समतेचे मिथ्य!

गेल्या काही अंकांत सुरू असलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चेत नी. र. वर्हाuडपांडे यांचा “समतेचे मिथ्य” हा लेख काही मौलिक भर घालील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. उदाहरणार्थ, समता, न्याय या संदर्भात दि. य. देशपांडे म्हणतात तसे वर्हा.डपांडे वेड घेऊन पेडगावला जातात. पूर्वी दसर्यानला एका ताटात तांदूळ घेऊन, त्यात “रावण” रेखूनत्या रावणाला मारीत असत. वर्हासडपांडे असेच करतात.
जेव्हा आपले विवेचन एखाद्या पूर्वपक्षाला दिलेल्या उत्तराच्या रूपात असते, तेव्हा पूर्वपक्ष निःपक्षपातीपणाने व त्याच्या सर्व बलस्थानांसह मांडून मगच त्याचा समाचार घ्यायला हवा. त्याऐवजी पूर्वपक्षाचे दुर्बल व विकृत रूप मांडण्याने चर्चेची पातळी खालावते.
ठोस संशोधन :- वहाडपांडे एका कामव्यवहारविषयक पाहणीचा हवाला देऊन सांगतात की कामव्यापारात पुरुष स्त्रियांपेक्षा चौपट “प्रमाणात भाग घेतात. हे विधान पुन्हा कामवासनेबद्दलही येते; म्हणजे मनातील भाव व प्रत्यक्ष व्यवहार स्पष्टपणे वेगळे केलेले आहेत. पुढे वर्हाबडपांडे सांगतात की स्त्रिया व पुरुषांची लोकसंख्या साधारणपणे एकच असते. आता जर पुरुषांच्या दर चार कामव्यापारांतील एकच स्त्रियांशी होत असेल, तर इतर तीन स्वतःशी, पुरुपांशी किंवा पशूशी व्हायला हवेत. असे घडते का? (व्यक्तिशः“मी” किती बुरसटलेला, भीरु आणि सरासरीपेक्षा वेगळा आहे, याची बहुतेकांना जाणीव व्हावी!) किन्सेच्या पाहणीत किंवा तिच्या वहाडपांड्यांनी केलेल्या वर्णनात काहीतरी चुकते आहे,खास.
जीवशास्त्र :- जरा पुढे लैंगिक रोग मानवांमध्येच आढळतात असे विधान, आणि त्याचे “खंडन”, अशी गोंधळवणारी जोडी भेटते. माझ्या माहितीप्रमाणे एड्ज्चा विषाणू HIV ( ह्यूमन इम्यूनोडेफिशियन्सी व्हायरस) सापडायच्या आधी मांजरांमध्ये तसलाच FIV (फेलाईन) विषाणू ओळखला गेला होता. मांजराला एड्ज वजा रोग होतो यावरून त्यांना लैंगिक रोग होतात हे सिद्ध होत नाही. परंतु जनावरांना लैंगिक रोग होत नाहीत की होतात हा प्रश्न “खुला” होतो. इथे कोणतेच “अधिकृत” मत नाही.
मुक्त संभोगातून रोगांचा प्रसार जास्त विस्तृत प्रमाणात होईल, हे खरेच. पण यापेक्षा एक वेगळेही अंग सुचते. जनावरांमध्ये कामेच्छा व कामव्यवहार यांना “माजावर येण्याची बैठक आहे. माणसे विशिष्ट काळातच माजावर येत नाहीत, तर नेहमीच कामव्यवहार करतात. अगदी स्त्रीच्या रजोदर्शनाच्या काळातही कामव्यवहार शक्य असतात व होतात. म्हणजे मानवांचे लैंगिक व्यवहार एकूण प्रमाणात जनावरांच्या तशा व्यवहारांपेक्षा जास्त असतात. आणि अशी बरेचदा आढळणारी परिस्थिती नेहमीच त्या परिस्थितीचा लाभ घेणाच्या जीवांना जन्म देते. हे निरीक्षण उत्क्रांतीच्या तत्त्वात progressive filling up ofavailable niches या नावाने ओळखले जाते. थोडक्यात काय संभोगातल्या. मुक्तीपेक्षा लैंगिक रोगांचा संबंध एकूण संभोगाच्या प्रमाणाशी जास्त आहे.
