एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता

एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
मुसलमानांची समता फक्त मुसलमानांपुरतीच होती. इस्लाम धर्म इतका एकतर्फी आहे व स्वतःच्या अटीशिवाय कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण न करता (वन्दे मातरम् म्हणण्याससुद्धा तो तयार होत नाही) मुस्लिमेतरांबरोबर संहअस्तित्वास इतका प्रतिबंध करणारा आहे की तो फक्त मुस्लिम देशांकरिताच योग्य आहे आणि असे असले तरी तेथेही विसाव्या शतकाने कायदेविषयक बदल आवश्यक झाले आहेत. भारतासारख्या मुस्लिम नसलेल्या देशात मुस्लिमेतर बहुसंख्याकांबरोबर मुस्लिम अल्पसंख्याकांना राहावयाचे झाले तर त्यांनी एकरूप व एकात्म होणे जरूरी आहे, हे ओघानेच येते. पण इस्लाम धर्म या गोष्टीस विरोध करतो. जवळ जवळ आदर्श धर्मनिरपेक्षतेच्या पिढ्यान् पिढ्यांच्या देखाव्यानंतरही हैद्राबाद संस्थानात मुस्लिम रझाकार चळवळीचा जो हिंसक उठाव होऊ शकला, त्यावरून ही गोष्ट जितकी सिद्ध होते तितकी इतर कशानेही होत नाही, आणखी दुसरे उदाहरण द्यावयाचे झाल्यास काश्मीरचे देता येईल. संविधानात्मकदृष्ट्या काश्मीर संस्थान भारतात विलीन होऊ शकले असते. परन्तु देहस्वभावदृष्ट्या विलीन होण्यास अक्षम असलेले मुस्लिम काश्मिरी मात्र विलीन होऊ शकले नसते. बाकीच्या भारतातसुद्धा हिंदू-मुसलमान एकात्मता यापेक्षा अधिक घडून आलेली नाही. मुस्लिम जातीयवाद हळूहळू पुनरुज्जीवित होण्याचे सर्वात मोठे कारण विभाजनाची गुंगी यथाक्रम उतरू लागली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, कर्मठ हिंदू व मुसलमान एकरूप होऊ शकत नाहीत; फक्त अज्ञेयवादी हिंदू व मुसलमानच एकरूप होऊ शकतात. एकात्मतेने मानवतावाद येणार नाही; तर मानवतावादाने एकात्मता येईल. आतापर्यंत आम्ही अयशस्वी झालो कारण आम्ही उलटे केले. घोड्यापुढे गाडी ठेवण्याचा प्रयत्न केला. Muslim Dilemma in India)
– एम. आर. ए. बेग
श्री अच्युतराव खोडवे ह्यांनी केलेला अनुवाद. (भारतातील मुसलमानांपुढील पेच पू. ११).

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.