इतर

मा. संपादक, आजचा सुधारक, यास
सा. न.
आपला एप्रिल १९९४ चा अंक वाचला. त्यातील ललिता गंडभीर यांनी दिलेल्या ‘गीता साने यांच्या पत्रास उत्तर’ मधील काही विचार खटकतात. त्या संदर्भात वे एकूणच स्त्री-मुक्ती चळवळीच्या संदर्भात पुढील विचार मांडावेसे वाटतात
पूर्ण स्त्री-मुक्तीच्या उपरोक्त व्याख्येमधील स्त्रीच्या लैंगिक शुद्धतेला अवास्तव महत्त्व देणे बंद हा मुद्दा खटकतो. यामुळे केवळ एका स्वैराचारी, बेबंद समाजाची निर्मिती होईल अशी भीती वाटते. तेव्हा स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेला महत्त्व देणे बंद करण्याऐवजी पुरुषांच्या लैंगिक शुद्धतेबाबत स्त्री-मुक्तिवाद्यांनी व स्त्री-पुरुष समानतावाद्यांनी आग्रह धरावा असे वाटते. स्त्रीचीच अशुद्धता तेवढी कळून येईल अशी परिस्थिती, आजकाल तांत्रिक प्रगतीमुळे, उरलेली नाही. करून सवरून नामानिराळा राहण्याची शक्यता, आजच्या परिस्थितीत, दोघांच्याही बाबतीत जवळजवळ समसमान असू शकते. अशा परिस्थितीत एकमेकांबद्दल असणारा विश्वास हो परस्परांच्या सदसद्विविवेकबुद्धीवरच (खरे बोलण्यावरच) अवलंबून आहे. म्हणूनच सुसंस्कृत, निकोप, निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी, सुधारणावाद्यांनी, स्त्री-पुरुष दोघांच्याही लैंगिक शुद्धतेबाबत आग्रही भूमिका घ्यायला हवी.
स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेबाबत अवास्तव आग्रह धरणार्याअ, आणि त्याचे भांडवल करून स्त्रीची छळणूक करणार्याम समाजाला, पुरुषांच्या लैंगिक शुद्धतेबाबत आग्रह धरूनच चोख उत्तर द्यायला हवे असे वाटते. यातून समाजात प्रामुख्याने दोनच वर्ग निर्माण होतीलस्वतंत्र प्रवृत्तीचे, एकटे राहणारे स्त्री-पुरुष अथवा स्वतंत्र प्रवृत्तीमुळे प्रौढ जोडीदाराचे सहजीवन नाकारून आपआपल्या अपत्यांसह एकटे राहणारे स्त्री-पुरुष, आणि सहजीवनाची उपजतच आवड असणारे, त्यासाठीच्या तडजोडी मनापासून स्वीकारणारे स्त्री-पुरुष!
आपल्याला ज्याच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे तो जोडीदार लैंगिकदृष्ट्या शुद्ध असावा ही अपेक्षा वास्तविक सुधारकांनासुद्धा गैर वाटू नये. उलट आरोग्यदृष्ट्या ती समर्थनीयच आहे. फक्त ही अपेक्षा ठेवताना स्त्री-पुरुष दोन्ही पक्षांनी तेवढीच आग्रही भूमिका घ्यायला हवी इतकेच!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.