इतर जनावरे व इतर कपी (गोरिला, चिंपाझी, इ.) यांपेक्षा माणसांमध्ये कामव्यवहार जास्त का? हा जीवशास्त्रातला एक महत्त्वाचा आणि अनुत्तरित प्रश्न आहे. याला एक तपशीलवार उत्तर सुचवले गेले आहे. इतर कपींच्या पिल्लांपेक्षा माणसांच्या पिल्लांचा मेंदू मोठा असतो. त्या मेंदूमुळे गर्भ वाढायला वेळ लागतो. पुढे मूल जन्माला आल्यावरही त्या मेंदूचा वापर करून व्यक्ती घडायला वेळ लागतो. अशा तर्हेचने इतर कोणत्याही कपीपेक्षा मानवी माद्यांना गर्भारपण आणि अपत्य-संगोपनात जास्त वेळ घालवावा लागतो. या काळातली मादीची आणि बाळाची अन्नाची गरज, संरक्षणाची गरज, ह्या गरजा पुरवायला नराने तयार होणे आवश्यकच, नव्हे अनिवार्य असते. नराने मादीवर “प्रेम” करणे, यासाठी ही जास्त कामुकता उपयुक्त ठरते. अशा तर्हे“ने युगल-बंधन (pair-bonding) घट्ट होण्यातून माणसांचे विशिष्ट काळातच माजावर येणे “सुटले, व कामव्यवहार सदा – सर्वदाचा झाला. (इच्छुकांना या संबंधातील हेलन फिशरचे द सेक्स काँट्रॅक्ट, डॉन जोहॅन्सचे ल्यूसी व डेस्मंड मॉरिसचे द नेकेड एप ही पुस्तके वाचावी.) माणसाच्या उत्क्रांतीतले कामव्यवहाराचे स्थान हा महत्त्वाचा विषय आहे.
या विषयाशी संलग्न दोन मुद्द्यांवर कुणी प्रकाश टाकू शकले तर तेही या चर्चेला उपयुक्त ठरेल. एक म्हणजे संभोगामुळे स्त्रीला एकाच पुरुषाशी एकनिष्ठ राहायला उद्युक्त करणारी रसायने तिच्या शरीरात जास्त प्रमाणात वावरतात का? एका दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात असा संदर्भ ऐकला, पण हे “तज्ज्ञ”मत नव्हे. दुसरे म्हणजे गर्भवती स्त्रीशी, ज्यापासून तो गर्भ राहिलेला नाही अशा पुरुषाने संभोग केला, तर गर्भपाताचा संभव वाढतो का? हा संदर्भ Robert Ardrey या लेखकाच्या जराशा बदनाम पुस्तकांमधील आहे. स्त्रीची संभोगात सहकारी होणार्याR पुरुषावरची “निष्ठा, पितृत्व “निर्वेध’ राहणे वगैरे वर्हाभडपांड्यांच्या लेखातील बाबींशी या दोन मुद्द्यांचा थेट संबंध आहे.
जीवशास्त्राच्या पुढे – परंतु ज्या पातळीवर आजच्या सुधारकात चर्चा होते आहे. त्या पातळीवर जीवशास्त्रीय अभ्युपगमांना कितीमहत्त्व द्यायचे, हा वेगळाच मुद्दा आहे.आपल्या जीवशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय मर्यादा ओलांडणारे माणूस हे एकमात्र जनावर आहे. थंडीवाल्यापासून शरीराला नसलेले संरक्षण देण्यासाठी वस्त्रे व घरे माणसाने घडवली. पायांना खूर नाहीत, तर पादत्राणे घडवली. विचारांची देवाणघेवाण करायला भाषा घडवली – त्याचेच एक रूप आजचा सुधारकहे आहे. म्हणजे निसर्गाने घातलेल्या मर्यादांची चौकट ताणणे व तोडणे याचे मानवांना वावडे नाही.
सध्या वापरात असलेल्या (प्रामुख्याने) पुरुषसत्ताक कुटुंबसंस्थेची मुले माणसांच्या शारीरिक मर्यादांमध्ये असतीलही, पण म्हणून ती संस्था“पवित्र” (sanctified) होत नाही. ती संस्था उपयुक्त तर आहेच, पण तिचे रूप बदलण्याची गरज आहे का ते तपासणे, आणि योग्य वाटतील ते बदल करायला झटणे, हा माणसाचा अधिकारच आहे.
