विवाह आणि नीती (भाग १६)

लोकसंख्या
‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे.
व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या अल्प असते. मेंढ्या आणि गाई यांची संख्या बरीच मोठी आहे; पण त्याचे कारण मनुष्याचे कर्तृत्व. मनुष्याची संख्या अन्य कोणत्याही मोठ्या प्राण्यांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा फारच जास्त आहे. याचे कारण अर्थातच माणसाचे कौशल्य, धनुष्यबाणांचा शोध, रवंथ करणारे प्राणी माणसाळविणे, शेतीचा आरंभ, आणि औद्योगिक क्रांती या प्रत्येकामुळे दर चौरस मैल क्षेत्रात जिवंत राहू शकणाऱ्या माणसांची संख्या सतत वाढत गेली आहे. यांतील शेवटच्या आर्थिक उपायाचा उपयोग या प्रयोजनाकरिता केला गेला हे आपल्याला माहीत आहे. बहुधा अन्य उपायांचाही तोच झाला असेल. मानवी बुद्धीचा उपयोग अन्य कोणत्याही एका प्रयोजनापेक्षा संख्यावृद्धीकरिता झाला आहे.
न मि. कार साँडर्स (Carr Saunders) यांचे असे म्हणणे आहे की लोकसंख्या सामान्यपणे स्थिर राहिली आहे. एकोणिसाव्या शतकात झालेली वाढ ही अपवादात्मक घटना होय. ईजिप्त आणि बॅबिलोनिया येथे जेव्हा मानवाने कालवे काढून व्यवस्थित शेतीचा स्वीकार केला तेव्हा तेथेही असेच काहीतरी घडले असावे असा तर्क आपण करू शकतो. एकोणिसाव्या शतका-आधीचे लोकसंख्येविषयीचे सर्व आकडे अनुमानावर आधारलेले आहेत; पण त्या सर्वांचे या बाबतीत एकमत आहे. भराभर वाढणारी लोकसंख्या ही क्वचित् आढळणारी अपवादात्मक घटना आहे. सध्या बहुतेक नागरित देशांतील लोकसंख्या स्थिर होऊ लागली आहे असे दिसते. हे जर खरे असेल तर त्याचा अर्थ एवढाच आहे की ते देश आता असाधारण अवस्थेतून बाहेर आले असून ते मानवाच्या सामान्य पद्धतीकडे परत येत आहेत.
मि. कार साँडर्स यांच्या ग्रंथाचा असामान्य विशेष असा आहे की त्यांच्या मते सर्वत्र आणि सर्व युगांत मानवाने स्वेच्छेने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि लोकसंख्या स्थिर राखण्याच्या कामात तो मोठ्या मृत्युप्रमाणापेक्षा अधिक प्रभावी ठरला आहे. कदाचित् त्यांच्या म्हणण्यात काहीशी अतिशयोक्ती असेल. उदाहरणार्थ भारतात आणि चीनमध्ये मृत्यूचे मोठे प्रमाण तेथील लोकसंख्या भराभर वाढण्यापासून रोखण्यात प्रामुख्याने कारणीभूत असते. चीनची आकडेवारी उपलब्ध नाही, पण भारताविषयी आहे. तेथे जन्मप्रमाण फार मोठे आहे, परंतु तरी लोकसंख्येच्या वाढीचा दर इंग्लंडपेक्षा थोडासाच जास्त आहे. बालमृत्यूमुळे आणि प्लेग व अन्य साथीच्या रोगांमुळे हे मुख्यतः घडून येते. मि. कार साँडर्स यांचा सिद्धांत प्राधान्याने खरा आहे हे निःसंशय. लोकसंख्या मर्यादित ठेवण्याकरिता अनेक उपायांचा अवलंब केला गेला आहे. यांपैकी सर्वात सरळ उपाय म्हणजे बालहत्या. जिथे जिथे धमनि हिला परवानगी दिली होती तिथे हिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. अनेक समाजात ही चाल इतकी पक्की रुजलेली होती की त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार त्या धमनि आपल्या बालहत्येत ढवळाढवळ करू नये या अटीवर केला आहे. डुखोबॉर (Dukhobor) या पंथाचे लोक मानवी जीवन अवध्य आहे या कारणास्तव लष्करी सेवा करण्यास नकार देत त्यामुळे झारच्या शासनाची त्यांच्यावर गैरमर्जी होती; पण त्यानंतर ते लोक कॅनडात गेल्यावर त्यांच्यात प्रचलित असलेल्या बालहत्येच्या चालीमुळे तेथील शासनाची नाराजी झाली. इतरही उपाय सामान्यपणे वापरले जात. अनेक समाजात स्त्री गरोदरपणातच नव्हे, तर अपत्यजन्मानंतर ते अंगावर पीत असेपर्यत लैंगिक संबंधापासून अलिप्त राहते. यामुळे तिची प्रसवक्षमता पुष्कळच मर्यादित होते. विशेषतः वन्य समाजांत हे मोठ्या प्रमाणावर घडते, कारण नागरित समाजापेक्षा त्या समाजात स्त्रीपुरुष लवकर म्हातारे होतात.
ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक अतिशय क्लेशकारक शस्त्रक्रिया करतात, आणि तिच्यामुळे त्यांच्या बहुप्रसवत्वाला मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात. जुन्या करारावरून आपल्याला कळते की प्राचीन काळी संततिप्रतिबंधाची निदान एक रीत माहीत होती आणि वापरातही होती; परंतु तिला ज्यूंचा विरोध होता, कारण ज्यूंचा धर्म नेहमीच मॅल्थसच्या शिकवणीच्या विरोधात राहिला आहे. या विविध उपायांचा वापर करून मानवाने उपासमारीने मोठ्या प्रमाणावर ओढवणारा मृत्यू टाळला आहे. त्याने जर आपली प्रजननशक्ती पुरेपूर वापरली असती तर मोठ्या प्रमाणावर होणारा मृत्यू अटळ होता,
तरीसुद्धा लोकसंख्या मर्यादित राखण्यास उपासमारीने मोठाच हातभार लावला आहे. हे कदाचित् अगदी प्रारंभिक अवस्थेत जरी घडले नसले तरी अप्रगत कृषीवल समाजात तसे झाले आहे. १८४६-४७ चा आयर्लंडमधील दुष्काळ इतका भयंकर होता की तेथील लोकसंख्या नंतर कधीही पूर्वीची पातळी गाठू शकलेली नाही. रशियात दुष्काळ वारंवार होत, आणि १९१९ चा दुष्काळ सर्वांच्या स्मरणात अजून ताजा आहे. मी जेव्हा १९२० साली चीनमध्ये होतो तेव्हा त्या देशातील लोकसंख्येचा मोठा अंश रशियात पुढच्या वर्षी झालेल्या दुष्काळाशी बरोबरी करील अशा दुष्काळाने पीडला होता. अशा घटनांवरून असे म्हणता येते की लोकसंख्या वाढता वाढता कधी कधी प्राण धारणाच्या मर्यादेपलीकडे जाऊ शकते. मात्र हे विशेषेकरून जिथे पीकपाण्याच्या अस्थिरतेमुळे अन्नाची मात्रा अचानक आणि मोठ्या प्रमाणात कमी होते तिथे घडते.
