[मार्च १९९१ च्या अंकात जाहीर केलेल्या दोन परिसंवादांच्या विषयांपैकी धर्मनिरपेक्षता’ या विषयाची अपेक्षित व्याप्ती दाखविणारे प्रश्न एप्रिल १४ व्या अंकात प्रसिद्ध केले आहेत. आज दुसर्या विषयावरील – माक्र्सवादावरील प्रश्न देत आहोत. ही प्रश्नावली आमचे मित्र हा विश्वास कानडे आणि डॉ निवास खाईवाले यांनी तयार केली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. पहिल्या परिसंवादाप्रमाणे चर्चेत भाग घेण्यासाठी आम्ही काही व्यासंगी विद्वानांना झामन्नत करत आहोत. परंतु या परिसंवादात आमच्या वाचकांनाही भाग यावा अश विनंती आहे.
– संपादक]
माक्र्सवाद है सामाजिक असमतोलाचे निदान करण्याचे आणि सामाजिक परिवर्तनाचे दिग्दर्शन करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून प्रतिष्ठा पावले होते. पण सत्तर ऐंशी वर्षे प्रभावी ठरलेला माक्सवद गेल्या दशकात एकदमच कोलमडून पडला. हे कसे झाले? ह्यामागे काही बाह्य शक्ती होत्या की माक्र्सवादातच ह्या -हासाची बीजे होती? माक्र्सवाद खरोखरच संपुष्टात आला आहे काय की ही माक्सवाच्या विकासातील केवळ एक अवस्था आहे? हे व असले प्रश्न जगभर विचारवंतांच्या मनांत उपस्थित झाले आहेत. प्रस्तुत परिसंवाद ह्या सर्व प्रश्नांचा वेध घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यासाठी पुढील मुद्दे विचारार्थ सुचवीत आहोत.
१. माक्र्सवादांच्या रशियातील आणि युरोपातील अन्य देशांतील वाटचालीत वेळोवेळी जे विद्रोही (पण माक्र्स-एंगेल्सलाच आधार मानणारे) विचार होते त्यांचे आजच्या संदर्भात पुनर्मूल्यांकन केल्यास त्यात आजच्या घटनांची कारणे सापडू शकतात काय?
२. माक्र्सचा सिद्धान्त (theory) आणि व्यवहार (practice) यात तफावत होती काय
३. रशिया व पूर्व युरोपातील मार्क्सवादी सरकारे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली याची राजकीय व अर्थशास्त्रीय मीमांसा काय आहे? फक्त एवढीच मीमांसा पुरेशी आहे काय?
४. भारतीय संदर्भात माक्र्सवाद कधीच मूळ धरू शकला नाही याची नेहमी पुढे करण्यात येणारी कारणे येथील ज्ञाति-धर्मभेद, एशियन मोड ऑफ प्रॉडक्शन, राष्ट्रवादापेक्षा आंतरराष्ट्रीयत्वाला जास्त महत्त्व इत्यादि प्रकारची सांगण्यात येतात. ही कारणमीमांसा पुरेशी आहे काय? याच संदर्भात अलीकडे धर्मनिष्ठेला आलेले अनन्यसाधारण महत्त्व या गोष्टींचाही विचार व्हावा. तसेच भारतीयांच्या तत्त्वचिंतनात खास भारतीय अशी एखादी विचारप्रणाली आहे काय याचाही शोध घेतला जावा.
५. माक्र्सवाद ही जर सामाजिक परिवर्तनाची प्रणाली होती; व ती जर आज कालबाह्य झालेली दिसत असेल तर तिला पर्यायी अशी शास्त्रीय प्रणाली कोणती? भांडवलशाही किंवा लोकशाही या संज्ञा एका विशिष्ट प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेच्या निदर्शक आहेत. इथे अभिप्रेत असलेल्या सामाजिक विचारप्रणाली म्हणून त्यांच्याकडे पाहता येणार नाही.
६. माक्र्सवाद खरोखरच संपुष्टात आला आहे काय? त्यातील नेमक्या कोणत्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत आणि कोणत्या अजून शिल्लक आहेत? त्यांच्या आधारे तो पुन्हा उभा राहू शकेल काय? भविष्यात त्याचे स्वरूप काय राहील? काय असावे?
७. माक्र्सवाद हे एक विज्ञान आहे, विज्ञानावर आधारलेला एक कार्यक्रम आहे, असा त्याच्या प्रवर्तकांचा दावा होता, आणि त्याच्या पुरस्कत्यांचा आजही आहे. माक्र्सवाद कोणत्या अर्थान विज्ञान आहे? विज्ञानात एखादा सिद्धान्त प्रस्थापित करण्याची एक पद्धती आहे, त्या पद्धतीने प्रस्थापित झालेल्या सिद्धान्तासंबंधाने वैज्ञानिकांमध्ये चाद नसतो. परंतु माक्र्सवादासंबंधाने हे आढळून येत नाही. याचा विचार होणे अवश्य आहे. तसेच अर्थकारण आणि राजकारण यांना आधारभूत असलेले माक्र्सवादाचे जे तत्त्वज्ञान आहे त्याचेही मूलगामी परीक्षण होणे जरूर आहे.