चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?

सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.
डॉ. बीझंट व लेडबीटर यांचे मित्र ए. पी. सीक्रेट यांनी १८९५ मध्ये त्यांना आपल्या शक्तीचा उपयोग करून ‘वस्तुजात (matter) कशाचे बनले आहे हे शोधून काढण्यास सांगितले. त्यावर त्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने हैड्रोजन पासून युरेनियम पर्यंतची ९२ मूलद्रव्ये पाहिली, त्यांचे अणू शोधले व अणूची फोड करीत करीत त्याच्या अंतिम सूक्ष्म घटकांपर्यंत ते पोहोचले. ह्या अंतिम घटकाला त्यांनी ‘अंतिम भौतिक अणू (Ultimate physical atom) असे नाव दिले. अंतिमतः अदृश्य मोत्यांच्या हाराप्रमाणे वस्तुजात छिद्रांचे किंवा बुडबुड्यांचे बनलेले असते असे त्याचे वर्णन त्यांनी केले. त्यांनी असेही सांगितले की हैड्रोजनचा अणू १८ उपाण्विक कणांचा (Sub-atomic particles) बनलेला आहे आणि इतरही सर्व मूलद्रव्ये १८ च्या पटीत असलेल्या तशाच कणांची बनली आहेत.
त्यांनी दिलेली सर्व माहिती थिआसॉफिकल सोसायटीच्या ‘occult Chemistry’ नामक ग्रंथात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अणूच्या विभाजनाची रेखाचित्रेही त्या ग्रंथात देण्यात आली आहेत. ही सर्व माहिती आजच्या वैज्ञानिक शोधांशी जुळती आहे. विशेष आश्चर्याची गोष्टीही की अलीकडेच अमेरिकेतील फर्मी प्रयोगशाळेतील भौतिकशास्त्रज्ञांनी अनेक वर्षांच्या प्रयोगांनंतर व अत्यंत खर्चिक अशा अतिशक्तिशाली आघातकाच्या (Super collider) साह्याने सृष्टीचा अंतिम घटक म्हणून ज्या उच्च क्वॉर्क (Top quark) चा शोध लावला त्याचे वर्णन वरील ‘अंतिम भौतिक अणूत मिळते. आणि ही सारी माहिती आधुनिक अणुशास्त्रयुगाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी देण्यातआली आहे!
१९२० च्या सुमारास हैड्रोजनचा अणू एक प्रोटॉन व एक इलेक्ट्रॉन ह्या दोन घटकांचा बनला आहे ह्या पलिकडे विज्ञानाला माहिती नव्हती. डॉ. बीझंट व लेडबीटर यांच्या कथनानंतर ७० वर्षांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील कणभौतिकीचे संशोधक डॉ. फिलिप्स यांनी त्यावर संशोधन केले व त्या द्वयीच्या कथनाची सत्यता पाहून ते विस्मयचकित झाले, आणि त्यावर ‘Extra Sensory Perception of Quarks’ असाग्रंथ १९८० मध्ये त्यांनी लिहिला.
डॉ. फिलिप्स यांचा ग्रंथ रोनाल्ड कोवेन नामक गृहस्थांच्या वाचनात आला. कोवेन यांनी बौद्धधर्माची दीक्षा घेतली आहे व ध्यानधारणेचा त्यांचा अभ्यास आहे. ग्रंथ वाचून त्यांनी डॉ. फिलिप्स यांना कळविले की त्यांना देखील अंतर्ज्ञानाची विद्या प्राप्त झाली आहे. तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी आठ मूलद्रव्ये काचेच्या संपुटात (Capsules) सीलबंद करून डॉ. फिलिप्स त्यांच्याकडे गेले. कोवेन यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ती सर्व मूलद्रव्ये अचूक ओळखली व डॉ. फिलिप्स यांची खात्री करून दिली. त्यावर डॉ. फिलिप्स यांनी १९९२ HEZ Recent Clairvoyant Observations of Sub-atomic Particles a 8888 PREZI Conclusive Evidence for ESP of Quarks and Sub-quarks 37 je लिहिले. (ESP = Extra Sensory Perception.)
हे वर्णन वाचून विवेकवादी विचारवंत, ते विवेकवादी असल्यामुळे, आपल्या विचारांना योग्य मुरड घालतील अशी आशा वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.