विवाह आणि नीती (भाग १२)

आजचे कुटुंब आपण प्रकरण २ आणि ३ यांत मातृवंशीय आणि पितृसत्ताक कुटुंब आणि लैगिक-नीतिविषयक प्रारंभिक कल्पनांवर त्यांचा परिणाम यांचा विचार केला याचे वाचकाला एव्हाना विस्मरण झाले असेल. ती कुटुंबविषयक चर्चा फिरून सुरू करण्याची वेळ आता आली आहे, कारण लैंगिक स्वातंत्र्यावर निर्बध घालण्याचा एकमेव विवेकी आधार कौटुंबिक जीवनात आढळतो. कामवासना आणि पाप यांच्यावरील दीर्घ चर्चा आता संपली आहे. काम आणि पाप यांतील संबंध ख्रिस्ती धर्माने निर्माण केला नाही हे खरे, पण त्याने त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला, आणि तेथूनच तो आपणा बहुतेकांच्या नैतिक अवधारणांत (moral judgements) मूर्त झाला आहे. काम ही गोष्ट मुळातच पापमय असून, विवाहाची सांगड अपत्योत्पादनाच्या इच्छेशी घालण्यानेच त्याचा निरास करणे शक्य आहे या धर्मशास्त्रीय मताविषयीही मी अधिक बोलणार नाही. आपण ज्यांची चर्चा आता करावयाची आहे तो प्रश्न म्हणजे अपत्यांच्या हिताच्या दृष्टीने टिकाऊ लैंगिक संबंध कितपत अवश्य आहेत हा आहे. म्हणजे आपल्याला कुटुंबाचा विचार स्थिर वैवाहिक संबंधाकरिता अवश्य असणारी संस्था या दृष्टीने करावयाचा आहे. हा प्रश्न मुळीच सरल नाही. कुटुंबाचा घटक असल्याने बालकाचा जो लाभ होतो त्याला पर्याय काय आहे यावर तो प्रश्न अवलंबून आहे हे उघड आहे. टाकून दिलेल्या मुलांकरिता अशा संस्था असू शकतील की ज्यांतील जीवन बहुसंख्य कुटुंबातील जीवनापेक्षा चांगले असेल, पिता कौटुंबिक जीवनात महत्वाची भूमिका पार पाडत असतो काय याचाही आपल्याला विचार करावा लागेल; कारण पत्नीची एकनिष्ठा ही केवळ त्याच्यामुळेच कुटुंबाला अत्यावश्यक मानली गेली आहे. बालकाच्या वैयक्तिक मानसशास्त्रावर कुटुंबाचा काय परिणाम होतो हे तपासावे लागेल – फ्राइडने या विषयाचा काहीसा अभद्र विचार केला आहे. आर्थिक व्यवस्थेमुळे पित्याचे महत्त्व वाढते की कमी होते हेही विचारात घ्यावे लागेल. शासनसंस्थेने पित्याचे, किंवा प्लेटो सुचवितो त्याप्रमाणे माता आणि पिता दोघांचेही स्थान स्वीकारावे काय हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल; आणि जरी आपण असे ठरविले की ज्यात माता आणि पिता दोघेही आहेत अशी परिस्थिती अपत्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असेल, तरी ज्यात माता आणि पिता यांपैकी एक किंवा दोघही मातृ-किंवा पितृपदाकरिता अपात्र आहेत अशा उदाहरणांची मोठी संख्या लक्षात घ्यावी लागेल; आणि ज्यांत माता-पिता परस्परांना इतके अननुरूप आहेत की ती विभक्त होणे हे अपत्याच्या दृष्टीनेच इष्ट असेल, अशा उदाहरणांचाही आपल्याला विचार करावा लागेल. जे लैंगिक स्वातंत्र्याला धार्मिक कारणास्तव विरोध करतात ते असा युक्तिवाद करतात की विवाहविच्छेद ही गोष्ट अपत्यांच्या हिताला बाधक आहे. परंतु हा युक्तिवाद जेव्हा धर्मशास्त्रवादी लोक करतात तेव्हा तो प्रामाणिक नसतो, आई किंवा बाप यांपैकी कोणी उपदंशाने आजारी असेल आणि मुलालाही तो आजार लागण्याची भीती असेल तेथहीं ही मंडळी विवाहविच्छेद किंवा संततिप्रतिबंधक साधनांचा वापर यांना विरोध करीत असतात यावरून हे दिसून येते. या प्रकारच्या उदाहरणावरून असे म्हणता येते की अपत्याच्या हिताला गद्गद स्वरात केलेले आवाहन वस्तुतः क्रूरपणाने वागण्याचे निमित्त असते. विवाह भाणि अपत्यांचे हित यांच्या संबंधाच्या संबंध प्रश्नाचा विचार पूर्वग्रह बाजूला ठेवून, आणि या प्रश्नाचे उघड उत्तर नाही हे ओळनान करण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी आतापर्यंत केलेल्या चर्चेचा मथितार्थ देणे इष्ट होईल.
