विवेकवाद आणि आगरकर

आगरकरांच्या संपूर्ण विचाराचे सूत्र सांगायचे झाले तर ते विवेकवाद (rationalism) होय असे आपण निभ्रांतपणे म्हणू शकतो. या विवेकवादाचे स्वरूप त्यांनी कोठे तपशीलवार सविस्तर सांगितले आहे असे म्हणता येत नाही. त्यांनी आपल्या सुधारणावादाचा पुरस्कार करण्याकरिता साप्ताहिक वृत्तपत्र हे माध्यम स्वीकारल्यामुळे त्यांच्या विवेचनाला मर्यादा पडल्या होत्या. राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक, धार्मिक इत्यादि विषयांची साधकबाधक, सविस्तर आणि मूलगामी चर्चा त्या माध्यमात करणे अशक्यप्राय होते. त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यामुळे त्यांना ग्रंथरचना करण्यासही सवड झाली नाही. शिक्षण संपल्याबरोबर ते वृत्तपत्रीय व्यवसायात पडले, आणि प्रथम सात वर्षे केसरीचे संपादन करून पुढील सात वर्षे सुधारकचे संपादन करीत असतानाच त्यांचे वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी अकाली निधन झाले. त्यामुळे ग्रंथलेखन करण्यास त्यांना अवसरच मिळाला नाही. परंतु या मर्यादांतही त्यांनी प्रसंगोपात्त केलेल्या सुधारणावादाच्या ऊहापोहाकडे पाहिले की मन थक्क होते. विविध सुधारणांची चर्चा करीत असताना त्या सुधारणांना प्राणभूत असलेल्या विवेकवादावर त्यांनी भरपूर प्रकाश टाकला आहे. आणि त्यांच्या लिखाणाचा काळजीपूर्वक अभ्यास करणारयाला त्यांना अभिप्रेत असलेल्या विवेकवादाची तत्त्वे कोणती होती याची स्पष्ट कल्पना येऊ शकते. अशा प्रकारची संकलित कल्पना मांडण्याचा आणि तिचे समर्थन करण्याचा प्रयत्न येथे करावयाचा आहे.
१. परिभाषेविषयी थोडेसे
Rationalism’ या इंग्रजी शब्दाला मराठीत सामान्यपणे ‘बुद्धिवाद’ किंवा‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हे शब्द रूढ असून ‘reason’ चा पर्याय म्हणून ‘बुद्धी’ हा शब्द आपण वापरतो. परंतु यात अनेक अडचणी आहेत. एक अडचण अशी की इंग्रजीतील केवळ ‘reason लाच नव्हे तर ‘intelligence’ आणि ‘intellect’ या शब्दांनाही ‘बुद्धी’ हा एकच शब्द मराठीत उपलब्ध आहे. परंतु हे तीन शब्द समानार्थी नाहीत, आणि त्यामुळे एकच शब्द त्या सर्वांचा प्रतिशब्द म्हणून वापरणे गैरसोयीचे आणि गोंधळ निर्माण करणारे आहे. दुसरी अडचण अशी आहे की खुद्द इंग्रजीत ‘rationalism’ हा शब्द दोन भिन्न अर्थानी वापरला जातो. एक सतराव्या शतकात होऊन गेलेल्या देकार्त, स्पिनोझा व लाइब्नित्स या तीन तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानांची समान प्रवृत्ती दर्शविणारा, आणि दुसरा अठराव्या शतकातील फ्रेंच विश्वकोशकारांना आणि एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडमधील बॅटम आणि मिल पितापुत्र यांना अभिप्रेत असलेला, आगरकरांनी वापरलेल्या ‘विवेकवाद’ या शब्दाने वरील अडचणींपैकी पहिली बरीचशी दूर होते, कारण त्यामुळे ‘बुद्धि’ हा शब्द ‘intelligence आणि ‘intellect’ या शब्दांकरिता मोकळा होतो. दुसर्याब अडचणीविषयी मात्र थोडे विस्ताराने लिहिणे भाग आहे.
