विवेकवाद – १२

उपयोगितावाद (Utilitarianism)

‘आजचा सुधारक’च्या डिसेंबर-जानेवारी अंकात ‘नीतिविचार धर्मविचाराहून निळा’ या लेखात नीतीचे धडे विवेचन केले होते. आज ते विवेचन अधिक विस्ताराने करण्याचा विचार आहे.

पाश्चात्य नीतिशास्त्राच्या इतिहासात पहिल्यापासूनच दोन परस्परविरुद्ध विचारसरणी किंवा संप्रदाय दिसून येतात. एवढेच नव्हे तर या दोन विचारसरणी परस्परांच्या शेजारी शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. ह्या दोन संप्रदायांना आपण तापसवादी आणि तृप्तिवादी अशी नावे देऊ शकतो. यापैकी पहिल्या संप्रदायाचे प्रतिपादन असे आहे की वासना किंवा इच्छा हे सर्व दुःखांचे मूळ आहे, म्हणून वासना जिंकणे, किंवा वासनाक्षय हा मानवाच्या हिताचा मार्ग आहे; तर दुसर्‍याचे प्रतिपादन असे आहे की जास्तीत जास्त इच्छची जास्तीत जास्त पूर्ती करणे यात मानवाचे हित आहे. प्राचीन ग्रीसमध्ये स्टोइक नावाचा एक पंथ होता आणि त्याचे एक तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र होते. हा पंथ तापसवादी होता. परंतु एपिक्यूरस नावाच्या तत्त्वज्ञाने दुसर्‍या, म्हणजे तृप्तिवादी मागचा पुरस्कार केला होता.

या दोन प्रवृत्तींचे लोक सर्व देशात सर्व काळांत आढळतात. त्यांपैकी दुसरी, म्हणजे तृप्तिवादी प्रवृत्ती ही नैसर्गिक आहे, परंतु दुसरीचेही जबरदस्त आकर्षण काहीं मानवांना असते असे दिसते. शरीराला पीडा देण्यात आत्म्याचे कल्याण आहे ही कल्पना मोठ्या प्रमाणात आढळते, परलोक, मरणोत्तर अस्तित्व, इत्यादि गोष्टींवर श्रद्धा असणाच्या लोकांत ह्या कल्पनेचा प्रभाव अधिक असणार हे उघड आहे.
यापैकी तृप्तिवादी संप्रदायाचे आधुनिक काळात अठराव्या शतकात पुनरुज्जीवन झाले असून जमी बॅटम (१४८-१८३२), जॉन स्टुअर्ट मिल (१८७६-७३) आणि हेनी सिबिक (१८३८-१९०६) या नीतिमीमांसकांनी त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. हे मत आधुनिक काळात ‘युटिलिटेरियनिझम’ म्हणून ओळखले जाते. या मताविषयी थोड़े विवेचन करण्याचा आज विचार आहे.

तृप्तिवादी संप्रदायाचे मत असे आहे की इच्छांची तृप्ती करणे ही स्वाभाविक नैसर्गिक गोष्ट आहे. कोणत्याही इच्छेची पूर्ती झाली की आपल्याला सुख होते आणि इच्छा अतृप्त राहिली तर दुःख, असंतोष निर्माण होतो. इच्छा निर्माण झाली की मनुष्याची नैसर्गिक कृती ती पूर्ण करण्याची असते. इच्छा हा मनोव्यापार प्रवर्तन या प्रकारात मोडणारा आहे. मानवाचे मनोव्यापार स्थूलमानाने तीन प्रकारचे असतात : (१) ज्ञान, (२) भावना, आणि (३) प्रवर्तन. यांपैकी प्रवर्तन या प्रकारचे व्यापार मनुष्याच्या कर्माना प्रेरणा देणारे असतात. ज्ञान (म्हणजे आपल्या भोवतालच्या जगातील वस्तुस्थितीची जाणीव) हे स्वतः प्रेरणा देत नाही; ते मनुष्याच्या बहुविध प्रवृत्तींना पोषक किंवा बाधक होते. इच्छा मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही; तिच्या पूर्तीकरिता मनुष्याला ती प्रवृत्त करते. इच्छापूर्ती शक्य असेल तर ती तो करतो आणि मग इच्छा शांत होत, किंवा जर इच्छापूर्ती शक्य नसेल तर त्या जाणिवेने इच्छा निवृत्त होते. तेव्हा इच्छापूर्ती करणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, आणि आपल्या जीवनात आपण सारा वेळ कोणती तरी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.

