसा झाला होता, आणि दुसरा संततिप्रतिबंधक साधनांनी. पारंपरिक नीतीने काही काळपर्यंत रूढी आणि सवयी यांच्या साह्याने दम धरला, पण युद्धाच्या धक्क्याने तिच्या भिती कोसळून पडल्या. आधुनिक स्त्रीवाद्यांना, तीस वर्षांपूर्वीच्या स्त्रीवाद्यांप्रमाणे पुरुषांच्या ‘दुर्गुणांवर’ बंधने घालण्यात फारसा रस राहिलेला नाही; त्यांची मागणी आता अशी आहे की जे पुरुषांना अनुज्ञेय आहे, त्याची परवानगी आम्हालाही मिळावी. त्यांच्या पूर्वीच्या पुरस्कत्यांनी नैतिक गुलामीची समानता मागितली होती; त्या आता नैतिक स्वातंत्र्याची समानता मागत आहेत.

ही सबंध चळवळ अजून प्रारंभावस्थेत आहे, आणि तिची वाढ कशी होईल हे सांगणे अशक्य आहे. तिचे अनुयायी आणि तिच्यानुसार कृती करणारे अजून बहुधा तरुण आहेत. त्यांच्या समर्थकांपैकी फारच थोड्यांजवळ वजन आणि प्रतिष्ठा आहेत. जेव्हा या विषयातील वस्तुस्थिती पोलिस, कायदा, धर्मसंस्था किंवा आईबाप या शक्तिकेंद्रांच्या लक्षात येते तेव्हा ते सर्व तिच्याविरुद्ध उभे ठाकतात; परंतु सामान्यपणे तरुण लोक ह्या लोकांना क्लेशकारक वाटेल अशी वस्तुस्थिती त्यांच्यापासून लपवून ठेवतात. जज्ज लिपासारखे जे लेखक वस्तुस्थिती जाहीर करतात, ते तरुणांची बदनामी करतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो; परंतु तरुणांना आपली बदनामी होते आहे याची वार्ता नसते. या प्रकारची अवस्था अर्थानेच अतिशय अस्थिर असते. पुढील दोनपैकी कोणती स्थिती अगोदर उद्भवेल हे सांगणे कठीण आहे. एकतर वडील मंडळींना वस्तुस्थितीची जाणीव होईल, आणि ते तरुणांचे नवप्राप्त स्वातंत्र्य हिरावून घेतील; किंवा तरुण लोक कालांतराने स्वत:च प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची पदे प्राप्त करतील, आणि त्यामुळे नव्या नीतींना अधिकृत नीतींची मान्यता मिळेल. यांपैकी एक परिणाम काही देशांत घडून येईल, तर दुसरा अन्य काही देशांत, असे मानणे सयुक्तिक होईल. इटलीमध्ये अन्य सर्व गोष्टींप्रमाणे अनीतीही शासनाच्या खास हक्काची गोष्ट आहे, आणि तिथे ‘सदाचारी ‘सक्ती केली जात आहे. रशियात नेमकी वेगळी स्थिती आहे. कारण तिथे सरकार नव्या नीतीच्या बाजूचे आहे. जर्मनीच्या प्रॉटेस्टंट भागात स्वातंत्र्याचा जय होईल अशी अपेक्षा आहे, परंतु कॅथलिक भागातील स्थिती अधिक शंकास्पद आहे. फ्रान्समध्ये दीर्घ काळापासून चालत आलेली एक अशी रूढी आहे की काही विशिष्ट प्रकारची अनीती सहन केली जाते, आणि तिच्यातून फ्रान्स बाहेर येण्याची जवळपास शक्यता नाही. इंग्लंड आणि अमेरिका या देशांत काय होईल याचे भविष्य वर्तविण्याचे धाडस मी करीत नाही.