2. ‘Rationalism’ चे दोन अर्थ
पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात सतराव्या शतकात होऊन गेलेले देकार्त, स्पिनोझा व लाइब्नित्स हे तीन तत्त्वज्ञ rationalist म्हणून ओळखले जातात. ‘Rationalism’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या शब्दापासून बनलेला असून त्याचा अर्थ ‘rcason’ असा आहे. मनुष्याजवळ दोन ज्ञानसाधने उपलब्ध आहेत असे सामान्यपणे मानले जातेः (१) Sense किंवा इंद्रिये म्हणजे डोळा, कान, स्पशेंद्रिय इत्यादि पाच ज्ञानेंद्रिये आणि (२) Reason. यापैकी इंद्रियांनी आपल्याला होणारे ज्ञान व्यक्तींचे म्हणजे या किंवा त्या विशिष्ट वस्तूचे (particular) असते, उलट reason चे ज्ञान सार्विक म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयीचे असते. इंद्रियांनी, उदा. डोळ्यांनी, आपल्याला ही वस्तू काळी आहे, ती पांढरी आहे किंवा ही वस्तू त्रिकोणी आहे, ती गोल आहे असे एकवचनी ज्ञान मिळते. अशा प्रकारची अनेक एकवचनी ज्ञाने एकत्र करून सार्विक (general किंवा universal) ज्ञान तयार होत नाही. उदा. आपण शंभर समभुज त्रिकोण तपासले आणि ते सर्व समकोण आहेत असे आपल्याला आढळले. तर त्यावरून ते सर्व शंभर त्रिकोण समकोण आहेत हे आपल्याला कळेल, पण सर्व समभुज त्रिकोण समकोण असतात हे ज्ञान त्यावरून मिळणार नाही. याच्या उलट reason ची गोष्ट आहे. इंद्रियांनी आपल्याला व्यक्तींचे ज्ञान होते, तर reason ने जातींचे, सामान्यांचे (universals) ज्ञान होते. Resaon चे कार्य प्रामुख्याने सामान्य कल्पना (संकल्पना किंवा concepts) बनविणे आणि तर्क किंवा अनुमान करणे हे आहे. सामान्य कल्पनांचा वापर शक्य झाल्याने सामान्य किंवा सार्विक ज्ञान शक्य होते. तर्कात आपण एक किंवा अधिक ज्ञाने गृहीत धरून त्यावरून एक नवे ज्ञान प्राप्त करतो, आणि हे नवे ज्ञान असे असते की जर आपली आधारभूत विंधाने सत्य असतील तर त्यावरून काढलेला निष्कर्षही सत्यच असतो, तो असत्य असू शकत नाही.
आता Reason आणि इंद्रिये यांविषयीचे देकार्तादि rationalistsचे मत असे होते की reasonने आपल्याला मिळणारे ज्ञान वस्तूंच्या खर्याr वास्तव स्वरूपाचे ज्ञान असते, तर इंद्रियांनी मिळणारे ज्ञान भासमान वस्तूंचे ज्ञान असते. वस्तूंच्या ठिकाणी इंद्रियांना आढळणारे धर्म वास्तव धर्म नसून भासमान धर्म असतात. वस्तूंचे वास्तव यथार्थ स्वरूप reason ला होणार्या् जातीच्या सामान्य ज्ञानात प्रगट होते. देकार्त, स्पिनोझा इत्यादि ration:alist तत्त्वज्ञांचा rationalism’ हा होता.
परंतु ‘rationalism’ या शब्दाला याहून बराच भिन्न असाही एक अर्थ आहे. हा अर्थ अठराव्या शतकात फ्रान्समध्ये प्रसिद्धी पावलेल्या तत्त्वज्ञानाने प्रसृत केला. युरोपमध्ये अठरावे शतक ‘enlightenment’चे, ‘प्रबोधनाचे शतक म्हणून ओळखले जाते. या प्रबोधनाचे आविष्कार दहावीस वर्षे मागेपुढे पश्चिम युरोपमध्ये सर्वदूर घडून आले. त्यापूर्वी सतराव्या शतकात गॅलिलिओने अर्वाचीन विज्ञानाचा पाया घातला होता आणि त्याची वाढ भराभर होत होती. देकार्तादि तत्त्वज्ञांनी तर्काला पटतील अशा ईश्वरास्तित्वाच्या सिद्धी दिल्या होत्या आणि त्यानुसार आविष्कृत (rcvcalcd) धर्माऐवजी reason वर आधारलेल्या परमेश्वराची कल्पना पुढे आली होती. त्यातून पुढे धर्मग्रंथावर अविश्वास आणि एकूणच श्रद्धेचा निषेध असे reason चे स्वरूप मानले गेले. ‘Reason’ चा आणि rationalism’ चा हा नवा अर्थ होता. या दुसर्यााrationalism मध्ये reason चा विरोध श्रद्धेला, पोथीनिष्ठेला होता. हा विचार मुख्यतः फ्रान्समध्ये अठराव्या शतकात विश्वकोशकार (Encyclopedists) म्हणून प्रसिद्धी पावलेल्या