वेताळकथाः २ पळा, पळा, कोण पुढे पळे तो!

राजा पुन्हा वेताळाला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, “राजा, विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम निवडताना स्वत;चा कल, स्वतःची क्षमता, यांच्याकडे लक्ष न देता ‘चलती कशाची आहे, हेच फक्त पाहिले तर त्यातून उद्भवणाच्या प्रश्नांचे एक टोकाचे उदाहरण मी तुला दाखवले. धन्य तुझी, की तू त्या कथेला दलित-ललित न समजता किंवा आयायट्यांवर केलेली टीका न मानता छान ‘सिनिकल दुर्लक्ष केलेस! पण आज मी तुला एक वेगळी कहाणी ऐकवणार आहे. मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. पण तो अनेक उत्तरांमधून एक निवडण्याचा, म्हणजे ‘मल्टिपल चॉईस प्रश्न आहे, ऐक.”
राजाला खरे तर कंटाळा आला होता. तो डझनभर वेळा ‘मानद डी. लिट्’ झालेला, ‘एक्स-ऑफिशिओ शिक्षणमहर्षी असलेला राजा आणि हा वेताळ त्याला वाईट-साईट कहाण्या सांगून बोअर’ करीत होता. त्याला भारतातील सर्व राजकारणी व्यक्तींची शिक्षणाबद्दलची अनास्था काय ठाऊक नव्हती? पण राजाला हे सारे बोलायला मनाई होती! . वेताळ बोलू लागला:
”एका आटपाट नगरातील एका शाळेतील पाच वर्गमित्रांची ही कहाणी आहे. त्यांची खरी नावे,आडनावे तर मी तुला सांगत नाहीच, पण सोईसाठी सर्वांना मुलगेच मानतो. यामुळे तू त्यांच्या जाती, त्यांची लिंगे वगैरेमुळे उद्भवणाच्या पूर्वग्रहांपासून मुक्त होशील. तर हे होते ‘क’, ‘च, ए, ‘त’ आणि ‘प. आपण यांना त्यांच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्यावेळी भेटत आहो. ‘क’ बोर्डात प्रथम आला आहे, ‘च विसावा, ‘ट’ ला पंच्याऐंशी टक्के गुण आहेत, तर ‘त’ला पासष्ट. ‘प’ मात्र इंग्रजी आणि गणित सोडून सर्व विषयात नापास झाला आहे. त्या दोन पेपरांच्या प्रती त्याला आगाऊ मिळाल्या होत्या, म्हणे!
पुढच्या शिक्षणासाठी ‘क’ ने ‘जनरल विषय निवडले. खरे तर त्याला कोणत्याच विषयात रस नव्हता. परंतु त्याचे पालक म्हणाले, “जनरल घे, म्हणजे वैद्यक, अभियांत्रिकी, दोन्ही वाटा हाताशी राहतील.’च’ ने’ मात्र इलेक्ट्रॉनिक्स घेतले होते. त्याचा खरा कल जीवशास्त्राकडे होता, परंतु त्या विषयात गुणार्जन अवघड असते. वर इलेक्ट्रो घेतल्याने एक भाषा शिकायचे (गुणांच्या दृष्टीने भाकड) कामही टाळता येते. ‘ट’ नेही जनरल विषय घेतले.‘त’ न नाटके, वक्तृत्वस्पर्धा, क्रिकेट वगैरे आपल्या आवडीच्या व्यवहारांना वेळ मिळावा म्हणून इतिहास, राज्यशास्त्र व इंग्रजी, असे विषय घेऊन ‘कलाशाखा’ निवडली. ‘प’ चा निर्णय सोपा होता-पुनश्च हरिः ओम्!
बारावीच्या परीक्षेत ‘च’ पहिला आला, तर ‘क’ विसावा. ‘ट’ ने आपला पंच्याऐंशीचा स्तर टिकवून धरला, तर ‘त’ ने पासष्टाचा.’प’ यावेळी दहावी पास झाला! आपल्या जुन्या स्पर्धकाने आपणास मागे टाकले याच दुःख तर ‘क’ ला होतेच, पण कधी स्पर्धकही नसलेल्या ‘ट’ ला पीसीबीत आपल्याएवढेच गुण पाहून तो मनापासून खंतावला. राजा, तुला PCB माहीत आहे ना? भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्या आद्याक्षरांपासून घडलेला हा शब्द वैद्यकीय शिक्षणाची गुरुकिल्ली आहे, बरे! तेथे भाषांना वजन नाही.
