हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे

‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या भरून काढण्यापूर्वी या लेखामागे असणारी आमची मनोभूमिका प्रदर्शित करणे आवश्यक वाटते. हिंदुत्व ही संकल्पना विशिष्ट गटापुरती का होईना रूढ झालेली आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही. हिंदुत्वाच्या प्रचारात काही काळ प्रत्यक्ष भागीदार झाल्यानंतर असे कळून आले की या क्षेत्रात कार्य करणाया कार्यकर्त्यांना समाजकारण वा राजकारण यासंबंधी भ्रांती आहे. कार्यकर्त्यांना हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुतत्त्वज्ञान यांसंबंधी पूर्णपणे अज्ञान असते. बुद्धिवादाचा आश्रय घेणारा, डाव्या विचारसरणीकडे झुकलेला अभ्यासक हिंदू नसतो काय? आमच्या लेखांतून विचारलेले प्रश्न, वा आम्ही केलेले हिंदुत्वाचे प्रतिपादन, हिंदुत्व नाकारण्यासाठी, किंवा हिंदुत्वाचा विरोध म्हणून नसून विचारवंतांनी द्वेषनिरपेक्ष अशी हिंदुत्वाची व्याख्या प्रचारकांना सांगावी याच उद्देशाने आहे. हिंदुधर्म संकल्पना आम्हाला अमान्य आहे. हिंदुत्वाच्या मंडनासाठी आणि प्रचारासाठी, मुस्लिम आणि ख्रिश्चन द्वेषाची भावना तीव्र करण्यापेक्षा तथाकथित हिंदुपरंपरेने जे महान आदर्श घडविले आहेत त्याचे पारायण व्हावे एवढाच आमचा लेखामागचा हेतू.
साम्राज्यवादी धोरणात मुसलमानांकडून हिंदूंवर अत्याचार झाले त्या कथा आपण आवेशाने सांगतो त्याच वेळी पुष्यमित्राने स्वकीय बौद्धांची कत्तल करून त्यांचे स्तूप फोडले अशी ऐतिहासिक घटना सांगितल्यानंतर या ऐतिहासिक घटनेला काही आधार आहे काय? हा प्रा. आचार्य यांचा मार्मिक प्रश्न आहे. प्राचीन भारतीय इतिहासासंबंधीच्या शोधग्रंथात ही घटना दिलेली असतेच. या घटनेला दिव्यावदान हा बौद्ध ग्रंथ आणि तिबेटी इतिहासकार तारानाथ यांच्या विधानांतून पुष्टी मिळते. डॉ. डी. आर. भांडारकरप्रभृतिसंपादित, बी. सी. लॉ, स्मरण ग्रंथ भाग १, १९४५ या ग्रंथात एन्.एन्. घोष यांनी ‘Did Pushyamitra Sunga Persecute the Buddhist?’ या मथळ्याखाली एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्यात ‘यो मे श्रमणशिरो दास्यति तस्याहं दीनारं शतं दास्यामि (जो मला भिक्षुचे एकमस्तक अर्पण करील त्याला मी शंभर दिनार अर्पण करीन) (दिव्यावदान) आणि ‘Taranath the Tibetan Historian also testifies the killing of shramanas and burning of Buddhist monasteries by Pushyamitra’, (पान २१५) असे दोन स्रोत त्यांनी दिलेले आहेत. सांची स्तूपाची प्रवेशतोरणे आणि कठडे शृंग कालातील असता पुष्यमित्राला बुद्धघातकी का ठरवायचे? असा प्रश्न उपस्थित करून, घोष ह्यांनी स्तूपाचे सुंदरीकरण उत्तरशृंग-कालीन आहेत असा शोध घेऊन शेवटी निष्कर्ष काढला आहे : ‘In face of these evidences how can we reject clear litetrary evidences that Pushyamitra persecuted the Buddhists? (पान २१६). पुष्यमित्र शुंगाच्या भिक्षुकत्तलीच्या घटनेत, बौद्धमूर्तीचा मारुती केला ही घटना अंतर्भूत झाल्यासारखी वाटते. इथे कालविपर्यासाचा लेखनप्रमाद घडून आला आहे हे मान्य. पण