हिन्दुत्व-अन्वेषण (पूर्वार्ध)

या लेखाचे प्रयोजन आहे काय? जनमानसात ज्या धार्मिक कल्पना रुजल्या आहेत त्यांना छेद देण्याची आवश्यकता काय? वर्तमान काळात हिन्दुत्व आणि राजकीय आकांक्षा याचे अतूट नाते जुळलेले आहे, आणि आजच्या सुधारक या मासिकाचा वाचक-लेखकवर्ग विचक्षण, प्रज्ञावंत, विवेकवादी, आणि सत्यान्वेषी आहे. ईश्वराचे अस्तित्व, ‘भारतीय समाजातील स्त्रीची भूमिका अशा विषयासंबंधी जनमानसात रूढ असणाच्या संकल्पनांना छेद देणारे लेख या मासिकातून वारंवार प्रसिद्ध होतातच. या लेखासंबंधी प्रतिवाद होऊ शकतो, किंवा पूर्वपक्ष म्हणून हा लेख वाचकांतर्फे विचारात घेतला जाऊ शकतो. शाब्दिक चावटीचा आश्रय न घेता हिन्दुत्व आणि हिन्दुधर्म यांच्या पारंपरिक अस्तित्वाची साक्ष देणारे पुरावे कोणी सादर करतील तर प्रस्तुत लेखकाला नकारात्मक आणि आग्रही भूमिका घेण्याचे कारण नाही. हिन्दुत्व आणि हिन्दुधर्म या विषयीचे जयघोष केवळ राजकीय स्वार्थासाठी, कल्पनारम्य अशा विचारप्रवाहात आत्मतुष्टीसाठी, अज्ञजनांना ओढून घेण्यासाठी प्रचारकी थाटाचे आहेत. विचारलेल्या प्रश्नांना तार्किक उत्तरे देण्याची बौद्धिक क्षमता नेतृत्वाच्या दबदब्यामुळे बोथट झाल्यामुळे किंवा नसल्यामुळे अनेक पळवाटा असणारी हिन्दुत्व आणि हिन्दुधर्मासंबंधीची गोंधळपूर्ण विचारसरणी सोयीची आहे. यासाठीच गेली सत्तर वर्षे आपण हिन्दुत्वाला कवटाळले आहे. त्यातही अगदी तळागाळाशी असणान्या जमातीला तो हिन्दुआहे याचे ज्ञान नाही. कारण हिन्दुत्व, हिन्दुराष्ट्र, हिन्दुधर्म हे गेली सत्तर वर्षे एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित राहिले आहे.
प्रस्तुत लेखकाला एखाद्या धार्मिक नेत्याने प्रश्न केला की आपण हिन्दु आहात काय? तर त्याचे उत्तर नकारात्मक आहे. लेखक वैष्णव धर्माच्या चौकटीतला आहे. त्याची माता शैव परंपरेतील आहे. कृष्ण हे लेखकाचे परम दैवत आहे. भागवत या धार्मिक ग्रंथावर त्याची श्रद्धा आहे. मंत्रोच्चारात ष चा ख असा उच्चार होत नाही म्हणून तो ऋग्वेदी ब्राह्मणआहे. पण त्याच्या ठिकाणी वेदप्रामाण्य मुळीच नाही. लेखक वैष्णव असू शकतो. भागवतधर्मी असू शकतो. पण तो हिन्दुधर्मीय नाही. ‘सनातन आर्य’ वैदिक धर्माशी त्याचे दूरान्वयानेही नाते नाही. कारण ही एक अर्थशून्य धार्मिक संकल्पना आहे.