कुटुंब ही मानवपूर्व संस्था आहे. तिचे जीवशास्त्रीय समर्थन असे आहे की मातेच्या गरोदरपणात आणि अपत्यजन्मानंतर स्तनपानाच्या काळात पित्याची मदत अपत्य जगण्यास उपकारक असते. परंतु आपण ट्रोत्रिअँड द्वीपवासीयांच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे (आणि हे मानवसदृश वानरांमध्येही आहे असे सुरक्षितपणे अनुमान करता येते) ही मदत ज्या कारणास्तव आदिम समाजात दिली जाई त्या कारणास्तव नागरित (Civilized) समाजात दिली जात नाही. आदिम पित्याला आपला अपत्याशी जीवशास्त्रीय संबंध आहे ही गोष्ट माहीत नसते; अपत्य हे आपल्या प्रेयसीचे मूल आहे एवढेच त्याला माहीत असते. हे त्याला माहीत असते. कारण अपत्याला त्याने जन्मताना पाहिलेले असते आणि याच गोष्टीमुळे तो आणि अपत्य यांच्यामध्ये एक नैसर्गिक दवा निर्माण होतोः या अवस्थेत त्याच्या पत्नीचा व्यभिचार कोणी त्याच्या नजरेस आणून दिला तर त्याचा मत्सर जागृत होईल; पण पत्नीने एकनिष्ठ राहावे याचे जीवशास्त्रीय कारण त्याला दिसत नाही. अपत्य हे आपली पत्नी आणि तिचा भाऊ यांच्या मालकीची गोष्ट आहे,
आणि आपला त्याच्याशी केवळ स्नेहाचा संबंध आहे असे तो समजतो.
परंतु बुद्धीचा विकास होता होता केव्हातरी मनुष्याच्या हातून ज्ञानाचे फळ खाल्ले जाणे अपरिहार्य आहे. त्याला कळून येते की अपत्य आपल्या बीजाचे फळ आहे, आणि म्हणून आपल्या पत्नीच्या अव्यभिचारी निष्ठेची खात्री बाळगता आली पाहिजे. त्यानंतर पत्नी आणि मूल दोन्ही पुरुषाची मत्ता बनते. आर्थिक विकासाच्या एका अवस्थेत ही फार महत्त्वाची मत्ता असते. आपली पत्नी आणि अपत्ये यांना आपल्याविषयी कर्तव्यभावना वाटावी याकरिता मनुष्य धर्माचा उपयोग करतो, अपत्यांना आपल्याबद्दल कर्तव्यभावना असावी हे विशेष महत्त्वाचे असते, कारण ती लहान असताना जरी तो त्यांच्याहून बलवान असला, तरी एकवेळ अशी येणे अपरिहार्य आहे की जेव्हा तो जख्ख म्हातारा होतो आणि ती (अपत्ये) मात्र तारुण्याच्या ऐन भरात असतात. या अवस्थेतही त्यांनी आपल्याविषयी आदर बाळगावा हे वृद्ध पित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या विषयीच्या बायबलमधील आदेशाची शब्दरचना फसवेपणाने केली गेली आहे. ती वस्तुतः अशी हवीः ‘तुझा बाप आणि आई यांचा या पृथ्वीतलावर दीर्घकाल वास होवो याकरिता तू त्यांचा आदर कर’, पितृवधाचे जे पराकोटीचे भय प्राचीन नागरणात (civilisation) आपल्याला आढळते त्यावरून पितृवधाच्या मोहाचे प्राबल्य दिसून येते. जो गुन्हा आपण कल्पनेतही करू शकत नाही. (उदा. नरमांसभक्षण), त्याचे आपल्याला गरे भय वाटू शकत नाही.
प्रारंभीच्या मेषपाल आणि कृषीवल समाजातील आर्थिक परिस्थितीत कुटुंबसंस्थेची पुरेपूर वाढ झाली. गुलामांची सेवा बहुतेक लोकांना अप्राप्य होती, आणि त्यामुळे मजूर मिळविण्याचा सर्वात सुलभ उपाय म्हणजे त्यांना जन्माला घालणे. मुलांनी बापाची सेवा कराची ही गोष्ट निश्चित करण्याकरिता कुटुंबसंस्थेला धर्म आणि नीती यांचा पूर्ण आशीर्वाद मिळविणे आवश्यक होते. हळूहळू अग्रजाधिकाराच्या प्रथेचा विस्तार कुटुंबाच्या उपशाखांपर्यंत करण्यात आला आणि कलपतीचे प्रभाव वाढण्यास मदत झाली. नृपसत्ता आणि महाजनसत्ता दोन्ही या विचारसरणींवर आधारल्या आहेत. एवढेच नव्हे, तर खुद्द ईश्वरीसत्ताही तिला अपवाद राहिली नाही, कारण इयूसनंतर ईश्वरसुद्धा पितृरूप झाला.