१.Old Testament, बायबलचा प्रथमार्थ,
जिथे जिथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला तिथे तिथे संयमाखेरीज अन्य मार्गानी होणारे संततिनियम पार बंद झाले. बालहत्या अर्थातच निषिद्ध झाली. तीच गोष्ट गर्भपाताची. आणि संततिनियमनाच्या अन्य मार्गाचेही तेच झाले. आता हे खरे आहे की धर्मोपदेशक आणि मठवासी संन्यासी व संन्यासिनी हे सर्व ब्रम्हचारी होते. परंतु त्यांची मध्ययुगीन युरोपमधील लोकसंख्येतील टक्केवारी आजच्या इंग्लडमधील अविवाहित स्त्रियांच्या इतकीही असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे प्रजावाढीला त्यांच्या ब्रम्हचर्यामुळे फारसा आळा बसत होता असे म्हणता येत नाही. म्हणून मध्ययुगात प्राचीन युगाच्या तुलनेत बहुधा मोठ्या संख्येने उपासमार आणि साधीचे रोग यांनी लोक मृत्युमुखी पडत. लोकसंख्येची वाढ अतिशय मंदगतीने होई. अठराव्या शतकात लोकसंख्यावाढीचा दर थोडासा वाढला. परंतु एकोणिसाव्या शतकापासून एक असामान्य बदल घडून आला, आणि वाढीच्या दराने पूर्वी कधी नव्हे अशी उंची गाठली. इ. स. १०६६ साली इंग्लंड आणि वेल्समध्ये एका चौरस मैलात सरासरीने २६ माणसे राहात. १८०१ साली हा आकडा १५३ झाला, आणि १९०१ मध्ये तो ५६१ इतका झाला. एकोणिसाव्या शतकातील वाढीचा दर याप्रमाणे नॉर्मन विजयापासून ते १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत असलेल्या दराच्या चौपट वाढला. आणि तरी इंग्लंड आणि वेल्स यातील संख्यावाढ बास्तव परिस्थितीची यथार्थ कल्पना देण्यास असमर्थ आहे, कारण त्या कालावधीत ब्रिटिश वंशाचे लोक पूर्वी तिथे वन्य लोक राहत अशा भूप्रदेशावर जाऊन वस्ती करीत होते. काही लोकसंख्यावाढ जन्मदरात झालेल्या वाढीमुळे झाली असे म्हणण्यास जवळ-जवळ कसलेही कारण नाही. त्याचे कारण अंशतः मृत्यूच्या दरात झालेली घट हे असले तरी प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीमुळे आलेली वाढती भरभराट हे आहे. १८४१ साली इंग्लंडमध्ये जन्मदराचे अभिलेख (records) ठेवले जाऊ लागले तेव्हापासून तो थेट १८७१-५ पर्यंत जन्मदर जवळ-जवळ स्थिर असून तो जास्तीत जास्त ३५.५ इतका होता. या अवधीत दोन घटना घडल्या. त्यापैक पहिली घटना म्हणजे १८७० सालचा शिक्षणकायदा, तर दुसरी म्हणजे फ्रेंडलॉवर १८७८ साली चाललेला नवमल्थसवादी प्रचाराबद्दल भरण्यात आलेला खटला. त्या क्षणापासून जन्मदर आधी हळूहळू आणि मग भराभर घटू लागला. शिक्षणकायद्याने प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाल्यामुळे मुले आर्थिक दृष्ट्या उत्पन्नाचे साधन राहिले नाही, आणि त्यामुळे संततिनियमनाला प्रेरक कारण मिळाले आणि ब्रेडलांने त्याचे साधन पुरविले. १९११-१५ या पाच वर्षांत जन्मदर २३.६% इतका कमी झाला. १९२९ च्या पहिल्या तिमाहीत तो १६.५ इतका खाली गेला. इंग्लंडची लोकसंख्या अजूनही हळूहळू वाढते आहे याचे कारण औषधे आणि आरोग्यसेवा. पण ती वेगाने स्थिर होण्याच्या मार्गावर आहे. फ्रान्समध्ये आज कित्येक वर्षे लोकसंख्या स्थिर आहे हे सर्वज्ञात आहे.
जननदर सबंध पश्चिम युरोपात सर्वत्र वेगाने कमी होत आहे. त्याला अपवाद म्हणजे पोर्तुगालसारखे मागासलेले देश. ही घट नागरसमाजात ग्रामीण समाजापेक्षा जास्त आहे.
