अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय

अशरीरी आत्म्याची कल्पना अनाकलनीय

पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्यांना, प्राण्यांचे आत्मे शरीराचा त्याग केल्यावर कसल्यातरी शरीराच्या आधारातूनच काही वेळ राहू शकतात, अशी खात्री झाली असली पाहिजे ……अशरीरत्व म्हणजे शरीराचा अत्यंत अभाव असे म्हणण्याचा त्यांचा आग्रह असेल तर मात्र ते काहीतरी गडबड करतात असे म्हणावे लागेल, अशरीरी वस्तू म्हणजे काय? आम्ही शरीरी मर्त्यांनी तिची कल्पना कशी करावयाची? आत्म्याशिवाय एखादी अशरीरी वस्तु आमच्या पाहण्यात आली आहे काय ? इंद्रियाला किंवा मनाला गोचर अशा वस्तूचे अस्तित्व मानण्यास कोणीही हरकत घेणार नाही. इंद्रिये ही मनाची द्वारे आहेत. मनात आढळून येणारी प्रत्येक वस्तू कोणत्यातरी इंद्रियाच्या वाटेने प्रथम त्यात गेलेली असते. किंबहुना इंद्रियविकारावाचून आम्हास मनाचे अस्तित्व देखील समजणार नाही….. अशरीरी आत्म्याच्या कल्पनेत आणखी एक गोष्ट आहे. ती ही की इतर काल्पनिक वस्तूंप्रमाणे त्याचे आम्हास ठळक काल्पनिक चित्र देखील काढता येत नाही. ‘अनंत’ शब्दाच्या अर्थात वास्तविकपणे जितकी दुर्बोधता आहे, तितकीच ‘आत्मा’ या शब्दात आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.