कृत्रिम बंधनांच्या प्रतिकारासाठी शिकस्त करा

……गृहस्थाश्रम हीच स्वाभाविक स्थिति होय. प्राचीनकाळी बहुधा सर्व मनुष्यांना या स्थितीचा अनुभव घ्यावयाला मिळे. पण अर्वाचीन काळी भिन्न परिस्थितीमुळे पुष्कळ स्त्रीपुरुषांना अविवाहित स्थितीत आयुष्य कंठणे भाग पडत आहे व यापुढे ही संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. ही स्थिति नाहींशी करण्यासाठी निदान तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय शोधून काढणे हा फार गहन प्रश्न आहे व त्याशी झगडण्याला तेजस्वी पुरुष पाहिजेत. पण मनुष्याला त्याच्या स्वाभाविक स्थितीचा उपयोग घेऊ न देणारी कृत्रिम बंधनें जर समाजांत उत्पन्न झाली असतील, तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपली शिकस्त करणे हे सामान्य मनुष्याचे देखील कर्तव्य आहे. हिंदूंच्या उच्च वर्णांतील विधवांना पुनः लग्न करण्यासंबंधानें जो निर्बंध आहे, तो अशा प्रकारचा आहे. त्याचप्रमाणे कांहीं जाति अत्यंत लहान झाल्यामुळे जातींतल्या जातींत वधूवरांची निवड करणे अशक्य होऊन जाते. असली कृत्रिम बंधनें दूर करणे हे मनुष्याच्या आटोक्यांतलें काम आहे, ते त्याने जरूर करावें….. धोंडो केशव कर्वे (आत्मवृत्त)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.