चर्चा : अमेरिकेतील लोकांची लैंगिकता

“अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” (आ. सु. १९९५, ६: २,४९-५४) या माझ्या लेखावर (१) श्रीमती ललिता गंडभीर व (२) प्रा. फक्रुद्दीन बेनूर यांनी अभिप्रायात्मक लेख लिहिले आहेत. (आ. सु., ऑगस्ट ९५). सुधारकातील लेख वाचले जातात व त्यांच्यावर विचार होतो हे पाहून प्रसन्नता वाटते. या उभयतांच्या मतप्रदर्शनाच्या संदर्भात मला थोडे विवेचन करण्याची इच्छा आहे.
(१)लेख अमेरिकेतील लोकांच्या लैंगिकतेविषयी झालेल्या सर्वेक्षणाचा परिचय साक्षेपी मराठी वाचकांना करून देण्यासाठी होता. या सर्वेक्षणाचे निकाल अनपेक्षित असल्यामुळे, सर्वेक्षणाच्या नमुन्यात आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लोकांचा योग्य प्रमाणात सहभाग नसावा अशी शंका व्यक्त केली होती. वस्तुतः अमेरिकेत काळ्या लोकांच्या संख्येचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असल्याने, सर्वेक्षणातील मिळालेल्या ३५०० उत्तरांपैकी १२०० ते १५०० उत्तरे काळ्या अमेरिकनांची असावयास हवी होती. तेवढी ती होती की नाही हे कधीच कळणार नाही. माझ्या लेखात लैंगिक आचरणाची तुलना होती असे म्हटले तर ती कृष्णवर्णीय व इतर अमेरिकन नागरिकांमधील होती.
लेखाचा संपूर्ण आशय केवळ लैंगिकतेशी संबंधित होता. त्यात इतर सामाजिक मूल्यांचा उदा. “गुलामगिरीचा नैतिक आधार”, “पेशवाईतील गुलामांचे बाजार” वगैरेचा मुळीच संबंध नव्हता. ललिताजींनी हे मुद्दे विनाकरण पुढे केले. आचार्य अत्र्यांचे “आम्ही चावट होतो” हे पुस्तक बन्याच वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आले होते. पण त्यातील वास्तविकता जाणण्यासाठी ते पुस्तकच वाचण्याची गरज नाही. कोणाही विचारी भारतीयाचे विचार तसेच असणार.
“लैंगिक सुख” हा व्यक्तीचा हक्क आहे असे अमेरिकनांना वाटते याबद्दल अमेरिकन मीडियात भरपूर पुरावे आढळतात. विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिकता ही स्वच्छंदीपणाच आहे असे सामान्य भारतीयांना वाटते हे सत्य आहे. याविषयी भारतीयांची व अमेरिकनांची तुलना करणे योग्य नाही. सार्वजनिक स्थळी स्त्री-पुरुषांनी परस्परांचे चुंबन घेण्याविषयी अमेरिकन व भारतीय मनोवृत्तीत जो फरक आहे तसाच हाही प्रकार होय. तेव्हा याबाबतीत या दोन गटांची तुलना सर्वस्वी अयोग्य आहे. भारतीयांच्या लैंगिकतेविषयी कोणताही अभ्यास अथवा सर्वेक्षण झाल्याचे आढळत नाही, त्यामुळे भारतीयांच्या लैंगिकतेबद्दल श्रीमती गंडभीर कोणत्या आधारावर लिहितात ते कळत नाही.
अमेरिकनांना लैंगिक उपभोगाचे आकर्षण इतके जबरदस्त आहे की प्राध्यापक,सेनेटर्स; जजेस्, गव्हर्नर्स एवढेच काय पण अनेक प्रेसिडेन्ट्स्च्या लैंगिक वर्तणुकीचे किस्से प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत लेखकाचे असेही खाजगी मत आहे की, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातही अपेक्षित लैंगिक उपलब्धींचा सुप्त विचार अंतर्भूत असतो. ज्या देशांमध्ये मुक्त लैंगिकता असते त्या देशांशी अमेरिकेचे प्रेमाचे संबंध असतात! या मताला पुराव्याचा आधार नाही पण प्रत्येकाने थोडा विचार केला तर हे विधान अगदीच चूक आहे असे म्हणता येणार नाही. सर्वेक्षणात ८२% गोच्या अमेरिकनांचा समावेश होता असे श्रीमती गंडभीर म्हणतात. म्हणजेच काळ्या अमेरिकनांच्या लैंगिकतेचे योग्य प्रतिबिंब या सर्वेक्षणात दिसत नाही हे त्यांनी मान्यच केले आहे.
