स्त्रीविषयी मनुस्मृतीचे मत

अस्वतंत्राः स्त्रियः कार्याः पुरुषैः स्वैर्दिवानिशम्
विषयेषु च सञ्जत्यः संस्थाप्या आत्मनो वशे॥२॥
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थावरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ॥३॥
पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोऽटनम्।
स्वप्नोऽन्यगेहवासश्च नारी संदूषणानि षट् ॥१३॥
नैता रूपं परीक्षन्ते नासां वयसि संस्थितिः।
सुरूपं वा विरूपं वा पुमानित्येव भुञ्जते ॥१४॥
(भयदि तिच्या पुरुषांनी स्त्रीला, दिवसरात्र आपल्या अधीन ठेवले पाहिजे. अनिषिद्ध अशा रूपादि विषयांतही तिला आपल्या वशात ठेवले पाहिजे. कौमार्यवस्थेत तिचे रक्षण पिता करतो, यौवनात पति करतो, तर वार्धक्यात पुत्र तिचे रक्षण करतात…. मद्यपान, दुर्जनांची संगत, पतीपासून दूर राहणे, भटकणे, झोपणे, परगृहनिवास हे सहा नारींचे दोष आहेत. त्या पुरुषाचे रूप पाहात नाहीत, वयाचा विचार करीत नाहीत. तो सुस्वरूप, विरूप कसाही असला तरी पुरुष म्हणून त्याचा उपभोग घेतात.)
मनुस्मृति, अध्याय ९