‘क’ व ‘ट” वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. ‘च’ अभियांत्रिकी, जीआरी, टोफेल अशा ठरीव वाटेने परदेशवासी झाला -मे गॅड कीप हिज सोल इन पीस-ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.‘त’ यथावकाश बी. ए. झाला. लोक सेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांना बसून आय.ए.एस. झाला.‘प’वडिलांच्या दुकानात काम करीत बी. कॉम ला गेला.
‘क’ ला वैद्यकीय अभ्यासक्रम जडच गेला. त्याच्या सवयीचे अभ्यासवर्ग व प्रश्नपेढ्या इथे उपयोगी नव्हत्या. निरीक्षणे, रोग्याकडून माहिती काढून घेणे, त्यावर निदान व इलाज ठरवणे, अशा पुस्तकबाह्य बाबी येथे महत्त्वाच्या होत्या. हे ‘क’ ला रुचत नसे, तर ‘ट ला सहजपणे जमे. दोघेही एमबीबीएस् झाले. पुढे शिकण्याइतके गुण दोघांकडेही नव्हते. पण ‘ट ने खटपटी, लटपटी करून एक मोक्याची जागा मिळवली, व ‘जनरल प्रैक्टिस सुरू केली. ‘क मात्र अजूनही संस्थेची नाळ तोडू न शकल्याने सरकारी आरोग्यसेवेत असिस्टंट सिव्हिल सर्जन म्हणून दाखल झाला, व एका तालुक्याच्या गावी आरोग्यसेवेचा प्रमुख झाला.
तेथे ‘शिकाऊजिल्हाधिकारी असलेला ‘त’ त्याला भेटला! ‘प’ ही येत जात असे. तो बी. कॉम. होतच होता, पण विद्यालय व विद्यापीठाच्या राजकारणात त्याला खरा रस होता. ‘ट’ गावातील स्पेशलिस्ट, सुपर-स्पेशलिस्ट, सुपर-सुपर-स्पेशलिस्ट वगैरेंपैकी योग्य त्यांना निवडून, त्यांच्याकडे रोगी पाठवीत ख्यातनाम झाला होता.
‘क’ पूर्ण सिव्हिल सर्जन झाला त्याच जिल्ह्यात ‘त” कलेक्टर होता, व‘प’ आमदार ‘च’वट तुलनेच्या पलिकडे गेले होते.
राजा, तुला हे पाच रूळ कोणत्या स्थानकांकडे जातात, हे उमगले असेलच. प्रयत्न न करता मिळत जाणारी ‘सेवाज्येष्ठता कमावीत ‘क स्वास्थ्य सेवा संचालक झाला, तेव्हाआरोग्यखात्याचा सचिव होतात, व मंत्री होता ‘प’ च वट अधूनमधून भेट असत.
आता राजा, एका मोठ्या, महत्त्वाच्या परीक्षेत ठरवला गेलेला क्रम पायमोज्यात हात घालून उलटा केलेला तू पाहिलास. या वर्णनात तसूभराचीही अतिशयोक्ती नाही, हे तू जाणतोस. जाणतोस.
मी तुला मोठी, ढगळ प्रश्न विचारू शकतो, की “चुकते कोठे?” पण आज माझा वाढदिवस आहे! मी तुला कबूल केलेला ‘मल्टिपल चॉईस प्रश्न विचारू इच्छितो. जर ही पाच पोरे दहावी पास होताना कोणी तुला विचारले असते, की नंतर दहा-पंधरा वर्षांत या पाचांच्या व्यावहारिक यशवंततेचा क्रम तू कसा लावशील, तर तू नक्कीच ‘प’ ला उच्चीवर ठेवले नसतेस. ज्या शिक्षणक्षेत्रात आज हजारो, लाखो, कौट्यवधी व्यक्ती गुंतलेल्या आहेत, त्या क्षेत्राच्या निकषांना तू इतके फोल ठरविले नसतेस, हे खासच. तर मी तुला आधी ‘उद्दिष्ट सांगतो. ते आहे, दहावी-बारावीच्या परीक्षांना प्रचलित, व्यावहारिक यशवंततेच्या भावी मोजमापाशी सुसंगत करायचे आहे. हे अशक्य आहे!