परंतु आपण येथे क्षणभर थांबू या, आणि स्त्रिया पुरुषांबरोबरीच्या मानल्या जाव्यात या मागणीत काय काय अभिप्रेत आहे याचा विचार करू या. पुरुपांना अतिप्राचीन काळापासून, तत्त्वतः नसली तरी व्यवहारात, अवैध लैंगिक संबंधाची परवानगी होती. पुरुषाने लग्नाच्या पूर्वी कुमार राहावे अशी अपेक्षा नव्हती, आणि व्यभिचार जर पत्नी आणि शेते यांच्यापासून गुप्त राहिली तर लग्नानंतरही तो फारसा गंभीर मानला जात नसे. ही व्यवस्था शक्य होत असे वेश्याव्यवसायामुळे. परंतु या संस्थेचे समर्थन करणे आधुनिकांना कठीण जाते. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळावेत म्हणून, आणि आपल्याप्रमाणेच एकनिष्ठ न राहता त्यांना एकनिष्ठ दिसता यावे याकरिता, पुरुषवेश्यांची संस्था प्रस्थापित केली जावी असे क्वचितच कोणी सुचवील. पण आजच्या उशीरा लग्न होणार्‍या काळात आपल्याच वर्गातील एका स्त्रीबरोबर कुटुंबाची स्थापना करीपर्यंत फारच थोडे पुरुष ब्रह्मचारी राहतील हे निश्चित आहे. आणि जर अविवाहित पुरुष ब्रह्मचारी राहणार नरातील, तर समानतेच्या तत्त्वानुसार अविवाहित स्त्रियाही आम्हीही ब्रह्मचारिणी राहण्याची गरज नाही असा दावा करतील. नीतिमार्तडांना ही स्थिती शोचनीय वाटेल हे निःसंशय, जो या प्रश्नाचा पूर्ण विचार करील अशा प्रत्येक नीतिमार्तडाच्या हे लक्षात येईल की दुहेरी मानदंडावाचून आपल्याला गत्यंतर नाही म्हणजे लैंगिक एकनिष्ठा पुरुषामध्ये असण्यापेक्षा स्त्रीमध्ये असणे अधिक आवश्यक आहे. आपल्या नीतिव्यवस्थेत पुरुषानेही ब्रह्मचारी राहावे अशी मागणी आहे असे म्हणणे ठीक आहे; पण त्याला सहज सुचणारे उत्तर हे आहे की ही मागणी आपण पुरुषावर लादू शकत नाही, कारण त्यांना गुप्तपणे पाप करणे सोपे असते. याप्रमाणे पारंपारिक नीतिवाद्याला अनिच्छेने पुरुष आणि स्त्रिया यांची असमानता मान्य करावी लागते. एवढेच नव्हे, तर असेही मानावे लागते की तरुण पुरुषांनी आपल्या वर्गातील मुलींशी लैंगिक संबंध न ठेवता वेश्यांशी ठेवणे अधिक चांगले. परंतु आपल्याच वर्गातील मुलीशी थेट संबध भाडोत्री नसतात, आणि वस्तुतः ते स्नेहाचे आणि अतिशय आनंददायीही असू शकत. जी नीती पाळली जाणार नाही हे त्यांना माहीत असते अशा नीतिव्यवस्थेचा पुरस्कार करण्याच्या परिणामांचा विचार नीतिमार्तंड करीत नाहीत. त्यांची अशी समजूत असते की आपण जोपर्यंत वेश्याव्यवसायाचा प्रत्यक्ष पुरस्कार करू , तोपर्यंत वेश्याव्यवसाय आपल्या शिकवणीचा अपरिहार्य परिणाम असला तरी त्याची जबाबदारी आपली नाही, परंतु आजच्या व्यावसायिक नीतिमार्तंडांजवळ सरासरी इतकीही बुद्धी नसते याचेच हे आणखी एक उदाहरण.

या परिस्थितीचा विचार करता हे स्पष्ट होते की जोपर्यंत अनेक पुरुषांना आर्थिक कारणास्तव लवकर लग्न करता येत नाही, आणि अनेक स्त्रियांना तर लग्नावाचूनच राहावे लागते, तोपर्यंत स्त्रीपुरुषसमानतेकरिता स्त्रियांच्या शुद्धतेचा मानदंड शिथिल करावा लागेल. जर पुरुषांना विवाहपूर्व संगाची सवलत दिली (आणि ती व्यवहारात दिलीच नसते), तर स्त्रियांनाही ती दिली पाहिजे; आणि ज्या देशात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, तिथे ज्या स्त्रियांना अपरिहार्यतेने अविवाहित राहावे लागते, त्यांना लैंगिक अनुभवापासून पूर्ण वंचित ठेवणे हा उघड अन्याय होईल. स्त्रियांच्या चळवळीच्या आद्य पुरस्कर्त्यांना या सर्व परिणामांची अर्थातच कल्पना नव्हती; परंतु त्यांच्या आधुनिक आयांना ते स्पष्ट दिसतात, आज जो कोणी त्यांना विरोध करील तो स्त्रियांना न्याय मिळावा या मतास अनुकूल नाही हे त्याला मान्य करावे लागेल.

