अमेरिकेतील लोकांची लैंगिकता

सैन्य पोटावर चालते अशी जुनी सार्थ म्हण आहे! सैन्यच नव्हे, तर प्राणिमात्र पोटाखातरच चालत असतात असे म्हटले तर वावगे ठरू नये, उदरभरण ही प्रत्येक जीवाची दैनंदिन प्रेरणा असून या प्रेरणेमुळेच सर्व जीवांच्या जीवनातील मोठा काल व यत्न व्यतीतहोतात. उदरभरणानंतर प्रत्येक जीवाची धडपड असते प्रजननासाठी, जगण्याइतकीच महत्त्वाची प्रजोत्पादनाची प्रेरणा जीवसृष्टीत आढळते. मानवी समाजातही प्रजोत्पादनाची प्रेरणा फार महत्त्वाची आहे. सृष्टीतील बहुसंख्य जीव लैंगिक प्रजोत्पादनच करतात. या प्रकारच्या प्रजोत्पादनासाठी प्रत्येक जीवास लिंगपेशी उत्पन्न करून, त्यांचा दुसर्याय जीवाने उत्पन्न केलेल्या लिंगपेशींबरोबर संयोग घडवून आणावा लागतो. त्यासाठी प्रत्येक जीवामध्ये परिपूर्ण लैंगिकता विकसित होणे व जीवाने लैंगिक आचरण करणे आवश्यक असते. ही लैंगिकता व लैंगिक आचरण जीवांनी सुखकारक व आनंददायक करून ठेवण्यात निसर्गाने फार मोठी किमया साधलेली आहे. ज्याप्रमाणे पोट भरण्यासाठी अन्न ग्रहण करताना अन्नाचा स्वाद व चव घेण्यात जीवांना आनंद व समाधान मिळते त्याचप्रमाणे किंवा त्याहून कितीतरी पटीने अधिक आनंद व सुख जीवांना लैंगिक आचरणामुळे प्राप्त होते. म्हणूनच लैंगिकता व लैगिक आचरण मानवी जीवनाचा व संस्कृतीचा एक प्रमुख घटक झाले आहे. आता विज्ञानाने लैंगिक आचरण व प्रजोत्पादन यांची फारकत करणे संभव केल्यामुळे तर लैंगिकआचरणावरील मानवी समाजातील निबंध खूपच सैल केले आहेत.
मानवी स्त्री-पुरुष वयात आल्यापासून अगदी गलितगात्र होईस्तोवर लैंगिक सुखासाठी धडपडत असतात. धर्माने व संस्कृतीने, काही विशिष्ट बंधने पाळून, मानवास लैंगिक सौख्यप्राप्तीची पूर्ण मुभा दिलेली आहे. एवढेच नव्हे तर लैंगिक आचरणाद्वारे अधिकाधिक आनंद मिळविण्याचे मार्गही दाखविलेले आहेत. हिंदूंची मंदिरशिल्पे, कामसूत्रासारखे ग्रंथ किंवा आयुर्वेदातील वयोस्थापना क्रिया वगैरेंना भारतीय संस्कृतीत निश्चित स्थान आहे हे नाकारून चालणार नाही. पाश्चात्य संस्कृतीत तर लैंगिक आचरणाविषयी सामाजिक निर्बध पुष्कळच सैल असल्याचे आढळते. ख्रिश्चन धार्मिक परंपरांचा हा प्रभाव म्हणता येईल. इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या पत्नीची प्रथा पुरुषांच्या लैंगिक आचरणाला भरपूर सूट देते. इस्लाममधील पुरुषांच्या सुंताविधीचा संबंध वैयक्तिक स्वच्छतेशिवाय, लैंगिक सौख्यात भर टाकण्याशी सुद्धा आहेच. (मुसलमान बालिकांच्या विशेषतः आफ्रिकी देशात-स्त्रीशिश्न काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेद्वारे (clitoridectomy) स्त्रियांना लैंगिक आनंदापासून वंचित ठेवण्याचा उद्देश असतो. त्यामुळे वयात आल्यावर स्त्रियांना लैंगिक आचरणाबद्दल गोडी राहात नाही व त्या पतीशी एकनिष्ठ राहतात असासमज आहे!)