येथपर्यंत नागरणाच्या विकासामुळे कुटुंबसंस्थेचे बळ वाढले. पण येथून पुढे विरुद्ध प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचा परिणाम असा झाली की आज पाश्चात्य जगातील कुटुंब मूळ कुटुंबाची केवळ छाया राहिले आहे. या कारणांमुळे कुटुंबाचा क्षय झाला ती कारणे अंशतः आर्थिक आणि अंशतः सांस्कृतिक होती. कुटुंबाच्या पूर्ण विकसित अवस्थेतही ते नागरी किंवा सागरी समाजास फारसे अनुरूप नव्हते. आपले वर्तमान युग वगळता सर्व युगांत व्यापार हे संस्कृतीचे प्रधान कारण राहिले आहे, कारण त्यामुळे भिन्न चालीरीतींची माणसे एकत्र आणली जातात, आणि त्यामुळे आपल्या जमातीच्या पूर्वग्रहातून मनुष्यांची मुक्ती शक्य होते. सागरगामी ग्रीकांमध्ये कुटुंबाची गुलामगिरी त्याच्या समकालीनांच्या तुलनेत अतिशय कमी होती. समुद्राच्या विमोचक प्रभावाची अन्य उदाहरणे म्हणून व्हेनिस, हॉलंड आणि एलिझाबेथकालीन इंग्लंड यांचे देता येईल. पण हा मुद्दा अप्रस्तुत आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा कुटुंबातील एक पुरुष दीर्घ प्रवासास जाई तेव्हा तो अपरिहार्यपणे कुटुंबाच्यानियंत्रणातून मुक्त होई, आणि त्या प्रमाणात कुटुंब दुर्बल होई. खेड्यातील लोकांचे शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर जे नेहमीच नागरणाच्या विकासाच्या कालखंडाचे वैशिष्ट्य राहिले आहेर्‍याने देखील सागरी व्यापाराप्रमाणे कुटुंब दुर्बल झाले आहे. समाजातील निम्न स्तराच्या बाबतीत कदाचित याहूनही अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे गुलामीची प्रथा, गुलामाच्या कौटुंबिक संबंधाविषयी मालकाला क्वचितच पर्वा असे. त्याला वाटेल तेव्हा तो पती आणि पत्नी यांची ताटातूट करू शके, आणि तसेच तो आवडेल त्या गुलामस्त्रीचा उपभोग घेऊ शके. आता हे खरे आहे की ही कारणे महाजनकुटुंबाला स्पर्श करू शकली नाहीत; प्रतिष्ठेच्या इच्छेमुळे ते कुटुंब अखंड राखले जाई. परंतु रोमन साम्राज्याच्या पहिल्या शतकात महाजनसत्तेचे महत्त्व नाहीसे झाले आणि जो ख्रिस्ती धर्म शेवटी विजयी झाला- तो मुळात गुलाम आणि कष्टकरी मजूर यांचा धर्म होता. या वर्गातील कुटुंबाच्या दौर्बल्यामुळे प्रारंभिक ख्रिस्ती धर्म त्याच्या काहीसा विरुद्ध होता है निःसंशय आहे. त्यामुळेच त्या धर्माच्या नीतिसंहितेमध्ये, बौद्ध धर्म सोडला तर अन्य कोणत्याही नीतिसंहितेपेक्षा कुटुंबाचे स्थान गौण होते. ख्रिस्ती नीतिसंहितेनुसार आत्म्याचा परमेश्वराशी संबंध महत्त्वाचा आहे, मनुष्याचा आपल्या बांधवांशी नव्हे.
बौद्ध धर्माचे उदाहरण मात्र धर्माच्या शुद्ध आर्थिक कारणमीमांसेविरुद्ध सावध करण्यास पाते आहे. बौद्ध धमाच्या प्रचाराच्या वेळी हिंदुस्थानातील आर्थिक परिस्थितीविषयीची माझी माहिती पुरेशी नसल्यामुळे त्या घमने व्यक्तीच्या आत्म्यावर एवढा भर देण्याची आर्थिक कारणे कोणती हे मी सांगू शकत नाही, एवढेच नव्हे, तर अशी कारणे होती याविषयीही मी साशंक आहे. ज्या काळात बौद्ध धर्माची हिंदुस्थानात भरभराट झाली त्या काळात तो प्रामुख्याने राजांचा धर्म होता असे दिसते, आणि त्यामुळे कुटुंबाशी संबद्ध कल्पनांची त्यांच्यावर अन्य कोणत्याही वगपक्षा अधिक मजबूत पकड असावी अशी अपेक्षा करणे स्वाभाविक आहे. महमंदाचा आणि जर त्याला धार्मिक नेता म्हणता आले तर कन्फ्यूशसचा अपवाद सोडला तर थोर घार्मिक नेते सामाजिक आणि राजकीय गोष्टीविषयी सामान्यपणे उदासीन होते असे दिसते, आणि त्यांची शिकवण चिंतन, साधना आणि आत्मसंयम यांच्या द्वारा आत्म्याची