पुरातत्त्वीय शोधांमध्ये बौद्ध मूर्तीचे रूपांतर तथाकथित हिंदुधर्मात पूजनीय असणार्यात देवतांच्या मूर्तीत झाल्याची उदाहरणे आहेत. रघूजी भोसल्यांनी बंगालवर स्वाध्या केल्या त्यांचे आम्ही मूल्यांकन केलेले नाही. साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नात हिंसा, अत्याचार, जाळपोळ अपरिहार्य असते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट जमातीला दूषणे देण्यात पक्षपाती भूमिका घेतली जाते एवढेच आम्हाला सुचवायचे होते. नागपूरकर भोसल्यांवर माधवराव पेशवे ह्यांनी स्वारी करून नागपूरकरांना अक्षरशः लुटून नेले, नागपूरची धूळधाण केली (इ.स. १७६८), या घटनेत अलिवर्दीखानासारख्या एखाद्या मुस्लिम सुभेदाराच्या विरोधात राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन पेशव्यांनी महान् कार्य केले असे म्हणावयाचे काय? अलिवर्दीखानाकडून लूटमारीनंतर रघूजीने खंडणी वसूल केली. नागपूरच्या भयंकर लूटमारीत पेशव्यांनी जानोजीकडून खंडणी वसूल केली. पेशवे-भोसले यांच्यातील संघर्ष हा जातीय संघर्प नसून सत्तासंघर्ष होता असे म्हणावयाचे आणि मुसलमानांच्या आक्रमणाविषयी वेगळे निकष लावून तिथे राष्ट्रीयत्वाचा शोध घ्यावयाचा हा अतिशय अप्रामाणिक इतिहास होतो. पेशव्यांच्या काळातील लूटमारीची वर्णने प्रा. धोंड यांच्या ‘मराठी लावणी’ या ग्रंथातून उतरवून दिलेली आहेत. धोंड ह्यांच्या संशोधनावर आक्षेप घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. पुराव्याशिवाय प्रा. धोंड पेशवाईसंबंधी विधाने करणार नाहीतच. आम्ही स्रोत दिला असल्यामुळे त्यांचे मूळ स्रोत सांगण्याचे उत्तरदायित्व प्रा. धोंड ह्यांच्यावर सोपवावे लागेल. आम्हाला आमच्या पुरता प्रा. धोंड ह्यांचे लेखन हा विश्वसनीय पुरावा वाटतो. शंकराचार्यासंबंधी आमच्या विधानाने प्रा. आचार्य अस्वस्थ झाल्यासारखे वाटतात. धर्मपीठावरील हे सारे आचार्य सरंजामी सरदाराप्रमाणेच असतात. लोकांच्या श्रद्धांचा लाभ उठवून, नवस फेडणे, पूजा पाठ करणे, पाद्यपूजेची भरमार दक्षिणा घेणे, दानपेटीतील दान, या मागे श्रद्धाळू मानवाची पिळवणूकच असते. मठांच्या धनार्जनाची साधने, मठांचे वैभव, मठांच्या आचार्याचे ऐश्वर्यपूर्ण जीवन, आणि सामान्य मानवाची श्रद्धेच्या माध्यमातून होणारी पिळणूक हा संपूर्ण विपये सामान्य
वाचकाच्या परिचयाचा असताना शंकराचार्यांची पाठ राखण्याची आचार्यांना गरज नसावी.. तरीपण शंकराचार्यांचे धार्मिक प्रचाराचे आणि समाजसुधारणेचे वा समाजप्रबोधनाचे कार्य आणि मठांची सांपत्तिक स्थिती आणि त्यांचे स्रोत, आणि मठाद्वारे झालेली लोकोपयोगी कृत्ये यासंबंधी आचार्यांनी लेखातून प्रकाश टाकल्यास या आचार्याविषयीचे (शंकराचार्य) मत अनुकूल होऊ शकेल. पण आमच्या लेखात मठ आणि आचार्य यांचा जो निर्देश आला आहे त्यात आम्हाला फक्त शंकराचार्यांचेच मठ आणि कार्य अभिप्रेत नसून, हिंदुत्वाच्या प्रचाराचे उत्तरदायित्व ज्यांच्यावर आहे, ते आचार्य मठाच्या बाहेर निघत नसतात, ज्ञानेश्वरी आणि दासबोधाच्या पलीकडचे बोलत नसतात, सामान्य मानवांच्या जीवनविषयक प्रश्नांशी त्यांना देणे घेणे नसते, असे ठामपणे सुचवायचे आहे.