तत्त्वज्ञांच्या लिखाणात व्यक्त झाला. या तत्त्वज्ञांपैकी व्होल्टेअर, डीडरो, डालेंबर्ट आणि होलबाख हे प्रमुख असून ते सर्व स्थूलमानाने जडवादी, विज्ञानवादी आणि श्रद्धाविरोधी होते. त्यांच्या मते निसर्गाचे ज्ञान मिळविण्याच्या उपाय म्हणजे नुकतीच उदयाला आलेली वैज्ञानिक पद्धती. ज्ञान ईश्वराने प्रेपितापुढे प्रगट केले असून त्याच्या शब्दांचा श्रद्धेने स्वीकार केला पाहिजे ही पूर्वीची कल्पना आता मागे पडली, आणि प्रत्येक गोष्टीची reason च्या साह्याने शहानिशा करून तिला पटेल अशाच गोष्टी स्वीकरणीय आहेत ही कल्पना हळूहळू प्रस्थापित झाली. फ्रान्समध्ये अठराव्या शतकात सुरू झालेले विवेकवादी बंड पुढे एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये बॅटम, जेम्स मिल् आणि जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या तत्त्वज्ञानांत परिणत झाले. Rationalist Press Association या संस्थेने पुढे ज्या rationalism चा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. तो हाच दुसरा rationalism. देकार्तादि तत्त्वज्ञांचा rationalism इंद्रियानुभवाला गौण स्थान देणारा, स्वतंत्र तर्काला विश्वाचे ज्ञान देण्यास समर्थ मानणारा असा होता. याच्या उलट ह्या दुसर्याणrationalism च्या अनुसार एकटा तर्क विश्वाचे ज्ञान देण्यास असमर्थ आहे. विश्वात काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे याचे ज्ञानमिळविण्याकरिता reason किंवा तर्क अवश्य आहे हे खरे; पण हा तर्क इंद्रियानुभवावरआधारलेला असला पाहिजे असा त्याचा आग्रह आहे.
आता आगरकरांना अभिप्रेत असलेला rationalism वरीलपैकी दुसरा होता. त्याला त्यांनी ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला. पहिल्या rationalism शी या दुसर्यानचा गोंधळ होऊ नये म्हणून त्याला (पहिल्याला) प्रज्ञावाद’ हा शब्द वापरावा असे मी सुचवितो. आगरकरांनी वापरलेला ‘विवेकवाद’ हा शब्द ‘बुद्धिवाद’, ‘बुद्धिप्रमाण्यवाद’ या शब्दांहून अधिक अन्वर्थक असल्यामुळे तो आपणही वापरावा असे मला वाटते. ‘विवेक’ म्हणजे भेद करण्याची शक्ती. या अर्थी सत्य-असत्य, इट-अनिष्ट, विधि-निषेध इत्यादींतील भेद ओळखणारी शक्ती असे विवेकाचे स्वरूप आहे. ‘बुद्धि’ या शब्दाच्या अन्य अर्थांशी होणारा संभाव्य घोटाळाही त्यामुळे टाळता येईल.
एवढ्या प्रस्तावनेनंतर आपण आता आगरकरांच्या विवेकवादाचे स्वरूप काय होते या प्रश्नाकडे वळू शकतो
३. विवेकवादाचे स्वरूप
मानवी जीवन विविधांगी आहे. त्यापैकी दोन प्रमुख अंगे म्हणजे ज्ञानाचे आणि कर्माचे ही होत. ज्ञानपर वाक्ये म्हणजे विधाने आणि कर्मपर वाक्ये म्हणजे विधी. विधाने म्हणजे वस्तुस्थिती अशी अशी आहे असे सांगणारी वाक्ये, तर विधी म्हणजे आपण अमुक कर्म करावे असे सांगणारी वाक्ये. या दोन्ही क्षेत्रांत आपण जी विधाने सत्य म्हणून आणि जे विधी कर्तव्य म्हणून स्वीकारतो त्यांची चिकित्सा किंवा शहानिशा करून मगच त्यांचा स्वीकार करावा असा विवेकवादाचा आग्रह आहे. कोणतेही विधान स्वीकारण्यापूर्वी ते सत्य कशावरून? हा प्रश्न विचारला पाहिजे आणि तसेच कोणत्याही विधीला मान्यता देण्यापूर्वी तो आपल्यावर बंधनकारक का मानावा हा प्रश्न विचारला पाहिजे; आणि या दोन्ही प्रकरणी आपले समाधान झाल्याखेरीज त्यांना मान्यता देऊ नये. विधाने आणि विधी यांच्या समर्थनार्थ दिली जाणारी कारणे आपल्याला पटली पाहिजेत. विधानांच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा असला पाहिजे आणि विधींच्या युक्ततेचे पुरेसे समर्थन देता आले पाहिजे. तसे असेल तरच त्यांचा स्वीकार विवेकवादाला मान्य होण्यासारखा आहे असे म्हणता येईल.