आपण इच्छापूर्ती करावी की नाही हा प्रश्न तृप्तिवाद्यांपुढे उद्भवत नाही. त्यांच्यापुढे उद्भवणारे प्रश्न वेगळे आहेत. एक प्रश्न आहेः परस्परविरुद्ध इच्छांची पूर्ती कशी करता येईल? तसेच काही इच्छांची पूर्ती केल्याने तात्कालिक समाधान मिळते, पण नंतर दीर्घकालीन असमाधान अनुभवाला येते त्याचे काय करावयाचे? या प्रश्नांची उत्तरे तृप्तिवादी काय देतात ते पाहू.

बर्टांड रसेल यांनी सुचविलेली एक कल्पना यासंबंधात उपयुक्त होईल. ही कल्पना लाइनिस (Leiniz) या तत्त्वज्ञाने वेगळ्या संदर्भात वापरली आहे. ही कल्पना आहे compossibility ची किंवा सहशक्यतेची शक्यता आणि सशक्यता यांत भेद आहे. आपल्या इच्छांपैकी काही इच्छा कदापि पूर्ण होण्याची आशा नसते. उदा. आपणास मृत्यू येऊ नये किंवा वार्धक्य येऊ नये ही इच्छा. अनेक इच्छा अशा असतात की ज्यांची पूर्ती करणे काही लोकांना शक्य असेल, पण इतरांना अशक्य असते. अशा इच्छांना आपण अशक्य इच्छा असे नाव देऊ, असंय इच्छा अशा असतात की ज्यांच्यापैकी प्रत्येक एकेकटी पूर्ण करणे शक्य असते. उदा. आपण टीव्हीवरील एखादा कार्यक्रम पाहू शकतो, किंवा त्यावेळी होणार असलेल्या एका प्रसिद्ध वक्त्याच्या व्याख्यानाला जाऊ शकतो; म्हणजे या दोन्ही इच्छा शक्य आहेत. पण त्या दोघींची एकाच वेळी पूर्ती आपण करू शकत नाही, कारण ज्यावेळी टीव्हीवरील कार्यक्रम असतो त्याचवेळी व्याख्यानही असते. अशा इच्छा एकैकशः शक्य असल्या तरी त्या सहशक्य नाहीत असे म्हणावयाचे, उदा. आपल्याला एका मित्राला भेटावयाचे असेल, आणि एका संगीत मैफलीलाही जायचे असेल, अशा परिस्थितीत आपला मित्र त्या मैफलीत अवश्य येईल अशी खात्री असेल, तर वरील दोन्ही इच्छा एकाच वेळी पूर्ण होऊ शकतील. या इच्छा सशक्य इच्छा.

आता ही सहशक्यतेची कल्पना वापरून तृप्तिवाद्याचे उत्तर आपण असे देऊ शकू: जास्तीत जास्त इच्छापूर्ती होण्याचा एक उपाय म्हणजे सशक्य इच्छांचा मोठ्यांत मोठा गट निवडणे. असे केल्याने आपल्या अनेक इच्छा अतृप्त राहतील हे खरे, पण त्याहून अधिक इच्छा तृप्त होतील. म्हणजे जास्तीत जास्त इच्छांची पूर्ती होईल, आपली जास्तीत जास्त इच्छापूर्ती व्हावी या हेतूने सशक्य इच्छांचा सर्वात मोठा गट कोणता असेल याचा हिशेब करीत असताना आपण अपक्षलले समाधान आणि प्रत्यक्ष इच्छापूर्ती झाल्यानंतर मिळणारे समाधान यांत अनेकदा तफावत असू शकते. एखादे साध्य हस्तगत करायला आपण खूप धडपड करावी, पण ते साध्य प्रत्यक्ष हस्तगत झाल्यावर त्याचे अपेक्षित होते तेवढे समाधान आपल्याला मिळू नये असे अनेकदा होते. पण याला अनुभवाने शहाणे होणे आणि अधिक काळजीपूर्वक हिरोच करणे यांखेरीज अन्य उपाय नाहीत. आपल्या बुद्धीचा उपयोग करून अपेक्षिलेल्या समाधानापेक्षा प्रत्यक्ष पदरात पडलेले समाधान कित्येकदा कमी असते. म्हणून बुद्धी न वापरता अंधपणे इच्छांना वश होणे हा मार्ग मात्र बिनभरवशाचाच म्हणावा लागेल, माणसाचे मन पशूच्या मनापेक्षा पुष्कळच प्रगल्भ आहे. त्याला दीर्घ स्मृती आहे, आणि स्मृतीसह येणार्‍या पश्चात्तापाचा अनुभवही त्याला वारंवार येतो. त्यामुळे इच्छांची पूर्ती करीत असताना नुसत्या वर्तमानकालीन समाधानाचा विचार करून चालत नाही; कारण तसे आपण वागलो तर लगेच पश्चातापाची पाळी आपल्यावर येते. म्हणून आपण कोणत्या इच्छांची पूर्तीकरिता निवड करावी हे ठरविताना भविष्यकालीन समाधानाचाही हिशेब करावा लागतो. भविष्याचा पण कुठपर्यत ? याला एकच उत्तर आहेः जितक्या दूरपर्यंत आपल्या वर्तमान कमांनी आपल्या समाधानाची वृद्धी किंवा घट होऊ शकते तिथपर्यंत, म्हणजे अर्थात मृत्यूपर्यंत, आपल्या समग्न संभाव्य जीवनाचा विचार करून महत्तम तृप्तीकरिता इच्छांच्या ज्या गटाची आपण निवड करू त्याचा उद्देश आपल्या संबंध जीवनात आपल्याला जास्तीत जास्त समाधान मिळावे हाच अस शकतो.