शैववैष्णवांनी परस्परांची मंदिरे फोडली हे वाक्य मात्र लेखात अकल्पित आलेले
आहे. लेखाच्या टाचणात परस्परांच्या जिवावर उठले होते असे होते. प्रसिद्धीकरता दिलेल्या लेखात हे वाक्य यावयास नको होते. या चुकीबद्दल खेद व्यक्त करतो. पण या विधानांनाही केव्हातरी आधार देण्याचा प्रयत्न करू. प्रा. आचार्यांचा पुन्हा प्रश्न राहणारच. जिवावर उठले याला पुरावा काय? द. वा. जोग यांच्या ‘भारतीय दर्शनसंग्रह या ग्रंथातील पृष्ठे ३८८, ४५२, ४५५ यातून हा बोध होऊ शकतो.
सैंधवी सभ्यतेतील शृंगधारी देवतेची प्रतिमा चंद्राची असावी हा आमचा तर्क आहे. आचार्यांनी हे विधान उचलून धरायला पाहिजे होते. कारण चंद्रपूजक म्हणजे हिंदु हीच व्याख्या हिंदुत्ववाद्यांना अतिशय सोयीची आहे. या व्याख्येनुसार हिंदुत्व हे ईजिप्त, सुमेरिया या संस्कृतीच्या कालखंडाइतकेच प्राचीन ठरते. सैंधवी सभ्यतेतील शृंगधारी देवता ही पशुपती शिवाची असावी असा अंदाज सर जॉन मार्शल ह्यांनी केलेला आहे. साहेबाने सांगितले तेच अंतिम सत्य समजायचे? The Cult of Brdliunia ह्या ग्रंथात शृंगधारी देवता ब्रह्मणस्पती असावी असेही सिद्ध केलेले आहे. कारण ऋग्वेदात बृहस्पती ही शंगधारी देवता आहे असा निर्देश आहे. शृंगधारी देवता चंद्र आहे असे मत मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. प्रमाणांनी तो चूक ठरविला जाऊ शकतो. त्यासाठी ग्रीकांच्या प्राचीन मिनोअन संस्कृतीचे प्रमाण ठेवण्याची गरज नाही. तसाच जर शोध घेतला तर मिनोअन संस्कृती आशिया मायनर ने संस्कारित केली आहे. आणि सुमेरिया-बॅबिलोनिया या संस्कृती सैंधवी संस्कृतीशी जवळचे नाते सांगतात. क्रीट संस्कृतीची जडण घडण बॅबिलोनियाच्या संस्काराने झालेली आहे. क्रीटन संस्कृतीतील राजा Minos हाच वृषभावतार होता आणि त्याचा सावत्र पुत्र मायनाटोर हा वृषभमानव होता ही कथा ग्रीक पुराणात आहे. कथा सांगणाच्या पुराण चित्रकृतीत मायनॉटोर वृषभमानव दर्शविला आहे. शृंगाचा संबंध वृषभाशी असावा असे ज्यावेळी आचार्य म्हणतात त्यावेळी वृषभ हा सोमाचे प्रतीक असतो हे लक्षात घ्यावे लागते.‘सोम की तुलना प्रायः वृषभ से की गई है, और उसे नंदी कहा गया है’. नंदी शिव कावाहन बन जाता है (पान ३०८). सोम को चंद्रमा से अभिन्न माना जाता है (पान ३०७). सोमको चंद्रमा के रूप में प्रतिष्ठित मान लिया जाता है (पान ३०७). हडप्पा की मुहरों पर अंकित एकशेंगी वृषभ (Unicorn) का अर्थ सोम है (पान ३०५). महादेवन् अपने एक अध्ययन में इस नतीजे पर पहुंचते हैं कि हडप्पा सभ्यता में सोम का प्रचलन था (३०५). सोम समस्त जगत् का राजा मान लिया जाता है (पान ३०७). सोम पूजा से संबंधित जो रुद्र, सोम केअभिन्न संबंध के कारण सोमनाथ के रूप में पूजा जाने लगा (पान ३११). हिमालय की चोटियों पर जमी बर्फ की तरह रुद्र या शिव के शिखर पर सोम को चंद्रमा के रूप में प्रतिष्ठित मान लिया जाता हैं (पान ३०७). ही अवतरणे ‘हडप्पा सभ्यता और वैदिक साहित्य या भगवानसिंह लिखित शोध-ग्रंथातून दिलेली आहेत (१९९१), ‘Cult objects on unicorn seals’ हा महादेवन्चा शोधनिबंध आहे. यूनिकॉर्न समोर असणारे भांडे सोमपूजेशी संबधित आहे असे महादेवन सांगतात.