परंतु प्रत्यक्ष जीवनात आपण विधानांचा आणि विधींचा स्वीकार अपुर्याो पुराव्याच्या आधारे, किंवा गैरलागू कारणांसाठी फार मोठ्या प्रमाणावर करतो असे आढळून येते. विशेपतः धार्मिक पुस्तके, पोथ्या, किंवा गुरूचा उपदेश हे सामान्यपणे त्या स्वीकाराचे कारण असते. श्रुतिस्मृती आणि गुरू यांची वचने आपण फार मोठ्या प्रमाणात श्रद्धेने स्वीकारतो. त्यांच्या बाबतीत समर्थन मागण्याचे आपल्याला सुचत नाही. परंतु अमुक वाक्य अमुक पोथीतील आहे किंवा अमुक गुरूंनी उच्चारले आहे म्हणून ते सत्य होत नाही. कोणतेही विधान श्रद्धेने स्वीकारणे चूक आहे. मग ते विधान कितीही मोठ्या व्यक्तीने उच्चारलेले असेना का. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीचा कसलाही निर्णायक पुरावा नाहीतिच्यावर अटळ विश्वास. अशी श्रद्धा आपण धर्मग्रंथ, पोथ्या आणि गुरू यांच्यावर ठेवतो. परंतु त्यातसांगितलेल्या गोष्टींचे कोणाचा तरी ‘शब्द’ याखेरीज अन्य कसलेही प्रमाण नसते. उदा. ईश्वर, परलोक, पुनर्जन्म, पाप-पुण्य इत्यादि कशाचेही कसलेही प्रमाण उपलब्ध नाही. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचे गेल्या दोनतीन हजार वर्षात हजारो अतिशय बुद्धिमान लोकांनी परोपरीने प्रयत्न केले आहेत, परंतु ते सर्व हेत्वाभासांनी युक्त होते असे शेकडो वेळा दाखवून झाले आहे.
धर्मपुस्तकात सांगितलेले विधीही असेच श्रद्धेने स्वीकारले पाहिजेत अशी अपेक्षा असते, आणि त्यांचा स्वीकार सर्रास श्रद्धेने केला जातोही. हे अर्थात् अतिशय असमंजस आहे. पण त्याशिवाय धार्मिक विधी अनेकदा अन्यायकारक, क्रू आणि पक्षपाती असतात. आपल्या हिंदू धर्माने स्त्रिया आणि शूद्र यांच्यावर केलेले अन्याय अनेक वेळा दाखवून झाले आहेत. याशिवाय प्रत्येक धर्माचे विधी वेगळे असतात आणि त्या त्या धर्माच्या अनुयायांवर ते बंधनकारक असतात. त्यातून दोन धर्माच्या माणसांनी परस्परविरुद्ध कर्मे करणे बंधनकारक होते. पण ही गोष्ट किती विपरीत आहे हे आपल्या लक्षात येत नाही.
शब्दप्रामाण्यावर, पूर्वाचार्यांच्या आचार घालून देण्याच्या अधिकारावर आगरकरांनी भरपूर टीका केली आहे. उदा. ते म्हणतात, ‘कोणतेही आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हासही आहे… बन्यावाईटाची निवड करण्याची जितकी बुद्धी त्यांना होती तितकी, तीहून अधिक आम्हांसही आहे… सृष्टिविषयक ज्ञान जितके त्यांना होते तितके, किंबहुना त्याहून अधिक, आम्हास आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचेच आम्ही पालन करणार, आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हास निर्दोष वाटतील असे नवीन घालणार. १
४. विधानांचे समर्थन
