पत्रव्यवहार

तात्पर्य सांगताना ते म्हणतातः …. तात्पर्य, व्यक्ती व समूह-जीवनाची अमुक अमुक अंगे ही राज्यसत्तेच्या नियंत्रणाखालीच असणे योग्य व वैध आहे. राज्यसत्ता धर्मपीठाच्यापेक्षा उच्चतर अशी सार्वभौम सत्ता आहे याला मान्यता मिळाली. गाभ्याचा मुद्दा सार्वभौमत्व व अंतिमतः नियंत्रण व अधिकार कोणाचा हा होता. ‘धर्माचा आधार समाजव्यवहारांना असावा की नसावा हा मुद्दा नव्हता. हाच पळशीकरांचा पायाभूत घोटाळा! युरोपमध्ये १२०० वर्षे चाललेला संघर्ष याच मुद्यासाठी होता. राज्यसत्ता विरुद्ध धर्मपीठ असा केवळ दोन सत्ताकेंद्रांचा सार्वभौमत्वासाठी चालेला हा लढा नव्हता. यामागील तत्त्व महत्त्वाचे होते. धर्मपीठ या कल्पनेमागे ईश्वर, त्याने पृथ्वीवर पाठविलेले प्रेषित, प्रेषितांच्या मुखातून व्यक्त झालेले ईश्वराचे संदेश व आज्ञा आणि हे सर्व ज्यात ग्रथित केलेले आहे असे धर्मग्रंथ या चार वस्तू येतात, तेव्हा एका बाजूला ऐहिक पातळीवरून सामाजिक, राजकीय, आर्थिक, विवाहसंस्थाविषयक, मालकी हक्कविषयक, गुन्हाविषयक-थोडक्यात सांगायचे तर सर्व समाजव्यवहाराचे (परलोकविषयक विचार वगळून) नियमन-नियंत्रण करण्यासाठी अवतरलेली मानवनिर्मित राज्यसत्ता, आणि दुसऱ्या बाजूला ईश्वराने पाठविलेले प्रेषित, त्यांनी प्रगट केलेले ईश्वरी संदेश व आज्ञा, अषितांनी ग्रथित केलेले धर्मग्रंथ आणि त्यांतील विधिनिषेध म्हणजेच ईश्वरी कायदा (Divine Law) यांच्यामधील हा संघर्ष होता. म्हणूनच सीझरचे देणे सीझरला द्या व ईश्वराचे ईश्वराला द्या असा ख्रिश्चन धर्मात संकेत निर्माण झाला. सामाजिक व्यवहाराला धर्माचा (रिलिजन) आधार असावा की नसावा हाच या संघर्षातील गाभ्याचा मूलभूत नुद्दा आहे. पण पळशीकर हा गाभ्याचा मुद्दा वगळून विचार करतात, त्यामुळे त्यांचे विवेचन मूळ समस्येला स्पर्श न करणारे आणि अप्रस्तुत झाले आहे असे त्यांची क्षमा मागून म्हणण्याचे धाडस करतो. ‘सेक्युलरिझम या संकल्पनेच्या विकासात हा धर्माच्या (रिलिजन) आधाराचा मुद्दा नव्हता हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे असे मी त्यांना आवाहन करतो. भारतातील हिंदू-मुस्लिम समस्येचा विचार करायचा असेल तर सेक्युलॅरिझमविषयीचा हा गाभ्याचा मुद्दा टाळून चालणार नाही. सर्व मुस्लिम धर्मपंडितांनी याच मुद्द्यावर सेक्युलरिझमविरुद्ध कड़वा संघर्ष चालविला आहे. मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी appeasement) सेक्युलॅरिझमची व्याख्याच बदलण्याचा, गाभ्याचा आशयच मारून टाकण्याचा आज सर्वत्र जो प्रयत्न होत आहे त्यातलाच पळशीकरांचा प्रयत्न आहे. त्यांच्या लेखातील इतर अत्यंत आक्षेपार्ह विधानांचा मी विचार करीत नाही. प्रा. स. ह. देशपांडे ते पाहून घेतील. मात्र एकच उल्लेख करतो. प्रा. स. ह. देशपांडे यांनी त्यांच्या लेखात मुस्लिम मानस आणि वर्तन यांचा उल्लेख केला आहे. (आ.सु. सप्टे-ऑक्टो९) त्याला उत्तर देताना पळशीकरांनी हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर यांनी केलेल्या मर्मग्राही चिकित्सेची दीड ओळीत वासलात लावली आहे. ही चिकित्सा त्यांना (पळशीकरांना) खरोखरीच मान्य असती तर पळशीकरांच्या लेखनात मुस्लिम मानसिकतेचे थोडेतरी प्रतिबिंब पडलेले दिसले असते. ज्या मानसिकतेतून पाकिस्तान आले, तीच मानसिकताआजही कार्यरत आहे याचे असंख्य पुरावे आहेत. पण याचे त्यांना काहीच वाटत नाही. याची त्यांना जाणीवही दिसत नाही, तरीही ते हमीद दलवाई आणि कुरुंदकर यांचा हवाला देतात या धाडसाला काय म्हणावे ! आ. सुधारकामध्येयाच विषयावर माझे लेख आल्याने (डिसें. एर- जाने फेब्रु.९२) अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही.