नवीन नीतिमत्तेविरुद्ध जुनी नीतिमत्ता या द्वंद्वामुळे एक अतिशय पट प्रश्न उपस्थित झाला आहे. शुद्धता आणि पत्न्यांची इमानदारी यांची मागणी जर आपण सोडून दिली, तर एकतर संस्थेचे रक्षण करण्याचे नवे उपाय आपल्याला शोधावे लागतील, किंवा कुटुंबसंस्थेच्या शाला आपल्याला अनुमती द्यावी लागेल. अपत्ये फक्त विवाहांतर्गतच व्हावीत, आणि पर्व विवाहबाह्य लैंगिक संबंध संततिप्रतिबंधक साधनांनी निष्फळ करून दात अशी सूचना कुणी करील. तसे झाले तर पूर्वेकडील पुरुष ज्याप्रमाणे पूर्वी खोजे आणि कंचुको याचेकडे दुर्लक्ष करीत, तसे नवरे आपल्या पत्नीच्या प्रियकरांकडे दुर्लक्ष करण्यास कदाचित शिकतील. या योजनेतील अडचण अशी आहे की तिच्यात संततिप्रतिबंधक साधनांचे अमोधत्व आणि पत्न्यांचे सत्यवादित्व यांच्यावर अविवेकी विश्वास ठेवावा लागेल. कदाचित ही अडचण कालांतराने कमी होईल. याला विकल्प पितृत्व या महत्त्वाच्या सामाजिक संस्थेचा -हास आणि पित्याच्या कर्तव्यांचा शासनसंस्थेकडून स्वीकार हा असू शकेल. विशिष्ट प्रकरणात जिथे एखाद्या मनुष्याला आपल्या पितृत्वाची खात्री असेल आणि अप्रत्याचे प्रेम असेल तिथे मूल आणि आई यांच्या पोषणाकरिता सध्या पिते सामान्यपणे करतात तो खर्च करायला तो तयार होईल, परंतु कायद्याने त्याला तसे करायला भाग पाडता येणार नाही. खरे म्हणजे ज्यांचे पितृत्व अज्ञात असते अशा अवैध अपत्यांची सध्या जी स्थिती आहे ती स्थिती सर्वच मुलांची होईल. फरक एवढाच असेल की ही गोष्ट नित्याची मानून शासनसंस्था मुलांच्या संगोपनार्थ आतापेक्षा जास्त कष्ट घेईल.

याच्या उलट जर जुनी नीतिव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर काही गोप्टी अनिवार्य आहेत. त्यांपैकी काही प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहेतच; पण त्या पुरेशा नाहीत असे अनुभवांती दिसून आले आहे. पहिली अनिवार्य गोष्ट अशी आहे की मुलींचे शिक्षण असे असावे की त्यामुळे त्या मूर्ख, अंधश्रद्ध, आणि अडाणी होतील. ज्या शाळांत धर्मसंस्थेचे नियंत्रण आहे तिथे ही अट अगोदरच पुरी झालेली असते. यानंतरची अवश्य गोष्ट म्हणजे लैंगिक विषयांची माहिती देणान्या सर्व पुस्तकांची करडी तपासणी (censorship) करावी लागेल. हीही अट इंग्लंड व अमेरिका या देशात पुरी होत आहे, कारण कायद्यात बदल न करता केवळ पोलिसांच्या उत्साहाने ही तपासणी अधिकाधिक कठोर होऊ लागली आहे. या गोष्टी अगोदरच अस्तित्वात आहेत, आणि म्हणून त्या उघडच अपुर्‍या आहेत हे दिसतेच आहे. इष्ट परिणाम साधू शकेल अशी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे पुरुपांच्या सान्निध्यात एकांतात राहण्याच्या सर्व संधी तरुण स्त्रियांना वर्ज्य कराव्यात. मुलींना आपल्या घराबाहेर जाऊन पैसा मिळविण्यास मज्जाव करावा. त्यांना आई किंवा मावशी यांची सोबत असल्याशिवाय घराबाहेर जाऊ देता कामा नये. अशी सोबत असल्यावाचून