२. नवमल्यसबाद म्हणजे लोकसंख्येवर नियंत्रण घालावे है मत, आहे. तिचा आरंभ सुखवास्तू समजात झाला, पण ती आता शहरांतील आणि औद्योगिक क्षेत्रांतील सर्व थरात पसरली आहे. जननप्रमाण अजून सुखवस्तू लोकांपेक्षा गरीब लोकांत जास्त आहे, पण सध्या ते लंडनमधील सर्वात गरीब विभागात दहा वर्षापूर्वी सर्वात श्रीमंत विभागांत होते त्यापेक्षा कमी आहे. ही घट संततिप्रतिबंधाची साधने आणि गर्भपात यामुळे झाली आहे. हे जरी काही लोक मान्य करीत नसले तरी ते खरे आहे हे सर्वांना माहीत आहे. ही घट ज्या ठिकाणी लोकसंख्या स्थिर होईल अशा ठिकाणी थांबेल असे मानण्याचे कारण नाही, ती त्यापुढेही चालू राहील, आणि लोकसंख्या कमी होऊ लागेल. कोणी सांगावे कदाचित् याचा अंतिम परिणाम सर्व नागरित वंशांचा निर्वंश होण्यातही होईल. जिप या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी आपल्याला काय हवे आहे याची स्पष्ट कल्पना असणे जरूर आहे. कार साँडर्सचे मत असे आहे की आर्थिक तंत्रज्ञानाच्या कोणत्याही अवस्थेत लोकसंख्येची एक विशिष्ट घनता इष्टतम असते; म्हणजे अशी घनता की जिच्यात प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त मिळकत मिळू शकते. जर लोकसंख्या या बिंदूच्या वर राहिली किंवा खाली गेली, तर आर्थिक सुस्थिती कमी होते. स्थूलमानाने बोलायचे तर आर्थिक तंत्रज्ञानातील प्रत्येक प्रगतीने लोकसंख्येची इष्टतम घनता वाढते. शिकारी अवस्थेत दरमाणसी एक चौरस मैल इतके क्षेत्र साधारणपणे पुरे; परंतु प्रगत औद्योगिक देशांत एका चौरस मैलात कित्येक लोकांची वस्तीही अति म्हणता येणार नाही. (पहिल्या) महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये लोकसंख्या जास्त झाली आहे असे म्हणायला जागा आहे. फ्रान्सविषयी असे म्हणता येत नाही, आणि अमेरिकेत तर त्याहूनही कमी म्हणता येते. परंतु फ्रान्स किंवा पश्चिम युरोपातील कोणत्याही देशाच्या सरासरी उत्पन्नात लोकसंख्यावाढीने फायदा होईल असे वाटत नाही, त्यामुळे आर्थिक दृष्टिकोणातून पाहता लोकसंख्येत वाढ व्हावी अशी इच्छा बाळगण्याचे कारण मला दिसत नाही. ज्यांना ही इच्छा असते त्यांना राष्ट्रवादी युद्धखोरीतून प्रेरणा मिळालेली असते; आणि जी संख्यावृद्धी त्यांना हवी असते ती कायम स्वरूपाची नको असते; कारण ज्या युद्धाची ते वाट पाहत असतात त्यात ही वाढलेली प्रजा त्यांना बोफांच्या तोंडी द्यायची असते. म्हणून वस्तुतः या लोकांच्या मते लोकसंख्येचे नियमन संततिनियमनाने करण्यापेक्षा युद्धभूमीवर येणाऱ्या मृत्यूमुळे होणे चांगले असे असते. ज्याने या गोष्टींचा नीट विचार केला आहे त्याला हे मत स्वीकारणे शक्य नसते. आणि ते मत जे स्वीकारतात ते वैचारिक गोंधळामुळे तसे करतात. युद्धाशी संबद्ध युक्तिवाद सोडले तर संततिनियमाच्या साधनांच्या माहितीमुळे नागरित देशांतील लोकसंख्या स्थिर होताना दिसते ही गोष्ट सर्वस्वी