“हट्ट”

आनंद दत्तात्रय मुठे हट्टी होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आईपाशी हट्ट धरला, ‘खर्यारखुर्याह’ क्रिकेट बॅटसाठी. आई म्हणाली, “चारशेची आहे ती! चल, हट्ट न करता शहाण्या मुलासारखी दहा रुपयेवाली फूटपाथवरची बॅट घे.’ आनंद ऐकेना, म्हणाला, “मी श्वास कोंडून धरणार, खरीखुरी बँट मिळेपर्यंत’. दम कोंडून तो लालनिळा झाला, पण बॅट मिळाली.
पंधरा वर्षाचा असताना त्यानं व्हिडिओ गेम सिस्टिम’ साठी हट्ट धरला. मोठा भाऊ म्हणाला, चार हजाराचा आहे तो! चल, हट्ट न करता शहाण्यासारखा शंभर रुपयांचा ‘लोगो’ घे.’ आनंद ऐकेना. म्हणाला, “मी अभ्यासच करणार नाही. नापास होईन’. एकदा नाही, दोनदा दहावीत गचकला, पण गेम सिस्टिम मिळाली.
पंचवीस वर्षांचा असताना त्यानं मोटरसायकलसाठी हट्ट धरला. वडील म्हणाले, ‘चाळीस हजाराची आहे ती! चल, हट्ट न करता लूना घे, आठ हजारांची’. आनंद ऐकेना. म्हणाला, “मी त्या पलिकडच्या मठ्ठ मंदाशी प्रेम करीन’. प्रेमच काय, एंगेजमेंटही झाली, पण मोटरसायकल मिळाली-वर एंगेजमेंट मोडायचे दहा हजार!
पस्तिसाव्या वर्षी आनंदनं अमेरिकेला जायचा हट्ट धरला. आई, वडील, भाऊ, सारे म्हणाले, ‘चार लाख लागतात त्याला! चल, एम्.ए. कर, इथल्या इथे’. आनंद ऐकेना. म्हणाला, “मी हलणारच नाही इथून, तुम्ही हो म्हणेपर्यंत’.
आता विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा पृष्ठभाग तासाला सोळाशे किलोमीटर वेगानं फिरतो. नागपुरात असेल वेग, चौदाशे किलोमीटर, ताशी. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, जवळपास एकोणतीस किलोमीटर सेकंदाला, या वेगानं आणि सूर्य एका व्हेगा नावाच्या ताच्याकडे जातो, जवळपास सेकंदाला वीस किलोमीटर वेगानं. आणि याचवेळी सूर्य आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरतो, सेकंदाला दोनशेऐंशी किलोमीटर वेगानं. आणि आकाशगंगा इतर साच्या तारामंडळांपासून दूर जात असते, वेगवेगळ्या वेगांनी – म्हणजे एखादं तारामंडळ जितकी लक्ष प्रकाशवर्ष दूर असेल, तितक्यांना दहानी गुणून येतात, तेवढे किलोमीटर दर सेकंद, अशा वेगांनी.
आणि बाळांनो, या सार्यांनचा परिणामी वेग खूप, खूप जास्त आहे. पण आनंद त्या जागेवरून हलेच ना! बरी अद्दल घडली!
मार्च ९६ च्या आ.सु. मध्ये स.ह. देशपांडे यांचे ‘मंत्र अधिक आर्सेनिक म्हणजे धर्म’, आणि असे धर्म विवेकाशी सुसंगत असतात, वगैरे वाचून वर दिलेली स्टीफन गोल्डिन या लेखकाची “स्टबर्न” (हट्टी) ही विज्ञानकथा आठवली. नेमका संबंध तुम्हीच ठरवा. आनंदने आपला हट्ट करण्याचा मंत्र कोणत्याही निसर्ग- नियमाच्या आर्सेनिकशिवाय वापरला, आणि भिरभिरत गेला.
मंत्राने आर्सेनिकशिवाय बकर्या् मारल्या, किंवा आर्सेनिक खाऊनही बकर्यांिना जगवले, तरच त्या मंत्राला अर्थ आहे, आणि असे नसताना मंत्र ‘विवेक-सुसंगत” कसाआणि कुठे?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.