विक्रम, वेताळ आणि समान नागरी कायदा

वेताळ : राजा, आजच्या सुधारकाचा ‘समान नागरी कायदा विशेषांक’ वाचलाच असशील ना? विक्रम : (गर्वाने) हो, तर! मी तर ताबडतोब माझ्या कायदेमंत्र्याला सांगून एक ‘आदर्श’ असासमान नागरी कायदा राज्यात लागूही केला. विद्वानांच्या सूचना मी नेहमीच तत्परतेनेअंमलात आणतो.
वेताळ: राजा, तू विद्वानांच्या सूचनाच फक्त अंमलात आणतोस, की त्याप्रमाणे केलेले कायदेहीअंमलात आणतोस?
विक्रमः (गडबडून) मला समजला नाही, तुझा प्रश्न.
वेताळ: (एक दीर्घ उसासा टाकून) म्हणजे तुला प्राथमिक शाळेतल्या नागरिकशास्त्राचे धडे पुन्हाघालून द्यायला हवेत! ऐक. समाजाने पाळायचे कायदे स्पष्टपणे घडवणे, त्याकायद्यांप्रमाणेसमाजाला वागायला लावणे, आणि जे लोक कायदे तोडताना दिसतात त्यांना न्याय देणे; या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या तीन बाबींची जबाबदारी तीनवेगवेगळ्या यंत्रणांवर टाकण्यात यावी, असा जगभरातला प्रघात आहे.
विक्रम : मला ते माहीत आहे रे. मी जरी सामंतशाही ‘राजा’ असलो, तरी मी जबाबदार्यां्चेहे त्रिविध वर्गीकरण पाळतोच माझ्या राज्यव्यवहारात.
वेताळ : आणि तिन्ही यंत्रणा नेमून दिलेली काम नीटपणे करतात?
विक्रमः अर्थातच!
वेताळ : तर मग तुझ्या राज्यात कोणत्याच पुरुषाला दोन बायका नसणार; कारण तू मागेच
द्विभार्याप्रतिबंधक कायदा केला होतास, होय ना?विक्रमः (दोन बायका असलेले अनेक आजी-माजी मंत्री, कलाकार, उद्योगपती यांची नावेआठवून गप्प राहतो).
वेताळ : आणितुझ्याराज्यातगरोदरस्त्रियांचेगर्भजलपरीक्षणकरूनजरत्यातपासातमुलगीहोणारअसल्याचेकळले, तर गर्भपात करवून घेणेही होत नसणार.
विक्रमः (राजाच्या डोळ्यासमोर राजपथावरचे एक भित्तिपत्रक येते, “आज पन्नास हजार खर्चकरून भविष्यातला पाच लाखांचा खर्च टाळा!” राजाने चौकशी केली असता त्याला सांगितले गेले होते, की आज पन्नास हजारात गर्भजलपरीक्षा घेता येते. जर मुलगी होणार असे कळले तर ‘पोट पाडण्याचा खर्चही यातच केला जातो. पण जर मुलगी झाली, तर मात्र शिक्षण, हुंडा, ‘सालंकृत कन्यादान’ वगैरेंसाठी पाच लक्षांची तरतूदकरावी लागते! हे सारे वेताळाला सांगणे सोईचे नसल्याने राजा गप्पच राहातो!)
वेताळ : तुला वसंत साठे या माजी मंत्र्याची वक्तव्येही आठवतच असणार, की विद्वानांच्याहट्टापायी गर्भजलपरीक्षेवर बंदी आणणारा कायदा केला, पण त्याची अंमलबजावणीकरायची शासनाला मुळीच इच्छा नाही. आठवते ना, हे सारे?
विक्रम : असे बोलायचे ते, म्हणून तर त्यांचे मंत्रिपद गेले!
वेताळ : स्वतःला फसवू नकोस, राजा. वसंत साठ्यांचे मंत्रिपद या कारणाने मुळीच गेले नाही.आणि मंत्रिपदगेल्यावरहीत्यांनामंत्रिपदाला‘समकक्ष’असेसंस्कृति-रक्षक-पददिलेगेले आहे.बरे,साठ्यांना ‘खरे बोलण्याचे’ गुण तरी दे, स्वच्छता आणिशुद्धलेखनाच्या मार्कासारखे! तू स्वतःला फसवतो आहेस, साठे नाहीत.
विक्रम : (वैतागून) तूच सांग, काय करू ते! ज्यांनी कायदे पाळले जातील हे पहायचे, तेच असेकोडगेपणाने बोलत सुटतात!
वेताळ : (शांतपणे) पुन्हा चुकतोयस, राजा! त्यांचा रोख होता, की गर्भजलपरीक्षा थांबवायचीयंत्रणाच उपलब्ध नाही. अशा परीक्षेशिवाय गर्भपात तर इतिहासात सदासर्वदा होतच आहेत. पण जाऊ दे, ते गर्भजल. होतायत अनेक वैदू आणि वैद्य ‘गर्भ’श्रीमंत, तर होऊ देत. तेही प्रजाजनच आहेत तुझे!
विक्रम: मला म्हणाले असते साठे तर मी केली असती सोय, कायदापालन-यंत्रणेची.
