विचारकलह आणि प्रगती

बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठी भिता?दुष्ट आचाखचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धी करणार्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आज पर्यंत या देशात हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे व बहुधा आमचे लोक गतानुगतिकच असल्यामुळे, हे भरतखंड इतकी .शतके अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडले आहे. हा कलह दुष्ट विकोपास जाऊ न देण्याविषयी मात्र खबरदारी ठेवली पाहिजे. नाही तर त्यापासून पुढे खच्या लढाया आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो. सुधारक आणि दुर्धारक, चपळ सुधारक आणि मंद सुधारक, थंडे सुधारक आणि गरम सुधारक, अथवा नाना प्रकारच्या मतांचे जुने आणि नवे लोक यांमध्ये सांप्रतकाली जी दुही माजून राहिली आहे ती पाहून घाबरून जाण्याचे किंवा देशावर काही प्रचंड संकट गुदरणार आहे, असे मानण्याचे बिलकूल कारण नाही

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.