एखाद्या विधानाचे समर्थन करण्याकरिता अन्य एक किंवा अनेक विधाने पुढे करावी लागतात. ह्या विधानांना आधारविधाने (premises) म्हणतात आणि त्यांवरून एखादे विवक्षित विधान निप्पन्न होते असे म्हणतात. आधारविधाने आणि त्यावरून निष्पन्न होणारे विधान (निष्कर्ष) यांच्यामधील संबंध असा असतो की आधारविधाने जर सत्य असतील तर त्यावरून अपरिहार्यपणे निष्पन्न होणारे विधानही सत्यच असते, ते असत्य असू शकत नाही. अशा तर्काला किंवा अनुमानाला निगामी तर्क (deductive reasoning) म्हणतात. परंतु पुष्कळदा आपल्याला हवे असलेले समर्थन निगामी तर्काने करता येत नाही. अशा वेळी उद्गामी (inductive) तर्काचा उपयोग करावा लागतो. उद्गामी तर्कात आधार विधाने सत्य असली तरी त्यावरून काढलेला निष्कर्ष सत्यच असेल अशी शाश्वती देता येत नाही. पण तशी खात्री देता येत नसली तरी निष्कर्ष सत्य असण्याची संभाव्यता (probability) बरीच असते असे म्हणता येते. विधानांच्या समर्थनाचा हा सबंध विषय तर्कशास्त्राचा विषय असून निगामी आणि उद्गामी अनुमानांचा विचार आधुनिकतर्कशास्त्राने जवळ जवळ पूर्णावस्थेस नेला आहे. विशेषतः ज्याला विज्ञान (Science) म्हणतात त्या चारशे वर्षापूर्वी आरंभ झालेल्या उद्योगात निगामी आणि उदगामी या दोन्ही प्रकारच्या तर्काचा उपयोग केला जातो. त्या पद्धतीला वैज्ञानिक पद्धती असे नाव असून तिच्या साह्याने गेल्या चारशे वर्षांत विश्वसनीय ज्ञानाचा एक विराट आणि सतत वाढत जाणारा संग्रह प्रस्थापित केला गेला आहे. कोणतेही विधान सत्य आहे, संभाव्य आहे की असत्य ह्याचा निर्णय विज्ञानावर सोपवायला हरकत नाही असे विवेकवाद सांगतो. विज्ञानात श्रद्धेला जागा नाही. तसेच असत्य विधान सत्य मानले जाण्याचा धोकाही नाही, कारण कोणत्याही विधानाची पूर्ण परीक्षा झाल्याशिवाय प्रस्थापित विज्ञानात तिचा समावेश केला जात नाही.
१. आगरकर वाड्मय (सं. नातू / देशपांडे), पृ. १. २८३
५. विधींचे समर्थन
ज्याप्रमाणे विधानांच्या समर्थनाकरिता शेवटी विज्ञानाकडे जावे लागते त्याप्रमाणे विधींच्या समर्थनाकरिता नीतिमीमांसेकडे (Ethics)जावे लागते.
विधी म्हणजे एखादे कार्य करावयास सांगणारे वाक्य, ते स्वीकरणीय आहे असे मानण्याकरिता त्याचे समर्थन कसे केले जाते याचा अभ्यास नीतिमीमांसेत होतो. गेल्या दोन-अडीच हजार वर्षांत ह्या अभ्यासातून बरीच विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे. विज्ञानाच्या पद्धतीविषयी जो एकमुखी निकाल दिला जातो तितका एकमुखी निर्णय मात्र नैतिक समर्थनाच्या क्षेत्रात मिळालेला नाही हे मान्य करावयास हवे. समर्थनाचे दोन प्रमुख नमुने येथे आढळतात, आणि त्यांपैकी जो कोणता आपल्याला स्वीकरणीय वाटेल तो प्रत्येकाने स्वीकारावा असे स्थूलपणे म्हटले जाते.
त्याकडे वळण्यापूर्वी एका आक्षेपाचे निरसन करणे योग्य होईल. धर्मवादी लोक असे म्हणतात की तुम्ही ज्यांना नैतिक विधी म्हणता त्यांच्यात आणि धार्मिक विधींत फारसा फरक नाही. खरे बोलावे, अहिंसा पाळावी, परोपकारकत्र्याविषयी कृतज्ञता बाळगावी, दिलेली वचने पाळावीत, इत्यादि विधी जसे नीतीला मान्य आहेत तसेच चे धर्मालाही मान्य आहेत. खरे म्हणजे धर्माचे उद्दिष्ट नीती हेच आहे, आणि म्हणून या बाबतीत तरी धर्माला दोष देणे केवळ दुराग्रहीपणाचे आहे.