पाश्चात्य जगात अलीकडे लैंगिक आचरणाचे भरपूर स्वातंत्र्य असून विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक आचरण बर्याणच अंशी ग्राह्य मानले जाते. तो व्यक्तिस्वातंत्र्याचा एक अभिन्न घटक समजतात. तसेच अनैसर्गिक लैंगिक आचरणही फारसे त्याज्य मानत नाहीत. समलिंगी लैंगिक आचरण करणाराच्या अधिकृत संस्था असून, अशा संस्था आपल्या सदस्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक असतात. पाश्चात्त्य देशांमध्ये लैंगिक स्वातंत्र्य सर्वाधिक स्वीडन, हॉलंड, नॉर्वे या स्कँडिनेव्हियन राष्ट्रांत आहे. त्यानंतर उत्तर अमेरिकेचा क्रम लागतो, त्यापाठोपाठ पश्चिम युरोप, भूमध्यसागरीय युरोप आणि पूर्व युरोप यांचा क्रमयेतो. थायलंड वगळता सर्व पूर्व आशिया व चीन यामध्ये लैंगिक स्वातंत्र्य बरेच मर्यादित आहे. आफ्रिकेमधील गैरइस्लामी देशांतील लैंगिक स्वातंत्र्य, रानटी मानवसमूहातील असल्यासारखे स्वैर आहे.
इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेतील समाजात लैंगिकतेकडे अतिशय निर्विकारपणे पाहिले जाते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. माणसास सुख आणि आनंद मिळविण्याचा नैसर्गिक हक्क असून लैंगिक आचारातून तो मिळत असल्याने, सर्वांना लैंगिक आचरणाची भरपूर संधी मिळाली पाहिजे असे बहुसंख्य सामान्य अमेरिकनांना वाटते. धनप्राप्ती ही अमेरिकन्सच्या जीवनातील पहिली प्रेरणा, तर लैंगिक सुखप्राप्ती ही दुसरी प्रेरणा आहे. यामुळे आज अमेरिकन संस्कृतीत व मानसिकतेमध्ये लैंगिकतेचा फार मोठा प्रभाव आहे. लैंगिक सौख्य ही, ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, पोषाख, करमणूक व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होतात तशीच, मिळविण्याची एक गोष्ट आहे असे अमेरिकन लोक मानतात. लैंगिक सुख हे हवे तेव्हा, हवे त्या प्रमाणात व हव्या त्या पद्धतीने उपलब्ध झाले पाहिजे असा प्रबल विचार प्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे. भारतामध्ये आज तरी अशा प्रवृत्तीकडे काहीशा तिरस्काराने व तुच्छतेने पाहिले जात असले तरी आणखी १५-२० वर्षांत भारतातही हीच विचारसरणी रूढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण जे अमेरिकेत घडते तेच २० -२५ वर्षांनी तंतोतंत भारतात घडते असा या शतकातील अनेक क्षेत्रांतील अनुभव आहे. या कारणास्तव, आज अमेरिकेत काय परिस्थितीआहे याविपयी साक्षेपी विचारमंथन आपल्याकडे होणे इष्ट आहे. अमेरिकन लोकांचे लैंगिक आचरण कसे आहे याबद्दल भारतीयांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. पूर्वी हॉलिवुडच्या चित्रपटांतून दिसणाच्या लैंगिकतेमुळे हे औत्सुक्य निर्माण झाले ते आता स्टार टी. व्ही. सारख्या माध्यमाने वर्षानुवर्षे चालणार्याे अनंत निसरड्या नाटकांमुळे (soap operas) फारच वाढले आहे.“बोल्ड अॅन्ड ब्यूटिफुल,” “सान्ता बाबरा,” “डायनेस्टी” वगैरे सारख्या सॉप्समध्ये अमेरिकन लैंगिकतेचे दर्शन घडते. उदाहरणार्थ ‘बोल्ड अॅन्ड ब्यूटिफुल’ मधील एरिक हा पोपाखांचा मध्यमवयीन कारखानदार आपल्या स्टेफनी नावाच्या पत्नीखेरीज आपल्या कॉलेजात असतानाच्या प्रेयसीशी – एलिझाबेथशी संबंध ठेवतो. एलिझाबेथची मुलगी ब्रूक ही एरिकचा मुलगा रिज याच्यासोबत लग्न न करता राहून गर्भवती होते. पुढे हा गर्भ गमावल्यानंतर रिज आपल्या वहिनीशी लग्न करतो. मोकळी झालली ब्रूक, एरिकशी संबंध करून त्याच्यापासून तिला दिवस जातात! म्हणजेच एक पुरुष, आई व मुलगी या दोघींशी लैंगिक सबंध ठेवतो, तर एक तरुणी आपल्या आईच्या प्रियकराशी व त्याच्या मुलाशी शरीरसंबंध करते! हे चित्र अमेरिकन समाजाचे प्रातिनिधिक आहे काय? अमेरिकेतील उच्चभ्रू समाजातील stag partics (डिक्शनरील अर्थावर जाऊ नये), wife-Swapping वगैरे संज्ञा कशाच्या निदर्शक आहेत?