पूर्णता कशी प्राप्त करून घेता येईल याविषयी असे. ऐतिहासिक काळात निर्माण झालेले धर्म-म्हणजे ऐतिहासिक अभिलेखांच्या (record) आरंभकाळी अगदाच भस्तित्वात असले घर्म सोइन अन्य धर्म-हे एकंदरीने ब्यक्तिवादी होते, आणि मनुष्य आपले संपूर्ण कर्तव्य एकाकी अवस्थेत पार पाडू शकतो अशी त्यात समजूत असे. जर कोणाचे समाजिक संबंध असतील तर त्यांशी संबद्ध कर्तव्ये त्याने पार पाडावीत असा आग्रह ते घरीत हे खरे, पण असे संबंध त्यांनी स्वीकारणे हे त्याचे कर्तव्य आहे असे त्यांनी सामान्यपणे मानले नाही. हे ख्रिस्ती धर्माविषयी विशेषच खरे आहे. त्या धर्माची कबविषयक अभिवृत्ति (attitude) हिंधा राहिली आहे. बायबल म्हणते ‘जो पित्यावर किंवा मातेवर, माझ्यावर करतो त्याहून जास्त प्रेम करतो तो मनुष्य मला शोभणारा नाही. याचा अर्थ असा होतो की मनुष्याने त्याला जे युक्त वाटेल ते करावे, मग त्याचे आईबाप ते अयुक्त समजत असले तरी हरकत नाही. परंतु हे मत प्राचीन रोमन मनुष्याला किंवा जुन्या वळणाच्या चिनी माणसाला मान्य झाले नसते, ख्रिस्ती धर्मातील या व्यक्तिवादी अंशाचा परिणाम हळू हळू झाला, पण त्यामुळे सर्व सामाजिक संबंध – विशेषतः ज्यांची मनोवृत्ती उत्कट कर्तव्यदक्षतेची असेल अशा लोकांचे सामाजिक संबंध – क्षीण झाले आहेत. हा परिणाम प्रॉटेस्टंट पंथापेक्षा कॅथलिक पंथात कमी दिसतो, कारण प्रॉटेस्टंट पंथात आपण मनुष्यापेक्षा ईश्वरावर प्रेम करावे या शिकवणीतील अराजकवादी अंशावर भर होता. परमेश्वराचे ऐकायचे म्हणजे व्यवहारात आपल्या सदसद्विवेकाचे ऐकायचे आणि भिन्न माणसांचे सदसद्विवेक भिन्न कर्मे कर्तव्य म्हणून सांगतील. त्यामुळे सदसद्विवेक आणि कायदा यांच्यात मधून मधून संघर्ष उद्भवणे अपरिहार्य आहे, आणि अशावेळी जो कायद्याच्या आदेशापेक्षा आपल्या सदसद्विवेकाचे आदेश मानतो त्याचे बरोबर आहे असे मानणे वा विसाला अपरिहार्य होईल, अव्वल नागरणांत (civilization) पिता परमेश्वर होता; ख्रिस्ती धर्मात परमेश्वर पिता आहे. याचा परिणाम असा झाला की मानवी पित्याचा अधिकार दुर्बल झाला.
अगदी अलीकडच्या काळात झालेल्या कुटुंबसंस्थेच्या हासाचे कारण प्रामुख्याने औद्योगिक क्रांती आहे हे निःसंशय. परंतु त्याची सुरुवात त्याच्या आधीच झाली होती, आणि त्याचे कारण व्यक्तिवादी विचारसरणी हे होते. तरुण स्त्रीपुरुषांनी आपल्या इच्छेनुसार-आईबापांच्या आज्ञेनुसार नव्हे = लाग्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. विवाहित पुत्रांनी पित्याच्या घरी राहण्याची सवय क्रमशः नाहीशी झाली. पुत्रांनी शिक्षण संपल्याबरोबर उपजीविकेकरिता पित्याचे घर सोडणे रूढ झाले. जोवर अल्पवयी मुलांना कारखान्यात काम करता येत होते तोवर त्यांचे मरण अतिश्रमाने ओढवेपर्यंत ती आईबापांच्या मिळकतीचे एक साधन होते. परंतु फैक्टरी अॅक्टांन्वये हे शोषण, त्यातून यांना लाभ होई त्यांचा विरोध होऊनहीं, बंद झाले. आधी उपजीविकेचे साधन असलेली मुले नंतर एक आर्थिक ओझे बनली. याच वेळी संततिप्रतिबंधक साधनांचाहीं शोध लागला, आणि जन्मदरात घट होऊ लागली. सरासरी मनुष्याला जितकी मुले परवडत तितकीच मुले त्याला सर्व युगात होत, कमी नाही आणि जास्तही नाही या मतात पुष्कळच तथ्य आहे. निदान हे ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी, कशायरच्या कापडगिरण्यातील मजूर, आणि ब्रिटिश उमराव यांच्या बाबतीत खरे आहे असे दिसते. हे मत काटेकोरपणे खरे आहे असा दावा मी करीत नाही, पण ते सत्यापासून आपल्याला वाटते तितके दूर नाही.
