इतर

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वर्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता. या दोन्ही अवस्था एपिलेप्सीमुळे (मिर्गी) श्रीरामकृष्णांना होत होत्या हे प्रतिपादन खालील कारणांमुळे सदोष वाटते.
(अ) आजही एपिलेप्सीचे अचूक निदान करणे यासाठी एपिलेप्सीचे नेमके ज्ञान, अनुभव व जरूर पडल्यास मेंदूच्या खास तपासण्या यांची गरज असते. आजही एपिलेप्सीच्या १० ते १५% रुग्णांमध्ये एपिलेप्सी हे निदान चुकीचे केलेले आढळते. श्रीरामकृष्णांच्या काळात एपिलेप्सीचे ज्ञान कमी होते, मेंदूच्या विशेष तपासण्यांचा शोध लागलेला नव्हता व एपिलेप्सीवरील औषधेही उपलब्ध नव्हती. एखाद्या व्यक्तीत आढळून येणारी देवीच्या दर्शनाची स्थिती व/वा भावानुभूती ही १००% एपिलेप्सी आहे, असे विधान करण्यासाठी त्या व्यक्तीची EEG ticlenctryया प्रकारे तपासणी करून असे अनुभव त्या व्यक्तीला येत असताना त्याच्या मेंदूत विशिष्ट विद्युत्बदल आढळून येतात असे सिद्ध करावे लागेल. श्रीरामकृष्णांच्या काळी अशी तपासणी उपलब्ध नव्हती. वैद्यकशास्त्रामध्ये एखाद्या आजाराच्या अस्तित्वाचा अप्रत्यक्ष पुरावा मानण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत आपल्याला संपूर्ण खात्री देऊ शकत नाही, पण इतर तपासण्या उपलब्ध नसल्यास ही वापरली जाते. ही पद्धत म्हणजे रुग्णाला जो आजार आहे असे डॉक्टरला वाटत असते त्याचे औषधोपचार रुग्णावर करणे आणि आजार बरा झाल्यास रुग्णाला तो आजार आहे असे मानणे. (काही रुग्णात हे मानणे चुकीचे ठरेल हे गृहीत धरून.) श्रीरामकृष्णांच्या काळात एपिलेप्सीवरील औषधे उपलब्ध नव्हती त्यामुळे अर्थातच असा अप्रत्यक्ष पुरावा मिळणेही शक्य नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर विचार करता केवळ श्रीरामकृष्णांचे आईवडील त्यांना लागलेली भावसमाधी हा मिर्गीचा झटका होता असे मानीत व डॉक्टरही त्या मताशी सहमत होते आणि मिर्गीला इंग्रजीत एपिलेप्सी म्हणतात म्हणून श्रीरामकृष्णांना एपिलेप्सी होती हे प्रतिपादन निःसंशयपणे सिद्ध होत नाही. आता थोडे सखोल विवेचन करू.
(ब) एपिलेप्सीमध्ये अनेक प्रकार आहेत. तो एकच आजार नाही. त्यामुळे एखाद्याला नुसती एपिलेप्सी आहे असे म्हणणे अपुरे ठरते आणि त्याला कोणत्या प्रकारची एपिलेप्सी आहे हे सांगणे आवश्यक असते. श्री. व-हाडपांडे यांनी या बाबीचा उल्लेखही केला नाही. श्रीरामकृष्णांना होणारे देवीचे दर्शन व भावानुभूती ही एपिलेप्सीच्या एखाद्या प्रकारात बसूशकते का ते पाहू.
विशिष्ट मानसिक अवस्था हेच मुख्य लक्षण असणारे एपिलेप्सीचे तीन प्रकार आहेत : (१) Simple partial seizures, psychic, (२) Complex partial seizures, (3) Simple or complex partial seizures with secondary generalization. यातील तिसर्याl प्रकारात शेवटी माणूस पूर्णपणे बेशुद्ध पडून त्यास आकडी (convulsion) येते. श्रीरामकृष्णांना आकडी (बेशुद्ध पडून हातापायांची विशिष्ट प्रकारे हालचाल) येत असल्याचे वर्णन नाही. त्यामुळे श प्रकारची एपिलेप्सी त्यांना नव्हती.