लैंगिकता याच विषयास वाहिलेली अनेक नियतकालिके अमेरिकेत मोठा धंदा करतात. Playboy हे तर सर्वात जुने व प्रसिद्ध. Penthouse, The Bitch, The Stud, Cosmopolitan यांसारखी गरम नियकालिके. न्यूज स्टॅडवर असंख्य सचित्र साहित्यउपकरणोंची तुफान विक्री होते. कित्येक सिनमागृहे कायमची xx अथवा xxx रेटेड फिल्म्स्ना वाहिलेली आहेत व ती दिवसभर चालू असतात. अगदी रेल्वे स्टेशन्स, बस स्टेशन्स, दारूचे गुत्ते येथे peep show मशीन्स अहोरात्र चालू असतात. यंत्रात एक नाणे टाकून फटीला डोळे लावून पाहिले म्हणजे २ अथवा ५ मिनिटे चालणारी ब्लू फिल्म दिसते! कॉलेज, विद्यापीठातील ७०-८०% विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लैंगिक जीवनसुरळीतपणे सुरू होऊन गेलेले असते. मग दरवर्षी नवा भागीदार असला तरी चालते.
हल्ली (Spring, 1995) अमेरिकन काँग्रेस (विधानमंडळ) च्या कनिष्ठ सभेत (House of Representatives) एक विधेयक चर्चेसाठी दाखल आहे. या विधेयकात, पित्याची नोंद नसलेल्या मुलांना सामाजिक सुरक्षा लाभापासून वंचित करण्याचे प्रावधान अमेरिकेच्या नवनिर्वाचित प्रतिगामी (Republican) सदस्यांनी केलेले आहे. अमेरिकन शहरातील (inner citics) प्रत्येक ३ नवजात अर्भकांपैकी १ अर्भक अविवाहित अल्पवयीन (tecnager) मातेचे असते! प्रस्तुत लेखकाच्या १९७० ते ७३ दरम्यानच्या अमेरिकेतील वास्तव्यात त्याच्या शेजारच्या बिर्हा डांत फक्त चार कृष्णवर्णी महिला रहात असत. ६० वर्षांची पणजी, ४० वर्षांची आजी, १८ वर्षांची माता आणि २ वर्षांची रोझबड” नावाची कन्या. कुटुंबात एकही पुरुष कायम वस्तीला नसे, परंतु भेटीगाठी (!) साठी सगळ्या वयाच्या पुरुषांची कायम वर्दळ असे! या स्त्रियांपैकी ४० वर्षे वयाची महिला एका फास्टफूड दुकानात सफाईचे काम करीत असे. सर्व स्त्रियांना सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत दर आठवड्याला ८० डॉलर्स (त्या वेळी) प्रत्येकी धनादेशाने प्राप्त होत असत. हे चित्र पुरेसे बोलके आहे असे वाटते!
