विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध [taboo]
(पूर्वार्ध)
नवीन लैंगिक नीतीची रचना करताना विचारायचा पहिला प्रश्न: ‘लैंगिक संबंधांचे नियमन कसे करावे?’ ही नाही. तो ‘पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना लैंगिक विषयासंबंधी कृत्रिम अज्ञानात ठेवणे इष्ट आहे काय?’ हा आहे. या प्रश्नाला पहिले स्थान देण्याचे माझे कारण असे आहे की, मी या प्रकरणात दाखविण्याचा यत्न करणार असल्याप्रमाणे, लैंगिक विषयातील अज्ञान हे कोणत्याही व्यक्तीला अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून असे अज्ञान टिकवून ठेवणे ज्या व्यवस्थेत अवश्य असेल ती इष्ट असू शकत नाही. मी असे म्हणेन की लैंगिक नीती अशी असावी की ती सु–टाक्षित लोकांना इष्ट वाटावी, आणि तिचे आकर्षण अज्ञानावर अवलंबित नसावे. ही गोष्ट एका व्यापक सिद्धांताचा भाग आहे, आणि जरी सरकार आणि पोलिसदले यांनी या सिद्धांताचा कदापि स्वीकार केला नसला, तरी तो विवेकाला अनाशंक्य वाटतो. तो सिद्धांत असा आहे की काही फार थोडे अपवाद सोडले तर युक्त (right) आचाराला अज्ञान कधीही पोषक होत नाही, आणि ज्ञानाने त्याला कधी अडथळा येत नाही. आता हे खरे आहे की जर ‘अ’ ला ‘ब’ में विशिष्ट कर्म करावे अशी इच्छा असेल, आणि ते कर्म ‘अ’ च्या हिताचे असेल आणि ‘ब’ च्या नसेल, तर आपले हित कशात आहे याविषयी ‘ब’ ला अंधारात ठेवणे ‘अ’ च्या हिताचे असू शकेल. ही गोष्ट वायदेबाजारात सर्वज्ञात असते, परंतु नीतिशास्त्राच्या उच्च विभागांत तिचा उल्लेख केला जात नाही. याच सदरात वस्तुस्थिती लपवून ठेवण्याच्या शासकीय व्यवहाराचा बराच मोठा भाग येतो. उदा. युद्धातील पराजयाचा उल्लेख होऊ नये याकरिता सरकारे प्रयत्नशील असतात, कारण पराभवाचे ज्ञान जनतेला आले तर ते सरकार गडगडण्याला कारणीभूत होऊ शकते. खरे म्हणजे हे सामान्यपण राष्ट्रीय हिताचे असते, पण सरकारच्या हिताचे नसते. लैंगिक विषयावरील मौन जरी वेगळ्या विभागातील असले, तरी त्याची उत्पत्ती अंशत: त्याच कारणातून झाली आहे. प्रथम फक्त स्त्रियांनाच अज्ञानात ठेवण्याचा प्रघात होता, कारण त्यांचे अज्ञान पुरुषी आधिपत्याला पोषक होते, परंतु अज्ञान हे साध्वीत्वाकरिता अपरिहार्य आहे या मताला स्त्रियांची हळूहळू पूर्ण संमती मिळाली, आणि अंशतः त्यांच्या प्रभावामुळे असे मानले गेले की बालके आणि तरुण स्त्रीपुरुष हे लैंगिक विषयाच्या बाबतीत जितके अनभिज्ञ असतील तितके चांगले. एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आधिपत्य हा हेतू राहिला नाही, आणि या विषयाचा प्रवेशा अविवेकी प्रतिषेधाच्या (tabo०) क्षेत्रात झाला. अज्ञान इष्ट असते काय या प्रश्नाचा कधी विचार केला जात नाही, एवढेच नव्हे, तर अज्ञानाने अपाय होतो हे दाखविणारा पुरावा उपलब्ध करणे बेकायदेशीर झाले आहे. एप्रिल २५, १९२९ च्या मॅन्चेस्टर गार्डियन मधील पुढील उतारा मी या विषयावरील विवेचनाचे सूत्र (text) म्हणून घेतो:

‘श्रीमती मेरी वेअर डेनेट यांच्यावरील खटल्याच्या निकालाने अमेरिकन उदारमतवाद्यांना धक्का बसला आहे, कारण ब्रुकलिन येथील ज्युरींनी त्यांना अश्लील साहित्य टपालाने पाठविण्याच्या अपराधाची गुन्हेगार ठरविले आहे. श्रीमती डेनेट या उच्च प्रशंसाप्राप्त आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जागाच्या एका पुस्तिकेच्या लेखिका असून त्या पुस्तिकेत बालकांना लिंगविषयक प्राथमिक गोष्टी सभ्य भाषेत सांगितल्या आहेत. त्यांना आता पाच वर्षांची कैद किंवा १००० पीड दंड, किंवा दोन्ही एवढी शिक्षा होऊ शकते.

श्रीमती डेनेट या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकत्र्या असून त्या दोन मोठ्या मुलांची आई आहेत, आणि ही पुस्तिका त्यांनी मुळात अकरा वर्षांपूर्वी या मुलांना शिकविण्याकरिता लिहिली. ती मुळात एका वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाली होती, आणि संपादकांच्या विनंतीनुसार ती पुस्तिकारूपाने पुनर्मुद्रित झाली. तिला अनेक वीस (scores of) डॉक्टर, धर्मोपदेशक, समाजशास्त्रज्ञ यांचा दुजोरा असून तिच्या कित्येक हजार प्रती यंग मेन्स् ख्रिश्चन असोसिएशन आणि यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन या (आंतरराष्ट्रीय) संस्थांनी वाटल्या आहेत. एवढेच नव्हे, तर तिचा उपयोग ब्राँक्रांन्हिलू या न्यूयॉर्कच्या शिष्ट उपनगरातील म्युनिसिपल शाळांत केला गेला आहे.

न्यू इंग्लंडमधील न्यायसंस्थेचे अध्यक्ष असलेले केंद्रीय न्यायाधीश, वॉरन बी. बरोज, यांनी वरील सर्व गोष्टी गैरलागू म्हणून बाजूला सारल्या, आणि तिथे साक्ष देण्याकरिता वाट पाहात बसलेले अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टर यांच्यापैकी एकालाही बोलू दिले नाही, तसेच ज्यूरीना श्रीमती डेनेटची प्रसिद्ध लेखकांनी केलेली भलावणही ऐकू दिली नाही. खटल्याचे कामकाज म्हणजे सदर पुस्तिका ज्यूरीना मोठ्या आवाजात वाचून दाखविणे यापलीकडे फारसे काही झालेच नाही; आणि ज्यूरीचे सदस्य उतार वयाचे, अँकलिन येथील विवाहित गृहस्थ असून त्यांनी एच्.एल्. मॅकेन किंवा हॅवलॉक एलिस यांचे लिखाण मुळीही वाचलेले नाही या कसोटीने त्यांची निवड सरकारी वकीलाने केली होती.

जर श्रीमती देनेटच्या लिखाणाचा प्रसार थांबविला, तर अमेरिकेतील तरुणांपुढे लैंगिक विषयांतील वास्तवांचे प्रामाणिक आणि प्रांजल वर्णन ठेवण्याची आशाच राहणार नाही असे जे न्यूयॉर्कमधील वर्ल्ड हे वर्तमानपत्र म्हणते ते अगदी बरोबर आहे हे स्पष्ट आहे. या निकालावर उच्चतर न्यायालयात अपील केले जाणार आहे. त्याच्या निकालाची वाट लोक अत्यंत उत्कंठेने पाहतील.’

हे प्रकरण अमेरिकेतील आहे हे खरे; पण ते येथे इंग्लंडमध्येही घडू शकते, कारण येथील कायदा बहुतांशाने अमेरिकन कायद्यासारखाच आहे. आपल्या हे लक्षात येईल की अल्पवयी मुलांना लिंगविषयक ज्ञान देणार्‍या मनुष्याला कायदा मुलांना हे ज्ञान असणे इष्ट आहे असे म्हणणाच्या तज्ज्ञांचा पुरावा वापरू देण्यास मजाव करतो. तसेच हेही आपल्याला दिसेल की अशा प्रकारच्या खटल्यात ज्यूरीचे सदस्य अदी अज्ञ माणसेच फक्त असावीत की ज्यांनी या प्रकरणाचा विवेकाने निर्णय करता येण्याकरिता अवश्य असलेले लिखाण वाचलेले नसेल, हे ठरविण्याची मोकळीक सरकारला असते. कायदा सरळ असे म्हणतो की मुले आणि तरुण यांना लिंगविषयक ज्ञान असता कामा नये, आणि ते ज्ञान असणे त्यांच्या दृष्टीने हितकर आहे की नाही हा विचार सर्वथा गैरलागू आहे. पण आपण (म्हणजे मी आणि वाचक) काही न्यायालयात नाही, आणि तसेच हे लिखाण बालकांना उद्देशून लिहिलेलेही नाही. त्यामुळे मुलांना अधिकृतपणे लिंगविषयक अज्ञानात ठेवण्याची पारंपरिक रीत इष्ट आहे की अनिष्ट याचा विचार करण्यास हरकत नसावी.