आधुनिक काळात कुटुंबाचे स्थान शासनसंस्थेच्या उपक्रमांमुळे त्याच्या बालेकिल्ल्यातही दुर्बल झाले आहे. कुटुंबाच्या उत्कर्षाच्या काळात त्याचे स्वरूप असे असेः एक वयस्कर कुलपती पिता (patriarch), नंतर अनेक प्रौढ मुलगे, त्यांच्या बायका आणि त्यांची मुले, क्वचित् त्यांच्या मुलांची मुलेही – ही सर्व एका घरात एकत्र राहात, एक आर्थिक एकक म्हणून सहकार्य करीत, बाह्य जगाविरुद्ध एखाद्या युयुत्सु आधुनिक राष्ट्राच्या नागरिकांप्रमाणे एकजुटीने उभी असलेली असत. आज कुटुंब म्हणजे बाप, आई आणि त्यांची धाकटी मुले – अशी स्थिती आहे. त्यातही धाकटी मुले शासनसंस्थेच्या आदेशानुसार आपला बहुतांश वेळ शाळेत घालवितात, आणि तिथे आईबापांना इष्ट वाटेल ते नव्हे, तर शासनसंस्थेला इष्ट वाटेल ते ती शिकतात. (याला धर्म हा अंशतः अपवाद आहे.) रोमन पित्याला आपल्या अपत्यांवर पूर्ण अधिकार – मृत्युदंड देण्याचाही होता. त्याच्यापासून आज आपण इतके दूरआलो आहोत की शंभर वर्षांपूर्वी मुलांच्या नैतिक बाढीकरिता त्यांना ज्याप्रकारे वागविणे अवश्य मानले जाई. त्या प्रकारच्या वागणुकीकरिता आज ब्रिटिश पित्यावर क्रोयाबद्दल खटला होऊ शकतो. आज शासनसंस्था मुलांना वैद्यकीय मदत देते आणि जर आईबाप दरिद्री असतील तर मुलाला भोजनही देते. पित्याची कर्तव्ये आता यामुळे अत्यल्प राहिली आहेत. कारण त्यांपैकी बहुतेक शासनसंस्थेने स्वीकारली आहेत. नागरणाच्या वाटचालीबरोबर हे घडणे अपरिहार्य आहे. आदिम परिस्थितीत पित्याची आवश्यकता जशी पक्षी आणि मानवसदृश वानरांत आहे, तशी ती मानवांत आर्थिक कारणास्तव, आणि तसेच अल्पवयीन अपत्ये आणि त्यांची आई यांचे रक्षण करण्याकरिताही होती. हे दुसरे काम शासनसंस्थेने यापूर्वीच आपल्या हातात घेतले आहे. ज्याचा बाप मृत आहे अशा मुलाचा कोणी खून करील ही भीती ज्याचा बाप हयात आहे त्या मुलापेक्षा जास्त राहिलेली नाही. खरे म्हणजे सुखवस्तू कुटुंबात पित्यांचे आर्थिक कार्य आज तो मत असल्यास अधिक समर्थपणे होऊ शकते. कारण आपली सगळी संपत्ती तो तिचा काही भाग स्वतःकरिता न ठेवता मुलांना देऊ शकतो. जे अजित धनावर अवलंबून असतात अशा लोकांना पिता अजूनही आर्थिक दृष्ट्या उपयुक्त असतो; परंतु मोलमजुरी करणार्‍या लोकांमध्ये ही उपयुक्तता समाजाच्या मानवतावादी विचारसरणीमुळे कमी होत चालली आहे, कारण या विचारसरणीनुसार मुलाला काही किमान पालनपोषण बाप देऊ शकत नसला तरी त्याला ते मिळाले पाहिजे असा आग्रह धरला जातो. सध्या पित्याचे सर्वात जास्त महत्त्व मध्यमवर्गात आढळते; कारण पिता जोपर्यंत जिवंत असतो आणि बर्‍यापैकी संपत्ती कमावतो तोपर्यंत तो आपली सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा टिकविण्यासाठी आवश्यक असणारे महागडे शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकतो. परंतु तो जर मुले लहान असताना वारला, तर त्यांचा सामाजिक दर्जा खालावण्याची भीती असते. मात्र या प्रकारची अनिश्चितता आयुर्विम्याच्या संस्थेमुळे पुष्कळच कमी झाली आहे, कारण या संस्थेच्या साह्याने दूरदर्शी पिता आपली स्वतःची उपयुक्तता पुष्कळच कमी करू शकतो, आधुनिक जगात बहुसंख्य पित्यांना इतके काम करावे लागते की त्यांना आपल्या मुलांकडे फारसे लक्ष देता येत नाही. सकाळी ते कामासाठी बाहेर जाण्याच्या घाईत असल्यामुळे त्यांना संभाषणाला वेळ नसतो, संध्याकाळी जेव्हा ते परत येतात तेव्हा त्यांची मुले झोपी गेलेली असतात, निदान जावीत अशी अपेक्षा असते. ज्यांना आपले वडील म्हणजे ‘सप्ताहांती येणारा मनुष्य म्हणूनच माहीत असतात अशा मुलांच्या कहाण्या आपण ऐकल्या माहत अपत्यांचे संगोपन करण्याच्या कठीण कामात पिते क्वचितच भाग घेऊ शकतात. खरे म्हणजे हे काम करतात मुलांच्या आया आणि शिक्षक, आता हे खरे आहे की पित्याला आपल्या मुलांबरोबर घालवायला अगदी थोडावेळ मिळत असूनसुद्धा त्याला आपल्या मुलांविषयी उत्कट प्रेम वाटत असते, लंडन शहराच्या सापेक्षतः दरिद्री भागात माणसे मोठ्या संख्येने आपल्या मुलांबरोबर हिंडताना दिसतात. ते उघडच आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपल्या मुलांचा परिचय करून घेण्यासाठी करीत आहेत आणि त्यात अतिशय आनंद मानताहेत असे दिसते. परंतु पित्याच्या दृष्टीने ह्या संबंधाला कितीही महत्त्व असले, तरी मुलांच्या दृष्टीने हा संबंध केवळ खेळातील संबंध असतो, आणि त्याला कसलेही गंभीर महत्त्व नसते.