स्वागतार्ह आहे. किस परंतु जर लोकसंख्या खरोखरच कमी झाली तर मात्र ती चिंताजनक गोष्ट होईल, कारण लोकसंख्येची घट जर निर्वेधपणे चालू राहिली, तर तिचा अर्थ अंती निर्वश हाच आहे. आणि सर्वांत प्रगत मानववंश नाहीसे व्हावेत अशी इच्छा आपण करू शकत नाही. याकरिता संततिनियमनाच्या साधनांचा उपयोग सध्याची लोकसंख्या कायम ठेवण्याइतपतच व्हावा अशी व्यवस्था आपण करू शकलो तरच त्यांचे स्वागत करणे योग्य होईल. यात काही अडचण येईल असे मला वाटत नाही. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्याची प्रेरणा सर्वथा नसली तरी प्रामुख्याने, आर्थिक असते, आणि म्हणून मुलांवर होणारा खर्च कमी करून, किंवा जरूर पडल्यास मुले उत्पन्नाचे साधन होतील अशी व्यवस्था करून जननप्रमाण वाढविता येईल. परंतु अशा प्रकारचा कोणताही उपाय सध्याच्या राष्ट्रवादी युगात भयावह आहे, कारण त्याचा उपयोग लष्करी सामर्थ्याकरिता करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. जगातील मुख्य युद्धखोर राष्ट्रे ‘तोफेला तिचे खाद्य मिळाले पाहिजे !’ ही घोषणा देऊन शस्त्रसंभाराच्या शर्यतीला जननप्रमाणाच्या शर्यतीची जोड देतील. इथेही जर नागरण (civilization) टिकून राहायचे असेल, तर आंतरराष्ट्रीय शासनाची परम आवश्यकता आपल्या प्रत्ययास येते. असे शासन जर जागतिक शांतता राखण्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्याला कोणत्याही राष्ट्राने आपली लोकसंख्या मर्यादित ठेवावी असे फतवे काढावे लागतील. मला वाटते की आपण असे धरून चालायला हरकत नाही की एखाद्या राष्ट्राने लोकसंख्या वाढावी असे उपाय केले नाहीत तर निदान पश्चिम युरोपात लोकसंख्या वाढणार नाही इतके जननप्रमाण राहील. परंतु अन्य राष्ट्रे केवळ अनिर्बध जननप्रक्रियेने सत्तेचा समतोल ढळवीत असताना समर्थ लष्करी राष्ट्र स्वस्थ बसतील अशी अपेक्षा करता येत नाही, म्हणून आपले काम योग्य प्रकारे करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय शासनाला लोकसंख्येचा प्रश्न विचारात घ्यावाच लागेल, आणि चुकार राष्ट्रावर संततिनियमनाच्या प्रचाराची सक्ती करावी लागेल. हे केल्याशिवाय जगाची शांतता सुरक्षित राहू शकत नाही.
याप्रमाणे लोकसंख्येचा प्रश्न दुहेरी आहे. आपल्याला लोकसंख्या वाढू नये याची तर खबरदारी घ्यावी लागेलच, पण ती घटू नये याचीही घ्यावी लागेल. पहिले संकट जुने आहे, आणि ते अजूनही पोर्तुगाल, स्पेन, रशिया आणि जपान इत्यादि देशांत विद्यमान आहे. दुसरे नवीन आहे, आणि आज तरी ते फक्त पश्चिम युरोपात तेवढे आहे. जर अमेरिका लोकसंख्येकरिता केवळ जननप्रक्रियेवर अवलंबून राहिली तर तिथेही हे संकट उद्भवेल; पण देशांतील जनतेमध्ये जननप्रमाण अल्प असूनही आतापर्यंत परदेशातून अमेरिकेत येऊन राहणाऱ्या लोकांमुळे तिथली लोकसंख्या निदान इष्ट प्रमाणात वाढती राहिलेली आहे. घटणाऱ्या लोकसंख्येच्या या नव्या