एकूण अमेरिकेतील लैंगिकता अतिशय स्वैर आहे हे भारतीयांना जाणवेल अशी परिस्थिती आहे. या लैंगिक स्वातंत्र्याची नेमकी काय अवस्था आहे याविषयी प्रत्यक्ष अमेरिकेतील शासन, विद्यापीठे, विचारधन संस्था (Think Tanks) व सुजाण नागरिक जागरूक असतात. त्यामुळे इतर सर्व सामाजिक समस्यांप्रमाणेच या विषयावरही वारंवार अभ्यास, संशोधन व सर्वेक्षण होते व त्यावरील वृत्तांत पुस्तकरूपाने प्रसिद्ध होतात. १९४० व १९५० च्या दशकांत डॉ. आल्फ्रेड किन्से या जीवशास्त्रज्ञाने सुमारे ११००० अमेरिकन्सच्या लैंगिक आचरणाचे सर्वेक्षण करून आपला अहवाल पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला त्यामुळे फार गजहब झाला होता. कारण त्या अहवालात अमेरिकन्सच्या अनीतिमत्तेचा गौप्यफोट होता. डॉ. किन्से यांनी समाजातील विशिष्ट गटाकडून प्रश्नमालिकेची लेखी उत्तरे मागितली होती. अर्थात ते सर्वेक्षण सांख्यिकीच्या नियमांशी तडजोड करणारे होते; त्यामुळे त्यांनी काढलेले निष्कर्ष बरेचसे गैरलागू होते. तरीपण इतर कोणत्याही साधनाच्या अभावी डॉ. किन्से यांच्या अहवालाचे ऐतिहासिक महत्त्व प्रस्थापित झाले. पुढे १९६६ साली डॉ. मास्टर्स व डॉ. जॉन्सन या संशोधकद्वयाने (अनुक्रमे पुरुष व महिला) परिश्रमपूर्वक अमेरिकन लोकांच्या लैंगिक आचरणाचा अभ्यास करून एक ग्रंथ “Human Sexual Response’ नावाने प्रसिद्ध केला. या पुस्तकात अमेरिकन लोकांच्या लैंगिक आवडीनिवडीविषयी विस्तृत विवचन व विश्लेषण असल्यामुळे हा ग्रंथही खूप गाजला. अमेरिकन लोक लैंगिक सौख्यासाठी किती प्रकारचे आचरण करतात व त्यात कितीवेगवेगळ्या भागीदारांशी संबंध ठेवतात याचे फार मनोरंजक चित्र या ग्रंथाद्वारे उभे राहते.
आता अगदी अलीकडे १९९४ साली शिकागो विद्यापीठातील प्राध्यापकांना “The Social Organization of Scxuality’ नामक ग्रंथ (किंमत सुमारे १५०० रुपये) प्रसिद्ध केला आहे. याच ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती Little, Brown कंपनीने “sex in America – A Definitive Survey” या नावाने सुमारे ७०० रुपये किंमतीला उपलब्ध करून दिली आहे. TIME साप्ताहिकाच्या १७ ऑक्टोबर १९९४ च्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीत या नवीन ग्रंथाचे विस्तृत परीक्षण ठळकपणे (Cover Story) प्रसिद्ध झाले आहे. या नव्या पुस्तकाचा दिलासा देणारा मुख्य निष्कर्ष म्हणजे अमेरिकन लोक वाटतात तेवढे लैंगिक नाहीत व अमेरिकेत विवाहसंस्था अजून मोडीत निघालेली नाही हा आहे.
या ग्रंथाचे प्रमुख लेखक डॉ. एडवर्ड लाऊमान हे समाजशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांनी National Opinion Research Centre च्या सहाय्याने हे सर्वेक्षण केले. या ग्रंथाचे अन्य लेखक आहेत डॉ. रॉबर्ट मायकेल, डॉ. स्टुअर्ट मायकेल्स आणि न्यूयार्कस्टेट युनिव्हर्सिटी, स्टोनी ब्रुक येथील डॉ. जॉन आँगनॉन. २५० प्रशिक्षित कार्यकर्त्यांद्वारे संगणकातून निवड केलेल्या, समाजाच्या सर्व स्तरांतील ४००० व्यक्तीच्या मुलाखती वारंवार घेऊन माहिती मिळविण्यात आली. ३५०० लोकांना पूर्ण माहिती दिली व या माहितीच्या आधारेच निष्कर्ष काढण्यात आले. या सर्वेक्षण नमुन्यात (sample मध्ये) फक्त १८ ते ५९ वर्षे वयाच्या व्यक्तींचाच समावेश करण्यात आला. यापूर्वीच्या सर्वेक्षणातील सर्व तांत्रिक दोष टाळून अभ्यास केल्याचा या लेखकांचा दावा आहे. तरीपण या सर्वेक्षणाबद्दल टीकाकार पूर्णपणे समाधानी नाहीत. २५ कोटी लोकसंख्येच्या देशातील नमुन्याची ३५०० ही संख्या फारच अल्प आहे. १८ खालील व ५९ वरील वयाच्या लोकांना या सर्वेक्षणात विचारात घेतले नाही. वस्तुतः याच वयाचे लोक लैंगिक आचरणात अधिक कार्यरत असतात. त्याचप्रमाणे समलिंगी लैंगिक आचरण करणार्याे लोकांची संख्या, कबुलीजबाब देणार्यावहून, खूप अधिक आहे, इत्यादि आक्षेप या सर्वेक्षणाविषयी घेण्यात आले आहेत. तरीपण शक्यतोवर बिनचूक तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून झालेले हे संशोधन अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे अमेरिकन लोकांच्या लैंगिक प्रवृतीचे यथार्थ दर्शन होते असेच सामान्यपणे मानले जात आहे.