हे म्हणणे सकृद्दर्शनी ठीक दिसते. परंतु त्याचा बारकाईने विचार केला की धार्मिक आणि नैतिक दृष्टिकोणातील भेद दृष्टीस पडतो. एकच कर्म जरी धर्माने आणि नीतीने विहित म्हणून सांगितले असले तरी त्यांची प्रेरणा आणि फलश्रुती ह्या दोन्हीत भेद आहे. धार्मिक विधींचा स्रोत श्रुति किंवा स्मृति, ईश्वर किंवा स्मृतिकार आणि त्याचा स्वीकार श्रद्धेने करावा असा आग्रह असतो. धार्मिक विधी का पाळायचे या प्रश्नाला उत्तर त्याच्या पालनाने पुण्य लागते आणि आपल्याला परलोकात सद्गती मिळते. म्हणजे धर्माचे आवाहन स्वार्थाला असते. परंतु नीतीची गोष्ट वेगळी आहे. नैतिक विधीचे पालन करायचे कारण त्याने आपला स्वार्थ साधतो हे नव्हे. सत्कर्म करायचे कारण ते सत्कर्म आहे; ते सत्कर्म आहे एवढीच गोष्ट त्याच्या बंधनकारकतेचे समर्थन करण्यास पुरेसे असते. आगरकरांनी नीती आणि धर्म याविषयी एका ठिकाणी फार मार्मिक विवेचन केले आहे. ते म्हणतात ‘अलीकडील विद्वान लोक नीतितत्त्वांचा विचार धर्मविचारापासून निराळा करतात. त्यांचा असा समज झाला आहे की नीतितत्त्वांचा अभ्यास पृथकपणे केला असता तो फार सोपा जातो. म्हणून सर्वमान्य नीतितत्त्वांचा धर्मात समावेश न करता त्या तत्त्वांचे स्वतंत्र शास्त्र कल्पून त्याचा स्वतंत्र अभ्यास करावा. असे करण्यात एक मोठी सोय आहे, ती ही की धर्मात नीतितत्त्वांचा अंतर्भाव केला असता “अमुक गोष्ट चांगली कशासाठी?’ असा प्रश्न कोणी केला तर त्यास असे उत्तर द्यावे लागते की “ती परमेश्वरास चांगली वाटते म्हणून ती चांगली मानणे भाग आहे.” यावर जर कोणी असा उलट प्रश्न करील की “अमुक गोष्ट परमेश्वरास चांगली वाटते असे कशावरून समजावयाचे?” तर त्यावर असे प्रत्युत्तर द्यावे लागते की वेदांसारख्या, बैवलासारख्या किंवा कुराणासारख्या ईश्वरप्रणीत पुस्तकात सांगितले आहे म्हणून. पण या उत्तरावरही कोणी असा प्रश्न करतात की “ही पुस्तके ईश्वरप्रणीत असे कशासाठी मानावे?” अशा प्रकारचा विलक्षण प्रश्न कोणी केल्यास त्याला इतकेच उत्तर देता येते की “ही पुस्तके ईश्वरप्रणीत आहेत असे या पुस्तकांतच सांगितले आहे” किंवा “ती ईश्वरप्रणीत आहेत असे आमचे मत आहे.” पण ही दोन्ही उत्तरे समाधानकारक नाहीत हे। कोणीही विचारी व समंजस मनुष्य कबूल करील. अशा प्रकारच्या विचारशैलीस तर्कशास्त्रात परिवृत्तिवाद म्हणतात. अशा प्रकारच्या कोटिक्रमाने संशयनिवृत्ती होत नाही, कारण यांतील विचार परस्परावलंबी असतात.
धर्म आणि नीती यांतील भेद पाहिल्यानंतर आपण परत विधींच्या समर्थनाकडे वळूशकतो.
या क्षेत्रात वर म्हटल्याप्रमाणे नीतिमीमांसकांत पूर्ण एकमत दुर्दैवाने दिसून येत नाही. विधीचे समर्थन अनेक तन्हांनी केले गेले आहे. पण त्यातही समर्थनाचे दोन प्रमुख नमुने आहेत. त्यांना अनुक्रमे साध्यवादी (telcological) उपपती आणि तव्यवादी (leontological) उपपत्ती अशी नावे असून त्यांचे स्वरूप स्थूल मानाने असे आहेः नीतिविचारात दोन संकल्पना प्रधान आहेत, एक साधुत्वाची (goodness) आणि दुसरी तव्याची (ought). ह्या संकल्पना ‘अमुक कर्म चांगले आहे आणि ‘अमुक कर्म कर्तव्य आहे’ या दोन वाक्यांत व्यक्त झाल्या आहेत. आता या दोन संकल्पनांपैकी प्रधान कोणती आणि गौण कोणती असा प्रश्न नीतिमीमांसक विचारतात आणि त्याची उत्तरे दोन भिन्न प्रकारांनी देतात. काही लोक कर्तव्याची कल्पना प्रधान मानतात, आणि साधुत्वाच्या कल्पनेची व्याख्या कर्तव्यकल्पनेच्या साह्याने करतात, तर अन्य काही लोक याच्या नेमका उलट विचार व्यक्त करतात. ते म्हणतात की साधुत्वाची कल्पना ही प्रधान कल्पना आहे आणि कर्तव्याच्या कल्पनेची व्याख्या तिच्या साह्याने करावी लागते. यापैकी पहिले मत dcontological (तव्यवादी) आहे तर दुसरे साध्यवादी (tclcological) आहे. या दोन उपपत्तींचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