वरच्या थरांतील व्यावसायिक वर्गात सामान्यपणे मुले लहानपणी नर्सच्या स्वाधीन केली जातात. आणि त्यानंतर बोडिग स्कूलमध्ये पाठविली जातात. आई नर्सची निवड करते, आणि बाप शाळेची. त्यामुळे त्यांचा मुलांवरील अधिकार अबाधित राखला जातो. हे मजूरवगत शक्य होत नाही. आई आणि अपत्य यांचा गाढ संसर्ग सुखवस्तू लोकांपेक्षा मजूरवात कमी असतो. सुटीच्या दिवशी पित्याचा संबंध येतो, पण हा संबंध खेळातील संबंधासारखा असतो, आणि त्याचा अपत्याच्या शिक्षणातील सहभाग मजूरवर्गातील पित्याच्या सहभागापेक्षा जास्त असत नाही. त्याला अर्थातच आर्थिक धन्माबदारी असते, आणि मुलांना शिक्षण कुठे दिले जावे हे ठरविण्याचा अधिकारही असतो. पण त्यांचा अपत्याशी होणारा संसर्ग फारसा गंभीर असू शकत नाही.
जेव्हा मूल पौगंडावस्थेत प्रवेश करते, तेव्हा आईबाप आणि मूल यांच्यात संघर्ष उत्पन्न होण्याचा दाट संभव असतो, कारण मुलाला वाटत असते की आपण आपले भवितव्य ठरविण्यास समर्थ आहोत आणि आईबापांना अपत्याविषयी काळजी वाटत असते. मात्र पुष्कळदा ही काळजी प्रच्छन्न अधिकारलालसा असते. आईबापांना वाटते की पौगंडावस्थेत उद्भवणार्‍या विविध नैतिक समस्या म्हणजे आपले खास क्षेत्र आहे; परंतु ते व्यक्त करीत असलेली मते इतकी ठाम असतात की तरुण मुले आपले मन त्यांच्याजवळ क्वचितच मोकळे करतात, आणि सामान्यपणे आपला मार्ग गुप्तपणे चोखाळतात. म्हणून बहुसंख्य
आईबापांचा या अवस्थेत फारसा उपयोग होतो असे म्हणता येत नाही.
आतापर्यंत आपण कुटुंबाच्या दुर्बलतेचा विचार केला. आता ते अजून कोणत्या बाबतीत बलवान आहे याचा विचार केला पाहिजे, आज कुटुंबाचे महत्त्व अन्य कोणत्याही कारणापेक्षा त्यात आईबापांना अनुभवायला मिळणाच्या भावनांमुळे आहे. स्त्रियांत तसेच पुरुषांतही वात्सल्यभावना मनुष्यांना कर्मास प्रवृत्त करण्याच्या शक्तीमुळे अन्य कुठल्याही भावनेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, ज्यांना मुले आहेत अशा स्त्रिया आणि पुरुष आपल्या जीवनाचे नियमन त्यांच्या अनुरोधाने करतात, आणि अतिशय सामान्य स्त्रीपुरुषांनाही मुलांमुळे निःस्वार्थपणे वागण्याची प्रेरणा मिळते. आयुर्विमा हे त्याचे बहुधा सर्वात निश्चित आणि परिमेय (measurable) उदाहरण असेल. शंभर वर्षांपूर्वीच्या पाठ्यपुस्तकांतील अर्थार्थी मनुष्याच्या (the economic man) कल्पनेत अपत्यांचा विचार नव्हता. अर्थशास्त्रज्ञांच्या कल्पनेत अपत्ये अर्थात् होती, पण त्यांनी गृहीत धरलेली सार्वत्रिक स्पर्धा पिता आणि पुत्र यांच्यात नसते असे त्यांनी मानले होते. जुन्या अर्थशास्त्रात अभिप्रेत असलेल्या कर्मप्रेरकात आयुर्विम्याच्या मानसशास्त्राचा समावेश नव्हता. असे असले तरी ते अर्थशास्त्र मानसशास्त्रदृष्ट्या स्वायत्त नव्हते, कारण संपत्तीची इच्छा वात्सल्यभावनेशी दृढपणे संबद्ध असते. रिव्हर्सची मजल तर असेही म्हणण्यापर्यंत गेली आहे की मतेची (property) संस्था कोबिक भावनेतून उद्भवली आहे. तो अशा पक्ष्यांची उदाहरणे देतो की जे प्रजननाच्या ऋतूत जमिनीची मालकी मानतात, पण अन्य वेळी नाहीं. मला वाटते की बहुतेक पुरुष हे मान्य करतील की अपत्यजन्मानंतर प्राप्तीची हाव आपल्यात पुष्कळच वाढते. ही प्रवृत्ती लौकिक अर्थाने बोलायचे तर सहजप्रवृत्तिसदृश म्हणजे उत्स्फूर्त असते, आणि तिची मुळे उपसंज्ञेत (subconscions) असतात. मला वाटते की या बाबतीत कुटुंबाचे महत्व मानवाच्या आर्थिक विकासात अमेय आहे, आणि जे पैसा शिल्लक टाकण्याइतके सुखवस्तू आहेत अशा लोकांमध्ये तो हेतू आजही प्रभावी आहे.
