१९८९ : एक अन्वयार्थ

मूळ लेखक : पॉल एम्. स्वीझी

एका युगाचा प्रारंभ किंवा शेवट म्हणून, महत्त्वाचे वळण देणारी म्हणून, विशिष्ट वर्षे ही लक्षणीय टप्पे म्हणून इतिहासात नोंदली जातात. १७७६, १७८९, १८४८, १९१७, १९३९ ही अशी काही वर्षे होती. ह्या यादीत जाऊन बसणारे आणखी एक वर्ष म्हणजे १९८९ (एकोणीसशे एकोणनव्वद) हे होय. पण कशासाठी म्हणून ते विशेष लक्षात राहील? Js_ कम्युनिझमचा शेवट झाला यासाठी, असे काही म्हणतील; तर इतर काही, भांडवलशाही आणि समाजवाद यातील संघर्षात भांडवलशाहीचाच अखेर विजय झाला यासाठी, असे म्हणतील. पण मला एक वेगळाच अन्वयार्थ सुचवावासा वाटतो.
जगण्यास समर्थ असणारी आणि सतत विस्तार पावणारी एक व्यवस्था म्हणून भांडवलशाही जवळ जवळ गेली ५०० वर्षे अस्तित्वात आहे. तिची कक्षा ही नेहमीच आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होती, आणि गेल्या दोनशे वा तीनशे वर्षांत तिने जागतिक परिमाणांचा पल्ला गाठला आहे. अंतर्विरोधांना तिला नेहमीच तोंड द्यावे लागले आणि खरे म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेल्या तिच्या बळकट वाढीसाठी ते आवश्यकही होते. पण भांडवलशाहीतील ह्या अंतर्विरोधांनीच, तिच्या विरोधी चळवळींना चालना दिली आणि ह्या चळवळी त्या व्यवस्थेबरोबरच फोफावत व विस्तारत गेल्या. पहिले महायुद्ध, मंदीची मोठी लाट आणि दुसरे महायुद्ध, ही भांडवलशाही व्यवस्थेची तीन गंभीर व व्यापक अरिष्टे (crises) चालू शतकाने पाहिली आहेत. या अरिष्टांचा परिपाक म्हणून १९१७ मधील रशियन क्रांतीपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत जगाचा एक तृतीयांश भूभाग आणि तेथील जनता ही जागतिक भांडवलशाही व्यवस्थेपासून फुटून निघाली. एकोणिसाव्या शतकात मार्क्सने मांडलेल्या शास्त्रीय ग्रथनातील भांडवलशाही व्यवस्थेला पर्यायी असलेल्या समाजवादी तत्त्वांनी प्रेरित होऊन तेथील जनतेने आपली अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था उभारायला सुरुवात केली.
फुटून निघण्याची ही जी घटना घडली, ती जागतिक भांडवलशाही व्यवस्थेच्या दुर्बल आणि तुलनेने अविकसित भागात. त्याचा परिणाम असा झाला की हे फुटून निघालेले देश भांडवलशाही व्यवस्थेच्या समर्थ व अधिक विकसित देशांशी समान अटींवर कधीच स्पर्धा करू शकले नाहीत. या देशांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे भांडवलदारी नेत्यांनी दृढ प्रयत्न चालवले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या प्रयत्नांविरुद्ध, आपले अस्तित्व टिकवण्याच्या कामी अतिशय प्राथमिक कार्यात या देशांना आपल्या सर्व शक्ती, अगदी प्रारंभकाळापासूनच, जुंपाव्या लागल्या. म्हणूनच ज्या जागतिक भांडवलशाही व्यवस्थेपासून हे देश फुटून निघाले होते त्या व्यवस्थेच्या तोडीची दुसरी एक सुसंगत समाजवादी व्यवस्था ते उभी करू शकले नाहीत. त्यामुळे त्या प्रत्येक समाजाच्या आपापल्या वाटचालीत त्यांच्या निव्वळ समाजवादी महत्त्वाकांक्षाच प्रतिबिंबित झाल्या नाहीत; तर त्या समाजांची विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत असलेली विविधता व त्यांची विशिष्ट दौर्बल्ये देखील प्रतिबिंबित झाली आहेत. त्या सर्वांच्या ओझ्याखाली हे समाज अगदी प्रारंभकाळापासून होते.