Simple partial seizures, psychic a Complex partial seizures 27 CT-ÉT प्रकारात दर झटक्याच्या वेळी तोच अनुभव येतो. जणू मेंदूमध्ये एक रेकॉर्ड बसवलेली असतेआणि दर झटक्याच्या वेळी तीच रेकॉर्ड लावली जाते. श्रीरामकृष्णांना होणारे देवीचे दर्शन अशा प्रकारचे नव्हते. त्यांना वेगवेगळ्या देवांचे दर्शन होई आणि त्यांच्याशी ते परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा संवाद करीत. त्यामुळे श्रीरामकृष्णांना होणारे देवीचे दर्शन एपिलेप्सीचा प्रकार ठरू शकत नाही. त्यांना होणारी भावानुभूती म्हणजे नेमके काय अनुभव होते याचे वर्णन श्री व-हाडपांडे यांनी दिलेले नाही. तो अनुभव दर वेळी तसाच येत असल्यास एपिलेप्सी हे त्याचे एक कारण असू शकते. तो अनुभव त्यांना संपूर्ण व सुसंगतपणे आठवत असल्यास ती simple partial seizure, psychic ठरेल आणि तो अनुभव त्यांना पूर्ण व सुसंगत आठवत नसल्यास वा अजिबात आठवत नसल्यास (आपल्याला काही अनुभव आला हेही रुग्णाला आठवत नाही) ती complex partial scizureठरेल. याबाबतही नेमकी माहिती श्री व-हाडपांडे यांनी दिलेली नाही. मलाही श्रीरामकृष्णलीलाप्रसंग हा ग्रंथ मिळू शकला नाही. परंतु असे झटके हे बहुसंख्य रुग्णांत काही सेकंद ते मिनिटांपर्यंत टिकतात आणि श्रीरामकृष्णांमध्ये ते बराच काळ टिकत. ही गोष्ट हे झटके एपिलेप्सीचे असण्याची शक्यता कमी करते.
(२) ‘रामकृष्णांनी रासमणी राणीला मारलेली थप्पड अशीच मिर्गीच्या झटक्यात मारली हे स्पष्ट आहे असे श्री. व-हाडपांडे यांचे म्हणणे आहे. श्रीरामकृष्णांना एपिलेप्सी होती हे म्हणणे मला का चूक वाटते याची सविस्तर मांडणी वर केलेली आहेच. तरीही त्यांना एपिलेप्सी होती असे गृहीत धरून या थपडेच्या प्रसंगाचा विचार करू.
एपिलेप्सीचे बहुसंख्य रुग्ण आयुष्यात कधीही एपिलेप्सीमुळे रागीट/हिंसक आक्रमक बनत नाहीत. एपिलेप्सीमुळे अशा प्रकारची घटना घडणे ही अगदी क्वचित होणारी गोष्ट आहे. जेव्हा असे घडते तेव्हा एपिलेप्सी आणि हिंसकता (Violence) यांचा तीनपैकी एक प्रकारे संबंध असतो. (१) Ictal violence – एपिलेप्सीचा झटका चालू असताना निर्माण झालेली हिंसकता. (२) Post-icial violence – एपिलेप्सीचा झटका संपल्यावर व पूर्ण शुद्धीवर येण्यापूर्वी निर्माण झालेली हिंसकता. (३) Inter-ictal violence एपिलेप्सीच्या दोन झटक्यांमधील काळात निर्माण झालेली हिंसकता.
Ictal violence या प्रकारात एपिलेप्सीच्या रुग्णाचे हिंसक वागणे हे बाह्य कारणाने निर्माण न झालेले (unprovoked) व दिशाविहीन (non-directed) असे असते. श्रीरामकृष्ण हे रासमणी राणीवर रागावले होते, म्हणजेच त्यांचे थप्पड मारणे unprovokedनव्हते. आणि ते राणीला एकच थप्पड मारून थांबले, तिला वा इतरांना बेभानपणे मारीत सुटले नाहीत यावरून त्यांचे वागणे non-directed नव्हते. या कारणास्तव थप्पड प्रकरण हा ictal violence चा प्रकार म्हणता येणार नाही.