बालकांच्या बाबतीत चोखाळला गेलेला पारंपरिक मार्ग म्हणजे त्यांना आईबाप व शिक्षक यांनी शक्य तितके जास्त अज्ञानात ठेवावे, त्यांना आपले मातापिता कधीच विवस्व दिसत नाहीत, आणि अतिशय अल्प वयानंतर (जर घरात भरपूर जागा असेल तर) त्यांना आपली भिन्नलिंगी भावंडेही विवख दिसत नाहीत. आपल्या लिंगाला स्पर्श करण्याची किंवा त्याच्याविषयी बोलण्याची त्यांना मनाई असते, आणि लिंगविषयक सर्व प्रश्नांना, धक्का बसल्याच्या आवाजात गप्प बसण्याचे उत्तर दिले जाते. बगळे मुले आणतात, किंवा बोराच्या झाडाखाली खणून ती आणावी लागतात असे त्यांना सांगितले जाते. पुढे केव्हातरी त्यांना वस्तुस्थिती अर्धवट आणि विकृत स्वरूपात इतर मुलांकडून कळते. ती मुले ही माहिती चोरून देतात, आणि आईबापांनी शिकविल्याप्रमाणे ती ‘घाणेरडी’ गोष्ट आहे असे मानतात. आपले आईबाप परस्परांशी काही घाणेरडे व्यवहार करतात, आणि ज्याअर्थी ते गुप्त ठेवण्याची त्यांची धडपड असते त्याअर्थी त्यांची त्यांना स्वत:लाच लाज वाटत असली पाहिजे, असा तर्क ती करतात. त्यांना हेही कळते की ज्यांच्याकडून आपण मार्गदर्शन आणि उपदेश यांची अपेक्षा करीत होतो त्यांनी आपल्याला पद्धतशीरपणे फसविले आहे. आपले आईबाप, विवाह आणि भिन्नलिंगी व्यक्ती यांच्याविषयीची त्यांची अभिवृत्ती (attitude) अशा प्रकारे दृषित होते की ती पुढे कधीही निर्मळ होऊ दाकत नाही. ज्यांचे संगोपन पारंपरिक पद्धतीने झाले आहे अशा स्त्रीपुरुषांपैकी फारच थोडे लोक लैंगिक विषय आणि विवाह यांच्याविषयी निर्मळ विचार करू शकतात. फसवाफसवी आणि खोटेपणा या गोष्टी आईबाप आणि शिक्षक चांगल्या समजतात; लैंगिक संबंध, विवाहांतर्गत संबंधही, कमीअधिक प्रमाणात किळसवाणे असतात, आणि प्रजोत्पादन करण्यात पुरुष प्राणिसुलभ वासनेला बळी पडतात, आणि स्त्रिया क्लेशकारक कर्तव्याला सामोच्या जातात, असे मानण्याचे शिक्षण त्यांना मिळते. ह्या अभिवृत्तीमुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही विवाह असमाधानकारक होतो, आणि सहजप्रवृत्तींचे समाधान न झाल्यामुळे त्या नीतीचा बुरखा पांघरलेल्या दुष्टपणात व्यक्त होतात.

