सहजप्रवृत्तीला पटेल तेच करावे

मी जे काही थोडे कार्य केले ते हौशीने, मनाच्या उत्साहाने. त्याग, तपश्चर्या, सेवा, दया हे शब्द उगाच माझ्यासाठी खर्च करू नका. त्यांचा मला नाद नाही. मी कुणासाठी म्हणून काही केले नाही. माझ्या स्वतःच्या आनंदाचा मोठा भाग त्यात होता. तशी मी बुद्धिप्रधान आहे. नेम वगैरे मी मानत नाही. शरीराला ज्याची जेवढी गरज आहे तेवढे मी पुरवते. अट्टाहासाने काही सोडत नाही. मनावर लादून काही करत नाही, लौकिकद्रष्ट्या करायची ती व्रतवैकल्ये मला हास्यास्पद वाटतात. परंतु शास्त्रीजींनी सुचवलेल्या सोमवाराचा उपास मी श्रद्धेने करते.

मनातल्या संयमाचे महत्त्व मला फार वाटते. मी काकासाहेब कालेलकरांना एकदा म्हटले होते. हे व्रत धरा, ते सोडा’ असे आश्रमी बंधन मला पटत नाही. बंधनातून केलेल्या गोष्टीत कृत्रिमपणा येतो. त्यागाची जाणीव राहते. करायचे ते सहजप्रवृत्तीला पटेल तेच कराचे. आव्हान मिळाले की मला जोर चढतो, हा माझा स्वभाव आहे.

ताराबाई मोडक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.