विद्यानगर, नांदेड
स. रा. गाडगीळ

संपादक, ‘आजचा सुधारक’
आपला फेब्रुवारी ९२ चा वाचला. विज्ञानाबद्दल लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून कृपया पुढील मजकुरास प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती…
प्रा. काशीकर म्हणतात फेिब्रुवारी १२) ‘ विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक सिद्धांत सामान्य जनांना समजत नाहीत. “पण हे बरोबर नाही. चिकारीने पुस्तके वाचणाऱ्याला ते समजू शकतात. कुठलाही सिद्धांत प्रयोगशाळेत पडताळून पाहता येतो. जगभर पडताळा पाहिल्यानंतरच सिद्धांत मान्यता पावले आहेत. सृष्टीच्या उगमाचा महाध्वनि-सिद्धांत हा तर्कशास्त्राच्या आधारे मांडलेला आहे. त्याला पर्यायी सिद्धांतही आहे. आज जगातील बरेच शास्त्रज्ञ दोन्ही बाजूला आहेत. येथे कुणाला मज्जाव नाही. अगदी प्रा. काशीकरही तिसरा सिद्धांत मांडू शकतात; मात्र तो वैज्ञानिक निकषांवर पडताळून पाहिला जाईल. त्यामुळे त्यातील अनेक तर प्रयोगक्षमतेच्या पलीकडे असतात हे विधान फसवे आहे.
‘क्वाँटम सिद्धांतात कार्यकारणासंबंधीच्या तत्वाशी विसंगती दिसते असे जाणकार म्हणतात’ असा प्रा. काशीकर उल्लेख करतात, त्याचा त्यांनी संदर्भ दिला असता किंवा नेमके विधान केले असते तर निराकरण करता आले असते. विज्ञानाविषयी लोकांमध्ये गैरसमज पसरू नयेत म्हणून हा पत्र प्रपंच। । भौतिकी विभाग
आपला नम्र
नही, जे. टी. आय., मुंबई- ४०० ०१९

संपादक,
आजचा सुधारक यांसी स. न. वि. वि.
‘आजचा सुधारकंचा फेब्रुवारी १९९२ चा अंक पाहिला. माझ्या पत्राविषयी आपण लिहिले तेही पाहिले. निराशा झाली.
विनोबाजींच्यापेक्षा अधिक अनलंकृत गद्य लिहिण्याची कुवत माझ्यात नाही, माझ्याहून अनेक पटीने श्लेष्ठ असणाऱ्या अन्य कुणातही आज ती महाराष्ट्रात नाही. यामुळे तीच आपली अटळ अट असेल तर याविषयी अधिक विचार करण्याचे कारण नाही. परंतु तुमची मांडणी, माझे पत्र, आपला खुलासावमाझे हे पत्र या सर्वांवरून आपल्या वाचकांपैकी कोण काय निष्कर्ष काढतात याविषयी मला कुतुहल आहे. कोणी मला लिहिल्यास मी आपल्याला कळवीन, कोणी आपल्याला लिहिल्यास आपण मला कळवावे. कळावे ही वि.
४३, गुरुकृपा कॉलनी
आपला
गोडोली, सातारा शहर ४१५००१

प्रा. दि. य. देशपांडे,
सप्रेम नमस्कार,
मी आज रोजी डॉ. विठ्ठल प्रभू, सेक्सोलॉजिस्ट, २-सी, शिवसागर, पांडुरंग नाईक रोड, शिवाजी पार्क, मुंबई ४०००१६ यांना पुढील पत्र पाठविले आहे.
“गेल्या दोन एक वर्षापासून नागूपर येथून आजचा सुधारक (संपादक : दि. य. देशपांडे, १४ अंबाझरी लेआउट, नागपूर -४४००१०) या नावाचे एक वैचारिक मासिक प्रसिद्ध होत आहे. तुम्ही त्याचे वर्गणीदार आहात किंवा नाही, निदान तुमच्या ते वाचनात तरी येते किंवा नाही याची मला काहीच कल्पना नाही.
