मासिक संग्रह: नोव्हेंबर, 1992

संपादकीय

आजच्या संपादकीयाचे स्वरूप वेगळे आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी आमच्या सल्लागार मंडळाच्या एक सभासद डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या धर्मान्तराच्या निमित्तानेआम्हाला पाठविलेल्या पत्रामुळे काही खुलासा करण्यासाठी हे आम्ही लिहीत आहोत.
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक सुरू झाल्याला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. ह्या अवधीत आम्हाला महाराष्ट्रातील विचारी वाचकांकडून पुष्कळच प्रोत्साहन मिळाले आहे. ह्या मासिकात कोणते विषय कसे मांडले जातात त्याकडे आमच्या वाचकांचे बारीक लक्ष असते.
ह्या मासिकाच्या संचालनासाठी दोन मंडळे नेमली आहेत. एक संपादक मंडळ व दुसरे सल्लागार मंडळ. संपादक मंडळाचे सभासद संपादकांना दैनंदिन कामात मदत करतात.

पुढे वाचा

आम्हांलाही पूर्वाचार्यांएवढेच अधिकार

पूर्वेतिहास आणि पूर्वाचार हे पुनःपुन्हा पुढे आणून त्यांचे फिरून अवलंबन करा, असे सांगत न बसतां, अलीकडील न्यायाच्या भात्यांतून तीव्र बाण काढून त्यांचा त्यांवर संपात केला पाहिजे. कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसहि आहे. पूर्वकालीन आचार्यांवर ईश्वराची जितकी कृपा होती, तितकीच आम्हांवरहि आहे, व त्यांच्याशी त्यांचा जितका संबंध होता तितकाच आम्हांसहि आहे. बर्‍या-वाईटाची निवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी, तीहून अधिक आम्हांसहि आहे. सृष्टिविषयक ज्ञान जितकें त्यांना होते, तितकें, किंबहुना त्याहून अधिक ज्ञान आम्हांस आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचंच आम्ही पालन करणार आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.

पुढे वाचा