सनातनी नीतिमार्तंडांचे (orthodox moralists) लैंगिक विषयासंबंधीच्या ज्ञानाविषयीचे मत पुढीलप्रमाणे सांगता येईल असे मला वाटते:
लैंगिक प्रेरणा अतिशय प्रबल प्रेरणा असून ती विकासाच्या भिन्न अवस्थांत भिन्न रूपांत प्रकट होते. बाल्यावस्थेत ती शरीराच्या काही विशिष्ट अवयवांना स्पर्श करून त्यांशी खेळण्यात व्यक्त होते; पौगंडावस्थेत ती अधिक परिणत रूप धारण करू लागते. लैंगिक दुर्वर्तन लैंगिक विचाराने वाढते हे नि:संशय, आणि म्हणून तरुण लोकांचे शरीर आणि मन दोन्ही लैंगिक विषयाशी सर्वथा असंबद्ध अशा गोष्टीत व्यग्र ठेवणे हा त्यांना सन्मार्गावर ठेवण्याचा उत्तम उपाय आहे. म्हणून त्यांना लैंगिक विषयासंबंधी काहीही सांगण्यात येऊ नये; शक्यतो त्यांविषयी बोलण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात यावा, आणि प्रौढांनी अशी बतावणी करावी की असा विषयच अस्तित्वात नाही. या उपायांनी एखाद्या मुलीला तिच्या लग्नाच्या रात्रीपर्यंत संपूर्ण अज्ञानात ठेवणे शक्य आहे; पण अशा परिस्थितीत वास्तव तिला इतके धक्का देणारे वाटते की तिच्या ठिकाणी लैंगिक संबंधाविषरी नेमकी ती अभिवृत्ती निर्माण होते की जी नीतिमार्तंडांना स्त्रियांच्या ठिकाणी हवी असते. मुलांच्या (पुरुषांच्या) बाबतीत मात्र हे काम अधिक कठीण आहे, कारण आपण त्यांना हद्द म्हणजे अठराव्या किंवा एकोणिसाव्या वर्षापर्यंत अज्ञानात ठेवू शकतो. त्यानंतर ते अशक्य होते. त्यांच्या बाबतीत अवलंबावयाचा योग्य मार्ग म्हणजे त्यांना सांगण की हस्तमैथुनामुळे न चुकता वेड लागते, आणि वेश्यागमनामुळे नेहमी गुप्त रोग होतात. ही दोन्ही विधाने रखरी नाहीत; पण ती ‘गुन्न असत्य’ आहत, कारण ती नीतिवृध्द्यर्थ करावयाची आहेत. मुलाला हेही शिकविले पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत लैंगिक विषयावरील संभाषण अनुज्ञेय नाही. त्यामुळे तो जेव्हा लग्न करील तेव्हा त्याच्या पत्नीला लैंगिक विषयासंबंधी किळस निर्माण होईल, आणि व्यभिचाराच्या भयापासून तिचे रक्षण होईल. विवाहबाह्य लैंगिक संबंध पापमय आहेत; विवाहांतर्गत लैंगिक संबंध पाप नाही, कारण मानवजातीच्या वृद्धीकरिता तो अवश्य आहे. पण ते मानवाच्या अध:पाताबद्दल शिक्षा म्हणून लादलेले अप्रिय कर्तव्य आहे, आणि ज्या वृत्तीने आपण शस्त्रक्रियेला सामोरे जातो त्याच वृत्तीने ते स्वीकारायचे आहे. दुर्दैवाने जर आपण खूप प्रयत्न केले नाहीत, तर मैथुनक्रिया सुखद व्हायची राहात नाही; पण पुरेशी नैतिक खबरदारी घेतली तर त्याचा बंदोबस्त, निदान स्त्रियांच्या बाबतीत, करता येतो. पत्नीला मैथुनातून सुख मिळू शकते आणि ते तिने मिळवावे असे स्वस्त पुस्तकात प्रसिद्ध करणे हे इंग्लंडमध्ये बेकायदा मानले जाते. याही कारणास्तव (अन्य कारणांखेरीज) अनेक पुस्तिका अश्लील म्हणून दंड्य ठरविल्या गेल्या आहेत असे मी स्वत: ऐकले आहे. कायदा, धर्मसंस्था आणि सनातनी शिक्षणशास्त्री यांची दृष्टी वर वर्णिलेल्या लिंगविषयक अभिवृत्तीवर आधारलेली आहे.