‘सोमो वै चन्द्रमाः’ असे शतपथ ब्राह्मण ग्रंथात नमूद आहे.’प्रजापतिः वै चंद्रमाः’ असाही या ग्रंथात निर्देश असून त्याची उच्च राशी वृषभ आहे. म्हणजे चंद्राचा वृषभाशी संबंध येतोच. वृषभ हे चंद्राचे प्रतीक ठरते. त्यामुळे सैंधवी संस्कृतीत चंद्रपूजा अस्तित्वात होती या आमच्या विधानाला प्रमाणे मिळतात. रुद्रपूजा आणि चंद्रपूजा या दोन प्रमुख उपासनापंथांच्या सोबत सूर्यपूजा, वृक्षपूजा, अग्निपूजा, पशुपूजा, मातृकापूजा अस्तित्वात नव्हत्या असे समजण्याचे कारण नाही. सैंधवी सभ्यतेतील अवशिष्ट यज्ञकुंडे ही उत्तरकालीन आहेत असा पुरातत्त्ववेत्यांचा शोध आहे. आचार्यांनी ग्रीक पुराणकथेतून माइनोटार आणि थीस्यूस यांच्यासंबंधी जी कथा दिली आहे तिच्यावरून एवढेच म्हणता येते की अथेन्सच्या पौराणिक कथेचा नायक Theseus याने क्रीट बेटावर वर्चस्व प्रस्थापित करून वृषभाचा अवतार असणार्याe मिनॉसच्या वंशाचे वर्चस्व संपविले. कारण माइनोटारच्या मृत्यूनंतर Theseus ने मिनॉसच्या कन्येशी विवाह केला. या संपूर्ण पुराणकथेचा सैंधवी सभ्यतेतील चंद्रपूजनाच्या अस्तित्वाच्या तर्काला बाध येत नाहीच. पण John Pinsent यांनी ग्रीक पुराणावर लिहिलेल्या अतिशय सुमार ग्रंथातील चित्रमय पुराव्यातून क्रीटन सभ्यतेत शृंगधारी देवता आढळत नाहीत हे तेवढेच लक्षणीय. शृंगधारी देवतांचे पुरावे Minos पूर्व कालखंडातील असण्याची शक्यता आहे. क्रीट बेटातील उत्खननातून प्राचीन मीन संस्कृतीचे जे अवशेष प्राप्त होतात, त्यांचे सैंधवी संस्कृतीतील अवशेषांशी साम्य आहे. ‘The composition of proto-Indian population does not excessively differ from that of Crete हे Hronzy या संशोधकाचे विधान महत्त्वाचे ठरते. कर्टीयसच्या मतानुसार मीन दर्यावर्दी असून त्यांनी मकरानच्या किनार्यांवनी प्रवास करून क्रीट बेटात वसाहत प्रस्थापित केली होती. तात्पर्य हेच की क्रीट बेटातील प्राचीनतम मीन संस्कृतीचा उद्गम सैंधवी संस्कृतीच्या दिशेने वळला आहे. त्याअर्थी शृंगधारी देवतांविषयी पुनर्विचार करावा AUT. ‘The moon god Sin in well known in Sumerian Pantheon. The highregard for the moon in Summerian relegion evidently came in organised expedition by Persian gulf. The important cult centre of moon god in Mesopotomia was Harran.’ (New Eastenm Mythology, by John Grey, P. 21)
सुमेरिया, बॅबिलोनिया या वाटेने चंद्रपूजेच्या प्रसाराचे लोण आशिया मायनरने जी क्रीट संस्कृती समृद्ध केली त्या संस्कृतीत चंद्रपूजा अस्तित्वात नसावी असे समजायचे काय? भारतीय भूखंडावर राज्य करणार्याक यवन राजांच्या शिक्क्यांवर चंद्रदेवतेची चित्रे कोरली असून त्या ग्रीक चंद्रदेवता आहेत. तात्पर्य सिन् म्हणजे चंद्र. सिन्धु हे प्राचीनकाळचे चंद्रपूजक, आणि त्या अर्थाने हिंदुधर्म हा चंद्रपूजकांचा धर्म म्हणून मान्य करण्यात परंपरेला कुठेही बाध येत नाही. मा. श्री. रिसबूड यांच्या पत्राला पुढील पत्रात उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.