मानवसमाजातील संस्था आणि पद्धती

जॉर्ज पी. मॅडक (Murdoch) या अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञाने १९४५ साली सर्व मानवी समाजांमध्ये निरपवादपणे सापडणाच्या काही संस्था व पद्धतींची यादी बनवली. ही यादी आमच्या वाचकांपुढे चर्चेसाठी मांडत आहोत.“मराठीकरणावरही” चर्चा व्हावी.
(१) वयानुसार गट पाडणे (Age Grading), (२) शारीरिक क्षमतेच्या क्रीडास्पर्धा (AthleticSports, (३) साज-शृंगार (Bodily Adornment), (४) पंचांग (Calender), (५) शुचितेचे शिक्षण (Cleanliness Training), (६) समूहांतर्गत विरचन (Community Organization), (७) पाकशास्त्र (Cooking), (८) श्रम-सहकार (Cooperative Labour), (९) विश्वरूपशास्त्र (Cosmology), (१०) प्रियाराधन (Courtship)
(११) नृत्य(Dancing), (१२) सुशोभन-कला (Decorative Art), (१३) रमलभविष्यकथन (Divination), (१४) श्रम-विभाजन (Division of Labour), (१५) स्वप्नार्थशास्त्र (Dream-Interpretation), (१६) शिक्षण (Education), (१७) परलोकविज्ञा (Eschatology), (१८) नीतिशास्त्र (Ethics), (१९) वंश वनस्पतीशास्त्र (Ethnobotany), (२०) शिष्टाचार (Enquette)
(२१) श्रद्धेने (मंत्राने) रोग निवारण (Faith-healing), (२२) कौटुंबिक मेजवान्या (Family Feasting) (२३) होम-हवन (Fire-making), (२४) कथा कहाण्या (Folklore), (२५) भक्ष्याभक्ष्यविचार (Food Taboos), (२६) मृत्यूत्तरक्रिया (Funeral Rites), (२७) खेळ (Gamcs), (२८) सूचक (सार्थ) हातवारे (Gestures), (२९) आहेर करणे, (Gift-giving), (३०) शासन (Government)
(३१) अभिवादन (Greetings), (३२) केशभूषा (Hair-styles), (३३) आदरातिथ्य (Hospitality), (३४) वास्तुशास्त्र (Housing), (३५) आरोग्यशास्त्र (Hygiene), (३६) जवळच्या नातलगांमधील लैंगिक व्यवहारावरील निर्बध (Incest Taboos), (३७) वारसाहक्क (Inheritance Rules), (३८) थट्टामस्करी (Joking), (३९) गोत्रविचार (KinGroups), (४०) नातेवाचक शब्द (Kinship Nomenclature), (४१) भाषा (Language), (४२) कायदे (Law), (४३) शकुन-अंधश्रद्धा (Luck Superstitions), (४४) यातु, जादू (Magic), (४५) विवाह (Marriage), (४६) भोजनमुहूर्तविचार (Mealtimes), (४७) वैद्यक (Medicine), (४८) प्रसूतिशास्त्र (Obstetrics), (४९)दंडविधान (Penal Sanctions), (५०) व्यक्तिगत नांवे (Personal Names) (५१) लोकसंख्या-धोरणे (Population Policy), (५२) नवजात संगोपन (Postnatal Care), (५३) गर्भारपणातील “पथ्ये” (Pregnancy Usages),(५४) मालमत्तेचे हक्क (Property Rights), (५५) अतिनैसर्गिक शक्तींची “शांत” (Propitiation of Supernatural Beings), (५६) कौमार्यव्यवहार (Puberty Customs), (५७) धार्मिक कर्मकांडे (Religious Ritual), (५८) निवास-नियम (Residence Rules), (५९) लैंगिक निबंध (Sexual Restrictions), (६०) आत्म्याची संकल्पना (Soul Concept), (६१) सामाजिक श्रेणी-विभाजन (Status differentiation), (६२) शल्यवैद्यक (Surgery), (६३) हत्यारे बनवणे (Tool – making), (६४) व्यापार (Trade), (६५) पाहुणेपण (Visiting), (६६)विणकाम (Weaving), (६७) हवामान नियंत्रण (यज्ञ?) (Weather Control).
प्रश्न : या सदुसष्ट घटकांपैकी कोणकोणते घटक एकत्रित करायला हरकत नाही? यातले कोणते घटक आधुनिक समाजांपैकी काही मोठ्या, विवेकी विभागांनी त्याज्य ठरवले
आहेत? ही यादी “संपूर्ण आहे काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.