या अभिवृत्तीचा लैंगिक क्षेत्रात काय परिणाम होतो याचा विचार करण्याआधी तिच्या अन्य क्षेत्रातील परिणामांविषयी मला थोडे बोलायचे आहे. माझ्या मतानुसार तिचा पहिला आणि सर्वात गंभीर परिणाम म्हणजे बालकांच्या ठिकाणी असणार्‍या वैज्ञानिक जिज्ञासेला होणारा अडथळा. बुद्धिमान मुलांना जगातील सर्वच गोष्टींबद्दल कुतूहल असते. ती फक्त आगगाड्या, माटोरी आणि विमाने यांच्याचविषयी प्रश्न विचारतात असे नव्हे, तर पाऊस कशाने पडतो आणि बालके कोण तयार करतो याहीविषयी विचारतात. या सर्व जिज्ञासा मुलाच्या दृष्टीने एकाच पातळीवर असतात; तो फक्त पॅव्हलॉव्ह ज्याला ‘ते-काय आहे?’ -प्रतिक्षेप (reflex) असे नाव देतो त्यानुसार वागतो; आणि हा प्रतिक्षेप सर्व वैज्ञानिक ज्ञानाचे उगमस्थान आहे. जिज्ञासेने प्रेरित झालेल्या मुलाला जेव्हा कळते की जिज्ञासा काही बाबतीत वाईट असते, तेव्हा त्याची सबंध वैज्ञानिक जिज्ञासाच अवरुद्ध होते. कोणते कुतूहल अनुज्ञेय आहे आणि कोणते नाही हे त्याला प्रथम समजत नाही. जर बालके कशी तयार करतात हे विचारणे वाईट असेल, तर काय सांगावे, विमाने कशी तयार करतात हे विचारणेही निषेधार्ह असेल. ते कसेही असले तरी एकंदरीत वैज्ञानिक कुतूहल ही एक भयंकर प्रेरणा आहे, आणि ती अनियंत्रित राहू देता कामा नये, असा निष्कर्ष तो काढतो. कशाचेही ज्ञान मिळविण्याचा यत्न करण्यापूर्वी ते ज्ञान पुण्यमय आहे की पापमय आहे हे आधी निश्चित केले पाहिजे, आणि लैंगिक जिज्ञासा सामान्यपणे अतिशय प्रबल असल्यामुळे मूल असा निष्कर्ष काढते की आपल्याला हवेसे वाटणारे ज्ञान वाईट असते, आणि सदाचारी ज्ञान पाढ्यांच्या ज्ञानासारखे कोणालाही आवडण्या शक्यता नसणारे ज्ञान असते. सर्व निरोगी मुलांच्या ठिकाणी असणारी वैज्ञानिक जिज्ञासा याप्रमाणे उद्ध्वस्त होते, आणि मुले कृत्रिमपणे निर्बुद्ध बनविली जातात. स्त्रिया या सरासरीने पुरुषांपेक्षा मूर्ख असतात हे नाकारता येईल असे मला वाटत नाही, आणि हा बहुतांशी त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेची गळचेपी अधिक प्रभावीपणे केली जाते याचाच परिणाम आहे असा माझा विश्वास आहे.

या बौद्धिक अपायाच्या जोडीला बहुतेक प्रकरणी एक अतिशय मोठा नैतिक अपायही घडून येतो. फ्रॉइडने पहिल्यांदा दाखविल्याप्रमाणे बालकांच्या गाद संबंधात येणार्‍या कोणाच्याही लक्षात येते की बगळ्यांच्या आणि बोरांच्या झाडांच्या भाकडकथांवर मुलांचा विश्वास नसतो. त्यामुळे आपले आईबाप खाट बोलतात असा निष्कर्ष मुले काढतात. ती जर एका बाबतीत खोटे बोलली तर ती अन्य बाबतीतही खोटे बोलू शकतात, आणि याप्रकारे त्यांचा नैतिक आणि बौद्धिक अधिकार नष्ट होतो. शिवाय ज्याअर्थी लैंगिक विषयात आईबाप रखोट बोलतात त्याअर्थी आपणही तस करायला हरकत नसावी असा निष्कर्ष मुले काढतात. ती परस्परांत त्याविषयी चोरून बोलतात, आणि बहुधा चोरून हस्तमैथुनही करतात. याप्रमाणे त्यांना फसवणूक आणि लपवाछपवीच्या सवयी लागतात, आणि आईबापांच्या धमकावणीमुळे त्यांची जीवने भयग्रस्त होतात. हस्तमैथुनाच्या दुष्परिणामांविषयी आईबाप आणि दाया यांनी केलेल्या धाकदपटशामुळे केवळ बाल्यावस्थेतीलच नव्हेत, तर प्रौढावस्थेतील मानसिक आजारही उद्भवतात हे मनाविश्लेषणशास्त्राने दाखवून दिले आहे.
मुलांशी वागण्यात लैंगिक विषयासंबंधी स्वीकारल्या जाणाच्या पारंपरिक मार्गाचे परिणाम असे होतात की ती (मुले) निर्बुद्ध, कपटी आणि भेकड बनतात, आणि त्यांच्यापैकी बरीच मोठी संरञ्या शहाणपणाच्या सीमेपार वेड्यांच्या क्षेत्रात ढकलली जाते.