भारतीय पुरुषांच्या लैंगिक वर्तणुकीचा मुद्दा बाईंनी वारंवार का उपस्थित करावा हे कळत नाही. मूळ लेखात तर भारतीयांच्या लैंगिकतेबद्दल कोणताच उल्लेख नव्हता. भारतात एड्स रोग झपाट्याने पसरतो आहे तो सर्वस्वी वेश्यावृत्तीमुळे. पुरुष मोठ्या प्रमाणात वेश्यागमन करतात व HIV विषाणु आपल्या कुटुंबात पसरवितात. परंतु वेश्यावृत्तीस लैंगिक स्वच्छंदतो म्हणणे बरोबर नाही. किमानपक्षी तो स्वैराचार तर नाहीच नाही.
आफ्रिकन अमेरिकन्सविरुद्ध भेदभाव केला जातो म्हणून त्यांना पुरेशा पगाराच्या नोकर्याह मिळत नाहीत असे श्रीमती गंडभीर लिहितात. परंतु अमेरिकेत नोकरी व शिक्षण या दोन्हीसाठीआरक्षण जरी नाही तरी equal opportunity कायद्यांचे संरक्षण आहे; तरीपण त्याचा उपयोग करून घेण्याची अनेक कृष्णवर्णीयांमध्ये पात्रताच नाही. आफ्रिकेतून जबरी पळवून आणून गुलाम केल्यामुळे आफ्रिकन अमेरिकन्समध्ये हटवादी वृत्ती उत्पन्न झालीआहे ती कित्येक पिढ्यानंतरही टिकून आहे. आम्ही अन्यायग्रस्त आहोत तेव्हा आम्ही गुलामगिरी संपल्यामुळे मनस्वीपणे वागू. आम्हाला श्वेतवर्णीयांनी पोसले पाहिजे. आम्ही कष्ट करून स्वतःची आर्थिक व सामाजिक प्रगती का करावी? अशी भावना या लोकांमध्ये जोपासली जाते. त्यामुळे शिक्षणाबद्दल नावड, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, गुंड टोळ्यांमध्ये सहभाग, स्वैर लैंगिकता इत्यादि दुर्गुणांकडे बहुसंख्य नीग्रो तरुण व तरुणी आकृष्ट होतात.
कृष्णवर्णीय अमेरिकनांनी क्रीडा, संगीत या क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली आहे हे गंडभीर भगिनींचे म्हणणे पूर्णतः खरे नाही. जेथे शारीरिक बलाचा (physical prowess) उपयोग होतो अशा मुष्टियुद्ध, बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल, बेसबॉल, तसेच धावणे यासारख्या खेळांत व क्रीडांमध्येच नीग्रो चमकतात. परंतु टेनिस, आइस-हॉकी, पोहणे, हिमक्रीडा या खेळांत नीग्रोअभावानेच आढळतात, कारण हे खेळ बुद्धीचे असतात. संगीतातही फक्त आफ्रिकन मूळ असलेल्या जाझ, सोल, रॉक याच संगीतप्रकारांत रूणवर्णीय पुढे आहेत, कारण या सर्व संगीतप्रकारांत शारीरिक क्षमता व ताल (जो नीग्रोंच्या दैनंदिन हालचालीत सतत दिसतो) याची गरज असते. सिंफॉनिक व चेंबर म्यूझिक, कंट्री म्यूझिक यामध्ये नीग्रोंची गती नगण्यच आहे. कारण या संगीतामध्ये बौद्धिक सर्जनशीलतेची गरज असते. एका तरी नामवंत नीग्रो कॉम्पोझर, कंडक्टरचे काय पण फर्स्ट व्हायलिनिस्टचे नावश्रीमती गंडभीर यांनी सांगावे अशी त्यांना विनंती आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रातही कृष्णवर्णीयांचे कर्तृत्व नगण्यच आहे. केवळ Roots नावाच्या नीग्रोंचा इतिहास सांगणाच्या पुस्तकाच्या लक्षावधी प्रती खपल्या; पण त्या कोणी विकत घेतल्या?टोनी मॉरिसन या काळ्या अमेरिकन महिलेला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. पण तिच्या कादंबर्यां्मध्ये नीग्रो लोकांमधील प्रच्छन्न लैंगिकतेची वर्णने वाचली म्हणजे यासच अभिजात साहित्य म्हणावे काय असा प्रश्न पडतो. नोबेल पारितोषिकांच्या निवडीमध्ये राजकारण नसते हे म्हणणे अगदीच भाबडेपणाचे आहे!