“विधायक” व राज्यकर्ता मंत्री, केवळ राज्यकर्ता शासकीय, “ब्यूरोक्रेटिक अधिकारी, समाजाला वेगवेगळ्या तहांनी, वेगवेगळ्या वाटांनी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञ, शिक्षक, प्रशासक, या सार्‍यांची प्रतवारी केवळ एक दोन परीक्षांच्या साहाय्याने जोखणे अशक्य आहे, हे मी तुला सांगायला नकोच. पण या शिक्षणपद्धतीचे एकुलते एक मोजमाप ठरणाच्या या परीक्षा इतक्या चुकाव्यात? एकूण शिक्षणपद्धतीच तर “गैरलागू” नाही ना? समाजाच्या गरजा या शिक्षणपद्धतीला समजल्याच नाहीत, समजल्या असतील, तर ही शिक्षणपद्धती त्यांच्याशी सुसंगतच नाही, असे तर नाहीना? राजा, मी उत्तरे सुचवतो. ती कोणत्या प्रश्नांची आहे हे तुझे तूच ठरव. एकदा आपण ‘कचटतप ही निर्विकार पद्धत वापरलीच आहे. तीच पुढे ही वापरू. (य) शिक्षण हे व्यक्तीच्या विकासासाठी असते. त्याचा समाजाच्या गरजांशी, त्यासाठी आवश्यक अशा मूल्यमापनाशी संबंध नसतो. परीक्षांची प्रतवारी ठरवण्याची पद्धत निरर्थक आहेच. त्यामुळे या साच्याकडे पाठ फिरवावी. व्यक्तिमत्त्वविकास या कल्पनेला जास्त ‘ठोस करून, तेच ध्येय राखावे.
(र) आपण कितीही मेकॉलेसाहेबाना शिव्या घातल्या तरी आपण सारे त्यांच्या नमुन्याच्या शिक्षणपद्धतीतूनच घडलेले आहोत. आज इंग्लंडातही (म्हणे) व्ह. फा., मॅट्रिक याला समांतर पद्धत येत आहे. तर आपण फक्त आजच्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार निपटून काढायचा व मूळ मेकॉले-पद्धतीला जायचे, म्हणजे सारे नीट होईल. आता भ्रष्टाचार निपटायला शेषनसारखा हडेलहप्पी माणूस लागेल, व त्याला या क्षेत्रात सर्वासर्वे बनवावे : लागेल – तरी तोंड वाकडे करीत का होईना, हे करायचे.
(ल) समाजाच्या गरजा, व्यक्ती व पेशे यांच्या संख्याबद्ध जोड्या ठरवण्यासाठी एक आयोग नेमायचा. या आयोगाने दर वर्षी आकडे ठरवून द्यायचे व प्रत्येक पेशासाठी ‘अॅप्टिट्यूड चाचण्या घ्यायच्या. नंतर वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या कोनाड्यांमध्ये रिचवायचे.
(व) आजही अनौपचारिक शिक्षणाचे अनेक प्रयोग होत आहेत. प्रयोग करणार्‍यांचे मानणे असे, की ते विचारी, विवेकी, झापडे नसलेल्या व्यक्तींची संख्या वाढवीत आहेत. असेही मानता येते, की इतर अनेक लोकांची झापडे ‘रुंदावणेही या प्रयोगांमधून होते. आता अशा प्रयोगांवर घेतली जाणारी मेहेनत, व त्यांचे ‘मापनीय परिणाम यांच्यातील प्रमाण फारसे आशादायक नाही. परंतु सध्याच्या अनेक व्याधींनी ग्रस्त औपचारिक शिक्षणाला पूरक म्हणून असे प्रयोग वाढवावेत.
वेताळ बोलतच होता, आणि राजाचे मन मात्र इकडेतिकडे भटकत होते. त्याने अनेक वर्षांपूर्वी ‘कंचा सत्कार आयोजित केलाच असणार, पण त्याला याचे नीटसे स्मरण नव्हते. दर वर्षी नवे प्रफुल्लित चेहरे घेऊन येणारी मुले, त्यांच्या पालकांच्या, त्यांच्या शिक्षकांच्या चेहेर्‍यांवरील कृतकृत्य भाव हे सारे राजाला नित्याचेच होते. सार्‍याच राजकारणी पुरुषांचे (व स्त्रियांचेही) असेच होते.
एकाएकी राजाच्या खांद्यावरून वेताळ मोठ्याने ओरडला, “बाहू उभे हाकारितो, कोणी ऐकचिना मज’!राजाच्याने राहवेना. तो वेताळाएवढ्याच मोठ्याने उत्तरला –
“मी एकटा काय काय करू? पूर्वी वाटा दाखवायला आगरकर, टिळक होते, आणि आज फक्त अडवानी- नरसिंहराव आहेत. ‘यथा राजा, तथा प्रजा’ असे म्हणतात, पण खरे तर ‘यथा प्रजा, तथा राजा, हेच केवळ खरे आहे.”
एवढ्यावरच राजाला आणि स्वतःला आपण सोडून द्यायचे का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.