आजच्या घटकेला या गोष्टी ज्यांचा लहान मुलांशी संबंध येतो अशा सर्व बुद्धिमान लोकांना काही प्रमाणात अवगत असतात; पण त्या कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणार यांना माहीत नाहीत. या प्रकरणाच्या आरंभी उद्धृत केलेल्या घटनेवरून हे स्पष्ट व्हावे. आज अशी अवस्था आहे की ज्याला मुलांदी व्यवहार करावा लागतो अशा कोणाही मुज्ञ मनुष्याला आपण कायदा मोडावा की आपल्यावर सोपविलेल्या मुलांना कधीही दुरुस्त करता न येणारा नतिक आणि बौद्धिक अपाय होऊ द्यावा यापैकी एक मार्ग स्वीकारावा लागतो. कायदा बदलणे अवघड आहे, कारण बहुतेक वडील मंडळी इतकी विकृत असतात की त्यांचे लैंगिक गोष्टीतील मुख त्या अनैतिक आणि घाणेरड्या आहेत या गजुतीवर आधारलेले असते. मला तरी असे वाटते की सध्या मध्यमवयीन आणि वृद्ध असणारे लोक मरेपर्यंत कसल्याही सुधारणेची आशा करणे व्यर्थ आहे.

आतापर्यंत आपण पारंपरिक रीतींच्या लैंगिक क्षेत्राबाहेर होणार्‍या दुष्परिणामांचा विचार करीत होतो; आता त्या प्रश्नाच्या लैंगिक अंगाचा विचार केला पाहिजे. नीतिमार्तडांच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट लैंगिक विषयांत गढून जाण्याला प्रतिबंध करणे हे आहे हे नि:संशय.

सध्या अशा प्रकारचे गढून जाणे मोठ्या प्रमाणात आढळते. इंटनच्या शाळेचे एक जुने प्रमुख अलीकडेच असे म्हणाले आहेत की शाळकरी मुलांचे संभाषण एकतर नीरस असते, नाहीतर अश्लील असते; पण तेथील मुलांना तर पूर्ण सनातनी (orthodox) पद्धतीने संगोपन मिळाले होते. लैंगिक विषयासंबंधी गूढ बाळगले जाते या गोष्टीमुळे मुलांचे त्या विषयासंबंधीचे स्वाभाविक कुतूहल कितीतरी पटींनी वाढते. जर प्रौद अन्य कुठलाही विषय जसा हाताळतात तसा लैंगिक विषयही हाताळला गेला, मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली गेली, आणि ती मागतील तितकी किंवा त्यांना समजू शकेल इतकी माहिती त्यांना दिली, पर मुलांना अश्लीलतेची कल्पनाच प्राप्त होत नाही, कारण काही विषयांचा उल्लेख करू नये या समजुटीवर ती कल्पना आधारलेली आहे. इतर कोटल्याही कुतूहलाप्रमाणे लैंगिक विषयांतील कुतूहलही त्याचे समाधान झाले की नाहीसे होते. म्हणून मुलांना लैंगिक विषयाचा ध्यास लागू नये याचा उत्तम उपाय म्हणजे त्यांना त्याविषयी हवी असलेली सर्व माहिती देणे हा आहे.