Post-ictal violence या प्रकारात प्रथम एपिलेप्सीचा झटका येतो आणि नंतर रोगी हिंसक बनतो. थप्पड प्रकरणात आधी श्रीरामकृष्णांना असा झटका (देवीचे दर्शन वा भावानुभूती) आल्याचा उल्लेख श्री. वहाडपांडे यांच्या लेखात नाही. या प्रकारच्या हिंसकपणात रुग्ण गोंधळलेल्या अवस्थेत असतो आणि त्याला आवरायला गेल्यास तो अधिक हिंसक बनतो. श्रीरामकृष्ण अशा अवस्थेत होते असा उल्लेख लेखात नाही. यामुळे थप्पड प्रकरण हा post-ictal violence चाही प्रकार म्हणता येणार नाही.
Inter-ictalvoilenceहा एपिलेप्सीशी संबंधित आहे असे अजून सर्वमान्य झालेले नाही. ज्या रुग्णांमध्ये असा संबंध असल्याचा दाट संशय घेण्यात येतो त्यांच्यात त्यांनी हिंसेच्या (अनेकदा अनाकलनीय) अनेक घटना केलेल्या आहेत असे आढळते. हिंसेची एकच घटना ही inter-ictal violence चा प्रकार आहे असे ठाम विधान करता येणार नाही. यामुळे थप्पड प्रकरण inter-ictal violence मध्येही बसत नाही.
अशाप्रकारे श्रीरामकृष्णांनी रासमणी देवीला रागावून धप्पड मारली, या घटनेचा एपिलेप्सीशी काहीही संबंध नाही.
मोहनिद्रा (Hypnosis) (संमोहन हा शब्द अधिक युक्त)
मिर्गी आणि मोहनिद्रा या दोन गोष्टी श्री वहाडपांडे यांनी जोडून घेतल्या आहेत. ‘तसेच या झटक्यात कधी कधी भास होतात’ असे विधान ते एका परिच्छेदात करतात. नंतरच्या परिच्छेदाची सुरवात ‘ज्यांना जागेपणी भास होतात अशा लोकांच्या व्यक्तित्वात एक विशेष हा असतो की ते उत्कट प्रमाणात सूचन म्हणजे सजेशनला (Suggestion) बळी पडणारे असतात’ या विधानाने होते. हे दुसरे विधान अत्यंत सरधोपट व चुकीचे आहे. जागेपणी भास होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यापैकी कोणत्याही कारणातील सर्व लोक हे सजेशनला बळी पडणारे नसतात. परंतु हा मुद्दा महत्त्वाचा नाही.
श्रीरामकृष्णा आणि विवेकानंद ही व्यक्तिमत्त्वे गाढ मोहनिद्रेत जाण्यास सक्षम होती। हे मलाही मान्य आहे. गाढ मोहनिद्रेत देवीचे भास होणे शक्य आहे. (हे प्रयोग मी स्वतः केले आहेत. परंतु ‘रामकृष्णांच्या प्रभावाने विवेकानंदाना आलेले अनुभव हे मोहनिद्रेच्या स्वरूपाचे होते. याचे प्रमाण हे की त्या अनुभवांच्या सत्यतेचा पडताळा येत नव्हता’ हा श्री. व-हाडपांडे यांचा युक्तिवाद तर्कदुष्ट (तर्कहीन) आहे. एक तर ज्या अनुभवांच्या सत्यतेचा पडताळा येत नाही त्यांचे मोहनिद्रा हे एकच कारण नाही; स्वप्नावस्था, वेड, मादक द्रव्यांचे सेवन अशी । इतरही मानसशास्त्रीय कारणे असतात. आणि साक्षात्कारवाद्यांच्या मते साक्षात्कार हा अनुभवही दुसरा ज्याची सत्यता पडताळू शकत नाही असा आहे. दुसरे असे की एखाद्या । गोष्टीच्या सत्यतेचा अनुभव आला नाही म्हणून ती गोष्ट असत्य ठरत नाही. मोहनिद्रा आणि समाधी तसेच साक्षात्कार अवस्था या एकच आहेत असे मानसशास्त्रात अजून सिद्ध झालेलेनाही. (या अवस्था एकच आहेत असे मानणारा मोठा गट आहे.) गाढ मोहनिद्रेत दैवताचे दर्शन करविता येते परंतु नंतर जागे झाल्यावर त्या व्यक्तीला आपल्याला स्वप्नसदृश आभासझाला होता हे कळते. आपल्याला दैवताचे साक्षात् दर्शन झाले अशी त्याची धारणा नसते. मोहनिद्रा, समाधी अवस्था, साक्षात्कार यातील परस्परसंबंधांवर आज मानसशास्त्रीयदृष्ट्या ठाम मत देता येणार नाही.