असा दूर आणि समग्र विचार करू लागल्याबरोबर एक तडजोड आपण करतो हे आपण पाहिले. म्हणजे मला या क्षणी जास्तीत जास्त समाधान प्राप्त व्हावे म्हणून वर्तमान इच्छांचे तारतम्य ठरवावे लागते, किंवा इच्छाविवेक करावा लागतो, तसाच सबंध जीवनात उद्भवणार्‍या इच्छांचाही विवेक मला करावा लागतो. परंतु इच्छातृप्तीच्या या योजनेमध्ये आपल्याला दुसरी एक तडजोड करावी लागते, समाजातील इतर व्यक्तींच्या इच्छांचीही दखल मला घ्यावी लागते, त्याची कारणे दोन आहेत. पहिले कारण असे आहे की इतरांच्या अनेक इच्छा माझ्या इच्छांच्या विरोधी असतात, आणि त्यामुळे माझी इच्छातृप्ती महत्तम व्हायची असेल तर एकतर मला इतरांच्या इच्छा विफल कराव्या लागतील, किंवा त्यांच्या इच्छा आणि माझ्या इच्छा यांत तडजोड करून सशक्य इच्छांचा गट शोधावा लागेल. सामान्यपणे राजा किंवा हुकूमशहा सोडले तर पहिल्या उपायाचा अवलंब कोपाला करता येणार नाही असे आपल्याला सर्शनी वाटेल, पण भापल्यापेक्षा कमी बलवान असणार्‍या व्यक्तीला धाकदपटशा दाखवून किंवा तिला फसवून बहुधा प्रत्येकच मनुष्य तो उपाय वापरीत असतो. परंतु हा उपाय आपल्याहून बलवान व्यक्तीच्या बाबतीत आपण वापरू शकत नाही हे उघड आहे. अशा परिस्थितीत आपल्याला दुसर्‍या उपायाचा अवलंब करावा लागतो.

ननैतिक-नैतिक

आतापर्यंत आपण इच्छातृप्तीचा विचार शुद्ध ननैतिक पातळीवरून केला. म्हणजे आपण मनुष्याचा विचार इतर प्राण्यांप्रमाणे इच्छा तृप्त करण्याची धडपड करणारा प्राणी म्हणून केला, त्याला प्रगल्भ बुद्धी आणि दूरदृष्टी असल्यामुळे त्याला संबंध जीवनाचा विचार करणे शक्य आहे, आणि तसा विचार कोणी केल्यास आपली इच्छातृप्ती महत्तम होण्याकरिता प्रयत्न करण्याची त्याची तयारी असेल असे गृहीत धरून आपण सहशक्य इच्छांचा विचार पुढे मांडला. मनुष्य समाजात राहणारा मागी असल्यामुळे अन्य मनष्याच्या इच्छा आणि त्याच्या इच्छा यांत विरोध उद्भवणे स्वाभाविक आहे. अशा प्रसंगी व्यक्तीची इच्छापूर्ती महत्तम व्हावी म्हणून सशक्य इच्छाची कल्पना कशी वापरता येईल तेही आपण पाहिले. आता येथे असा विचार सुचतो की केवळ एका व्यक्तीच्या इच्छापूर्तीचा विचार न करता सबंध समाजाच्या इच्छापूर्तीचा विचार करायचा झाला तर ही सशक्य इच्छांची कल्पना समाजजीवनातही वापरता येईल.