आमच्या मते या सर्वेक्षणात एकाच अमेरिकेचा अभ्यास झाला असण्याचा संभव आहे. ही अमेरिका म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत अमेरिका. यात WASP’s (व्हाइट अँग्लो । सँक्सन प्रोटेस्टंट), कॅथालिक आणि आशियाई लोकांचा समावेश होतो. यात सुमारे १० लाख भारतीयही येतात. सर्वेक्षणात भाग घेणारे ३५०० लोक बहुसंख्येने याच गटातील असणार, कारण या लोकांचे स्थिर पत्ते असतात, फोन नंबर असतात व ते सुसंगत भाषेत उत्तरे देऊ शकतात. पण जी एक दुसरी अमेरिका आहे तिचे काय? काही पिढ्यांपूर्वी झाडीत राहणार्याश (आणि वनचरांना शोभणारीच नैतिक मूल्ये असणारया) आफ्रिकनअमेरिकन्सपैकी किती लोकांचा सहभाग या सर्वेक्षणात आहे याबद्दल शंका घेण्यास जागा आहे. केवळ सोशल वेल्फेअरचा चेक वाचण्यापुरते यांचे शिक्षण आणि कोणत्याही भाषेत चार धड वाक्ये न बोलता येण्यासारखी ज्यांची अवस्था आहे त्यांचे प्रतिबिंब या सर्वेक्षणामध्ये आहे काय याबद्दल आमच्या मनात शंका आहे. सर्वेक्षणाचे जे गोंडस निष्कर्ष निघाले आहेत ते याच कारणामुळे असे समजण्यास जागा आहे. असे असले तरी या ग्रंथात अमेरिकन लोकांच्या लैंगिकतेबद्दल जे निष्कर्ष आहेत ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत.
विवाहित अमेरिकनांपैकी गेल्या वर्षभरात ९४% लोक आपआपल्या पत्नी/पतीशी एकनिष्ठ होते. सामान्यतः संपूर्ण वैवाहिक जीवनात ७५% पुरुष व ८५% महिला आपल्या भागीदाराशी एकनिष्ठ असतात. याचाच अर्थ बाहेरख्यालीपणाचे प्रमाण अल्प आहे.
संपूर्ण लोकसंख्येतील (विवाहित तसेच अविवाहित) ८०% लोक दरवर्षी एकाच भागीदाराशी लैंगिक आचरण करतात. पूर्ण जीवनांत पुरुषाचे ६ लैंगिक भागीदार असतात तर महिलांना २ भागीदार असतात.
५४% पुरुष दररोज एकदा अथवा त्याहून अधिक वेळा लैंगिकतेबद्दल विचार करतात, परंतु ६७% महिला असा विचार आठवड्यात २-३ वेळाच करतात.
१८ ते ३० या वयोगटातील लोकांचे या १२ वर्षांत किती लोकांशी शरीरसंबंध झाले याचे विश्लेषण असे : २% शून्य, २४% १, २६% २ ते ४, २४%५ ते १०, २४%, ११ ते २० आणि १३% २१ हून अधिक.
संपूर्ण जीवनात २०% अमेरिकन पुरुषांचा व ३१% महिलांचा एकच लैंगिक भागीदार होता, तर ५०% पुरुषांचे व ३०% महिलांचे ५ हून अधिक लैंगिक भागीदार होते.
संपूर्ण लोकसंख्येपैकी १/३ लोक आठवड्यात २ हून अधिक वेळा, १/३ लोक दरमहा काही वेळा व १/३ लोक वर्षभरात काही वेळाच लैंगिक आचरण करतात.
३० वर्षे वयापर्यंत ३% तरुण तरुणींना लैंगिक अनुभवच मिळालेला नसतो.
सामान्य समजुतीपेक्षा फारच कमी म्हणजे केवळ २.७% पुरुष व १.३% महिला समलिंगी संभोगच करतात. उभयलिंगी संभोग करणार्यां ची यात नोंद नाही.
हे सगळे निष्कर्ष अपेक्षेहून फारच मिळमिळीत आहेत असेच या क्षेत्रातील अनुभवी लोकांचे मत आहे. These conclusions appear too good to be true!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.