हे म्हणत असताना मी अनुभवावाचून काहीतरी बोलतो आहे असे समजू नये. माझ्या शाळेतील मुलांत मला जे दिसले त्याने मला निर्णायकपणे दाखवून दिले आहे की मुलांचा फाजीलपणा हा प्रौदांच्या फाजील सोवळेपणाचा परिणाम असतो. माझ्या दोन मुलांना (एक सात वर्षांचा मुलगा आणि दुसरी पाच वर्षांची मुलगी) लिंग किंवा मलमूत्रविसर्जन यांत काही विशेष आहे असे शिकविले गेले नाही, आणि त्यांना आतापर्यंत श्लीलता आणि अश्लीलता या कल्पनांपासून शक्य तितके सुरक्षित ठेवले आहे. बाळे कोठून येतात याविषयी त्यांनी स्वाभाविक आणि निरागस कुतूहल दाखविले आहे; पण त्याच्याहून जास्त कुतूहल त्यांना एंजिने आणि आगगाड्या यांत आहे. तसेच या विषयावर प्रौढांच्या गैरहजेरीत बोलत बसण्याची प्रवृत्तीही त्यांच्या ठिकाणी दिसली नाही. आमच्या शाळेतील इतर मुलांच्या बाबतीत आम्ही असे पाहिले की ती जर दोन किंवा तीन वर्षे, किंवा चारही वर्षे वयाची असताना आमच्याकडे आली तर त्यांची वाढ आमच्या मुलांसारखीच होई. परंतु बहुतेक मुले आमच्याकडे सहा आणि सात वर्षे वयात येत, आणि ती लिंगाशी संबद्ध कोणतीही गोष्ट अनुचित मानायला शिकलेली असत. इतर विषयांसंबंधी बोलताना जो स्वर आपण वापरतो त्याच स्वरात आमच्या शाळेत लोक या विषयासंबंधीही बोलत त्याचे त्यांना आश्चर्य वाटे, आणि काही काळपर्यंत ती ज्यांना अश्लील समजत अशा विषयासंबंधी बोलण्यात ती मुक्तीची भावना अनुभवीत. परंतु वडील मंडळी ही संभाषणे रोखण्याचा कसलाही प्रयत्न करीत नाहीत हे पाहून, त्यांना हळूहळू त्या गोष्टींचा कंटाळा येई, आणि ज्यांना श्लीलता म्हणजे काय ह्याची कसलीच शिकवण दिली गेली नव्हती, जवळपास त्या मुलांइतकी ती निर्मळ मनाची होत. नंतर जेव्हा नवीन आलेली मुले ज्याला अनुचित समजतात अशा विषयावर संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना त्यात कसलाही रस वाटत नाही. याप्रमाणे त्या विषयावर स्वच्छ हवेचा प्रयोग झाल्यामुळे त्याचे शुद्धीकरण होते, आणि तो अंधारात असताना त्यात उत्पन्न होणारे विषारी जंतू नष्ट होतात. सामान्यपणे अनुचित मानल्या गेलेल्या विषयासंबंधीची मुलांची अभिवृत्ती इतकी आरोग्यावह आणि निर्मळ व्हावी याचा याद्दन अन्य उपाय असेल असे मला वाटत नाही.

या प्रश्नाचे एक अंग असे आहे की ज्याची पुरेशी जाणिव ख्रिस्ती नीतिमार्तंडांकडून लैंगिक विषयावर जी घाण ओतली गेली आहे ती धुऊन काढण्याची इच्छा असल्या लोकांना नाही असे मला वाटते. निसर्गाने लैंगिक विषयाचा दांगट विसर्जनाच्या प्रक्रिया घाट आहे, आणि त्यामुळे मलमूत्रविसर्जाच्या क्रिया आपण जोपर्यंत घृणा: तोपर्यंत त्या घृणेचा काही अंदा लैंगिक विषयाला चिकटणे मानसशास्त्रीयदृष्टया स्वाभाविक आहे. याकरिता बालकांशी होणाऱ्या आपल्या व्यवहारात विसर्जनाच्या प्रक्रियेविषयी फाजील चारवंदळपणा न बाळगणे अवश्य आहे. आरोग्याकरिता काही खबरदारी घेणे यातच अवश्य आहे; पण म्हणून मुलांना सुजू लागल्याबरोबर त्यांना समजावूत सांगितले पाहिजे की ही खबरदारी आरोग्यासाठी आवश्यक आहे, विसर्जनाच्या विधीमध्ये काही स्वरूपतः घृणास्पद आहे. म्हणून ती ध्याय नाही.

अनुवादक: म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.