या बाबतीत पिता आणि मुले यांच्यात एक चमत्कारिक गैरसमज संभवतो. ज्याने धंद्यात खूप मेहनत केली आहे असा मनुष्य आपल्या निरुद्योगी मुलाला सांगतो की आपण सारा जन्म केवळ मुलांच्या हितार्थ कष्ट केले आहेत. परंतु मुलाला मात्र भविष्यात केव्हातरी मोठे घबाड मिळण्यापेक्षा आज थोडा पैसा आणि थोडी प्रेमाची वागणूक मिळाली तर हवी असते. मुलाच्या हेही लक्षात येते की बाप आपल्या ऑफिसमध्ये जातो तो केवळ सवयीमुळे, अपत्यस्नेहाने नव्हे. त्यामुळे आपला बाप ढोंगी आहे याविषयी मुलाची खात्री असते. आणि तितकीच खात्री आपला मुलगा कुचकामाचा आहे अशी बापाचीही असते. मात्र यात मुलाच्या हातून अन्याय होत असतो. तो आपल्या बापाला पाहतो तो त्याच्या मध्यमवयात. त्यावेळी त्याच्या सर्व सवयी दृढमल झालेल्या असतात. पण त्या सवयींना कारणीभूत झालेल्या गूढ असंज्ञ कारणांची त्याला कल्पना नसते. कदाचित् बापाने लहानपणी दारिद्याचे चटके सहन केले असतील, आणि त्याचा पहिला मुलगा जन्मला तेव्हा त्याने शपथ घेतली असेल की माझ्या कोणाही मुलावर हा प्रसंग येऊ नये, असा निश्चय अतिशय महत्त्वाचा आहे, आणि म्हणून त्याचा संज्ञेमध्ये पुनरुच्चार करण्याची गरज नसते, कारण त्यावाचूनही तो पुढच्या संबंध आयुष्यावर प्रभाव गाजवतो. ज्या कारणांमुळे कुटुंब अजून प्रबल राहिले आहे त्यांपैकी एक हे आहे.
बाल अपत्याच्या दृष्टीने आईबापांचे महत्त्व असे असते की त्यांच्याकडून त्याला असा स्नेह मिळतो की जो त्याची भावंडे सोडून दिली तर आणखी कोणालाही मिळत नाही. हे अंशतः हितकर आहे, पण अंशतः अहितकरही आहे. कुटुंबाच्या मुलांवर होणार्‍या मानसशास्त्रीय परिणामांचा विचार मी यापुढच्या प्रकरणात करणार आहे, त्यामुळे इथे मी त्यासंबंधी एवढेच म्हणतो की शीलसंवर्धनात त्याला महत्त्वाचे स्थान आहे, आणि म्हणून भाईबापांपासून दूर झालेली मुले अन्य मुलांहून बरीच भिन्न – चांगली किंवा वाईट हे मी म्हणत नाही – असली पाहिजेत.