3- या पार्श्वभूमीवर शीतयुद्धाला त्याचा खराखुरा अर्थ प्राप्त होतो. वस्तुतः शीतयुद्धात बऱ्याच ‘गरम युद्धांचाही अंतर्भाव झालेला होताच. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच शीतयुद्धाला प्रारंभ झाला. त्यावेळी एकूण जागतिक व्यवस्थेत अमेरिकेकडे सत्ताकेंद्र होते आणि आण्विक अस्त्रेदेखील तिच्याच ताब्यात होती. भांडवलशाही व्यवस्थेपासून समाजवादी व्यवस्थेच्या दिशेने जाण्याची त्यावेळी जी प्रक्रिया सुरू झाली होती, ती पुन्हा भांडवलशाही व्यवस्थेकडे परतविण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील होती. पूर्व युरोपातील बराच भाग ‘रेड आर्मीच्या ताब्यात होता. पश्चिम जगाबरोबर-निदान युरोप-बरोबर ‘जगा आणि जगू द्या अशी व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे, असे स्टॅलिनला सुरुवातीस वाटले. या गृहीतानुसार साधारणपणे वर्षभर चालल्यानंतर आणि त्या दरम्यान अमेरिकेकडून ती स्वीकारल्याचे कसलेच चिन्ह न आढळल्यामुळे, समाजवादी व्यवस्थेचे अस्तित्व टिकवण्याकरिता स्टॅलिनने अतिशय टोकाच्या उपाययोजना करण्याचे ठरवुन टाकले. शेजारी देशांवर त्याने कर्मठ कम्युनिस्ट हुकूमशाही लादली. अमेरिकेने सोव्हिएत युनियनवर जर आण्विक हल्ला केला तर संपूर्ण युरोप जलदगतीने व्यापता यावा, म्हणून त्याने त्या राष्ट्रगटांच्या समूहाला लष्करी युतीच्या करारात घट्ट आवळून टाकले. वॉर्सा करारामागे फक्त हाच एक हेतू होता; पश्चिम युरोपात साम्राज्यवादी विस्तार करावा असा हेतू नव्हता. सोव्हिएत युनियनने आण्विक क्षेत्रात अमेरिकेशी बरोबरी केल्यानंतर, पूर्व युरोपातील युद्धोत्तर लष्करी व्यवस्थेचे महत्त्व पूर्वीएवढे राहिले नसल्याने त्यावरील पकड सैल झाली तरी चालेल, असे गोर्बाचेव्हना का वाटले, ते यावरून स्पष्ट होते. एनया स्टॅलिनचे डावपेच यशस्वी झाले. आण्विक बरोबरी झाल्यानंतर अमेरिकेकडून धमकावले जाण्याचा मुद्दा गैरलागू ठरला. त्यामुळे अमेरिकेने आपला एक नवा डाव रचला. सोव्हिएत युनियन आणि त्याच्या कम्युनिस्ट मित्र राष्ट्रांना अमर्याद शस्त्रास्त्रस्पर्धेच्या असह्य ताणाखाली ठेवायचे, असा तो डाव होता. तो लागू पडला आणि १९८९ मध्ये तो फलद्रूपदेखील झाला.
ब्रेझनेव्हच्या राजवटीत सोव्हिएत समाजात अरिष्टावस्था निर्माण झाली होती (विशेषतः आर्थिक व्यवस्थेत; पण फक्त आर्थिक व्यवस्थेतच नव्हे). सोव्हिएत व्यवस्थेचे समर्थ अपत्य असलेल्या गोर्बाचेव्ह यांनी त्या अरिष्टापासून आपल्या समाजाला वाचविण्यासाठी मूलभूत सुधारणांची गरज आहे हे ओळखले. ‘पेरेस्त्रोइका’ व ‘ग्लासनॉस्त एवढाच त्या सुधारणांचा अर्थ नाही; तर प्राणघातक शस्त्रास्त्रस्पर्धेचा अंत घडवून आणणे आणि शेजारच्या देशांत कम्युनिस्ट हुकूमशाही चालू ठेवण्याच्या आर्थिक जबाबदारीचा त्याग करणे, असाही त्या सुधारणांचा अर्थ आहे. सोव्हिएत लष्करी पाठिंब्यांची हमी मिळणार नसल्यामुळे जमतेचा पाठिंबा कधीच नसलेल्या त्या देशांतील राजवटी कोसळल्या.
शीतयुद्धाची समाप्ती झालेले वर्ष म्हणून १९८९ हे वर्ष नक्कीच लक्षात राहील; निदान १९४५ मध्ये युरोपात शीतयुद्धाचा जो काही अर्थ लावला जात होता त्यादृष्टीने तरी ते लक्षात राहील. आणखी कशासाठी ते लक्षात राहील? भांडवलशाहीच्या इतिहासाला वळण देणारे एक अतिशय महत्त्वाचे वर्ष म्हणून? समाजवादाची अखेर म्हणून अतिशय महत्त्वाच्या आणि अद्यापही बहुतांशी अनिर्णीत असलेल्या या प्रश्नांबद्दल समारोपाचे चार शब्द.
१९८९ हे वर्ष भांडवलशाही व्यवस्थेला फार महत्त्वाचे वळण देणारे वर्ष आहे असे काही मला वाटत नाही.