वेताळ : ‘ म्हणजे रहदारीचे नियम पाळायला ‘ट्रॅफिक पोलीस’ उभारलेस, तशी यंत्रणा?
विक्रम : हो!… नाही, तशी नाही. त्यापेक्षा चांगली.
वेताळ : काय झाले, राजा?तुला काहीतरी डाचते आहे, असे दिसते.
विक्रम : (राजाला साधेसाधे रहदारीचे नियमही न पाळणारे प्रजाजन आठवतात. हा उर्मट“कायदेभंग”स्थितप्रज्ञपणे पाहणारे ट्रॅफिक पोलीस आठवतात. नियम तोडल्याने दररोज होणारी प्राणहानी, वित्तहानी आठवते. एकूण रहदारीची अकार्यक्षम सुस्ती आठवते. जरा नेटाने या सार्या, ‘सत्यांना सामोरे जात राजा म्हणतो) काय करावे माझ्या प्रजाजनांना? त्यांना रहदारीचे नियम त्यांच्या भल्यासाठी, सुरक्षेसाठी, वेगवान हालचालींसाठीच केलेले आहेत, हेही नीट कळत नाही! आणि पोलीस यंत्रणा तर नेहमीच “आम्ही कुठेकुठे पुरे पडणार?” असे म्हणत निष्क्रिय होते आहे. छे! लोकांचास्वार्थीपणा फारच वाढला आहे, या कलियुगात!
वेताळ : राजा! राजा! शांत हो! बावचळून जाऊन वाटेल ते बोलू नकोस. अगदी तुझ्याआठवणीतही या राज्यात सायकलीवर दोघांनी बसणे, स्कूटरवर पुढे लहान मुलांना उभे करणे, रात्री बिन-दिव्याचे वाहन चालवणे, वगैरे गोष्टींना बंदी होती. एकेक करून तू आणि ते कायदे करणारे लोक यांनीच त्या साध्या ‘बंद्या’ उठवल्या-कधी स्पष्टपणे तर कधी ‘कानाडोळा करा’ अशा सूचना पोलिसांना देऊन. तुझीच री ओढत आज सर्वच राजकारणी लोक कायदे मोडायची भाषा करतात. मला वाटते याची उदाहरणे द्यायची गरजनसावी. वेताळा! बरा तावडीत सापडलास! आता मी तुला प्रश्न विचारतो, की ‘याला काय उपाय?’ तुला उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर माझे जे होणार होते, तेचतुझेही होईल!
वेताळ : राजा, आपल्या मागील संभाषणांचे सूत्र धरून मी एक उत्तर सुचवू शकतो, कीप्रजाजनांचे ‘सुशिक्षण’ करून त्यांना पटवून द्यावे की सारे कायदे तुमच्या भल्यासाठीच आहेत. पण याला वेळ लागणार. तुमच्या मागच्या अदूरदृष्टीने उत्पन्न झालेले प्रश्न आज दूरदृष्टीने सोडवायचे, तर निदान एकदोन पिढ्या जाव्या लागतील. मला वाटते की तुलायेवढ्या दूरदृष्टीची सवय नाही. तुला ‘झटपट’ उत्तर हवे असणार, होय ना?
विक्रम : मला खरोखरीच मरण्यापूर्वी एकदा तरी कायद्याचे राज्य पहायचे आहे, रे! तू मलाबिरबलाच्या खिचडीसारखी अपार फुरसतीने होणारी सुधारणा सुचवू नकोस, प्लीज! वेताळ : मला तरी ‘खरी’ उत्तरे कशी सुचणार?पण एक शक्यता वाटते, ती तुला सांगतो.
आम्ही निवडणुकीत मते देऊन ‘विधायकांची निवड करतो. हे विधायक ‘विधेयके मांडून त्यांचे कायदे करतात. आता याच विधायकांपैकी काही जण मंत्री बनून कायद्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख करतात. म्हणजे तीन यंत्रणांपैकी कायदे करणारीआणि ते लागू करणारी, या यंत्रणा बहुतेक वेळी एकाच व्यक्तीमार्फत काम करतात.
जर कायदे कठोरपणे लागू केले, तर जनता ‘रुसेल’ आणि आपले विधायक-पद जाईल, या भीतीने मंत्रिगण स्वतःच केलेले कायदे अंमलात आणायला कचरतात. उलट “गरीब जनतेने सायकलवर डबलसीट जाण्यात काही गैर नाही. त्यांना कुठे दोन सायकली परवडतात?” असले पोकळ युक्तिवाद करून कायद्याचा शक्तिपात करण्यात विधायक-मंत्र्यांचाच पुढाकार असतो.
कायदे करणारी यंत्रणा ही कायदे लागू करणार्या यंत्रणेपासून ‘पुरेशी’ सुटीझालेली नाही, असे वरकरणी तरी वाटते. पटते का तुला, हे?
विक्रमः चला! प्रश्नांना उत्तरे शोधणे किती कठीण असते, हे तुलाही जाणवले, तर! आताआपण असे करू. – समान नागरी कायदा विशेषांक काढणाच्या त्या आजच्यासुधारकांनाच प्रश्न विचारू, की कायदे पाळले जातील यासाठी काय करावे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.