सत्यप्राप्तीचे उपाय

आपल्या मतांपैकी एकही पूर्णपणे सत्य नसते. प्रत्येकाभोवती संदिग्धता आणि भ्रांती यांचे वलय असते. आपल्या मतांतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय सुविदित आहेत. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या पूर्वग्रहांविरुद्ध पूर्वग्रह असलेल्या लोकांशी चर्चा करणे, आणि जो उपन्यास (hypothesis) अपर्याप्त सिद्ध होईल त्याचा त्याग करण्याची तयारी ठेवण्याची मनोवृत्ती अंगी बाणवणे – हे ते उपाय होत. या उपायांचा अवलंब विज्ञानात करतात, आणि त्यांच्याच साहाय्याने वैज्ञानिक ज्ञानाची भव्य इमारत उभारली गेली आहे. खरी वैज्ञानिक वृत्ती असलेला प्रत्येक वैज्ञानिक हे कबूल करायला तयार असतो की जे वर्तमान क्षणी विज्ञान म्हणून आपण स्वीकारतो त्यात अधिक शोध लागल्यावर बदल करावा लागणार आहे. परंतु असे असले तरी जे वर्तमान क्षणीचे विज्ञान बहुतेक सर्व व्यवहाराकरिता सत्याच्या पुरेसे जवळ गेलेले असते; आणि त्यासंबंधी वैज्ञानिकाची अभिवृत्ती संशयाची आणि केवळ संभाव्य मानण्याची असते.

  • बर्ट्रांड रसेल

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.