कारण आणि reason

मराठीत आपण ‘कारण हा शब्द आणि त्याच्या विलोम converse अर्थाचा’ म्हणून हा शब्द अनेक अतिशय भिन्न अर्थांनी वापरतो. ‘विलोम अर्थ’ याचा अर्थ उदाहरणाने स्पष्ट करता येईल. उदा. पति याचा विलोम शब्द पत्नी’, ‘शिक्षक’ याचा विलोम शब्द ‘विद्यार्थी’. ‘अ’ चा ‘ब’ शी जो संबंध असेल त्याचा विलोम संबंध म्हणजे ‘ब’ चा ‘अ’शी संबंध. उदा. जरअ ब-पेक्षा मोठा असेल तर ब अ-पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे च्यापेक्षा मोठा या संबंधांचा विलोमसंबंध च्यापेक्षा लहान . कारण या शब्दाचा म्हणून विलोम शब्द होय, कारण जरआपण म्हणालो की ‘अ, कारण ब, तर ‘ब, म्हणून अ असे आपण म्हणू शकतो, एवढेच नव्हे तर तसे आपल्याला म्हणावे लागते. आता पुढील उदाहरणे पाहा.
(१) ‘अ मेला कारण त्याला साप चावला आणि त्याला साप चावला म्हणून तो मेला.’
(२) ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे, कारण तो मनुष्य आहे आणि सर्व माणसे मर्त्य आहेत,आणि ‘सॉक्रेटीस’ मनुष्य आहे आणि सर्व मनुष्य मर्त्य आहेत, म्हणून सॉक्रेटीसमर्त्य आहे.’
वरील दोन उदाहरणांचे संदर्भ अतिशय वेगळे आहेत. (१) चा संदर्भ एका घटनेचे कारण सांगण्याचा आहे. कारण याचा येथील अर्थ ‘कशामुळे? तर (२) चा संदर्भ एक अनुमान करण्याचा आहे. त्यात एक विधान सत्य कशावरून समजायचे हे सांगितले आहे. या प्रत्येकठिकाणी उपवाक्यांचा क्रम उलटा केला तर कारण या शब्दाऐवजी म्हणून हा शब्द वापरावा लागतो. म्हणजे ‘कारण शब्दाचे जसे दोन अर्थ आहेत तसेच म्हणून या शब्दाचेही असले पाहिजेत.
आता अनुमानामध्ये जी वाक्ये आधार म्हणून वापरली जातात त्यांना premises म्हणतात. premisesनिष्कर्ष साधतात म्हणून त्यांना आपण ‘साधक विधाने किंवा नुसतेच ‘साधके’ म्हणू या.
आता मराठीत ‘कारण हा एकमेव शब्द हे दोन संबंध व्यक्त करण्याकरिता वापरला जातो, परंतु इंग्रजीत त्यांना ’cause’ आणि ‘reason’ असे दोन शब्द आहेत. त्यांचा भेद असा आहे. उदा. मरणे ही घटना आहे आणि सर्पदंश हीही घटनाच आहे. त्या दोहोंमध्ये ’cause of हा संबंध असतो. कारण आधी घडते आणि कार्य नंतर घडते. परंतु साधक आणि निष्कर्ष ह्या घटना नव्हत, ती विधाने आहेत. निष्कर्ष सत्य कशावरून समजायचा या प्रश्नाला त्यात उत्तर आहे. आता विधाने घटना नाहीत हे सहज दाखविता येण्यासारखे आहे. ‘सॉक्रेटीस मर्थ्य’ आहे हे विधान आहे. विधान घडत नाही, आणि म्हणून त्याच्या संबंधाने ‘केव्हा हा प्रश्न गैरलागू ठरतो. ते एकतर सत्य असते किंवा असत्य असते. आणि जे सत्य ते निष्काल सत्य आणि जे असत्य तेही निष्काल असत्य असते. म्हणून साधक (premise) आणि निष्कर्ष (conclusion) यांचा संबंध cause असू शकत नाही. त्याला इंग्लिशमध्ये ‘reason’ FEMTATA. ‘Cause why something happens’, ‘reason why something is true’.हा संबंध कारण कार्य (cause-effect) संबंधाहून भिन्न आहे. कारण विधाने निर्माण होत नाहीत, ती सत्य किंवा असत्य असतात. पण कार्य उत्पन्न होते, निष्कर्ष साधकांपासून निष्पन्न होतो (follows from) किंवा अनुमित होतो. विधाने निष्काल सत्य किंवा असत्य असतात असे वर म्हटले आहे. हे अधिक स्पष्ट करावयास हवे, २+२=४ किंवा ‘पानिपतचे युद्ध १७५७ मध्ये झाले ही विधाने सर्वदा सत्य आहेत असे म्हणणे सयुक्तिक दिसते. पण कोणी म्हणेल की २+२=४ हे विधान अमुक काळी सत्य आहे असे म्हणणे अयुक्तिक असेल, पण ते सार्वकालिक सत्य आहे असे म्हणणे बरोबर नाही काय? नाही, कारण सार्वकालिक असणे आणि निष्काल असणे या गोष्टी भिन्न आहेत. काही गोष्टी, उदा. matterकिंवा energy (भौतिक वस्तू किंवा ऊर्जा) या सर्वकाळी राहणार्या , टिकणाच्या, वस्तू आहेत. त्या सार्वकालिक आहेत. पण २+२=४ हे आज किंवा सर्व काळी सत्यआहे असे म्हणणे निरर्थक आहे. जसे आपले विचार अवकाशात नसतात तशी विधाने काळात नसतात. आणि काळात नसलेल्या साधक आणि निष्कर्ष यांचा संबंधही असाच निष्काल असतो.
‘कारण या शब्दाचे वरील दोन अर्थ दाखविण्याकरिता ’cause’ आणि ‘reason’ हे दोन शब्द रूढ आहेत. दुर्दैवाने मराठीत किंवा संस्कृतमध्ये reason याअर्थीकारणं याहून अन्य शब्द सापडत नाही. म्हणून मी एक तडजोड सुचवितो. causeया अर्थी ‘नैसर्गिक कारणआणि reason या अर्थी ‘तार्किक कारण असे शब्दप्रयोग केल्यास बराच कार्यभाग साधू शकेल. ”
वरील दोन अर्थाखेरीज तिसर्या ही एका अर्थी का हा शब्द मराठीत रूढ आहे. तो अर्थ आहे प्रयोजन किंवा हेतू. (हेतू या शब्दाच्या मराठी अर्थी. संस्कृतात हेतु हा शब्द कारण या अर्थी रूढ आहे). आपण एखाद्या मुलाला विचारतो, ‘तू मुंबईला का (कशाकरिता) गेला होतास?’ म्हणजे तुझ्या मुंबईला जाण्याचे प्रयोजन काय होते? इंग्लिशमध्ये या अर्थी reason’ हा शब्द रूढ आहे. या अर्थाने अनेक घटनांना (म्हणजे नैसर्गिक घटनांना) reasons नसतात, पण कृतींना, कर्माना असतात. कर्म किंवा कृती या नैसर्गिक घटनांहून भिन्न असतात, कारण त्या घटनांमागे जड किंवा भौतिक कारणे नसून बुद्धिमान कत्र्याने केलेल्या सहेतुक क्रिया असतात.
याप्रमाणे इंग्लिशमध्ये ‘reason’ हा शब्द दोन अर्थी रूढ आहे. पण मराठीत कारण हा शब्द तीन अर्थानी रूढ आहे. ही बह्वर्थता वर सुचविलेल्या उपायाने बरीच दूर होऊ शकेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.