संकटाशी आपल्या पूर्वजांच्या विचारपद्धती परिचित नाहीत. त्यावर उपाय म्हणून नैतिक उपदेश आणि संततिनियमनाच्या प्रचाराविरुद्ध कायदे केले जातात; पण हे उपाय निष्फळ होतात हे आकडेवारीने दाखवून दिले आहे. संततिनियमनाच्या साधनांचा उपयोग हा सर्वच नागरित राष्ट्रांच्या प्रचलित आचाराचा भाग झाला आहे, आणि त्याचे निर्मूलन करणे अवश्य आहे. लैंगिक संबंधाविषयीच्या वास्तवांना तोंड देण्यास कचरण्याची सवय शासनामध्ये इतकी दृढमूल झाली आहे की ती ताबडतोब नाहीशी होईल अशी अपेक्षा करता येत नाही पण ती सवय अतिशय अनिष्ट आहे, आणि जे आज तरुण आहेत, ते जेव्हा अधिकाराच्या जागांवर जातील, तेव्हा ते या बाबतीत आपले वडील आणि आजे यांच्याहून जास्त धौट असतील अशी आशा करू या. संततिनियमनाच्या साधनांचा उपयोग अटळ आहे, आणि त्यामुळे जोपर्यंत लोकसंख्या प्रत्यक्ष घटू लागत नाही तोपर्यंत तो इष्टही आहे, हे ते धीटपणे
* ओळखतील अशी आशा करायला जागा आहे. ज्या देशांत लोकसंख्येत प्रत्यक्ष घट सुरू झालेली असेल तिथे तिच्यावर उचित उपाय म्हणजे लोकसंख्येची पातळी स्थिर होईपर्यंत मुलांच्या संगोपनाकरिता कराव्या लागणाऱ्या खचीत पालकांना प्रायोगिक पातळीवर मदत
या संबंधात एका बाबतीत आपली वर्तमान नैतिक संहिता बदलणे इष्ट होईल. इंग्लंडमध्ये सध्या सुमारे २० लक्ष स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आहेत, आणि त्यांना कायदा व रूढी यांच्यामुळे निरपत्य राहावे लागते. ही गोष्ट बहुतेक प्रकरणी अतिशय अन्यायकारक आहे. अविवाहित मातेला जर रूढीने मान्यता दिली आणि तिची आर्थिक स्थिती सुसह्य होण्यास मदत केली, तर आज निरपत्यतेचा शाप भोगणाऱ्या कितीतरी स्त्रिया माता होतील यात संशय नाही. एकपतिक-एकपत्नीक विवाह हा स्त्रीपुरुषांची संख्या स्थूल मानाने सारखीच असते या गृहीतावर आधारलेला आहे. जिथे वस्तुस्थिती याहून भिन्न असते, तिथे ज्यांना गणितामुळे एकटे राहावे लागते त्यांच्या बाबतीत पुष्कळ दुष्ट व्यवहार होतोः आणि जिथे जननप्रमाणात वाढ व्हावी अशी इच्छा असेल तिथे असा दुष्टपणा सार्वजनिक पातळीवरही अनिष्ट असू शकतो.
जसजसे ज्ञान वाढते तसतशी शासनाने हेतुतः केलेल्या कारवाईमुळे ज्या शक्ती आजपर्यंत नैसर्गिक शकक्तीवाटत होत्या त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिकाधिक शक्य होते. लोकसंख्यावाढ ही अशा शक्तीपैकी एक आहे. ख्रिस्ती धर्माच्या आरंभापासून ही गोष्ट सहजप्रवृत्तीच्या अंध धडपडीच्या ताब्यात राहिलेली आहे. परंतु जेव्हा तिच्यावर विचारपूर्वक नियंत्रण ठेवावे लागेल अशी वेळ भराभर जवळ येत आहे. परंतु जसे बालकांच्या संगोपनावरील शासनाच्या नियंत्रणाच्या बाबतीत आपण पाहिले, तसेच याही क्षेत्रात ते नियंत्रण आंतरराष्ट्रीय शासनाचे असावे लागेल, आजच्या स्पर्धालु युद्धखोर राष्ट्रांचे नव्हे.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.