साध्यवादी लोकांचे मत असे आहे की काही साध्ये अंतिम साध्ये असतात. आपल्या बहुविध साध्यांपैकी बहुतेक साध्ये अन्य कशाची तरी साधनेही असतात. उदा. हायस्कुलात जाणाच्या विद्याथ्र्याचे साध्य मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे असते. पण हे त्याचे साध्य पुढच्यापरीक्षा पास करण्याचे किंवा नोकरी करून उदरनिर्वाह करण्याचे साधन असू शकेल. परंतु सर्वच साध्ये साधनेही असू शकत नाहीत. साध्य-साधनाच्या शृखलेचा कोठेतरी शेवट असला पाहिजे. किंवा एका वेगळ्या कल्पनेच्या साह्याने हे स्पष्ट करता येईल. आपले कोणतेही साध्य आपल्याला महत्त्वाचे वाटते. त्याकरिता पैशाची किंवा श्रमाची किंमत देण्याची आपली तयारी असते. म्हणजे त्याला आपल्या लेखी मूल्य असते. पण एखाद्या गोष्टीचे मूल्य तिचे स्वतःचे स्वरूपगत मूल्य नसून ते तिला अन्य कोणत्यातरी गोष्टीचे साधन असल्यामुळे प्राप्त झालेले असू शकेल. उदा. औषधाचे मूल्य त्याने आपला आजार बरा होतो म्हणून असते. धडधाकट मनुष्य औषधाकडे ढुंकूनही बघणार नाही. परंतु सर्वच गोष्टींचे मूल्य असे साधनमूल्य असू शकत नाही. आरोग्य हे स्वतः मूल्यवान असेल तरच त्याचे साधन असलेले औषधही मूल्यवान असू शकते. म्हणजे काही वस्तूंचे मूल्य साध्यमूल्य असते. अशी साध्ये आहेत काय की जी अन्य कशाचीही साधने नाहीत?असतील तर त्यांचे मूल्य त्यांचे स्वतःचे स्वगत मूल्ये असेल. अशा मूल्याला स्वतोमूल्य (intrinsic value) असे नाव असून स्वतोमूल्यवान वस्तू ही तिच्यामुळे आपल्याला मिळणार्यात अन्य कशाकरिता नको असून ती तिच्या स्वतःकरिताच (स्वार्थ) * हवी असते. ती स्वार्थ वांछनीय (desirable for its own sake) असते. तिला good in itsel ‘स्वार्थ साधु’ असेही म्हणतात.
२. आगरकर वाड्मय, २.२९५
अशा काही वस्तू आहेत असे नीतिमीमांसकाचे मत आहे. त्यामध्ये सुखाचा अंतर्भाव प्रामुख्याने होतो. सुख हे आपल्याला केवळ सुखार्थ हवे असते. अन्य गोष्टी सुखसाधने आहेत. म्हणजे त्यांचे मूल्य साधनमूल्य आहे. पण सुखाचे मूल्य स्वतोमूल्य आहे. काही नीतिमीमांसकांच्या मते सुख ही एकमेव गोष्ट स्वार्थस्वाध्य, स्वार्थसाधु, किंवा स्वार्थ वांछनीय आहे, तर अन्य काही नीतिमीमांसक सुखाच्या जोडीला ज्ञान, सौंदर्यास्वाद, स्नेह इत्यादि गोष्टींचाही स्वार्थसाध्य वस्तूंमध्ये अंतर्भाव करतात.
अमुक एक किंवा अनेक गोष्टी आपली अंतिम साध्ये आहेत असे एकदा म्हटले म्हणजे त्याच्या साह्याने कर्तव्य किंवा युक्त कर्म कोणते ते ठरविता येते. ज्या कर्माने स्वतोमूल्य निर्माण होईल ते कर्म अन्य कर्माहून वर्य (to be prefered) असते आणि ज्याने प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त स्वतोमूल्य निर्माण होईल ते कर्म आपले कर्तव्य असते असे साध्यवाद्यांचे मत आहे.
ज्याला उपयोगितावाद’ utilitarianism हे नाव आहे ते एक साध्यवादी मत आहे आणि त्यानुसार सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे. त्यामुळे उपयोगितावादानुसार ज्या कर्माने जास्तीत जास्त सुख निर्माण होईल ते कर्म आपले कर्तव्य ठरते. पण कोणाचे सुख?या प्रश्नाला उपयोगितावादाचे उत्तर आहे – जास्तीत जास्त लोकांचे; कारण माझे सुख स्वतोमूल्यवान असेल तर इतर कोणाचेही तसेच स्वतोमूल्यवान असावे लागेल. म्हणून उपयोगितावादानुसार कोणत्याही कर्माचे समर्थन त्याने जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण होते हेच असू शकते.