नृत्यांना जाण्याची प्रथा निष्ठूरपणे मोडून टाकावी. पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाच्या अविवाहित स्त्रीजवळ मोटरकार असणे बेकायदा ठरविले जावे, आणि सर्व अविवाहित स्त्रियांची दर महिन्याला पोलिस डॉक्टरांकडून वैद्यकीय परीक्षा घेऊन त्यांपैकी जर कोणी कुमारी नसतील तर त्यांना तुरुंगात धाडणेही कदाचित् शहाणपणाचे होईल. संततिप्रतिबंधक साधनांच्या उपयोगाचे अर्थातच निर्मूलन करावे लागेल आणि अविवाहित स्त्रियांशी केलेल्या संभाषणात निरंतर नरकवासाच्या शिक्षेबद्दल शंका घेणे बेकायदा मानावे लागेल. हे उपाय जर शंभर किंवा अधिक वर्षे कसोशीने केले तर कदाचित् अनीतीची चढती लाट थोपविता येईल. परंतु कसलाही गैरउपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी सर्व पोलिस शिपाई आणि डॉक्टर यांना खच्ची करावे लागेल असे मला वाटते. पुरुषी मन हे स्वभावतःच भ्रष्ट असते हे लक्षात घेता हा उपाय आणखी काय पुढे नेणेही कदाचित शहाणपणाचे होईल. मला तर असेही वाटते धर्मगुरू सोडून सर्व पुरुष खच्ची करावेत, असा आग्रह नीतिवाद्यांनी धरला तर ते दूरदर्शीपणाचेच होईल.
आपल्या लक्षात येईल की आपण कोणताही मार्ग स्वीकारला तरी त्यात अशी आणि आक्षेपार्ह गोष्टी आहेतच. जर आपण नव्या नीतीला तिच्या मार्गाने जाऊ दिले, तर ती आज पोचली आहे त्याच्या पलीकडे जाणे, आणि त्यांतून आपल्याला अजून अज्ञान अशा अडचणी आपल्यासमोर उभ्या राहणे अपरिहार्य आहे. पण जर आपण आधुनिक जगावर पूर्वीच्या युगांत शक्य असलेली बंधने लादृ म्हटले, तर आपल्याला अशक्यप्राय कठोर नियमांचा आश्रय घ्यावा लागेल. परंतु मानवी स्वभाव त्यांच्याविरुद्ध लवकरच बंड करून उठेल हे निश्चित. हे इतके स्पष्ट आहे की धोके आणि अडचणी कोणत्याही असल्या तरी जगाला मागे ओढण्यापेक्षा पुढे जाऊ देण्यात आपल्याला समाधान मानावे लागेल. याकरिता आपल्याला एका खर्‍याखुर्‍या नव्या नीतीची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला बंधने आणि कर्तव्ये मानावी लागतीलच, पण ती भूतकाळातील बंधने आणि कर्तव्ये यांच्याहून अतिशय भिन्न असतील. जोपर्यंत नीतिमार्तंड नामशेष झालेल्या व्यवस्थेकडे परत जाण्याचा उपदेश करण्यात समाधान मानतात तोपर्यंत नवीन स्वातंत्र्याला नीतीचे नियंत्रण घालण्यात किंवा त्याच्याबरोबर येणारी नवी कर्तव्ये कोणती हे राण्यात ते कसलीही मदत करू शकणार नाहीत. जुन्या व्यवस्थेत ज्याप्रमाणे येणार्‍या प्रत्येक ऊर्मीला (impulse) वश होणे संमत नव्हते, तसेच नव्या व्यवस्थेतही संमत नाही. परंतु ऊर्मीना आवरण्याचे प्रसंग आणि तसे करण्याचे हेतू नव्या व्यवस्थेत वेगळे असतील असे मला वाटते. खरे म्हणजे लैंगिक नीतीच्या सबंध प्रश्नाचा पुनर्विचार होणे अवश्य आहे. पुढील पाने या कार्याला एक अतिशय नम्र आणि अल्प असे अंशदान म्हणून लिहिली आहेत.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.