दोन महायुद्धांच्या मधल्या काळात पूर्व युरोपीय देश हे पश्चिम व मध्य युरोपीय भांडवलशाही देशांच्या वर्चस्वाखाली होते, त्यांच्यावर अवलंबून होते. हे पूर्व युरोपीय देश आता त्यातच पूर्वस्थितीकडे वाटचाल करीत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. ही अर्थात एक महत्त्वाची घटना आहे आणि तिचे परिणाम कुतूहलजनक व बोधप्रद ठरू शकतील. पूर्व युरोपातील काही देश हे ‘लॅटिन अमेरिकन धर्तीचे बनतील; तर पूर्व जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया यांसारखे इतर काही देश युरोपीय भांडवलशाही व्यवस्थेत ऑस्ट्रियासारखे गौण स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ शकतील. व्यापक परिस्थितीच्या संदर्भात हे किरकोळ बदल आहेत आणि त्यांचा त्या देशांबाहेर जाणवेल असा परिणाम होण्याची फारशी शक्यता नाही. जागतिक भांडवलशाही व्यवस्थेबाबत सांगायचे तर तिच्या आंतर्विरोधांवर वरील घडामोडींचा फारसा बरावाईट परिणाम होईल असे वाटत नाही. पूर्वीप्रमाणेच हे अंतर्विरोध दिवसेंदिवस वाढत व तीव्र होत जातील, हे जागतिक परिस्थितीचे लक्षपूर्वक अवलोकन करणाऱ्या कुणाही निरीक्षकाला दिसून येई. एकूण लक्षणेच अशी दिसत आहेत की नजीकच्या भविष्यात ते वाढतील आणि तीव्र बनतील, आणि एका किंवा अनेक गंभीर अरिष्टांना जन्म देतील.
सरतेशेवटी प्रश्न उरतो तो समाजवादाच्या भवितव्याचा. त्याचे दोन भाग कल्पिता येतील. एक, नजीकच्या भविष्यातील समाजवादाचे भवितव्य आणि दुसरा, दूरच्या भविष्यातील समाजवादाचे भवितव्य.
ढोबळपणे ज्याला साधारणपणे दृष्टिक्षेपात असणारा भविष्यकाळ असे म्हटले जाते, त्या काळातील समाजवादाचे भवितव्य हे सोव्हिएत युनियनमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर बहुतांशी अवलंबून राहील. समाजवाद गाडून टाकणे हे आपले ध्येय नाही; तर त्याची सुटका करणे हे आपले ध्येय आहे, असे सोव्हिएत नेत्यांपैकी सुधारणावादी गटाचे प्रतिनिधित्व करणारे गोर्बाचव्ह सागतात. हे काही कमी महत्त्वाचे नाही; पण त्याचबरोबर, सोव्हिएत समाज, विशेषतः कामगार वर्ग, गोर्बाचेव्ह यांच्या ध्येयात सहभागी होणार आहे की नाही आणि गोर्बाचेव्हपर्व स्थितीकडे परत जाण्याची प्रवत्ती आणि पर्वयरोपप्रमाणे भांडवलशाही मार्गाला अनुसरण्याची प्रवृत्ती, या दोन्ही प्रवृत्तींना प्रतिकार करणार आहे की नाही हे अधिक महत्त्वाचे आहे. असा जर प्रतिकार होऊ घातला असेल तर सोव्हिएत युनियनमध्ये समाजवादाच्या पुनरुज्जीवनाला संधी आहे, असे मला वाटते. पण काही काळ तरी आपल्याला त्याचे उत्तर देता येणार नाही, आणि म्हणून तोपर्यंत याबाबतचे मत राखून ठेवणे व्यवहार्य ठरेल.
आता दूरच्या भविष्यकाळाबद्दल. मानवजातीचे अस्तित्व आणि विकास ही समाजवादाचे अस्तित्व व त्याचा विकास यावर अवलंबून आहेत याबद्दल माझी खात्री आहे. भांडवलशाही ही मानवी पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. आणि जोपर्यंत ती अस्तित्वात आहे तोपर्यंत ती तसेच करत राहणार आहे. पुढील शतकात किंवा त्याही अगोदर आपण अशा अवस्थेप्रत पोहोचलेले असू की जेथून परतणे अशक्य झालेले असेल, अर्थात् समाजवाद म्हणजे मानवाच्या संपूर्ण मुक्तीची हमी नाही, हे उघड आहे. पण मानवी गरजांचे समाधान करण्यासाठी मानवी बुद्धीचा उपयोग करणे असा समाजवादाचा अर्थ असेल (आणि मार्क्सला तोच अभिप्रेत होता), तर त्याशिवाय मानवी मुक्तीचा दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाही, हे देखील तितकेच उघड आहे.

२१ शांतिनिकेतन काशीनाथ घरू रोड, कीर्ती कॉलेजसमोर माना दादर, मुंबई ४०००२८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.