कै. डॉ. राधाकृष्णन् यांच्या ‘हिन्दुधर्म आणि तत्त्वज्ञान या विषयावरील ग्रंथात वेद, उपनिषदे, क्रमाने षट्दर्शने, गीता अशा अनेक ग्रंथातून उचलून घेतलेल्या पुष्पांकित आंग्लभाषेने सजविलेल्या त्यांच्या विचारांच्या मिरवणुकीतून अखेरच्या पृष्ठापर्यंत या तत्त्वज्ञाला हिन्दुत्व म्हणजे काय याचे त्यांना तरी आकलन झाले असावे असे वाटत नाही. ग्रंथ संग्राह्य आहे, पण मौलिक स्वरूपाचा नाही. हिन्दुत्व, हिन्दुधर्म, हिन्द्रुतत्त्वज्ञान या विषयावर आजपर्यंत जे लेखन प्रवचन झाले आहे त्यांत हिन्दुत्व वगळता अन्य अनेक तत्त्वविचारांची, उपासनांची प्यादी बुद्धिबळाच्या पटावर सजवून मांडलेली असतात. हिन्दुत्व आणि हिन्दुपरंपरा यामागे इतिहास आणि परंपरा नाहीत. तरीपण निरनिराळ्या तत्त्वविचारांना, उपासनांना एकत्र गुंफून त्याला ‘हिन्दुधर्म’ असे नामाभिधान देणारा एखादा महामानव झाला काय? हा महामानव हिन्दुधर्माचा प्रेषित म्हणून पूजनीय ठरतो. पण असा महामानव कोण? कोठे आणि केव्हा झाला? याचा शोध अजून लागला नाही. कोणत्याच अभिलेखात ‘हिन्दु’ शब्द नाही.’संस्कृत भाषेच्या शब्दकोषात या शब्दाचा अर्थ सांगितलेला नाही. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते आणि कृष्णभक्त श्री आद्य शंकराचार्य यांच्या प्रतिपादनात हिन्दुधर्म वा तत्त्वज्ञान याचा कुठेही निर्देश नाही. ज्ञानदेव ते रामदास या कालखंडात संत, पंत, शाहीरांनी जी हजारोंच्या संख्येने काव्यरचना केली त्यातून हिन्दुत्वाविषयी कुठेही ओळ नाही. समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्र धर्म म्हणतात पण त्याचा अर्थ तेच जाणतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी हिंदवी स्वराज्याची वा हिन्दुपतपादशाहीची स्थापना केली असा शोध आधुनिक इतिहासकारांनी लावला आहे. महाराजांना ही स्थापना अभिप्रेत होती वा नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण हिन्दुधर्मस्थापनेविषयी त्यांच्या चरित्रसाधनांतून मात्र प्रमाण मिळत नाही.
शंभर वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारले गेले असते तर त्याने शैव, वैष्णव, शाक्त, जैन, महानुभाव, लिंगायत अशा धर्माची वा पंथाची नावे घेतली असती. पण आपण हिन्दुधर्मीय आहोत ही जाणीव पन्नास वर्षांपूर्वीपर्यन्त कोणालाचनव्हती.
‘आसिन्धु सिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृतः’ अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावर हिन्दुत्वाची व्याख्या दिलेली आहे. पण हिन्दुत्वाची ही संकल्पना भौगोलिक आहे. मनुस्मृतीने आर्यवर्ताची हीच भौगोलिक सीमा सांगितली आहे. या व्याख्येतून मनूने दक्षिणापथाचे क्षेत्र वगळले आहे. राजस्थान ते बिहारपर्यंत जे उत्तर भारताचे भूक्षेत्र आहे ते आसिन्धुसिन्धुपर्यंत विस्तारलेले नाही. ह्यांना हिन्दु म्हणून वगळायचे? आणि गुजराथ ते बंगाल पर्यंतच्या भूक्षेत्रावर राहणार्यां नाच हिन्दु
म्हणावयाचे? सिन्धु हा शब्द समुद्र या अर्थाने न घेता नदी या अर्थाने घेतला तर मात्र हा प्रदेश ग्रीकांचा इंडोज ठरतो. स्वातंत्र्यवीरांना हिंदुस्थान म्हणजे ग्रीकांचा इंडोज अभिप्रेत होता असे कोणीही मान्य करणार नाही. या व्याख्येतून धर्मसंकल्पना या संदर्भात हिन्दुत्वाचा तर दूरान्वयानेही बोध होत नाही. ग्रीकांचा इंडोज पाकिस्तानात आहे.
प्रामाण्यबुद्धिवेदेषु साधनानाम् अनेकता ।
उपास्यानाम् अनियमः एतद् धर्मस्य लक्षणम्
अशी लोकमान्यांनी व्याख्या दिलेली आहे, ती कोणत्या धर्माची आहे, या धर्माच्या व्याख्येत पळवाटा आहेत. आणि ही व्याख्या स्त्रियांना, संतांना, जाती-जमातींना अन्यायकारक असून वेदप्रामाण्याच्या आधारावर त्यांना ‘एतद् धर्मातून बहिष्कृत करणारी आहे. एकतर वेदप्रामाण्य तीन वर्षांसाठीच विहित आहे. त्यातही वेदमंत्राचा उच्चार करण्याचे आणि ऐकण्याचे अधिकार फक्त ब्राह्मणजातीपुरतेच मर्यादित आहेत. मराठी समाजाला उपनयनाचा अधिकार आहे, पण तो वेदोक्त मंत्रांनी होत नसतो.