‘या मासिकाच्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘विवाहयोग्य वय : वास्तव व प्रचार’ या शीर्षकाचा जो लेख प्रसिद्ध झालेला आहे त्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. या लेखाचा जो काही विषय आहे तो तुमचाही अभ्यासविषय असावा अशी माझी समजूत आहे. म्हणून या विषयावर तुम्हीही एक लेख लिहून तो आजचा सुधारककडे पाठवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
“या लेखातल्यासारखे विचार बऱ्याच वर्षापासुन माझ्याही मनात घोळत आहेत. माझी स्वतःची तर आता तुम्हाला माहिती झालेली आहेच. मुलामुलींत वयाच्या चौदा वर्षाच्या आसपास लैंगिक जिज्ञासा व मागोमाग भक निर्माण होते. पण लग्नाच्या बाबतीत कायद्याने ठरवून दिलेली वयोमर्यादा मुलाच्या बाबतीत २१ आणि मुलीच्या बाबतीत १८ ही आहे. लैंगिक भूक भागविण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे विवाह करणे. यामुळे मुलामुलींच्यावर उपासमार लादली जाते. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे तर सकाळी १० वाजता भूक लागलेली आहे, पण जेवण मात्र दुपारी दोन अगर संध्याकाळी पाचपूर्वी करण्याला बंदी. यातून मार्ग काढण्यासाठी माझ्या मनात असा विचार येत असे की लग्न जर उशीरा करावयाचे असेल तर तोपर्यंत लैंगिक उपासमार न करता मुलामुलींनी संततिनियमनाची साधने वापरून ती भूक का भागवू नये?
मी आज श्री. दि. य. देशपांडे यांना तुम्हाला आजचा सुधारकचा फेब्रुवारी १९९२ चा एक अंक पाठवण्याबद्दल एक पत्र लिहीत आहे. तो अंक तुम्हाला मिळाल्यावर, तो तुम्ही वाचल्यावर तुमच्याकडून मी पत्राची अपेक्षा करीत आहे….. कळावे,
‘मृगजळ,’
कुपवाड रोड,
विनायक राजाराम लिमये
विश्रामबाग, सांगली ४१६४१५

प्रा. दि. य. देशपांडे,
२२-२-१२ सप्रेम नमस्कार
ता. १२-२-९२ रोजी लिहिलेल्या डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या पत्राचे एक प्रतिरूप सोबत पाठवीत आहे. त्यांच्या पत्रावरून असे दिसते की ते लेख तर लिहितीलच पण शिवाय मासिकाचे वर्गणीदारही होतील,
ता. १५-२-९२ चे तुमचे पत्र मला ता. १९-२-९२ रोजी मिळाले. ‘तुमचेही मत माझ्यासारखेच आहे हे जे तुम्ही लिहिले आहे ते वाचून आनंद झाला, पण या विषयावर लेख लिहिण्याची तुम्ही केलेली विनंती मी मान्य करू शकत नाही. एखाद्या विषयावर पुस्तक लेख वगैरे लिहावयाचा असल्यास तो लेख लिहिणान्याने त्या विषयाचा दीर्घकाल अभ्यास केलेला असला पाहिजे असे मला वाटते. या विषयाच्या बाबतीत या कसोटीला मी उतरत नाही ही चतुस्थिती आहे. लिखाणाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही सांगावयाचे आहे त्याला शब्दरूप देण्याची क्षमता त्या माणसात असली पाहिजे, या कसोटीलासुद्धा मी उतस्तो किंवा नाही याबद्दल मी स्वतःच साशंक आहे. तरीपण डॉ. प्रभू यांचा लेख प्रसिद्ध झाल्यावर, वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याची थोडीबहुत क्षमता असलेला एक सामान्य माणूस या नात्याने या विषयावर एक पत्र लिहून ते आजच्या सुधारकाकडे पाठवण्याचा माझा विचार निदान आज तरी आहे.
आपल्या विचारांना शब्दरूप देण्याच्या क्षमतेबद्दल मी वर जे लिहिले आहे त्याबद्दल आणखी थोडेसे. मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच जात-धर्म न मानणारा, नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी, जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टिकोणाने पाहणारा इत्यादि इत्यादि केवळ विचारानेच नव्हे तर आचारानेसुद्धा आहे; पण असे आहे तरी मी तुमच्याप्रमाणे विवेकवादावर लेख लिहू शकणार नाही. यावरून माझा मुद्दा तुमच्या लक्षात यावा.