जर वर्हालडपांडे म्हणतात तशी पुरुषांची कामुकता स्त्रियांच्या कामुकतेच्या चौपट असेल, तर त्यांनीच भलामण केलेल्या समजूतदारपणाची जबाबदारी प्रामुख्याने पुरुषांवर येते. हे (माझे) मत एका समांतर उदाहरणाने दाखवायचा प्रयत्न करतो. अन्नाची भूक आणि लैंगिक “भूक”यांना समांतर मानून पाहावे.
माझी भूक तीन पोळ्या सुखाने खाऊ शकण्याची आहे, पण माझ्या अन्नदात्रीला बारा पोळ्या खायला घालूनच सुख-समाधान मिळते. मी खाण्यात शौर्य दाखवूनही तिचे समाधान करू शकत नाही. तसे समाधान केले तर माझ्या शारीरिक व मानसिक आरोग्याला अपाय होतो. अशावेळी तडजोड करायची जबाबदारी अन्नदात्रीनेच घ्यायला हवी.
बरे, जर तिने तिचे समाधान करण्यासाठी मी सोडून इतरांनाही जेऊ घालायचे ठरवले, व याला समाजाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मान्यता दिली, तर मलाही माझ्या तीन पोळ्या तीन ठिकाणांहून घेण्याची मुभा हवी. मी तसे केल्यास मजवर दोष यायला नको. यालाच न्याय म्हणता येते, इतर कशालाही ती “पदवी”देणे सयुक्तिक नाही.
सर्वांनाच असल्या मुभा देणे हे सामाजिक संस्थांमध्ये अंतर्भूत असायला हवे, मग त्या स्वातंत्र्याचा वापर कोणी करो वा न करो, मुक्त संभोग करा, किंवा कराच असे जबाबदार स्त्रीमुक्तीवादी म्हणताना मी तरी ऐकले-वाचलेले नाही. मुक्त संभोग व व्यभिचार यांसाठी जर पुरुषांना फार दूषण दिले जात नसेल, पण स्त्रियांना दिले जात असेल; याहून पुढे जाऊन स्त्रियांना लग्नांतर्गत बलात्कार भोगावा लागत असेल व तसे न होऊ देणार्याज स्त्रियांना शिंगे उगारलेल्या गाईची उपमा दिली जात असेल; याहूनही पुढे जाऊन जर या लैंगिक व्यवहाराला आर्थिक व सामाजिक रूपही दिले जात असेल – तर हे गैर आहे, येवढे मात्रस्त्री- स्वातंत्र्यवादी म्हणतात.
इथेही वहाडपांड्यांनी तांदळाचाच रावण मारलेला आहे आणि तो सुद्धा “अज्ञ लिखाण”, “काडीचाही अभ्यास नसतो”, “जिभेवर येईल ते ठोकून देणे”, “पुरोगामित्वाच्या छापासाठी हपापणे”, असे वार करून, स्वतः मात्र लैंगिक रोग जनावरांना होतात की नाही यावर दोन विरुद्ध मते जिभेवर आलेली ठोकून दिली आहेत. जैविकीच्या अधिकृत मतांबद्दल अज्ञपणा दाखवला आहे. अशी अधिकृत मते असतात का? मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, ऐतिहासिक वगैरे संशोधने “निर्विवाद” असतात का?
असे करण्याऐवजी वहाडपांडे इतरांच्या अज्ञ लिखाणावर उतारा म्हणून सुज्ञ लिखाण का करीत नाहीत? त्यांच्या लिखाणाचा आजच्या सुधारकाने नेहमीच आदर केलाआहे (सुधारकाला लेखकांची चणचण तर नेहमीच असते!) पण सकस, सकारात्मक ज्ञानदायी लेखनाऐवजी जर नुसतेच चढ्या सुरात विवाद उत्पन्न केले तर ते अपेक्षित परिणामविरोधी । (counter-productive) होते. आणि असे करण्याची कसूर वर्हाीडपांडेही करतातच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.