सहजप्रवृत्तीचे प्रशिक्षण

आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती चांगल्याही नसतात आणि वाईटही नसतात; नैतिकदृष्ट्या त्या उदासीन असतात. त्यांना इष्ट वळण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. जुनी ख्रिस्ती लोकांना प्रिय असणारी पद्धत सहजप्रवृत्तींना प्रतिबंध करण्याची होती, परंतु नची पद्धत त्यांना प्रशिक्षित करण्याची आहे. उदाहरणार्थ सत्तेची इच्छा घ्या. ख्रिस्ती नम्रता (humility) शिकविणे व्यर्थ आहे; त्यामुळे ती प्रवृत्ती दांभिक रूपे धारण करते एवढाच तिच्यामुळे फरक पडतो. तिला प्रकट होण्याच्या हितकर वाटा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मूळची सहजप्रवृत्ती हजार प्रकारांनी शांत होऊ शकते-परपीडन, राजकारण, व्यापार, कला, विज्ञान- या सर्व गोष्टी जर यशस्वीपणे हाताळल्या गेल्या तर ती शांत होते. आपली सत्ताकांक्षा कोणत्या प्रकारे शमवावी हे मनुष्य आपल्या नैपुण्यांच्या अनुरोधाने ठरवील. त्या तारुण्यावस्थेत मिळालेल्या कौशल्यानुसार तो हा किंवा तो व्यवसाय स्वीकारील. आपली सार्वजनिक विद्यालये (public schools) फक्त परपीडनाची प्रवृत्ती शिकवितात. तिच्यातून ‘गोर्‍या माणसाचे ओझे ‘ (White man’s burden) वाहणारे लोक निर्माण होतात. पण हेच लोक जर विज्ञानोपासनेत गेले असते तर त्यांपैकी काहींनी ते पसंत केले असते. आपण आत्मसात् केलेल्या नैपुण्यांपैकी जे अधिक कठिण असेल ते मनुष्य सामान्यपणे निवडतो. बुद्धिबळात प्रवीण असणारा मनुष्य सोंगट्या खेळणार नाही. याप्रकारे नैपुण्यसदाचाराला साह्यभूत होऊ शकते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.