वेद अत्यंत कृपणु झाला । त्रिवर्णाचे कानी लागला।
स्त्रीशूद्रादिकासी अबोला। धरूनी ठेला अद्यापी ।।
असे एकनाथ म्हणतात. वेदप्रामाण्य तेव्हाच सार्थ होईल की जेव्हा एतद्धर्मातील सर्वांनाच वेदपठणाचा आणि श्रवणाचा अधिकार मिळेल. धर्मप्रसाराच्या आणि समाजोद्धाराच्या कार्याविषयी अतिशय उदासीन असणारे, पाद्यपूजा करवून घेणे हाच ज्यांच्या जीवनकार्याचा एकमेव छंद आहे असे कर्म-ठाधिपती शंकराचार्य वेदपठणाचा अधिकार सर्व जातीजमातींना देणार आहेत काय? शंकराचार्याच्या पढत ज्ञानापेक्षा ज्यांच्या प्रतिभेची आणि बुद्धीची भरारी उंच आहे अशा जमातीतील मुलांना उपनयनसंस्काराचा तरी अधिकार आचार्य देतात काय? एतद्धर्म हा फक्त ब्राह्मणांसाठीच आहे काय? उपासनेविषयी कोणतेही नियम एतदधर्मात नसतात असे ज्यावेळी लोकमान्य म्हणतात त्यावेळी ते एतद्धर्माची टवाळी करतात की काय असाही प्रश्न मनात येतो. (हिन्दू) धर्माच्या भल्यासाठी ही व्याख्या मोडीत काढणे आवश्यक आहे. पुन्हा वेदप्रामाण्य म्हणजे काय? हा प्रश्न उरतोच. वेद हे केवळ धर्मग्रंथच होते असे समजणे फार मोठे अज्ञान होय. वेदांना प्रमाण मानले तर वेदातील इंद्र, वरुण, अग्नी, वायु, ब्रह्मणस्पती या दैवतांचे पूजन तरी ‘एतद्धर्मात’ होते काय? आणि श्रद्धावान ज्या देवतांचे धार्मिक उत्सव आज साजरे करतात त्यांचा वेदांत पत्ता नाही. एकूण सारेच अनाकलनीय आणि गृहीताच्या पातळीवरचेच आहे. चर्मकार, मातंग, कुंभकार, अशा अनेक जाती जमाती वेदप्रामाण्याच्या अटीने तथाकथित हिन्दुधर्मातून बहिष्कृत होतात. भरतखंडातील रहिवाशांना हिंदु संबोधण्यासाठी इतिहासाची साक्ष अनुकूल नाही. संपूर्ण भरतखंडाला ‘इंडिया’ असे संबोधण्यात युरोपियन इतिहासकारांनी प्रमाद करून ठेवला आहे. हिन्दुस्थान हा शब्द १०० वर्षांपूर्वी मुसलमान आमदानीत रूढ झालेला आहे. तो मुसलमानांनी दिलेला आहे आणि हिन्दुत्ववाद्यांनी स्वीकारला आहे.