अमेरिकेत एक गोरी अमेरिका व एक काळी अमेरिका वसते आहे असे अमेरिकन मीडियासुद्धा म्हणतात. TIME च्या १८ मे १९९२ च्या अंकातील प्रमुख लेखाचे (cover storyचे) शीर्षकच मुळी “The Two Americas” असे नव्हते काय?सर्व मोठ्या शहरांत (inner cities) मध्ये राहणारी आणि उपनगरे व ग्रामीण भागांत राहणारी अमेरिका वेगवेगळी आहे. पश्चिम फिलाडेल्फिया व सिटी लाईन यामधील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक भेद प्रस्तुत लेखकाने अनुभवलेला आहे. न्यूयॉर्क सिटीतील हालेंमचे वातावरण त्यास परिचित आहे. श्रीमती गंडभीर या मॅसेच्युसेट्मध्ये Route 128 अथवा Route 9 च्या परिसरात राहत असणार! (Inner cities मधील काळ्या गेटोमधील जीवनाची त्यांना जाणीव असण्याची शक्यता कमी!)
(२) इस्लाम हा कुआनप्रणीत जीवनधर्म आहे. कुआनानुसार(४:३) बहुपत्नीत्वाच्या चालीस मान्यता आहे (संदर्भ : Islam in Focus by Hammudah Abdalati) त्यामुळे ही प्रथा धर्मामुळे निर्माण झालेली नाही हे प्राध्यापक बेनूर यांचे विधान बरोबर नाही. पवित्र कुरआन मध्ये चार पत्नी करताना पाळावयाची पथ्ये सांगितलेलीआहेत.“उहुद” च्या युद्धानंतर विधवा झालेल्या स्त्रियांना संरक्षण देणे हे ही प्रथा सुरू करण्यामागचे तात्कालिक कारण होते. परंतु ही प्रथा मोठ्या प्रमाणात पसरली हे नाकारता येत नाही. इस्लामचे काटेकोर पालन सर्वच मुसलमान करतात असे मुळीच नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे.
बालिकांच्या स्त्री-शिश्नावरील शस्त्रक्रिया ही मिस्र, सूदान, नायजेरिया इत्यादी आफ्रिकी इस्लामी राष्ट्रांमध्ये व तेथून स्थलांतरित लोकांमध्ये प्रचलित आहे. फ्रान्समध्ये या गुन्ह्यासाठी कोर्टात खटले चालून आफ्रिकन वंशाच्या मुसलमानांना शिक्षा झालेल्या आहेत व त्यांची मोठी चर्चाही झालेली आहे. अरबी, तुर्की, इरानी मुसलमानांमध्ये, तसेच भारत, पाक, बांगलादेश या उपखंडातही ही प्रथा ऐकिवात नाही. आन व हदीस मध्ये अशी आज्ञा येते नसेलही, पण ही प्रथा अस्तित्वातच नाही असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही, मूळ लेखांत मुसलमानांच्या सुंताविधीबद्दल उल्लेखही नव्हते, तेव्हा प्राध्यापकांनी त्याबद्दल काहीही लिहिणे आवश्यक नव्हते.
तात्पुरत्या पत्नीची सोय अस्तित्वात असल्याचे प्रस्तुत लेखकास इरानमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात समजले. इरानमध्ये ९० टक्के लोक शियापंथीय आहेत. ही प्रथा सुन्नीपंथीयात नाही ही माहिती प्रा. बेनूर यांनी दिली ती नवीन आहे. ही तात्पुरती पत्नी कोणी घ्यावी याबद्दल धर्मगुरूंची संमती लागते. धर्मगुरू (अयातोल्ला) अशी संमती, पतीला पत्नीपासून किती दिवस दूर राहावे लागणार याचा विचार करून मुक्तपणे देतात!
माझ्या लेखावर दोन्ही जागृत वाचकांनी सविस्तर मतप्रदर्शन केले याबद्दल मी या उभयतांचा आभारी आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.