३. हा ‘स्वार्थ’ शब्दाचा अर्थ काळजीपूर्वक लक्षात ठेवावा.
साध्यवादीच असलेले, पण उपयोगितावादाहून काहीसे भिन्न असणारे, मत म्हणजे ज्याला Ideal Utilitarianism (आदर्श उपयोगितावाद) असे नाव दिले गेले आहे ते जी. ई. मूरचे मत. या मतात भेद एवढाच आहे की त्यानुसार स्वतोमूल्य फक्त सुखातच असते असे नसून वर लिहिल्याप्रमाणे ज्ञान, कलास्वाद, स्नेह इत्यादि गोष्टींतही ते असते. जास्तीत जास्त सुख निर्माण करणे आपले कर्तव्य आहे याऐवजी जास्तीत जास्त स्वतोमूल्य निर्माण करणे आपले कर्तव्य आहे असे त्या मताचे प्रतिपादन असते.
हा साध्यवादी विचार झाला. पण नीतिशास्त्राच्या इतिहासात आणखी एक प्रकारही प्रामुख्याने आढळून येतो असे वर म्हटले आहे. तो प्रकार म्हणजे तव्यवाद. त्यासंबंधाने चार शब्द लिहिणे अवश्य आहे.
साध्यवादी विचारात अंतिम साध्याची कल्पना प्रधान मानली जाते आणि कर्माचे कर्तव्यत्व या अंतिम साध्याचे साधन म्हणून ठरते. परंतु तव्यवादी विचारात तव्याची किंवा कर्तव्याची कल्पना प्रधान मानलेली असून काही कर्मे स्वतंत्रपणे कर्तव्ये असतात असे तव्यवादी मानतात. उदा. सत्य बोलावे, किंवा अहिंसा पाळावी किंवा दिलेली वचने पूर्ण करावीत इत्यादि विधी स्वतंत्रपणे बंधनकारक आहेत असे आपल्याला प्रतिभान होते असे तव्यवादी मानतात.‘सत्य बोलावे’ याचे स्पष्टीकरण तसे केल्याने सुखवर्धन होते किंवा ते हितकर आहे, किंवा पुण्यकर आहे असे नसून सत्य बोलणे हे साक्षात् बंधनकारक आहे असे आपल्याला प्रतिभान होते. अशा प्रकारची युक्त कर्माविषयीची स्वयंसिद्ध अशी अनेक प्रतिभाने आहेत असे काही तव्यवादी मानतात. याशिवाय ही सर्व प्रतिभाने एका सूत्रात ओवता येतात असे मानणारे कांटचे मतही प्रसिद्ध आहे. परंतु या सर्वांचे विवेचन करण्यास येथे अवकाश नाही.
तव्यवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते उपयोगितावादी विचारसरणीतील काही दोष दाखवितात. या दोपदर्शनात तथ्यही आहे. पण तेवढ्याने उपयोगितावादाचे पूर्ण खंडन होते असे म्हणता येत नाही. उपयोगितावादानुसार जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत-जास्त सुख निर्माण करणे हे कर्तव्याचे एकमेव सूत्र आहे. ते सूत्र अपुरे आहे असे तव्यवादी तत्त्वज्ञांनी दाखवून दिले आहे. पण ते तत्त्व अपुरे आहे असे सिद्ध केल्याने ते चूक आहे असे सिद्ध होत नाही. ते कर्तव्याचे पूर्ण तत्त्व नाही एवढेम सिद्ध होईल, आणि त्याला अन्य एका किंवा अधिक तत्त्वांची जोड द्यावी लागेल. अशी जोड देता आली तर ही मिश्र तव्यवादीउपयोगितावादी उपपत्ती सर्वांत समाधानकारक उपपत्ती ठरू शकेल. हा विषय बराच मोठाआहे. त्याचा विचार पुढे केव्हा तरी.
आता वरील दोन प्रकारच्या उपपत्तींपैकी आगरकरांनी स्वीकारलेली विधींच्या बंधकत्वाची उपपत्ती साध्यवादी होती, आणि त्यातही उपयोगितावादाची होती. ‘मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन या सार्वत्रिक धर्माची दीक्षा’ असे त्यांनी या मताचे वर्णन केले होते. सार्वत्रिक सुखवर्धनाचे तत्त्व नीतीचे एकमेव तत्त्व नसले तरी एक महत्त्वाचे अपरिहार्य तत्त्व म्हणून त्याला सार्वत्रिक मान्यता आहे हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.