हम जाता जाता, विवेकवादावरील तुमच्या लेखमालेबद्दल आणि आजच्या सुधारकाच्या एकूण स्वरूपाबद्दल मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
वर लिहिल्याप्रमाणे मी नंतर जर तुम्हाला पत्र पाठवले तर व दर्जाच्या एका किमान कसोटीला ते उतरत आहे असे तुम्हाला वाटले तरच त्याला प्रसिद्धी द्यावी. कळावे, कुपवाड रोड, विश्रामबाग, सांगली ४१६४१५
विनायक राजाराम लिमये दूरध्वनी : ७४२६९

वरील पत्राला डॉ. प्रभूचे उत्तर लामिका प्रिय श्री लिमये यांस,
स. न. वि. वि.
आपले ता. ८-२-१९९२ रोजचे पत्र मिळाले. वाचून आनंद वाटला. सोबत पाठविलेले “इच्छामरण : गुणवत्ता जीवनाची सुरेल भैरवी हे कात्रणही मिळाले. मनःपूर्वक आभार. लेख चांगला झाला आहे. महत्त्वाचे मुद्दे त्यात घेतले आहेत. विषय प्रचंड मोठा पर्ण आहामाधारक है नाशिफारस
आहे व वादग्रस्त आहे. आपण या विषयास वाहून घेतले आहे व आपल्या दोन्ही पुस्तकातून संपूर्ण ऊहापोह केलेला आहेच.
आजचा सुधारक हे मासिक मी पाहिलेले नाही. जरूर मी त्याचा वर्गणीदार होईन.. फेबुवारीचा अंक पाठविण्याबद्दल शिफारस केली त्याबद्दल आभार, अंक मिळाल्यावर लेख लिहीन. मी आपल्या विचारांशी सहमत नाही. सर्वच मुद्दे इथे लिहिणे कठीण, परंतु प्रमुख कारणे अशी :
1) जननेंद्रिये जन्मतः प्राप्त झाली असली तरी कामेच्छा ठराविक वयातच प्रज्वलित होते याचे कारण निसर्गाला प्रजोत्पादन हवे असते खरे, परंतु व्यक्तीची स्वतःची संपूर्ण वाढ झाल्यावरच ही इच्छा प्रज्वलित होते.
२) संभोग म्हणजे सम्यक भोग किंवा सं+ भोग-इथे दोघांच्या इच्छेचा भाग असतो. एकाचीच इच्छा पूर्ण व्हावी यासाठी दुसन्याच्या स्वातंत्र्यावर चढाई करणे योग्य
३) स्त्रीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता असल्यामुळे तिला तिच्या संपूर्ण आयुष्यात संभोगाची नितांत गरज भासत नाही. (वयाच्या आठ वर्षे किंवा त्यापूर्वी पुरुषाची जितकी इच्छा असते तितकी तिची कायम असते), संभोगाशिवाय स्त्री आजन्म सखात राहू शकते कारण योनीत संवेदनशीलता नसते. शिश्निकेच्या उद्दीपनाने तिची कामपूर्ती अधिक प्रभावीपणे होऊ शकते. म्हणूनच तिच्या आनंदासाठी संभोगाची गरज नसते. स्त्रीला संभोग हे प्रेम व मातृत्व प्राप्त करण्याचे साधन असते. पुरुषाला संभोग है साध्य असते.
४) संभोग न केल्यास माणूस मरत नाही. तेव्हा लैंगिक भूक ही शारीरिक भुकेसारखी मारक नाही.
५) संभोगाइतकीच कामतृप्ती हस्तमैथुनाद्वारे लाभते. तेव्हा कामतृप्तीसाठी लग्न होईतोवर हस्तमैथुनाचा वापर करणे इष्ट होय.
६) संभोगाला समाजमान्यता, जबाबदारी, खाजगीपणा हवा त्याप्रमाणे केवळ एकमेकांपुरतेच असे मर्यादित स्वरूपही हवे. Free Sex चा पुरस्कार आजवर मान्य झालेला नाही. स्त्रियांना तर तो कधीच मान्य होणार नाही. कारण संभोगात स्त्रीला प्रेमाची गरज असते. व ती समर्पणाच्या भावनेवर संभोग स्वीकारते.
७) स्त्री-पुरुषांची मने जुळली तरच विवाह यशस्वी होतो. म्हणून स्त्रीचे वय २१ वर्षे व पुरुषाचे वय २५ वर्षे होईपर्यंत – मानसिक परिपक्वता येईपर्यंत विवाह करू नये; असे माझे मत आहे.
आपला
विठ्ठल प्रभू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.