स्त्रीस्वरूपातील रामकृष्ण
The ICD-10 Classification of Mental and Behavioural Disorders पुस्तक जागतिक आरोग्य संघटनेने १९९३ मध्ये जगभर वापरण्यासाठी प्रसिद्ध केले आहे. यात ‘ट्रॅन्सव्हेस्टिझ’ हा शब्द दोन disorders मध्ये वापरला आहे. Dual-role transvestismआणि Fetishistic transvestism.स्त्रीवेषात रामकृष्णांना स्त्रियांचे मासिक धर्म झाल्याचे भास होत असा उल्लेख श्री. व-हाडपांडे करतात. स्त्रियांचे मासिक धर्म आणि कामशांती या दोन अलग गोष्टी आहेत. श्रीरामकृष्णांना स्त्रीवेषात कामजागृती व कामशांती होत होती असा उल्लेख श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात नाही. वर नमूद केलेल्या पुस्तकाप्रमाणे स्त्रीवेषात कामजागृती व कामशांती होणे हे fetishistic transvestismचे एक आवश्यक लक्ष्य आहे. ते श्रीरामकृष्णांत नसल्याने त्यांना fetishistic transvestismनव्हता. Dual-role transvestismमध्ये ती व्यक्ती भिन्नलिंगी व्यक्तीचे कपडे काही काळ वापरते परंतु अशा वागण्यामागे लिंगबदलाची इच्छा किंवा लैंगिक भावना नसते. श्री. व-हाडपांड्यांनी उद्धृत केलेले श्रीरामकृष्णांचे वागणे dual-role transvestismमध्ये बसते. केवळ यावरून ते मनोविकृत होते असा निष्कर्ष निघत नाही. (श्री. व-हाडपांडे यांनीही तसे स्पष्टपणे म्हटलेले नाही.) सध्या जगभर sexual identity, sexual inclinations वsexual practices याबाबत उलथापालथ चालू आहे. Homosexuality हा आता मानसिक आजार मानला जात नाही.Dual-role transvestismअसलेला माणूस माझ्याकडे आला; आणि त्याच्या मधूनमधून स्त्रीवेष धारण करण्याने त्याला, त्याच्या कुटुंबीयांना किंवा समाजाला त्रास होत नसेल, तर त्याला मी तू मनोविकाराने ग्रस्त आहेस आणि तुझ्यावर उपचार केले पाहिजेत असे म्हणणार नाही. (याची तात्त्विक कारणमीमांसा देण्याचे हे स्थळ नव्हे.)
एवढी प्रतिक्रिया लिहून झाल्यावर माझा Ist MBBS ला शिकत असलेला आतेभाऊ आला. त्याला मी प्रथम श्री. व-हाडपांडे यांचा लेख वाचायला दिला.“पटतंय की सारं हे” अशी त्याची प्रतिक्रिया होती. नंतर मी माझे लिखाण त्याला वाचायला दिले. “तुझं वाचल्यावर पहिलं चुकीचं वाटतय” असे तो म्हणाला आणि त्याने विचारले, “जर देवीचे दर्शन आणि भावानुभूती या एपिलेप्सी किंवा मोहनिद्रा नाहीत तर त्या मानसशास्त्रीय दृष्ट्या आहेत तरी काय?ते तू मांडलेच नाहीस.” “ते माझ्या लेखाचे प्रयोजन नाही” मी उत्तरलो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.