इंडोज, इंडिया ही नावे मात्र प्राचीन काळी प्रचारात होती. पण या नामांचा आणि वर्तमान हिंदुस्थानचा मुळीच संबंध नाही. सिन्धूच्या पाच उपनद्या आणि सरस्वती या नद्यांच्या खोर्यानतील भूप्रदेशाला वेदांच्या काळात सप्तसिंधु असे नाव होते हे सर्वश्रुत आहे. ग्रीकांनी, फारशी देशवासीयांनी ‘स चा उच्चार ‘ह असा केला हे देखील सर्वांनाच ज्ञात आहे. मूळ शब्द सिंधु असा असून ग्रीकांनी, फारशांनी त्याचा उच्चार हिन्दु असा केला. म्हणूनच संस्कृत ग्रंथांत सिंधूचा परिचय मिळतो. पण हिन्दु हा उच्चारदोषातून निर्माण झालेला शब्द असल्यामुळे कोणत्याच संस्कृत ग्रंथात हिन्दु हे नाव नाही. इमेट्री हा इंडिजचा राजा होता हे चॉसर नावाच्या कवीला ज्ञात होते. इमेट्री हे ग्रीकांचा शिक्क्यावर ज्याचे नाव कोरले आहे तो हिन्दु यवन डेमेट्रियस राजा होता. त्याचे राज्य सिंधूच्या खोर्या तील भूप्रदेशापर्यंतच मर्यादित होते. अलेक्झांडरसोबत आलेल्या स्टॅबो, एरियन, प्लुटार्क, प्लीनी या ग्रीक इतिहासकारांनी सिंधूच्या खोर्याातील टोळी राज्यांचा इतिहास दिलेला आहे. या लेखकांच्या उपलब्ध माहितीचे संकलन करून मेगॅस्थिनिसने जो ग्रंथ लिहिला त्याला त्याने ‘इंडिका असे नाव दिले आहे. त्यानंतर चिनी परंपरेत यिअन्तु, यान्तु, शिन्तु अशा नावांनी हिन्दुदेश ज्ञात होता (इ. स. पू. २ रे शतक). पण या चिनी प्रवाशांचा भारत प्रवेशाचा मार्ग सिंधूच्या किनार्या(नेच झाला होता. त्यामुळे त्यांनाही शिन्तु (हिन्दु) नावाने सिंधूच्या खोर्यापतील भूक्षेत्र अभिप्रेत आहे असे दिसते. कारण त्यानंतर भारतात आलेल्या इत्सिग, युवानचंग ह्या चिनी प्रवाशांची मोलॅचो (महाराष्ट्र) चा निर्देश केलेला आहे. पण हिन्दुस्थान हा शब्द मात्र त्यांच्या प्रवास वर्णनात आढळत नाही. परदेशी ग्रीक फारशी व्यापार्यां च्या वा इतिहासकारांच्या उच्चारदोषामुळे झालेला हा घोटाळा बुद्धीची कवाडे झाकून जयघोषाच्या गर्जनेतून निनादत असतो. आपण हिन्दी नसून परंपरेच्या साक्षीने सिंधी आहोत आणि ऐतिहासिक हिन्दुस्थान हा वर्तमान पाकिस्तानात आहे. या सिंधूच्या खोर्या त राहणार्यान हिंदूंनी साम्राज्यविस्तारामुळे वा धर्मप्रचाराद्वारा भरतखंड, दंडकारण्य गोदावरीच्या दक्षिणेला असणार्यार चोल, पल्लव, पांड्य, केरळसुत्र, सतीयपुत्र, ह्यांना हिन्दुत्वाची दीक्षा दिली असे समजायचे काय? सिंधूच्या खोर्या,तील टोळ्यांत सैंधवांप्रमाणेच, ब्राह्मण, कढ, शूद्रक, शिबी, मालव, अर्जुनायन यौधेय या टोळ्यांचा निर्देश ग्रीक इतिहासकारांनी केला आहे. या टोळ्या कधी हिन्दुयवनांच्या, त्यानंतर मौर्याच्या, गुप्तांच्या, साम्राज्यात विलीन झाल्या होत्या. यांपैकी एकाही टोळीने महाराष्ट्रापर्यंत आपला राज्यविस्तार केलेला नव्हता.‘गोदावरीचे तीर दूरच राहिले. तात्पर्य हेच की इंडिया, इंडिका, इंडोज या नामांनी फक्त सिंधूच्या खोर्यागतीलच भूक्षेत्र निर्धारित केले गेले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनाचा बोध घेऊन बहुश्रुत झालेले युरोपियन व्यापारी सिंधूच्या तीरावरील इंडिया शोधण्यास निघाले. युरोपियनांच्या मतानुसार हिन्दुस्थान तीन आहेत. हिन्दुत्ववाद्यांचा तथाकथित हिन्दुस्थान पश्चिम आणि पूर्व हिन्दुस्थान (वेस्ट आणि ईस्ट इंडीज). पोर्तुगीजांनी सार्याुचभारतीय परदेशीयांना जेंटु असे संबोधिलेले होते. त्यांच्या लेखी मुसलमान देखील जेंटूच म्हणजे हिन्दु होते; पण मुसलमानांना स्वतःला हिंन्दु म्हणवून घेण्यात अस्मिताच विसरावी लागेल आणि तथाकथित हिन्दुत्ववाद्यांना मुसलमान हिन्दु संबोधणे आवडणार नाही. मुसलमान हिंदूना काफीर म्हणत. आपल्या पूजाविधीचे संपादन करताना देशकालाचा उच्चार करावयास उपाध्याय सांगतात त्यांत भरतवर्षे, भरतखंडे, दंडकारण्ये देशे गोदावर्याःउत्तरे दक्षिणे तीरे’ अशी भौगोलिक वाटणी झाली असते. या मंत्रांत हिन्दु वा सिन्धुदेशे असा उल्लेख नाही.