येथे आपल्याला नैतिक भूमिकेचा स्वीकार करावा लागेल. ही भूमिका स्वीकारायची म्हणजे आपल्या कर्माचा विचार ती चांगली आहेत की वाईट उचित आहेत की अनुचित, ती कर्तव्ये आहेत की निषिद्ध आहेत हे प्रश्न विचारायचे. जोपर्यंत मनुष्य केवळ आपल्या महत्तम इच्छातृप्तीचा विचार करतो तोपर्यंत हे प्रश्न उद्भवत नाहीत. आतापर्यंत आपण केलेला विचार तसा होता. म्हणजे तो ननैतिक होता. इच्छा निसर्गक्रमाने आपल्या ठिकाणी वेळोवेळी उद्भवतात, आणि आपण स्वाभाविकपणे त्यांची पूर्ती करतो, या इच्छा चांगल्या आहेत की नाहीत, इष्ट आहेत की नष्ट, इत्यादि प्रश्न आपण विचारले नाहीत. पण हे प्रश्न मनुष्याला पडतात. म्हणजे तो कर्माकडे केवळ इच्छापूर्तीचे साधन म्हणून न पाहता, हित, कल्याण, इष्ट, उचित, श्रेयस्करर्‍या गोष्टींचे साधन म्हणूनही पाहतो. ‘हे कर्म मला आवडते’ आणि ‘हे कर्म माझे कर्तव्य आहे’ यांत तो भेद करतो. हा भेद नेमका काय आहे ते स्पष्टपणे आणि सुसंगतपणे सांगणे कठीण आहे, असा नीतिमीमांसकांचा शेकडो – नव्हे हजारो वर्षांचा अनुभव आहे. पण तो भेद सुश्लिष्टपणे सांगणे जमले नाही म्हणून तो भेद भ्रामक आहे किंवा मिथ्या किंवा व्याज आहे असे क्वचितच कोणी म्हणेल. मानवी जीवनात नीतीचा प्रवेश मूल्यकल्पनेतून आणि कर्तव्यकल्पनेतून होतो. यांपैकी मूल्यकल्पनेचा परिचय आपण या लेखमालेच्या लेखांक ९ आणि ११ यांत करून घेतला आहे. मूल्यांचे साध्यमूल्य आणि साधनमूल्य असे दोन प्रकार असून त्यांपैकी साध्यमूल्याची कल्पना प्रधान आहे हे आपण पाहिले आहे. ही साध्यमूल्याची कल्पना समजावून घेण्याकरिता आपण स्वतोमूल्याची कल्पना समजावून घेतली होती. ही कल्पना नीतिशास्त्रातील प्रधान कल्पना (निदान दोन प्रधान कल्पनांपैकी एक कल्पना) आहे. कुठल्याही गोष्टीला स्वतोमूल्य किंवा अंतिम साध्याचे मूल्य असल्याखेरीज तिच्या साधनाला साधनमूल्य किंवा परतोमूल्य प्राप्त होऊ शकत नाही हे आपण पाहिले आहे.