महाजनसत्ताक समाजात, खरे म्हणजे ज्यात वैयक्तिक श्रेष्ठत्वाला मान आहे अशा कोणत्याही समाजात, कुटुंब हे काही व्यक्तींच्या बाबतीत ऐतिहासिक सातत्याचे एक लक्षण मानले जाते. ज्याचे नाव डार्विन आहे त्या मुलाच्या हातून जे वैज्ञानिक कर्तृत्व गट होते तेवढे कर्तृत्व जर त्याचे नाव लहानपणीच बदलून नक्स’ (Snooks) ठेवले असते तर त्याच्या हातून प्रगट होत नाही असे आढळून आले आहे. जर आडनावे पितृवंशानुसार ठरण्याऐवजी ती मातृवंशानुसार ठरली असती, तरी हेच आढळून आले असते अशी माझी कल्पना आहे. अशा प्रकरणात अनुवंश (heredity) माणि परिस्थिती (environment) यांचे वाटे निश्चित करणे अशक्य आहे; परंतु गॉल्टन आणि त्याचे शिष्य या गोष्टी अनुवंशजन्य आहेत असे मानतात त्यात कौटुंबिक परंपरेचे स्थान मोठे असते याविषयी माझ्या मनात शंका नाही. कौटुंबिक परंपरेच्या प्रभावाचे उदाहरण म्हणून सॅम्युएल बटलरचे देता येईल, असंज्ञ स्मृतीची (unconscious memory) उपपत्ती सुचविण्याचे आणि अनुवंशाच्या व- लामावादी (neo-Lamarckism) उपपत्तीचा पुरस्कार करण्याचे कारण असे होते की कौटुंबिक कारणामुळे बटलरला डार्विनशी सहमती दाखविणे अशक्य होते. असे म्हणतात की त्याचे आजोबा आणि डार्विनचे आजोबा यांचे भांडण होते, आणि त्याचे वडील आणि डार्विनचे वडील यांचेही भांडण होते. तेव्हा त्याने छानिनशी भांडणे अवश्य होते. त्यामुळे शांच्या मेथ्यसलाचे जे स्वरूप आहे त्याचे कारण डार्विन आणि बटलर यांचे आजे भांडखोर होते हैं माहे.
आजच्या संतति-प्रतिबंधक साधनांच्या काळात कुटुंबाचे सर्वात मोठे महत्त्व कदाचित् हे असेल की त्याच्यामुळे अपत्यांना जन्म देण्याची सवय टिकून राहिली आहे. जर पुरुषांचे अपत्य त्याच्या मतेचा भाग राहणार नसेल, आणि त्याच्याशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी त्याला मिळणार नसेल, तर अपत्याला जन्म देण्याचे त्याला कारणच राहणार नाही. आता आपल्या आर्थिक संस्थांत थोडा बदल करून कुटुंब फक्त आईचेच असावे अशी व्यवस्था करता येईल हे खरे, पण मी येथे अशा कुटुंबाचा विचार करीत नाही आहे, कारण अशा कुटुंबात लैंगिक निष्ठेला महत्त्व देण्याचे कारण असणार नाही, आणि या प्रकरणात मी कुटुंबाचा विचार ते टिकाऊ विवाहाला कितपत कारणीभूत होईल या दृष्टीने करीत आहे. आता हे शक्य आहे आणि खरे म्हणजे मला ते असंभाव्यही वाटत नाही – श्रीमंतांची कुटुंबे नोडली (म्हणजे समाजवादाच्या तडाख्यातून श्रीमंत लोक वाचले) तर पिता लवकरच नामशेष होईल, तसे झाले तर मुलांचा सांभाळ स्त्रिया आणि पुरुष यांच्या ऐवजी स्त्रिया आणि शासनसंस्था ह्या करतील. स्त्रियांना हवी तितकी मुले होतील, आणि पित्यांवर त्यांची जबाबदारी राहणार नाही. खरे म्हणजे जर आई स्वैर प्रवृत्तीची असेल, म्हणजे एकाच वेळी अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी असेल तर मुलांचे पितृत्व निश्चित करणे अशक्यही होईल. पण जर हे घडून आले, तर त्यामुळे पुरुषांचे मानसशास्त्र आणि त्यांचे व्यवहार यांत फार गंभीर परिवर्तन घडून येईल, आणि हे परिवर्तन बहुतेक लोकांना अपेक्षित असेल त्याहून अधिक गंभीर असेल. याचा पुरुषांवर होणारा परिणाम चांगला की वाइट ते सांगण्याचे धाडस मी करीत नाही. पुरुषांच्या जीवनातून लैगिक प्रेमाच्या तोडीची असलेली एकमेव भावना (म्हणजे वात्सल्यभावना नाहीशी होईल. लैंगिक प्रेमही त्यामुळे अधिक थिल्लर होईल, स्वतःच्या मृत्यूनंतर घडणार असलेल्या कशातही रस घेणे मनुष्याला अशक्य होईल. त्यामुळे पुरुष कमी उद्योगी होतील, आणि कदाचित् उद्योगातून लवकर निवृत्तही होतील. त्यांना इतिहासात वाटणारा रस आणि ऐतिहासिक परंपरेच्या सातत्याची जाणीव ही कमी होतील. त्याचबरोबर नागरिंत मनुष्याल आढळणारी सर्वात उग्र आणि हिन भावना – म्हणजे काळ्या लोकांच्या हल्ल्यापासून आपली बायको आणि मुले यांचे रक्षण करण्याचा त्वष – हाही नाहीसा होईल. मला वाटते की पुरुष कर्मी युद्धखोर होतील, आणि कदाचित कमी लोभीही होतील. यांपैकी चांगले आणि वाईट परिणाम यांच्यातील सवर्णमध्य साधणे अशक्यप्राय आहे, पण हे परिणाम भीर आणि दूरगामी होतील हे उघड आहे. याकरिता पितृसत्ताक कुटुंब अजूनही महत्त्वाचे आहे. पण ते किती काळ तसे राहील हे सांगणे कठीण आहे.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.