हिन्दु हा संस्कृत शब्द नसल्यामुळे कोणत्याच संस्कृत ग्रंथात त्याचा अर्थ दिलेला नसतो. तरी पण ‘मेरुतंत्र नावाच्या प्रकरणात हिन्दु शब्दाची फोड करून दाखविली आहे. पण हा ग्रंथ अगदी अलिकडचा आहे. कारण त्यात अंडूज (इंग्रज) असा निर्देश आहे.‘हीनञ्च दूषयत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये अशी हिन्दूची व्याख्या केली आहे. या व्याख्येतून धर्माचा वा भोगोलिक क्षेत्राचा बोध होत नाही. हीन हा शब्द जातींच्या संदर्भात घेतला तर अगदी महात्मा ज्योतिबाच्या काळापर्यंत शूद्रांना दूषितच समजले जात असे. शूद्रांना दूषणे देणारा धर्म हिन्दु धर्म असे म्हणावयाचे? हीन हे विशेषण सांस्कृतिक मूल्यांच्या संदर्भात समजून घेतले तर जगातील प्रत्येक सुसंस्कृत मानव हिन्दुधर्मीय ठरतो. आणि ते आपत्तिजनक होईल. तात्पर्य, मेरुतंत्रकाराने हिंदु शब्दाचा अर्थ सांगताना सामाजिक अन्यायाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. किंवा बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. मेरुतंत्रानुसार हिन्दुत्व ब्राह्मणी विचारांचा पुरस्कार करते.
शंभर वर्षापूर्वीच्या कालखंडात दुर्दैवाने भारत ही एकराष्ट्राची कल्पना अस्तित्वात नव्हती. ती आज स्वीकारली गेली आहे हे सुदैव. शंभर वर्षापूर्वी हा देश गुजराथ, मारवाड, पंजाब, सिंध, मराठी, कनोजी, बंगाली, कानडी अशा प्रादेशिक राष्ट्रकांत वाटला गेला होता. शैव, वैष्णव, शाक्त, जैन अशा धर्मात भरतखंडातील प्रजा वाटली गेली होती. अगदी अलिकडच्या काळात ‘हिन्दुत्वं प्रचाराने लादले गेले आणि एकचालकानुवर्तित्वाच्या आदरातून हे अर्थहीन, अनैतिहासिक ओझे सांभाळले गेले. आजही बौद्ध, जैन, महानुभाव धर्मीय स्वतःला हिन्दु म्हणवून घ्यावयास तयार नाहीत. हिन्दुत्व म्हणजे नेमके काय हे हिंदुत्व वाद्यांना सांगता आले नाही आणि येणार नाही. हिन्दुत्व इतिहासाला अज्ञात आहे आणि कधीकाळी सैंधवांनी हा संपूर्ण देश आक्रमणातून वा धर्मप्रचारातून ‘हिन्दु’ करून सोडला ह्याला मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहास यांतून पुरावे आढळत नाहीत.
हिन्दुत्ववाद्यांनी ‘सनातन धर्म’, ‘आर्य सनातन वैदिक धर्म अशा अस्तित्वात नसणाच्या धर्म संकल्पनांचा आधार घेऊन हिन्दुत्वाचा अर्थ सांगितला असतो. भगवान गौतम बुद्ध बौद्ध धर्म हाच सनातन धर्म आहे असे सांगतात. जैन धर्मालाही अत्यंत प्राचीन इतिहास आहे तोही सनातन आहे. पण दोन्ही धर्माचे प्रचारक त्या त्या धर्माला जैन आणिबौद्ध धर्म असेच संबोधतात. हिंदुधर्माच्या अनुयायांना हिन्दुत्वाविषयी ठोस सांगता येत नाही म्हणून सनातन या नामाभिधानाने पळवाट शोधली असते. प्रत्येकचें धर्म सनातन असतो.‘आर्य सनातन वैदिक धर्म ही तर वर्तमान काळात कोणत्याच स्वरूपात अस्तित्वात नसलेली एक कीर्तनी प्रवचनी जयघोषात वापरली जाणारी पोकळ संकल्पना आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.