आता स्वतोमुल्याच्या कल्पनेशी दुसरी एक कल्पना निगडित आहे – कर्तव्याची, तव्याची (ought) किंवा नैतिक बंधनाची. एखादी वस्तू स्वतोमूल्यवान आहे हे मान्य केले की ती गोष्ट निर्माण करण्याचे किंवा तिची वृद्धी करण्याचे बंधन आपल्यावर येते. है बंधन कोणी आपल्यावर लादलेले नसते; ते आपणच आपल्यावर घालून घेतो. उदा. सुख किंवा संतोष ही स्वतोमूल्यवान गोष्ट आहे हे लक्षात आल्याबरोबर त्याची निर्मिती किंवा वृद्धी करण्याचे बंधन आपल्यावर आहे याची जाणीव आपल्याला होते. आपल्या स्वतःचे सुख किंवा समाधान प्राप्त करण्याकरिता आपण स्वाभाविकपणेच प्रयत्न करीत असतो. तेथे आपण आपले सुख निर्मिण्याचे किंवा त्याची वृद्धी करण्याचे बंधन आपल्यावर आहे असे म्हणता येत नाही. परंतु जे सुख स्वतोमूल्यवान आहे आणि म्हणून ज्याची निर्मिती किंवा वृद्धी करणे आपले कर्तव्य आहे असे आपण म्हणालो ते सुख म्हणजे माझे सुख नव्हे. ते कोणाचे आहे याला महत्त्व नाही, त्याच्या मूल्यवत्वात ते माझे आहे याचा संबंध नाहीं. माझे सुख माझे आहे म्हणून स्वतोमूल्यवान नाही, तर ते सुख आहे म्हणून स्वतोमूल्यवान आहे. सुख कोणाचेही असो, ते स्वतोमूल्यवान असते आणि म्हणून ज्या सुखाची निर्मिती किंवा वृद्धी करणे आपले कर्तव्य आहे ते सुख व्यक्तिसापेक्ष सुख नसून व्यक्तिनिरपेक्ष सुख असते. अशा दृष्टिकोणातून पाहिल्यावर सुख कोणाचेही असो ते निर्मिण्याचे बंधन आपल्यावर येते. या व्यक्तिनिरपेक्ष सुखात माझ्या सुखाचाही समावेश होत असल्यामुळे त्याची निर्मिती करण्याचे बंधन थोड्याफार प्रमाणात माझ्यावर येते.) अमुक एक इच्छा माझी आहे, म्हणून ती पूर्ण करण्याला मला नैसर्गिक कारण आहे, ती इच्छा माझी असल्यामुळे ती पूर्ण करण्याची प्रेरणा मला देण्याची नैसर्गिक शक्ति त्या इच्छेतच आहे. तसेच इतरांच्या इच्छातृप्तीला प्रेरणा देणारे हेतु त्यांच्या प्रत्येकाच्या ठिकाणीही असणारच. पण हे सारे नैसर्गिक स्तरावर झाले. पण इच्छातृप्ती मग ती कोणाचीही असो, स्वत्तोमूल्यवान गोष्ट आहे हे माझ्या लक्षात आले तर ही जाणीव ती इच्छाकृती प्रत्यक्षात आणण्यास मला प्रवृत्त करणारी प्रेरक शक्ती बनते. ही प्रेरणा नैतिक प्रेरणा आहे आणि तिचे बंधन नैतिक बंधन आहे.
आता हे सर्व विवेचन युटिलिटेरियनिझम् च्या परिभाषेत थोडक्यात मांडू या.

‘Utilitarianism’ हे नाव या विचारसरणीला प्रथम जेरमी बैटम् (JETET Bentham) याने वापरले. त्यापूर्वी या मताला सुखवाद (Hedonism) ह्या नावाने संबोधले जाई. ‘Hedonism’ हा शब्द ‘hedone’ या ग्रीक शब्दापासून बनला असून ‘hedone’ म्हणजे pleasure किंवा सुख, या वादाचे अनेक प्रकार आहेत. विशेषतः स्वसुखवाद (Egoistic Hedonism) आणि सर्वसुखवाद (Universalistic Hedonism) हे दोन प्रकार विशेष महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी पहिल्याचे प्रतिपादन असे आहे की प्रत्येक मनुष्याने सर्वदा केवळ महत्तम स्वसुखार्थ कर्म करावे, तर दुसन्याचे प्रतिपादन असे आहे की प्रत्येक मनुष्याने सर्वदा असे कर्म कराने की ज्याने जास्तीत जास्त मानवांचे जास्तीत जास्त सुत्र निर्माण होईल. बॅटमच्या काळापासून या दुसर्‍या मताचे ‘युटिलिटेरियनिझम’ हे नाव रूढ होऊन गेले. त्याला आपण मराठीत ‘उपयोगितावाद’ असा शब्द पर्याय म्हणून वापरू, या मतानुसार कोणत्याही कर्माची उपयोगिता म्हणजे त्याची सुखोत्पादक शक्ती, ‘सुखोत्पादन’ या शब्दाच्या अर्थात दुःखनाशाचा अंतर्भाव अभिनेत आहे. जीवनात सुखदुःखे इतकी सरमिसळ अढळतात की कोणत्याही कर्मान सुखाबरोबरच दुःखाचीही थोडीफार निर्मिती होतेच. अशा कर्माची उपयोगिता म्हणजे त्यातून उद्भवणार्‍या सुखातून त्यातून उद्भवणारे दुःख वजा केले असता जी बाकी उरेल ती, ही बाकी प्रसंगी ऋणचिह्नांकितही असू शकेल. एखाद्या कमनि खूप दुःख आणि थोडेसेच सु निर्माण झाले, तर सुखातून दुःख वजा जाता उरलेली सुखाची मात्रा ऋणसंख्या असेल मनुष्याचे कर्तव्य असे कर्म करणे आहे की ज्याने जास्तीत जास्त सुखवृद्धी होईल असे जेव्ह म्हटले जाते तेव्हा त्यात असेही अभिप्रेत असते की जेथे भावात्मक सुखवृद्धि शक्य नसेल, तेथे ‘ याने कमीत कमी दरवोत्पती होईल असे कर्म करावे.

बेटमच्या काळापासून उपयोगितावादाचे प्रतिपादन ‘the greatest happines of the greatest number’ या सूत्रात व्यक्त केले जाते. या सूत्राविषयी दोन आक्ष घेण्यात आले आहेत. पहिला आक्षेप असा आहे की या सूत्रात एक महत्त्वाचा दोष आहे. त्यात ‘greatest number’ या शब्दांऐवजी ‘all’ हा शब्द पाहिजे होता. या आक्षेपाचा भाव बरोबर आहे, पण त्यात वर उल्लेखलेला दोष आहे असे म्हणता येत नाही. ‘Greatest number’ ची सीमा’ all’ हीच आहे, आणि म्हणून सर्व ‘चा अंतर्भाव महत्तम संख्येन झालेला आहे असे म्हणावे लागते. सर्वांचे सुख हे ध्येय आहेतो आदर्श आहे. पण प्रत्यक्षात ते कोणीही साध्य करू शकत नाही, म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांचे सुख आपले लक्ष्य बनवावे. एखाद्याला क्वचित् सर्वाचे सुख साधता आले तर ते साधावे असा अभिप्राय वरील सूत्रात आहेच.
दुसरा आक्षेप, या सूत्रात फक्त मनुष्यांच्या सुखाचा विचार अभिप्रेत दिसतो, आता सामान्यपणे हे सूत्र मानवांच्या सुखापुरते वापरले जाते हे खरे आहे, परंतु पशुपक्ष्यांना संवेदना असते, त्यांनाही सुखदुःखे असतात, तेव्हा महत्तम संख्येत’ मानवाबरोबरच अन्य प्राण्यांचाही अंतर्भाव करावा असे अलिकडे सामान्यपणे मानले जाते.

उपयोगितावादावर अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. त्यांपैकी एक आक्षेप असा आहे की हे उथळ तत्त्वज्ञान आहे. नीतीच्या गंभीर विषयाचे यात विडंबन आहे. केवळ सुखप्राप्त हे नीतीचे ध्येय असू शकत नाही; नीती त्याहून अधिक गंभीर बाब आहे; इत्यादि. पण हा आक्षेप उपयोगितावादाच्या स्वरूपाविषयांच्या गैरसमजातून उद्भवला आहे असे म्हणाले लागते. सुख प्राप्ती हे उपयोगितावादाचे ध्येय नाहीं; सुखोत्पत्ती आहे, जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त सुखांची निर्मिती ज्याने होईल असे कर्म करणे त्यानुसार कर्तव्य आहे. आणि हे करणे उथळ किंवा थिल्लर गोष्ट आहे असे म्हणता येणार नाही. तसेच सुख म्हणजे केवळ भोजनादि शारीर अनुभवांचे सुख असे मानण्याचे कारण नाही. सर्व प्रकारच्या सुखांचा त्यात अंतर्भाव होतो. त्यात शास्त्रज्ञाला होणार्‍या ज्ञानोपासनेने होणाच्या सुखाचा अंतर्भाव होतो, तसेच समाजसेवकाला दीनदुःखितांच्या सेवेने मिळणार संतोषाचाही अंतर्भाव होतो. फार काय, वेदान्त्याचा ब्रह्मानंद हाही सुखरूपच आहे. प्रत्येकाच्या शक्ती आणि आवडी वेगळ्या असतात. त्यामुळे भिन्न लोकांना भिन्न गोष्टींनी सुख होते. सर्व लोकांच्या सर्व प्रकारच्या सुखांचा विचार जास्तीत लोकांच्या ‘जास्तीत जास्त सुखात’ अभिप्रेत आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.